You are currently viewing मूलांका प्रमाणे अंकांची वैशिष्टये

मूलांका प्रमाणे अंकांची वैशिष्टये

कोणत्याही महिन्याच्या १ ते ३१ तारखेपर्यंत आपला जन्म होतो. अंकगणितात मग आपला मूलांक कोणता आहे ह्याचा विचार केला जातो.

खालील प्रमाणे तक्ता पाहिला तर आपला मूलांक हा तेथे गृहीत धरला जातो. पण एकाच मूलांक वर लाखो व्यक्ती जन्म घेत असतात. आणि त्यात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या जीवनावर वेगवेळे प्रभाव पडत असतात. जसे १,१०,२९,२८ ह्या वेगवेगळ्या तारखेवर जन्म घेणाऱ्या व्यक्तीचा मूलांक हा एक असेल पण सर्वाना सारखे फळ मिळणार नाही. खालील टेबल मध्ये हेच दाखविले आहे. सर्वात शेवट चा तिसरा दर्जा पहा त्यात त्या तारखांना जन्म घेणाऱ्या व्यक्तींना जरा आधी च्या तारखांपेक्षा कमी फळ आणि संघर्ष जास्त असेल.

मुलांक दर्जा

मूलांक १- १,१०,१९,२८

वर दिलेल्या तक्त्यात १,१०,१९,२८ तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्ती सर्व सूर्याच्या अधिपत्याखाली येतात. आणि सर्वांचा मूलांक १ असतो. पण सर्वाना १ मूलांकाची सारखी फळे मिळणार नाहीत त्यासाठी त्याचा पाहिला दर्जा दुसरा आणि तिसरा दर्जा पहावा लागेल.
सर्वात पाहिला दर्जा हा १९ ला देण्यात येईल. कारण येथे सूर्य (राजा) आणि ९ सेनापती मिळून त्या व्यक्तीला फार प्रसिद्धी देतील. त्याच्याकडे चांगली लीडरशिप असेल. राजकारणात म्हणून अशा व्यक्ती फार प्रसिद्धी मिळवू शकतील. अधिकार प्राप्ती सहज मिळविताना दिसतील.

कोणाच्या हाताखाली काम करणारे नव्हेत. नेहमी रॉयल पणा ह्याच्यात दिसून येतो. म्हणून जेव्हढे यश हे १९ ला जन्म घेणाऱ्या व्यक्तीला १ मूलांक आहे म्हणून मिळेल तेव्हढे १० आणि २८ वाल्याना त्याच्यापेक्षा कमी कमी मिळू शकेल.

सर्वात तिसरा दर्जा हा २८ ला दिलेला आहे म्हणून ह्या तारखांना जन्म घेणाऱ्या व्यक्तींना जीवनात संघर्ष असतोच. कारण २ हा चंद्र आणि ८ हा शनी येथे मिळून त्यांच्या जीवनात आधी अपयश येते नंतर खूप संघर्ष करून ह्या व्यक्ती पुढे जातात. सहज काही गोष्टी मिळताना फार कठीण होऊन बसते.

१ मूलांक किंवा भाग्यांक ह्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/1-number-driver-or-conductor-in-numerology-in-marathi/

मूलांक २- २,११,२०,२९

वरील तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्ती चंद्राच्या अधिपत्याखाली येतात आणि सर्वांचा मूलांक २ होतो. पण सर्वाना चंद्राची जी काही फळे आहेत हि वेगवेगळी अनुभवावी लागतील. त्यात सर्वात पाहिला दर्जा हा ११ नंबर ला दिला आहे २ सूर्य मिळून हा अंक तयार होतो म्हणून
खालील चांगली फळे ह्यांना जास्त अनुभवास येतात. चंद्र हा एका आकाराचा नाही म्हणून अशा व्यक्ती मुडी असतात. मानसिक स्थिरता मिळविताना कठीण होते. मुव्हमेंट जास्त, धावपळी खूप होतात, दिसायला सुंदर, चंद्र सारखा चेहरा, फॅमिलीला धरून चालतात, खूप सपोर्टिव्ह असतील किंवा सपोर्ट घेणारे सुद्धा दिसतील, मिळून मिसळून वागणारे सुद्धा किंवा खूप त्रास झाला कि एका कोपऱ्यात दिसतील.

२ आणि २० ला जन्म घेणाऱ्या व्यक्तींना ११ पेक्षा कमी फळे मिळतील आणि २९ तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्ती ह्या तिसऱ्या दर्जा खाली येतील म्हणून अशा व्यक्तींना खूप त्रास होताना पाहिला गेला आहे. २ चंद्र आणि ९ मंगळ — २ चा शत्रू ९ आहे म्हणून अशा व्यक्तींच्या जीवनात खूप संघर्ष मिळेल. आनंद कमी कष्ट जास्त. खास अशा व्यक्तींना वैवाहिक सुखाची फळे कमी मिळताना दिसतील म्हणून सल्ला असा दिला जातो कि कधीही आपल्या ८,४,९ मूलांक किंवा भाग्यांक व्यक्तीशी विवाह करू नये झालाच असेल तर स्वतःच्या मूलांक आणि भाग्यांक ला बॅलन्स करून घेणे. त्यासाठी कोणत्याही नुमरोलॉजिस्ट ची मदत अवश्य घ्या.

२ मूलांक किंवा भाग्यांक ह्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/2-number-mulank-bhagyank-in-marathi/

मूलांक ३- ३,१२,२१,३०

ह्या तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्तींवर गुरु चा प्रभाव असेल कारण ह्या सर्वांचा मूलांक ३च असेल पण गुरु चे परिणाम कसे वेगवेगळे बसतील हे पाहू. १२ तारखेला इथे पहिला दर्जा देण्यात येईल कारण १- सूर्य आणि २- चंद्र (राजा+ राणी) त्यामुळे ह्या तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्तींना जेव्हढी चांगली चांगली फळे गुरु ची मिळतील तेव्हढी दुसरा दर्जा २१ आणि तिसरा दर्जा ३ आणि ३० तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्तींना मिळणार नाहीत. दुसऱ्या दर्जा २१ ला दिला आहे कारण इथे प्रथम राणी आहे आणि नंतर राजा सूर्य मागे आहे. आणि तिसरा दर्जा हा ३ आणि ३० ला दिला आहे कारण ३ ला कुणाचा सपोर्ट नाही.

मूलांक ३ च्या वक्तींमध्ये नॉलेज ची भूक असते. शिक्षण चांगले होते, इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हिटी चांगली असते, चांगले शिक्षक होऊ शकतात, जीवन सात्विक असते, समाजात मार्गदर्शक म्हणून कामे ह्यांना जमतात, ऑकल्ट सायन्स मध्ये हे मास्टर असतात, जसे ज्योतिषी, रेकी,टॅरो,वास्तुतज्ञ वगैरे क्षेत्रात अशा व्यक्ती जरूर पाहण्यात येतात. ह्यांना असा सल्ला दिला जातो कि अशा व्यक्तींनी कधीही नॉनव्हेज खाऊ नये. जीवनातील बरीच ध्येय गाठण्यास मदत होईल.

३ मूलांक किंवा भाग्यांक ह्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/3-number-mulank-bhagyank-in-marathi/

मूलांक ४- ४,१३,२२,३१

ला जन्म घेणाऱ्या व्यक्तींचा मूलांक हा ४ असतो आणि त्यावर राहू चा प्रभाव असतो. पण सर्वात पहिला दर्जा हा २२ ला देण्यात येतो कारण हा एक मास्टर नंबर आहे. नंतर ३१ ला बी, ४ ला सी, आणि १३ ला डी दिला जात आहे.

म्हणजे सर्वात जास्त फळे हि २२ ला जन्म घेणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसतील. ३१ ह्यां अंकात गुरु आणि सूर्य आहेत ह्यात प्रथम गुरु आहे आणि राजा मागे आहे म्हणून बी, ४ एकटा आहे म्हणून सी, आणि १३ ला जरी सूर्य हा पुढे आणि गुरु मागे दिला आहे पण हा १३ अंक कार्मिक नंबर म्हणून मानला जातो. आपणास माहित असेल कि बऱ्याच देशांत जिथे नूमरोलॉजि ला जास्त मान्यता दिली जाते तिथे १३ अंक हा अशुभ मानतात. तिथे फ्लॅट नंबर, १३ अंकाचा मजला, हॉटेल मध्ये १३ नंबरचे टेबल सुद्धा वापरात आणीत नाहीत. १३ अंकावर हर्षल चा सुद्धा खूप प्रभाव असतो.

४ मूलांक असणाऱ्या व्यक्ती ह्या कुणाच्या हाताखाली काम करताना दिसत नाहीत, करत असतील तर ते आपल्या मर्जीने त्या कामाचे स्वरूप ठरवित असतात, लॉजिकल असतील, डिसिप्लिन च्या बाबतीत हे नंबर एक असतील, पण ह्यांच्या जीवनात सतत संघर्ष आणि रिलेशन ह्याचे उपद्व्याप जरूर असतील. पैसे मिळविण्यासाठी हे घराबाहेर, जन्मस्थळापासून दूर जाऊन प्रगती करताना दिसतात.
लवकर राग येणे, अर्ग्युमेण्ट करणे, सिक्रेटिव्ह असणे, गोष्टी लपविण्यामध्ये ह्यांचा हात असतो.

४ मूलांक किंवा भाग्यांक ह्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/4-number-mulank-bhagyank-in-marathi/

मूलांक ५- ५,१४,२३

वरील तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्तींना ५ अंक मूलांक म्हणून मिळतो आणि ह्याच्यावर बुधाचा अधिक प्रभाव पाहण्यात येतो. सर्वात पहिला दर्जा हा १४ ला दिला आहे कारण इथे सूर्य आणि राहू मिळून जी बुद्धी लागते ती खूप काम करते. २३ ला दुसरा दर्जा कारण इथे राणी आणि गुरु (चंद्र गुरु) आहे आणि ५ ला सी मध्ये ठेवले आहे.

स्वतःच्या मर्जीने कामे करणारे, स्वतःचा हिशोब स्वतः सांभाळणारे, आपल्या जीवनात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत, आयुष्यात खूप चुका सुद्धा ह्यांच्या हातून होताना दिसतात, पण त्यात ते स्वतःला एका विशिष्ट वयात येऊन बॅलन्स सुद्धा करतात , रोमॅंटिक जीवन वगैरे असे गुण ह्यांच्यात दिसतात.
पण जरी इथे १४ ला पहिला दर्जा दिला असलात तरी माझ्या माहिती प्रमाणे ह्यांना वैवाहिक सुख खूप कमी मिळते.

५ मूलांक किंवा भाग्यांक ह्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/5-number-mulank-bhagyank-in-marathi/

मूलांक ६- ६,१५,२४

वरील तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्ती मूलांक ६ म्हणजे शुक्राच्या प्रभावात असतात. तरी वरील तिन्ही तारखेमधील काही फरक असतोच. जसे इथे १५ तारखेला पहिला दर्जा, दुसरा ६ ला आणि तिसरा २४ ला कारण इथे २+४ चंद्र + राहू आपला प्रभाव टाकेल.

जेव्हढे शुक्राचे ग्लॅमर १५ कडे असेल तेव्हढे ६ आणि २४ मध्ये दिसत नाही. अशा व्यक्ती रोमँटिक असतील, मेकअप ला प्राधान्य देणाऱ्या, लक्झरीत राहणाऱ्या, अति हुशारीने वावर करणाऱ्या, आजच्या शुक्र प्रधान युगात कोणत्याही सुखाचा आनंद घेण्यात मागे पुढे न पाहणाऱ्या अशा व्यक्ती असतात. मात्र इथे एक नमूद करावेसे वाटते जर २४ तारखेला एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला तर बऱ्याच वेळेला ह्यांचे वैवाहिक जीवन हे डिस्टर्ब झालेले असते त्यामुळे असा सल्ला देण्यात येतो कि २४ नंबरच्या मूलांक किंवा भाग्यांक असणाऱ्या मुलींनी लग्न करताना अति सावध राहून निर्णय घ्यावा आपली पत्रिका आणि नुमेरो रिपोर्ट जरूर चेक करून घ्यावा.

६ मूलांक किंवा भाग्यांक ह्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/6-number-mulank-bhagyank-in-marathi/

मूलांक ७- ७,१६,२५

वरील तिन्ही तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्ती ह्या केतूच्या प्रभावात येतात कारण त्यांचा मूलांक ७ आहे. वर दिलेल्या तक्त्यात दिनांक १६ ला जन्म घेणाऱ्या व्यक्ती ह्या पहिल्या दर्जाच्या असतील कारण इथे सूर्य आणि शुक्र मिळून १६ अंक बनत आहे. २५ अंक हा चंद्र आणि बुध मिळून बनतो म्हणून १६ ला मिळणारे जेव्हढे चांगले किंवा वाईट परिणाम असतील तेव्हढे २५ अंकाला आणि ७ अंकाला मिळणार नाहीत कारण इथे ७ हा एकटा पडतो.

७ मूलांक च्या अधिपत्याखाली येणारे अति धार्मिक, सात्विक असतील, सर्वांचा मानसन्मान करणारे, जीवनात इतरांसाठी सतत उपयोगी पडणारे, जवळच्या रिलेशन ने सतत पीडित असणारे, जीवनात जास्त फसवणूक झालेले, चिट होणारे, दानी, अभ्यासू, सतत प्रवासी असणारे, हेल्थ, वैवाहिक जीवन आणि इमोशनल हे तिन्ही विषय सतत ओपन होताना दिसतात. म्हणून अशा व्यक्तीना केतूच्या प्रभावाखालील हे सर्व गुण मिळतात. त्यात १६ तारखेला हे वरील प्रभाव जास्त मिळतील.

७ मूलांक किंवा भाग्यांक ह्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/7-number-mulank-bhagyank-in-marathi/

मूलांक ८- ८,१७,२६

वरील तिन्ही तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्ती ह्या मूलांक ८ च्या असतील आणि ८ ह्या अंकावर शनी चा प्रभाव असतो.ह्या तिन्ही तारखेत पहिला दर्जा हा दिनांक १७ ला दिला आहे सूर्य आणि केतू मिळून हा अंक बनतो. नंतर दुसरा ८ आणि तिसरा २६ असा दर्जा देण्यात येतो. म्हणून १७ तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्तीवर जेव्हढा मूलांक ८ चा प्रभाव चांगला पडेल तेव्हढा ८ आणि २६ वर पडणार नाही.
म्हणून खास करिअर मध्ये १७,८,२६ ह्यापैकी १७ तारखेच्या व्यक्तींना चांगले सक्सेस झालेले पाहण्यात येते.

८ मूलांक असलेल्या व्यक्ती सतत संघर्षात येत असतात, सतत हाताखालील कामे उशिरा होणे, खूप मेहनती, स्वाभिमानी, समजण्यास कठीण अशा व्यक्तिमत्वाच्या व्यक्तींना जीवनात सतत लढत राहावे लागल्याने स्वतःवर विश्वास जास्त असतो आणि इतरांवर अशा व्यक्ती कमी विश्वास ठेवतात. त्यात २६ तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्ती ह्या ८ आणि १७ पेक्षा जास्त पीडित दिसतील. खास त्याच्या वैवाहिक जीवनातील संघर्ष आणि हेल्थ इशू. म्हणून सल्ला असा देण्यात येतो कि २६ ला जन्म घेणाऱ्या व्यक्तींनी विवाह करताना जास्त काळजी घ्यावी. पत्रिका आणि नुमरॉलॉजि करून चांगला बॅलन्स करून मग निर्णय घ्यावा .

८ मूलांक किंवा भाग्यांक ह्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/8-number-mulank-bhagyank-in-marathi/

मूलांक ९- ९,१८,२७

वरील तिन्ही तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्ती ह्या ९ अंकाच्या अधिपत्याखाली येतात जिथे अशा व्यक्तींवर मंगळाचा जास्त प्रभाव पाहण्यात येतो. पण त्यात ९ ला सर्वात पहिला दर्जा दिला आहे आणि नंतर २७ ला आणि शेवटचा दर्जा हा १८ ला आहे. म्हणून सक्सेस असणाऱ्या व्यक्तींमध्ये ९ आधी नंतर २७ आणि शेवटी १८ ला जन्म घेणारे असतील. त्यात २७ हा अंक चंद्र आणि केतू मिळून होतो. आणि सर्वात शेवटी जास्त त्रास हा १ सूर्य आणि ८ शनी ह्यांना होईल कारण हे एकमेकांचे शत्रू आहेत.

९ मूलांक असणाऱ्या व्यक्ती ह्या हिंमतवान असतात, कुणासमोरही ते झुकत नाहीत , आपले खरे करण्याकडे जास्त अग्रेसिव्ह, इतरांबरोबर आरग्युमेण्ट, दानवीर कर्ण, सतत संघर्ष करून पुढे पुढे जाण्याच्या स्पर्धा, रिलेशनल मध्ये थोडे न समजून घेणारे, जीवनात फक्त सक्सेस चा विचार करणारे, लढाऊ असतात. त्यात सर्वात १८ नंबर ला जन्म घेणाऱ्या व्यक्ती जास्त पीडित दिसतील. ह्यांना कधी पित्याचे प्रेम मिळताना दिसत नाही. फार कमी जणांना ते मिळत असावे.

९ मूलांक किंवा भाग्यांक ह्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/9-number-mulank-bhagyank-in-marathi/

धन्यवाद…..!

Leave a Reply