You are currently viewing ६ नंबर मूलांक/भाग्यांक

मूलांक / भाग्यांक नंबर ६ कसा?

आपला मूलांक ६ आहे जर आपला जन्म कोणत्याही महिन्यात ६,१५,२४ तारखेला झाला असेल.
६ = ६
१५ = १ + ५ = ६
२४ = २ + ४ = ६

वरील सर्व जन्म तारखेची बेरीज ६ वर येते म्ह्णून आपणा सर्वांचा मूलांक ६ असेल जर आपला जन्म ह्या तारखेने झाला असेल.

किंवा जर आपल्या जन्म तारखेची पूर्ण बेरीज केली असता ६ येते तर आपला भाग्यांक ६ आहे.
२२ -५- १९८६ = २+२+५+१+९+८+६ = ३३ = ६ भाग्यांक होतो.

६ नंबर आणि शुक्र- स्वभाव/व्यक्तिमत्व आणि इतर बाबी

नुमेरोलॉजी मध्ये ६ हा अंक शुक्राचा आहे. शुक्र हा अवकाशात एक डायमंड आहे लुकलुकणारा तारा. शुक्र म्हणजे दैत्यगुरू शुक्राचार्य जे दैत्यांचे गुरु होते. ह्या सर्व बाबींचा विचार करता ६ अंकावर ह्याचा प्रभाव अवश्य असतो जेणेकरून ह्यांच्या राहणीमानात टापटीपपणा व्यवस्थित पणा, निटनिटकेपणा दिसतोच.

व्यक्ती सतत स्वतःला चमकविण्याचा प्रयत्न करत असते. ह्या व्यक्ती आपले आयुष्य जगत असताना कुणालाही जुमानत नाहीत ह्याचा अर्थ ते कुणाच्या ऑर्डर खाली नसतील. क्रिएटिव्हिटी खूप असते, स्वतःच्या जीवनाला स्वतासारखा आकार देण्याचा स्वतःच्या मर्जीने प्रयत्न करतात.

शुक्र किंवा ६ नंबर हा सौंदर्याचा प्रतीक आहे, ग्लॅमर चे प्रतीक आहे म्हणून अशा व्यक्ती नेहमी सौंदर्याला आणि ग्लॅमर ला प्राधान्य देतात.

६ नंबर च्या व्यक्तींकडे एक आकर्षण असते. ह्यांची शारीरिक भाषा अतिशय सुंदर असते, शारीरिक जडण घडण सुंदर असते, चेहऱ्यावर तेज असते, वयाचा अंदाज येत नाही . विरुद्ध लिंगी आकर्षण ह्यांना नेहमी असू शकेल. ह्यांची महत्वाची कामे हि विरुद्ध लिंगीकडून जास्त होतात.

६ नंबर च्या व्यक्ती नेहमी खाणे पिणे आपल्या मनाप्रमाणे करतात. स्वतःवर कोणत्याही मार्गाने खर्च करण्याची ह्यांची तयारी असते.
दुसऱ्याची मदत करण्यासाठी नेहमी तत्पर दिसतात. दयाळू स्वभाव असतो. जनावरे, झाडे झुडपे ह्यांबद्दल लगाव असतो.

६ नंबर चे तरुण तरुणी हल्लीच्या युगात ८०% प्रेमात अप्रोच होतात. प्रेमविवाह करण्यामध्ये सफल होतात. फेसबुक वॉट्सअप आणि सोशिअल कनेक्ट मधून आनंद घेतात. त्यात जर त्यात विरुद्ध लिंगी संपर्कात असेल तर ह्या सोशिअल कनेक्ट मध्ये स्वतःला गुंतवून घेतात.

२० एप्रिल ते २७ मे आणि २४ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर मध्ये जर आपला जन्म झाला असेल तरी आपल्याला ६ नंबर चा प्रभाव आपल्या जीवनावर जास्त झालेला दिसेल.

हेही वाचा :- ५ नंबर मूलांक / भाग्यांक

करिअर / पैसा

अशा कोणत्याही करिअरची निवड करताना फॅशन मीडिया,डिझाईन ब्युटी प्रोडक्ट, एंटरटेनमेंट, ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटो शूट ,रेडिमेड गारमेंट, जेम्स आर्टस् ज्वेलरी ह्या क्षेत्राशी किंवा ह्या क्षेत्रात लागणाऱ्या वस्तूंशी ह्यांना जास्त लगाव असू शकेल तेव्हा अशा क्षेत्री ह्यांना करिअर करण्याचा सल्ला दिला जातो. मेडिकल क्षेत्रात हार्ट रिलेटेड प्रॅक्टिस मध्ये ह्यांचा चांगला हात असतो. रायटर, धर्मगुरू, हॉटेल इंदूस्ट्रीज मध्ये सुद्धा मूलांक ६ वाल्या व्यक्ती प्रगती करताना दिसतात. नर्सिंग व्यवसायात सुद्धा ६ नंबर च्या व्यक्ति ह्या चांगले काम करतात.

आपल्यातील कमीपणा आणि मार्गदर्शन

६ नंबर च्या प्रभावित असणाऱ्या व्यक्तींना समोरच्या व्यक्तीला ओळखताना उशीर होतो. प्रथम त्या व्यक्तीबद्दल हे एकदम शास्वत असतात पण काही कालांतराने त्या व्यक्तीबद्दल हे हिरमुसले जातात. म्हणून कोणत्याही व्यक्तीवर किती ट्रस्ट करावा हे ह्यांनी प्रथम जाणून घ्यावे.

जीवनात ह्या व्यक्तींना एकदा तरी समोरच्या व्यक्तींकडून विश्वासघात होतो. दुसरी गोष्ट ह्या ६ नंबरच्या व्यक्ती स्वतःच्या बाहेरील विश्वात स्वतःला दाखविण्यासाठी एव्हढे मग्न असतात कि त्यांना त्यांच्या आतल्या स्किल चा मागमूस लागत नाही कि ते काय काय करू शकतील. म्हणून केव्हा केव्हा करिअर मध्ये ह्यांना उशीर होतो. वाढत्या वयात आल्यावर त्याची जाण होते पण तेव्हा उशीर झालेला असतो.

तिसरा गुण ह्यांना दुसर्यांना मदत करण्याचा एक वाईट अनुभव असा येतो कि ती व्यक्ती ह्यांना नंतर दूर करते किंवा ह्यांना नंतर कळते कि आपण स्वतःकडे दुर्लक्षित झालो. त्यामुळे वरील सर्व मुद्द्यांवर आपण सावधान राहिले पाहिजे असा सल्ला दिला जातो.
खाण्यापिण्याच्या सवयीवर जास्त दुर्लक्ष नको कारण नंतर ह्यांना त्रास होताना पाहिले गेले आहे.

  • शुभ रंग:- निळा सफेद आणि वांगी रंगाचा उपयोग शुभत्व देतो. गुलाबी रंग सर्वात चांगला.
  • अशुभ रंग:- काळा आणि लाल
  • भाग्यवान दिवस:- शुक्रवार
  • लकी नंबर्स:- ६ काही वेळा ३ आणि ९,५ सुद्धा चांगला जातो.
  • शत्रू नंबर:- ४,८ हे नंबर ह्यांना शत्रुत्व किंवा नुकसान दायक असू शकतात. ज्या वयाची/वर्षांची किंवा तारखांची बेरीज सुद्धा ४ किंवा ८ येते ती वर्षे सुद्धा जास्त त्रासदायक असू शकतील.१३,२२,३१,४०,१७,३५,४४,
  • महिन्याच्या शुभ तारखा:- ६,१५,२४,
  • जीवनातील शुभ वर्षे:- २१/२४/३०/३३/३९/४२ हि वयाची वर्षे विशेष असतील. आणि ज्या वर्षाची बेरीज हि ६ असेल उदारणार्थ २०२२= ६. किंवा २००४ वगैरे. ज्या वर्षाची बेरीज ६ येते किंवा ज्या वयाची बेरीज ६ येते अशी सर्व वर्षे आपल्याला शुभ असतात. ह्यात काही नवीन निर्णय सुरुवात करू शकता.
  • आजार:- हार्ट डिसीज, छातीचे दुखणे, पाठ दुखी , गळ्याचे सर्व आजार, डायबिटीज, ९०% व्यक्तींना कोलोस्ट्रॉल ४०/५० नंतर जास्त होण्याचे दिसते. ह्यांना खाण्यापिण्यावर जर ताळतंत्र नसेल तर पुढे एका विशिष्ट सेवनाने जो त्रास होतो त्यावरील आजारांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. स्किन बद्दल काळजी घेण्याचा सल्ला सुद्धा देण्यात येतो.

दलाई लामा, टीना अंबानी, शहिद भगत सिंग, सुभाष घई, सानिया मिर्झा

वरील सर्व प्रतिष्ठीत व्यक्ती ह्या ६ शी संबंधित आहेत.

धन्यवाद…..!

Leave a Reply