You are currently viewing ८ नंबर मूलांक/भाग्यांक

आपला मूलांक – भाग्यांक नंबर ८ कसा?

आपला मूलांक ८ आहे जर आपला जन्म कोणत्याही महिन्यात ८,१७,२६ तारखेला झाला असेल.
८ = ८
१७ = १ + ७= ८
२६ = २ + ६ = ८

वरील सर्व जन्म तारखेची बेरीज ८ वर येते म्ह्णून आपणा सर्वांचा मूलांक ८ असेल जर आपला जन्म ह्या तारखेने झाला असेल.

किंवा जर आपल्या जन्म तारखेची पूर्ण बेरीज केली असता ८ येते तर आपला भाग्यांक ८ आहे.
२४ – ८ – १९८३ = २+४+८+१+९+८+३ = ३५ = ८ भाग्यांक होतो.

८ नंबर आणि शनी- स्वभाव/व्यक्तिमत्व आणि इतर बाबी

नुमरॉलॉजि मध्ये ८ नंबर हा शनी चा आहे. ह्या व्यक्तीं वर शनी चा प्रभाव असल्यामुळे शनी ह्यांना जास्त पॉलिश करताना दिसतो. कारण शनी कधीही ह्यांना एकटे सोडत नाही. ज्या टार्गेट साठी हे जेव्हा लायकीचे होतात तेव्हाच ते त्यांच्या पदरात पाडतो. म्हणजेच अशा व्यक्तींना काही मिळविण्यासाठी फार कष्ट होताना दिसते. जीवनातल्या काही गोष्टी सहज मिळताना दिसत नाहीत तेव्हा त्या गोष्टींसाठी शनी आपल्याला तयार करत आहे असे ह्या व्यक्तींनी समजण्यास हरकत नाही. हे वयाच्या ३५ वर्षापर्यंत जास्त निदर्शनात येते नंतर लाईफ हळू हळू स्मूथ होते.

शनी हा न्यायाचा प्रतीक आहे तो जज आहे म्हणून अशा व्यक्ती प्रामाणिक दिसतात. सतत कायद्यात असणाऱ्या नियम सहजासहजी न मोडणाऱ्या असतात. आतमधून ह्या व्यक्ती अति स्ट्रॉंग असतात स्वतःच्या अडचणी कधीही हे बाहेरील लोकांना दाखवीत नाहीत. ह्या व्यक्तींचे बाहेरील कवच खूप स्ट्रॉंग असते.

शनी हा ग्रह मंद आहे आणि त्यामुळे पहिल्याच वेळी कधी ह्या व्यक्तींचे काम होईलच असे नाही. खूप स्लो जाते आणि बऱ्याच वेळा टार्गेटला संथ गती मिळून ते उशिरा होते. असेही पाहण्यात आले कि जेव्हा ह्यांच्या २०/२५ वर्षाच्या काही टार्गेट वर काम करीत असतात तेव्हा ते अशा वेळेस आनंद घेत असतात जेव्हा त्यातील मजा हि संपलेली असते.

पसरट, गोलाकार, पुढे झुकाव असे खांदे असतात, हे रागीट, आपल्यात गुंग असणारे कधी कधी एकदम शांत सुद्धा दिसतात. एकदम सिरिअस दिसतात. तत्पर बुद्धिमत्ता, थोडे मॅच्युअर्ड, धैर्यवान हे सर्व गुण ८ वाल्यांकडे असू शकतात.

कोणत्याही गोष्टींसाठी इच्छाशक्ती फार असते, कोणत्याही गोष्टींचा खोलवर अभ्यास करण्याचा स्वभाव असतो. हार सहजासहजी मानत नाहीत. खूप मेहनत करण्याची ह्यांची तयारी असते. त्यात जरी बऱ्याच अडचणी आल्या तरी हे त्याला फेस करीत असतात.

एका विशिष्ट वयापर्यंत काही जण ह्यात आळशी सुद्धा पाहण्यात आल्या पण पुढे ह्याच व्यक्ती मेहनत करताना सुद्धा दिसल्या. एक विशिष्ट गुण ह्यांच्यात नेहमी पाहण्यात आला तो म्हणजे नेतृत्व क्षमता (लीडर शिप) त्यात हे एकदम चमकू शकतात.

कोणत्याही कार्याबद्दल, व्यक्तीबद्दल आपले कितीही नुकसान झाले तरी ते समर्पण करण्यात हे नंबर वन असतील. समर्पित असण्याचा गुण ह्यांच्याकडे असतोच. ह्याच्यात एक गुण नक्की पाहण्यात येतो तो म्हणजे समयसूचक पणा. कोणत्याही अडचणी आल्या तरी त्यावर समयसूचक राहून त्या लगेच दूर करण्याचा किंवा तेथून मार्ग काढण्याचा अनुभव ह्यांच्यात असतोच.

हेही वाचा :- ७ नंबर मूलांक / भाग्यांक

करिअर / पैसा

वकिली, जज, डॉक्टर आणि बिल्डर ह्या मोठ्या मोठ्या क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी हाडाची मेहनत घेतली आणि त्यांचा मूलांक आणि भाग्यांक ८ असेल तर त्यांना नेम आणि फेम मिळाल्याशिवाय राहत नाही.

कोणत्याही करिअर मध्ये ८ वाले जातात तेव्हा ते करिअर लवकर सोडत नाहीत तिथे बरीच वर्षे काढतात जर असे झाले तर ते करिअर नंतर त्यांना चांगले फळ नक्की देते. ज्यांचे वाईट दिवस येतात ते ८ मूलांक आणि भाग्यांक वाले इझी मनी च्या मागे लागतात आणि काही तरी स्क्याम मध्ये फसतात बाकीचे सुटतात. पण ८ वाले नक्की सापडतात तेव्हा असा सल्ला देण्यात येतो कि जीवनात कधीही लगेच काही करून श्रीमंत बनता येईल असे करू नये. सरकारी कामासाठी ८ मूलांक आणि भाग्यांक वाले हे चांगले सूट होतात.

मूलांक ८ च्या व्यक्तींना नेहमी कर्जाचा सामना करावाच लागतो बरेच जण कर्जातून बाहेर निघत नाहीत किंवा एका कर्जावर अजून कर्ज घेताना दिसतात. पण ह्यांना त्यासाठी पैसा मिळतो काळजी नाही.

फॅक्टरी आणि मोठ्या मशिनरीज वर काम करणारे व्यक्ती सुद्धा मूलांक भाग्यांक ८ च्या जास्त पाहण्यात आल्या आहेत त्यामुळे अशा क्षेत्रात काम करायला आपणास हरकत नाही. कन्स्ट्रक्शन, प्रिंट, शेती, आणि खनिज क्षेत्रात सुद्धा आपण चांगली प्रगती करू शकता पैसा मिळेल.

आपल्यातील कमीपणा आणि मार्गदर्शन

आपल्या कामात अति व्यस्तपणा असेल तर रिलेशन मेंटेन करणे हे आपल्याला जमत नाही त्यात काही कटूपणा नक्की दिसेल. कोणत्याही एका संपर्कात असलेल्या व्यक्तीकडून निराशा मिळते. काही वेळा असे हि दिसून येते कि पहिल्या २५ वर्षापर्यंत च्या व्यक्तींमध्ये आळशीपणा किंवा कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना जे आधी करायला पाहिजे ते होत नाही हा कमीपणा आपल्याला सुरुवातीला दिसत असेल तर त्रास होईल. ह्यांच्यातला एक कमीपणा म्हणजे कामात जर गुंतले तर स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीत आणि नंतर ह्यांना त्याची किंमत फार वाईट चुकवावी लागते.

कोणतीही नशा आपण घेत असाल आणि आपला मूलांक किंवा भाग्यांक ८ असेल तर आयुष्यात हि मोठी चूक असेल . करिअर हेल्थ पैसा रिलेशन ह्यापैकी कोणतीतरी एक गोष्ट त्याने कायमची निघून जाईल. मग त्यावर काहीच काम करून फायदा होत नाही.

  • शुभ रंग: निळा रंग आहे शुभ आहे पण काळा रंग शक्यतो वापरू नये. सफेद, क्रीम, पिवळा, हिरवा आणि जांभळा हे वापरू शकतात अति गडद वापरू नये.
  • अशुभ रंग: लाल .
  • भाग्यवान दिवस: बुधवार आणि शुक्रवार
  • लकी नंबर्स: ५,६,३, ह्या क्रमाने हे नंबर घ्यावेत सर्वात जास्त ५ नंतर त्या क्रमाने.
  • शत्रू नंबर: ८ (इथे ८ मूलांक/भाग्यांक वाल्याना ८ अनलकी नंबर आहे) घर गाडी मोबाइलला सुद्धा ह्याचा कमीत कमी उपयोग करावा. ९ आणि १ नंबर सुद्धा ह्यांच्यासाठी शत्रू नंबर आहेत.
  • महिन्याच्या शुभ तारखा: ५,६,३,वर ज्या महिन्याच्या तारखा जातील त्या शुभ ५,१४,२३,६,१५,२४,३,१२,२१,३०.
  • जीवनातील शुभ वर्षे: ज्या वर्षाची बेरीज ५,६,३,१ येते उदारणार्थ २००३, २००४,२०२२,२०१७
  • आजार: पायाबद्दलचे सर्व आजारांपासून ह्यांना सावधानता बाळगावी लागेल. कोणतेही आजार हे शरीराच्या आत मध्ये इफ्फेक्ट देतात बाहेरून ते दिसत नाहीत असे आजार. जॉईंट, किडनी आणि हाडांच्या विकारांना सुद्धा त्रास जाणवू शकतो. खास उतरत्या वयात लक्ष द्यावे लागेल.

श्री नरेंद्र मोदी, आशा भोसले, शिल्पा शेट्टी धर्मेंद्र, शर्मिला टागोर, श्री मनमोहन सिंग.

वरील सर्व प्रतिष्ठीत व्यक्ती ह्या ८ शी संबंधित आहेत.

धन्यवाद…..!

Leave a Reply