नमस्कार,

मी देवेंद्र ज. कुणकेरकर प्रथमच श्री दत्तगुरु ज्योतिष च्या माध्यमातून आपणा सर्वांना माझा परिचय करून देत आहे. गेल्या 16 वर्षात ज्योतिष शास्त्राचा दांडगा अनुभव घेत घेत इथपर्यंत येताना वेब च्या माध्यमातून नवीन पिढीला काही ज्योतिष मार्गदर्शन करण्याचा मोह मला सुद्धा रोखता आलेला नाही.

वेब वर ज्योतिष लेखात प्रत्येक वेळी काही नवीन देण्याचा प्रयत्न करताना आनंद होईल मला. आणि ते मिळविताना आपल्याला सुद्धा त्याचा खूप उपयोग होईलच ह्यात शंका नाही.

ह्याचा परिचय खालील काही प्रशांतून तुम्हाला मिळेलच जे जे मी मागे १६ वर्षात शोधण्याचा प्रयत्न केला आहे.आणि त्याची सर्व उत्तरे वेब च्या माध्यमातून मला जशी जशी सवड  मिळेल तसे क्लिअर करत जाईन. त्याचे उत्तर कदाचित आपल्याला माहीतही असेल पण नवीन उत्तर देण्याचा सतत प्रयत्न असेल माझा.

मी ज्या ज्या गुरूंकडून त्यांच्या जवळ बसून शिकलो ,किंवा ज्यांचे वाचून ऐकून शिकलो त्या सर्व माझ्या गुरूंना मी वंदन करून त्यांचेच ताट मी आपल्यासमोर ठेवणार आहे माझ्या पद्धतीने सजवून त्याचा स्वीकार आपण कराल ह्यात तिळमात्र शंका नाही.