Table of Contents
आपला मूलांक नंबर ५ कसा?
आपला मूलांक ५ आहे जर आपला जन्म कोणत्याही महिन्यात ५,१४,२३ तारखेला झाला असेल.
५ = ५
१४ = १ + ४ = ५
२३ = २ + ३ = ५
वरील सर्व जन्म तारखेची बेरीज ५ वर येते म्ह्णून आपणा सर्वांचा मूलांक ५ असेल जर आपला जन्म ह्या तारखेने झाला असेल.
किंवा जर आपल्या जन्म तारखेची पूर्ण बेरीज केली असता ५ येते तर आपला भाग्यांक ५ आहे. 19 नोव्हेंबर १९८२ = १+९+१+१+१+९+८+२ = ३२ = ३+२ = ५ भाग्यांक होतो.
हेही वाचा :- ४ नंबर मूलांक / भाग्यांक
५ नंबर आणि बुध= स्वभाव/व्यक्तिमत्व आणि इतर बाबी
बुध हा ग्रह २७ डिग्री सूर्याच्या अवती भोवती फिरत असतो. त्याला १२ वर्षाच्या मुलाची उपमा दिली गेली आहे. म्हणून ५ नंबर वाले व्यक्ती थोडे अपरिपक्व असू शकतील. अति गोंधळ ह्यांच्याकडे पाहण्यात येत असतो. कोणत्याही गोष्टींत हे अति सिरिअस नसतात.
कोणत्याही अति महत्वाच्या कार्यात सुद्धा खेळकर प्रवृत्ती असल्यामुळे आपल्या सर्व अचिव्हमेंट, टार्गेट वर हे आधीपासून लक्ष देत नाहीत एकदम गळ्यापर्यंत आले कि मग सिरिअस होताना दिसतात. जास्त हार्ड वर्क करताना दिसत नाहीत बुद्धीचा अंक असल्यामुळे सतत आपली बुद्धी आयडिया लावून कामे करताना दिसतात.
कधी कधी अशा व्यक्ती खूप आळशी दिसल्या. पण हसमुख आणि बोलका चेहरा दिसतो. खांदे ब्रॉड आणि डोळे बोलणारे असतात. ह्याच्याकडे आकर्षण अधिक असते, कोमल स्वभाव, दुसऱ्यांवर जास्त विश्वास करतात, ट्रॅव्हल करण्याचा स्वभाव, खाण्यापिण्यात चवीचे असतात.
बुद्धिमत्ता चांगली असते आणि आपल्या आयडिया चांगल्या प्रेसेंट करणारे पण चंचलता जास्त- फ्लेक्सिबिलिटी जास्त, जास्त रिलेशन मध्ये असतात. आपल्या रिलेशन वर ठाम नसतात. मोठ्या जबाबदाऱ्या पासून दूर, जीवनात सतत बदल ह्यांना दिसून येतो. नवीन नवीन सर्च करण्यामध्ये जास्त दिसतात. कुणी ह्यांची मस्करी केली कि लगेच त्याच भाषेत हे हजार जबाबी असतात.
५ वाल्यांच्या आयुष्यात राहण्याची ठिकाणे सुद्धा बऱ्याच प्रमाणात बदलताना दिसतात. विदेशात जाण्यासाठी अति उत्सुक.
२३ मे ते २३ जून किंवा २३ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर मध्ये जर आपला जन्म झाला असेल आणि आपला मूलांक/भाग्यांक ५ असेल तर बुधाचा विशेषे प्रभाव अशा व्यक्तींवर १००% पाहण्यात येतो.
करिअर / पैसा
करिअर मध्ये बदलाव नेहमी दिसण्यात येतो लहानपासूनच्या करिअर बद्दलच्या संकल्पना वयात आल्यावर वेगळ्या असू शकतील. मॅनेजमेंट, बँकिंग-बँकर, ऑर्गनाईझ, फायनान्स, अकाउंटिंग, बिझनेस मॅनेजमेंट, कन्सल्टन्सी, स्टॉक मार्केट.
व्यवसायात एका पेक्षा जास्त व्यावसायिक असणे हि खुबी ह्यांच्यात असते म्हणून पैसा ह्यांना मिळत असतो. एकाच वेळी नोकरी आणि व्यवसाय ह्यांना दोन्ही जमते. मीडिया क्षेत्रात आणि फिल्मी क्षेत्री हे प्रगती करताना दिसतात. गव्हर्नमेन्ट जॉब ह्यांना एकतर जमत नाही किंवा मिळत नाही. गव्हर्नमेन्ट च्या जॉब साठी केलेले कोर्से वाया जाऊ शकतात. ट्रॅव्हल्स च्या व्यवसायातून चांगला पैसा मिळतो. मेडिकल क्षेत्रात असतील तरी दुसऱ्या क्षेत्राशी जुडले जातात आणि तिथून काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो.
कुरिअर सर्विसेस इम्पोर्ट एक्स्पोर्ट सारखे व्यवसाय उत्तम करू शकतात. कोणतेही काम जे फिरण्यासंबंधित असेल अशा क्षेत्रात ह्यांची प्रगती दिसते.
आपल्यातील कमीपणा आणि मार्गदर्शन
आपल्यातील सतत बदल करण्याचा स्वभाव नुकसान देऊन जात असतो. कोणत्याही कामाच्या शेवटी योग्य निर्णय चुकीचा होऊ शकतो त्यामुळे आपले टार्गेट, अचिव्हमेंट हे अर्धवट राहण्याची जास्त शक्यता नाकारता येत नाही. धरसोड वृत्ती टाळावी.
गुंतवणुकीच्या बाबतीत अति घाई करताना दिसतात त्यामुळे त्यात इतरांचा सल्ला जरुरीचा असेल. पैसा कमविला कि ह्यांना काही रिलेशन जपण्याचा सल्ला दिला जात आहे. जे जमविताना कठीण होते.
- शुभ रंग= हिरवा आणि सर्व लाईट रंग
- अशुभ रंग= काळा
- भाग्यवान दिवस= बुधवार, शुक्रवार
- लकी नंबर्स= १,३,५,६.
- शत्रू नंबर= कोणताही नंबर शत्रू नसतो पण ९ ने जपावे थोडे. घर गाडी ९ नंबर ने घेऊ नये
- महिन्याच्या शुभ तारखा= ५,१४,२१
- जीवनातील शुभ वर्षे= ज्या वर्षाची बेरीज ५ येते किंवा ज्या वयाची बेरीज ५ येते अशी सर्व वर्षे आपल्याला शुभ असतात. ह्यात काही नवीन निर्णय सुरुवात करू शकता.
उदाहरण – असे वर्ष ज्याची बेरीज ५ येते २०२१ — २+०+२+१ = ५. किंवा असे वय ५/१४/२३/३२/४१/५० हे वर्षे विशेष महत्वाचे
- आजार= ह्यांची जर पचन संस्था बरोबर काम करत नसेल तर बऱ्याच आजारांचा सामना करावा लागतो. गॅस ऍसिडिटी आणि पोटाचे आजार ह्यांना जाणवतात, खाण्यापिण्यापासून एलर्जी होते, नर्वसनेस आणि स्किन चे त्रास पासून सावधान.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर १४/४/१८९१
- श्रीकांत जिचकर १४/९/१९५४
- अमीर खान १४/३/१९६५
- नरेंद्र मोदी – १७/९/१९५० = ३२ — भाग्यांक ५
- सैफ अली खान — १६/८/१९७० = ३२ — भाग्यांक ५
- राज कपूर १४/१२/१९२४
वरील सर्व प्रतिष्ठीत व्यक्ती ह्या ५ शी संबंधित आहेत.
धन्यवाद…..!