You are currently viewing लग्न करताय किंवा करून झाले? तर जाणून घ्या ३, ५, ७ च्या अंकांचे खेळ

जाणून घ्या ३, ५, ७ च्या अंकांचे खेळ- Magic Of Number 3,5,7 in Married Life

loshu grid 3 5 7

वरील लोशू ग्रीड मध्ये मधली जी लाईन आहे ती ३,५,७ ची आहे. ह्या प्लान ला स्पिरिच्युअल / इमोशनल प्लान सुद्धा म्हणतात पण हेच नंबर ठरवतात कि आपले वैवाहिक जीवन कसे आहे? ह्यातील जो अंक आपल्या जन्म तारखेत नसेल तो अंक निदान मूलांक किंवा भाग्यांक प्रमाणे तरी यावा.

अंक ३- गुरु

३ अंक हा गुरु चा आहे. जन्म तारखेत हा अंक असला कि व्यक्ती हा त्याच्या वैवाहिक जीवनात पारिवारिक समजला जातो. आपल्या फॅमिली बद्दल त्याला एक चांगली आस असते. त्याच्या कुटुंबासाठी तो सतत चांगले करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या वैवाहिक सुखाच्या ज्या ज्या इव्हेंट्स असतात आणि त्या पूर्ण करण्यास ३ अंक हा सपोर्ट करतो. ३ अंक हा वैवाहिक जीवनातील येणार पैसा सुद्धा आहे. ३ अंक वैवाहिक जीवनात मुलाबाळांचा आनंद देणारा सुद्धा आहे. वैवाहिक जीवनात व्यक्ती वावरत असताना त्याचे कौशल्य तो सतत पणाला लावून जीवन सुंदर करण्याचा प्रयत्न करतो आणि ३ अंक त्याला त्यात खूप मदत करत असतो.

हाच ३ नंबर जर नसेल तर वरील विषयात निगेटिव्ह ठरतो.

विवाह होण्यासाठी उशीर होऊ शकतो, खास मुलींना ह्या अंकाचा आशीर्वाद नसेल तर स्थळ मिळता मिळता उशीर होतो, किंवा नापसंती चे रिझल्ट जास्त मिळतात.

विवाह झाल्यावर विवाहानंतर जे जे पुढील कार्य त्या पती पत्नीला मिळून करायचे जसे मुलं होणे , करिअर करणे, घर प्रॉपर्टीज घेणे अशा कार्यात एक तरी कार्य वयाच्या ४२ पर्यंत अडकलेले असते, फार उशीर होत असतो.

संतान होताना त्रास होतो. किंवा झाल्यावर ह्या विषयी काहीतरी त्रास असतोच.

पैसा कमी पडू शकतो कारण आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्याकडे असलेल्या स्किल चा उपयोग लग्न झाल्यावर अशा व्यक्तीला करण्यास त्रास होतो.

पती पत्नी दोघांच्याही जर ३,५,७ पैकी ३ आणि ५ नसतील तर मजल हि घटस्फोटापर्यंत सुद्धा गेलेली पाहण्यात येते. काही पती पत्नींमध्ये पहिली ४/५ वर्षे अर्थात पहिले मूल होईपर्यंत खूप वाद विवाद असतात आणि नंतर प्याचअप होते त्यास कारण जे मूल जन्माला आलेले असते ते ३,५,७ पैकी कोणतेही असे २ नंबर घेऊन येते कि त्या पती पत्नीचा तो लोशू ग्रीड चा प्लान पूर्ण होतो. म्हणजे तिघांच्या जन्म तारखेला मिळून हि लाईन पूर्ण होते. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पती पत्नींमध्ये वाद विकोपाला जाऊ शकतात नेहमीच इशू होताना दिसतात.

वरील सर्व जे जे दिले आहे त्यातील जास्त जबाबदारी त्याला जास्त उचलावी लागेल ज्याच्याकडे ह्या लाईन मध्ये ३ नसेल. आणि हे वरील सर्व मुद्दे १००% वैवाहिक जीवनात केव्हा दिसतील जेव्हा पती आणि पत्नी मध्ये दोघांच्याही लोशू ग्रीड मध्ये ३ नंबर नसेल.

३ अंकाची अट – आणि सल्ला

जर आपल्या लोशू ग्रीड मध्ये हि लाईन पूर्ण होत नसेल मूलांक आणि भाग्यांक टाकून सुद्धा तर वरील सर्व आपल्या वैवाहिक जीवनात पाहावयास मिळू शकेल. आणि पत्रिकेत सुद्धा गुरु चे बळ कमी पडलेले दिसेल. तेव्हा सल्ला असा दिला जातो कि आपण विवाह करताना समोरील पार्टनर मध्ये ३ नंबर चेक करावा तिकडे असेल तर जरूर तो आपणास मदत करू शकेल.

जर विवाह झालाच असेल आणि दोघांमध्ये ३ अंकाचा सपोर्ट मिळत नसेल तर जरूर मार्गदर्शन घ्यावे. किंवा गुरु चे उपाय करावेत जेणे करून गुरु चे चांगले फळ मिळण्यास मदत होईल.

हेही वाचा :- मूलांका प्रमाणे अंकांची वैशिष्टये

अंक ५

३,५,७ चा प्लान पूर्ण होण्यासाठी अंक ५ चा मोठा रोल असतो जेव्हा विषय वैवाहिक सुखाबद्दल असेल. अंक ५ हा बुधाचा अंक आहे म्हणजे वैवाहिक सुख घेताना शक्कल लढविणारे पती पत्नी ह्या दोघांच्या जन्म तारखेत अंक ५ हा असतोच.

आपल्या बुद्धीच्या जोरावर दोघे आपल्या संसाराचा आनंद द्विगुणित करत असतात. ह्या संसारात पैसा कधीच कमी पडत नाही किंवा पैशाच्या बाबतीतील सर्व म्यानेजमेंट हे उत्तम रित्या करण्यात हि जोडपी पटाईत असतात. नवीन नवीन संसार करताना जी जोडपी फार हुशारीने आपला संसार थाटत असतात आणि खूप आनंद घेत असतात त्या दोघांच्यात अंक ५ असतोच.

सर्व नंबर ला बॅलन्स करणारा अंक ५ हा दोघांच्या जन्मतारखेत मूलांक किंवा भाग्यांक मिळून तरी असावा. आता ज्याच्या एकाच्या जन्म तारखेत हा अंक दिसत नसेल तर वरील विषयी पायपीट तो एकटा करत असतो त्यात पार्टनर चा सपोर्ट किती मिळेल ह्यावर शंका असेल. ज्याच्या एकांपैकी कुणाच्या तारखेत ५ नसेल त्याने आर्थिक व्यवहार संसारात घेताना जास्त निर्णय घेऊ नये ज्याच्यापढे ५ आहे त्याला त्याची धुरा सांभाळायला द्यावी.

आणि दोघांच्या मध्ये हा ५ नसेल (मूलांक आणि भाग्यांकाने सुद्धा नाही आलेला असेल) तर मात्र मनी मॅनेजमेंट मध्ये असे पतिपत्नी सतत हैराण होताना दिसतात. संसार करताना पैसा हा विषय खूप चिडचिड करणारा होऊन बसतो.

आणि ह्याबरोबर जर ३ सुद्धा नसेल तर मुले होताना जी जी फॅसिलिटी पैशाने मजबूत हवी ती ती मिळत नाही. मग सरकारी दवाखाना आपल्याला मदत करू शकेल.

५ आणि ७ नसेल फक्त ३ असेल तर एव्हढाच पैसा मिळत असतो कि शिल्लक ठेवताना कठीण होते.

आणि जर तिन्ही अंक दोघांमध्ये नसतील तर काही ग्यारंटी देता येत नाही संसार पूर्ण होण्याची. त्यात जर २/३ मुले असतील आणि ते जर ३/५/७ घेऊन आलेले असतील तर पूर्व पुण्याई आईवडिलांचा आशीर्वाद ह्यामुळे संसाराचा गाडा पुढे रेटत जातो.

अंक ७

३,५,७ चा जो प्लान आहे त्यात ७ अंक हा केतू च्या प्रभावात येतो. जर हा अंक असेल दोघांमध्ये तर समजावे कि पती पत्नी जी जी धावपळ संसाराची करतात त्यात दोघे मिळून करतात पण त्यासाठी ३ किंवा ५ ह्यापैकी एक किंवा दोन्ही नंबर त्या बरोबर लागतात त्या लाईन मध्ये. मूलांक किंवा भाग्यांक चा सपोर्ट घेऊन आला तरी चालतो मग.

असे पती पत्नी दोघांकडे ७ चा आशीर्वाद आहे अशा संसारात सात्विक पणा असतोच, धार्मिक प्रवृत्ती बळावलेली असते, अध्यात्मिक पणा चा सपोर्ट घेऊन संसार करीत असतात, पूजा अर्चा होम हवन, ज्योतिष, बाबा, पंडित ह्या गोष्टींचा सपोर्ट घेणारे पती पत्नी ह्यात मोडतील. ह्यात मात्र दोघांच्यात ७ अंक बऱ्याच वेळा दिसत असेल तर अशा पतिपत्नींना सल्ला देण्यात येतो कि आपल्या संसारात पैशाची फसवणूक होणार तर जरा जपून पैशाचे व्यवहार करावेत.

पण जर एकाच्या खास महिलांच्या जन्मतारखेत ७ नसेल तर एक तर संतती होताना त्रास होतो, त्या निर्माण करताना ज्या ज्या व्यवस्था असतील त्या त्या समोर सहजपणे मिळताना त्रास होतो किंवा असे झाले नाही तर संतान झाल्यानंतर तिच्या पालन पोषण ची जी जी जबाबदारी आहे त्यात कुठे तरी अशा महिला कमी पडू शकतील.

आणि जर दोघांच्या जन्मतारखेत ७ अंक नसेल तर मात्र मुलांच्या संगोपनाचे व्यवस्थित आर्थिक नियोजन करावे. त्यात आपण हैराण होऊ शकता. पैसा कमी पडू शकेल.

संतती निर्माण करत असताना मुलगाच पाहिजे हा नाद सोडून द्यावा. हीच प्रॉपर्टी पाहिजे असा नाद सोडून द्यावा, इथेच मी घर घेणार, सासू नकोच तरच लग्न करणार, बायको गोरीच हवी, असे फाजील प्रश्न ह्यांच्या लग्न अगोदर किंवा लग्नानंतर उदयास येतात.

तर माझा हा अभ्यास किती बरोबर आहे हे पाहण्यासाठी आपलं पतीपत्नींनी एका पेपर वर लोशू ग्रीड बनवा आणि त्यात मधली लाईन पूर्ण होते का पहा. जर झाली नाही तर त्यातील जो नंबर आपल्याकडे कमी आहे तो समोरच्या पार्टनर कडे आहे का ते पहा.

आपला मूलांक आणि भाग्यांक मिळून जरी ३,५,७ ह्यातील एक एक येत असेल तरी त्या लाईन मध्ये लिहावा.
जर तिन्ही नंबर आपल्याकडे नसतील आणि आपण लग्न करणार असाल तर निदान ह्यातील कोणतेही २ नंबर ज्याच्याकडे आहेत त्याची तरी निवड करा.

समजण्यास फार कठीण वाटत असेल तर नुमरॉलॉजिस्ट ची नक्की मदत घ्या

धन्यवाद…..!

Leave a Reply