You are currently viewing ३ नंबर मूलांक/भाग्यांक

आपला मूलांक नंबर ३ कसा ?

आपला मूलांक ३ आहे जर आपला जन्म कोणत्याही महिन्यात ३,१२,२१,३० तारखेला झाला असेल.
३ = ३
१२ = १+२ = ३
२१ = २ + १ =३
३० = ३ + ० = ३

वरील सर्व जन्म तारखेची बेरीज ३ वर येते म्ह्णून आपणा सर्वांचा मूलांक ३ असेल जर आपला जन्म ह्या तारखेने झाला असेल.

किंवा जर आपल्या जन्म तारखेची पूर्ण बेरीज केली असता ३ येते तर आपला भाग्यांक ३ आहे.
२ डिसेंबर १९९५ = २+१+२+१+९+९+५ = २९= २+९=१२ १+२ = ३ भाग्यांक होतो.

३ नंबर आणि गुरु- स्वभाव/व्यक्तिमत्व

३ हा अंक गुरु च्या अधिपत्याखाली येत असल्यामुळे गुरु ग्रहाचे सर्व गुणधर्म ह्या व्यक्तीकडे पाहिले जातात. अशा व्यक्ती समाजात आपल्या मान प्रतिष्ठा ह्याचा विचार करून वावरताना दिसतात. गुरु एक ब्राह्मण तत्वात येत असल्यामुळे असे लोक नेहमी सात्विक बुद्धी चे दिसू शकतील. कुणाचे लगेच नुकसान करण्याकडे ह्यांचा कल नसेल. पण तरी सुद्धा आपल्या बुद्धीचा वापर करताना आणि समाजात वावरताना ह्या अहंकारी असू शकतील.

अंतरिक्ष मधून आलेली कोणतीही हानी गुरु च्या गुरुत्वाकर्षण मुळे पृथ्वीवर येण्यापासून गुरु हा रक्षण करत असतो म्हणून अशा व्यक्ती समाजात त्याच्या घराण्यात प्रोटेक्शन चे कार्य करण्या मध्ये प्राविण्य मिळवितात.

३ अंक मूलांक किंवा भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कलात्मक (क्रिएटिव्हिटी) अनुशासन, प्रेमी आणि राष्ट्रवादी सुद्धा असतो.
नेहमी नवीन नवीन काहीतरी युक्त्या लावण्याची कला ह्यांच्यात असते.

गुरु हा देवांचा शिक्षक आहे आणि त्यामुळे ह्या अंकाच्या व्यक्तींकडे सतत मार्गदर्शन करण्याचा स्वभाव असतो आणि हे करताना अशा व्यक्ती नेहमी काही नवीन नवीन शिकण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. गुरुकडेच सर्वात जास्त चंद्र आहेत त्यामुळे ह्याच्याकडे प्रसिद्धी आपोआप येते ह्याना बरेच जण फॉलो करणारे सुद्धा असतात. म्हणून अंक ३ वाल्या व्यक्ती ह्या मोठ्या हुद्द्यावर पाहण्यात येतात किंवा ह्याच्या आजूबाजूला बरेच लोक जमा होत असतात.

अधिकारिकता, महत्वाकांक्षी, विस्तारक, धार्मिक प्रवृत्ती, महत्वाकांक्षी, कुटुंब प्रमुख, स्पष्टवादी, बुद्धिमान, आनंदी, दृढनिश्चयी, इमानदार, आपल्या कार्यावर विश्वास असणारे, सामाजिक कार्यात मग्न, मोठे टार्गेट ठेवणारे.

हेही वाचा :- २ नंबर मूलांक / भाग्यांक

करिअर / पैसा

करिअर मध्ये सुद्धा इथे गुरु चे विशेष गुण ह्याच्याकडे पाहण्यात येतात. सल्ला असा देण्यात येतो कि जर आपल्याला आपल्या करिअर बद्दल समाधान हवे असेल तर जिथे जिथे आपले स्किल लागेल आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा भरपूर उपयोग होईल अशा ठिकाणीच ३ नंबर वाले हे चांगले करिअर करू शकतील. त्यामुळे बऱ्याच वेळा अंक ३ वाले स्वतःचा व्यवसाय करताना दिसतात.

त्यामुळे — कानूनी सालाहकर, वकील, जज , ज्योतिषी , डॉक्टर , व्याख्याता (प्रवचनकार), चिकित्सा कार्य, दलाली, विज्ञापन, अभिनय, जलवाहतूक कार्य (जलीय व्यापार) , भोजनालय. इत्यादी क्षेत्री ३ नंबर च्या व्यक्ती ह्या दिसून येतात. पैसा — जेव्हढा खर्च करतील तेव्हढा येत जातो हि एक कमाल आहे ह्यांची. पैसा जमा करणाऱ्या ३ नंबर च्या व्यक्तींना त्रास होताना दिसतात खास आर्थिक दृष्टीनेच.

आपल्यातील कमीपणा आणि मार्गदर्शन

सर्वात मोठा कमी पणा हा आहे कि हे चांगली सुरुवात करणारे असतात पण शेवट चांगला करता येत नाही. म्हणजे कोणत्याही कामावर सुरुवातीला आपण खूप मेहनत करणारे आहेत पण शेवटी एव्हढे लक्ष देताना ह्यांना त्रास होतो.

आपण आपल्या हाताखालील लोकांसाठी तानशाही वागू शकता तसे केलेत तर थोडा त्रास होण्याची शक्यता असेल.
अति व्यवहार करणे हा सुद्धा एक कमीपणा ह्यांच्याकडे पाहण्यात येतो. त्यात हे प्रत्येक गोष्टीत व्यवहाराने वागतात जिथे तो ह्यांना काही वेळा रिलेशन मध्ये त्रास होताना दिसतो.

अति आत्मविश्वास आणि घमंडीपणा ह्याच्यात दिसून येतो जेव्हा हे उच्च पदावर काम करतात त्यामुळे सल्ला असा देण्यात येतो कि आपल्याकडे जे जे ज्ञान आहे त्याची कुवत हि इतर सर्वांकडे असेल असे नाही थोडे सांभाळून घ्यावे इतरांना मग आपल्याला थोडा कमी त्रास होईल.

३ नंबर च्या व्यक्ती अपमान सहन करू शकत नाही म्हणून कधी ना कधी बदला घेण्याच्या भावना जास्त असू शकेल –सांभाळून.

  • शुभ रंग= पिवळा , निळा
  • अशुभ रंग= काळा, सफेद , लाल
  • भाग्यवान दिवस= गुरुवार, शुक्रवार, मंगळवार
  • ३ नंबर साठी लकी नंबर्स= ३ साठी ३ वाले नेहमी लकी असतील, ५, ९, २, ७.
  • शत्रू नंबर= ६, ४ आणि ८
  • महिन्याच्या शुभ तारखा= ज्या तारखेची बेरीज ३ येते अशा सर्व तारखा शुभ असू शकतील.
  • जीवनातील शुभ वर्षे= ज्या वर्षाची बेरीज ३ येते किंवा ज्या वयाची बेरीज ३ येते अशी सर्व वर्षे आपल्याला शुभ असतात. ह्यात काही नवीन निर्णय सुरुवात करू शकता. उदाहरण – असे वर्ष ज्याची बेरीज ३ येते २०१९ — २+१+९=१२=१+२=३. किंवा असे वय ३ रे १२ वे २१ वे ३० वे आणि इतर ह्या वयात सुद्धा आपल्याला काही शुभ घटना घडू शकतात.

आजार

श्वसन प्रक्रिया हा एक काळजीचा भाग ह्यांना जाणवू शकेल, हृदय संबंधित सर्व प्रकारच्या आजारांची काळजी घ्यावी. कोणत्याही अजराजांचे मूळ कारण हे वजन असू शकेल म्हणून वजनावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला ह्यांना देण्यात येतो . त्यामुळे पुढे पायांचे त्रास ह्यांना खूप जाणवतात. पण मोठ्या आजारांच्या बाबतीत ३ नंबर वाले लकी पाहण्यात आले जसे श्री शरद पवार आणि युवराज सिंग.

श्री शरद पवार १२/१२/१९४०
युवराज सिंग १२/१२/१९८१
सोनू सूद –३०/७/१९७३
रजनीकांत — १२/१२/१९५०
गोविंदा – २१/१२/१९६३
राणी मुखर्जी २१/३/१९७८
वरील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती ह्या ३ नंबर च्या अधिपत्याखाली येतात.

धन्यवाद…..!

Leave a Reply