Table of Contents
आपला मुलांक 1 कसा?
आपला मूलांक 1 आहे जर आपला जन्म कोणत्याही महिन्यात 1,10,19,28 तारखेला झाला असेल.
- 1=1
- 10= 1+0=1
- 19=1+9=10=1
- 28=2+8=10=1
वरील सर्व जन्म तारखेची बेरीज 1 वर येते म्ह्णून आपणा सर्वांचा मूलांक 1 असेल जर आपला जन्म ह्या तारखेने झाला असेल.
किंवा जर आपल्या जन्म तारखेची पूर्ण बेरीज केली असता 1 येते तर आपला भाग्यांक 1 आहे.
2 नोव्हेंबर 1995 = 2+1+1+1+9+9+5 = 28=1 भाग्यांक 1 होतो.
1 नंबर आणि सूर्य
हा अंक सूर्याचा आहे. सूर्य जसा तेजस्वी असतो तसेच ह्या व्यक्ती सतत उर्जावान दिसतात. सूर्य हा कुणालाही प्रदक्षिणा घालत नाही म्हणून आपण कुणाच्या मागे मागे जाणारे नसता.
सूर्य हा आकाशमंडळात राजा मानला गेला आहे म्हणून आपण एक ऑर्डर देणाऱ्या व्यक्तिमत्वात मोडता. लीडरशिप व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याकडे असते. सूर्य हा सतत तळपणारा आणि दुसर्यांना ऊर्जा देणारा ग्रह म्हणून अशा व्यक्ती समाजात राहून स्वतः झिजून दुसर्यांना मदत करणाऱ्या असू शकतील.
सूर्य जसा रोज आपल्या वेळेचे पालन करतो तसा ह्याही व्यक्ती आपल्या टार्गेट मध्ये ते पूर्ण करण्यासाठी वेळेचे पालन करतात आणि त्यावर रोज शारीरिक आणि मानसिक तयारी करण्याची क्षमता आपल्यात असते.
१ नंबर मूलांक/भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव
आपल्याकडे जे जे ज्ञान असेल ते ते आपण दुसर्यांना देण्याचा स्वभाव असतो. संतुलित स्वभाव आणि आदर करणारा स्वभाव आपल्यात असतो. आपण बिनधास्त स्वभावाच्या व्यक्ती असता आणि कार्य करताना आपण पुढील गोष्टींच्या परिणामाचा विचार करीत नाही.
घरात आपण जरी लहान असलात तरी सर्व जबाबदाऱ्या घेणारे असता. घरातील कोणत्याही कार्यक्रमांत आपण हिरहिरीने भाग घेऊन मोठ्या जबाबदाऱ्या घेता. सतत दुसर्यांना मदत करण्याचा स्वभाव आपल्यात आहे.
नेतृत्व क्षमता आपल्यात आहे. म्हणून जिथे जिथे 1 नंबर वाले असतील तिथे तिथे ह्यांना लीडरशिप आपोआप मिळते. दूरदृष्टी ने वागण्याचा स्वभाव. स्वतःकडे कितीही समस्या असली तरी दुसर्यांना सांगणारे नव्हेत.
1 हा अंक सर्वात प्रथम येतो त्यामुळे आपण आपल्या घराण्यात सुद्धा नवीन कामाची सुरुवात करणारे पहिलेच असाल. आपल्याकडे येणाऱ्या पैशातून आपण नवीन नवीन काही मिळविण्यासाठी गुंतवणूक सतत करत असता. ह्यांना समाजात मानसन्मान मिळत असतो. आणि त्यामुळे ह्या प्रसिद्धी च्या वाटेवर नेहमी अग्रेसर असतात.
करिअर पैसा
लीडरशिप हा मूळ गुणधर्म असल्यामुळे कोणत्याही क्षेत्राचे नेतृत्व करणारे करिअर असू शकते. राजकारण, एखाद्या संस्थेची जबाबदारी घेणे वगैरे.
आपणाकडे नवीन नवीन आयडिया असल्यामुळे कोणत्याही अशा क्षेत्राची निवड करा जिथे जिथे आपल्याला समाजात मार्गदर्शक राहून मानसन्मान आणि करिअर ह्या दोन्ही गोष्टी साधता येतील.
जॉब मध्ये ह्यांना जास्त समाधान मिळत नाही पण जेव्हा तिथे आपल्या मनासारखे काही मोठे काम करायला मिळते किंवा लीडर शिप असते तेव्हा हे जॉब करू शकतात नाहीतर हे स्वतः करिअर स्वतः बनविण्याच्या नादात असतातच. वरिष्टांबरोबर मतभेद ह्यांचे होऊ शकतात. म्हणून जॉब करताना सहन करावे लागेल.
पैसा ह्यांना मिळत असतो जेव्हा जेव्हा पैसा ह्यांना लागेल तेव्हा तेव्हा ह्यांना तो मिळतोच. पैशाची काळजी जास्त नसते.
आपल्यातील कमीपणा आणि मार्गदर्शन
आपण एक अहंकारी व्यक्ती असू शकता. लीडरशिप करताना हाताखालील व्यक्तींवर आपला रुबाब जास्त दाखविताना कुणावर अन्याय होणार नाही ह्यावर लक्ष द्या.
आपल्याकडे जेव्हढी ऊर्जा आहे तीच ऊर्जा दुसर्यांकडे असेल असे समजू नका. आपणास कुणाचा सपोर्ट मिळण्यासाठी कदाचित त्रास होऊ शकेल खास पित्याचा म्हणून पिता आणि आपले संबंध कटुता पूर्ण असू शकतात. किंवा पुढे मुलांबरोबर संबंध १ नंबर च्या व्यक्तींचे चांगले पाहिले गेले नाहीत.
आपल्या संपर्कात ज्या ज्या व्यक्ती येतात त्यांना आपल्या ऊर्जेची किंवा आपल्या संतापाची लगेच कल्पना येते आणि अशा काही व्यक्ती आपल्या जीवनातून जाऊ शकतात.
आपल्याकडे अति आत्मविश्वासूपणा आपल्याला काही ठिकाणी एक पाऊल मागे आणेल आणि आपण बॅकफूट वर याल. तेव्हा काळजी घ्या. जास्त ओव्हरकॉन्फिडन्स स्वतःबद्दल ठेऊ नका.
- १ नंबर साठी लकी नंबर्स= 2/5/3/6/4/7/1/9 हे नंबर आपल्याला चालतील पण त्यातील 1/4/6 हे न्यूट्रल नंबर आहेत 4 आणि 6 शी थोडे कठीण आहे.
- शत्रू नंबर= 8
- शत्रू रंग= काळा आणि निळा
- लकी कलर= पिवळा, सफेद, ब्राऊन, लाल.
- आरोग्य – आजार आणि १ नंबर= डोक्याचे आजार मायग्रेन वगैरे, अपचन आणि रक्ताचे कोणतेही आजार – ब्लड प्रेशर , डोळ्यांचे आजार , डायबिटीज, हृदयरोग, टेंशन.
वरील सर्व आजारांवर एकच उपाय सर्वांची जास्त काळजी करत बसू नये. जास्त व्याप करून पसारा वाढवू नये.
१ ते १२ वर्षापर्यंतच्या लहान मुलांना गर्मी च्या गाठी, ताप, गोवरे, कान्जणे येण्याचा संभव जास्त असतो.
कोणत्याही वर्षाची टोटल हि जर 4 येत असेल (२०११) किंवा आपला पर्सनल नंबर त्या वर्षासाठी 4 येत असेल (हे कसे काढायचे आपल्याला पुढील काही पोस्ट मध्ये मिळेल) किंवा आपले वय 4 वर येत असेल –तर 1 मूलांक आणि भाग्यांक वाल्यानी जपून राहावे खूप त्रास होतो. एखादा अपघात , भांडणे, कोर्ट केस , आजार अशा आजारांना सामोरे जावे लागते.
मूलांक १ असणाऱ्या मान्यवर व्यक्ती
- बिलगिट्स 28 ऑक्टोबर 1955 — श्रीमंत आणि दानी व्यक्तिमत्व स्वतःकडे जे जे आहे ते देत राहणारा.
- धीरूभाई अंबानी 28 डिसेंबर 1932
- मुकेश अंबानी 19 एप्रिल 1957
- नीता अंबानी 1 नोव्हेंबर 1963
- रतन टाटा 28 डिसेंबर 1937
- इंदिरा गांधी 19 नोव्हेंबर 1917
- प्रतिभा पाटील, (देशाची पहिली महिला राष्ट्रपती)
- सुश्मिता सेन, नाना पाटेकर, दारासिंग, ऐश्वर्या राय, ह्रितिक रोशन, संजीव कपूर, लता मंगेशकर,
पुढील पोस्ट मध्ये 1 नंबर आणि लोशु ग्रीड चा संबंध ह्याबद्दल वाचावे.
धन्यवाद…..!