You are currently viewing अंकांचे शत्रू, मित्र आणि विश्लेषण

अंकांचे शत्रू, मित्र आणि विश्लेषण

नूमरॉलॉजि मधील वरील चार्ट मध्ये १ ते ९ अंक दिलेले आहेत.

हा तक्ता आपण जर पाहिलात तर सहज रित्या आपल्याला हे समजेल कि त्या अंकाला कोणते शत्रू कोणते मित्र आणि कोणते सम अंक चालतात.

१- सूर्य

सूर्य अंकगणितात १ अंकाचे प्रतिनिधित्व करतो. तो जर राजा मानला तर त्याला प्रथम सर्वात जवळचे अंक १-सेनापती, २-राणी आणि ५-राजपुत्र. नंतर च्या टप्यात तो ३-गुरु, ६ -शुक्राचार्य आणि इतर १- राजांना जवळ करेल.पण तो ८ नंबर ला सर्वात जास्त शत्रू मानतो कारण ८ नंबर सूर्यपुत्र शनी चा आहे. त्याला ४- राहू आणि ७ केतू हे सारखेच वाटतील कारण केतूकडून तो अध्यात्माचा सल्ला घेईल आणि राहूची सुद्धा काही तांत्रिक अडचणीत मदत घेईल. म्हणजे १ अंकाला — (मित्र १/९/५ नंतर ३/६/१) (शत्रू -८) (सम ४/७)
होतील.

२- चंद्र

चंद्राला अंकगणितात राणी ची उपमा दिली असता ती प्रथम १-राजा, ५-राजपुत्र आणि ३-गुरु ला प्राधान्य देईल. इतर राण्यांना सुद्धा नंतर सन्मानित करेल २–(बी). ती ८-शनी पासून ४-राहू पासून आणि ९-सेनापती पासून दूरच राहण्याचा प्रयत्न करेल. ७-केतू आणि ६ शुक्राचार्याना ती सम प्रमाणात मानसन्मान देईल. म्हणजे अंक २ साठी (मित्र १/५/३) (शत्रू-८/४/९) आणि (सम ७/६) होतील.

३- गुरु

अंक ३ गुरु ला गुरुचे प्रतिनिधित्व दिले आहे. म्हणून गुरु सर्वात आधी १- राजा, नंतर ५-राजपुत्र, ३ इतर गुरु, आणि २-राणी ह्यांना
आधी मानसन्मान देईल. नंतर तो अध्यात्मिक केतू ला सुद्धा कधी कधी जवळ करेल. पण त्याला नेहमी विरोध करणारे ६-शुक्राचार्य ह्यांना तो जवळ करणार नाही.त्यांना तो नेहमी आपला शत्रू मानेल. ४-राहू, ८-शनी, ९ मंगळ ह्याच्याशी तो सम वागेल त्यांना शत्रू किंवा मित्र हे दोन्ही मानू शकेल . आणि इथे 7केतू ला सुद्धा लांब ठेऊनच समत्व देईल. इथे ७ ला मित्र आणि सम मध्ये सुद्धा दाखविला आहे ते त्या त्या परिस्थितीत त्याचा उपयोग करावा. म्हणजे अंक ३ साठी (मित्र १/५/३/२ केव्हा ७) (शत्रू-६) आणि (सम ४/८/९ *7) होतील.

४- राहू

अंक ४ वर राहू चा अधिकार आहे. राहू हा अति हुशार प्लॅन करणारा म्हणून ओळखला जातो. त्याचे अर्धे अंग ७-केतू ला नंतर १-राजाला, ५-प्रिन्स ला, ६- शुक्राचार्याना आधी मानसन्मान देईल. नंतर तो ८-शनी, आणि ४- इतर दानवांना सुद्धा जवळ करेल कधी कधी त्यांचा उपयोग करून घेईल. पण कधी कधी ८-शनी, ४-राहू, ९-सेनापती, आणि २-राणी ह्यांना तो शत्रू सुद्धा मानेल. कारण ८ नंबर ने शनी ची शिक्षा सुद्धा राहुला मिळते आणि ९ नंबर चा सेनापती त्याची सिस्टम मानत नाही आणि २ नंबर राणी ला सुद्धा तो त्रास देण्याच्या प्रयनात असतो.

आणि तो ३- गुरु ला सम ठेवेल. म्हणून इथे राहू चे (मित्र –७,१,५,६ केव्हा केव्हा ४/८) (शत्रू-९/२ आणि केव्हा केव्हा ४/८) (सम-३) जिथे केव्हा केव्हा वाचाल तेव्हा त्या नंबर च्या सहवासात तो राहू शकत नाही त्या अंकांपासून दूर असेल तर त्यांचे एकमेकांशी पटेल. म्हणजे उदारणार्थ जर ४ ने ४ शी लग्न केले तर पटणार नाही पण ४ ने ४ शी पार्टनरशिप करून ते वेगवेगळ्या शहरात आपली कामे करत असतील तर त्या बिझिनेस मध्ये खूप फायदा होईल. ह्यासाठी जर आपला ४ मूलांक किंवा भाग्यांक असेल तर नक्की नुमरॉलॉजिस्ट ची मदत घेऊ शकता.

हेही वाचा :- जाणून घ्या आपल्या फक्त जन्मतारखेवरून आपल्याला अंकांचा आशीर्वाद किती आहे.

५- बुध

अंक ५ ला राजपुत्राचा दर्जा दिला आहे (प्रिन्स). तो एक १२ वर्षाखालील राजपुत्र मानला जातो म्हणून तो १-राजा,२-राणी, आणि त्याला त्याच्या खट्याळपणात मदत करणारे ६-शुक्राचार्य याना जवळ करेल. तसेच तो राजपुत्र ३-गुरु आणि इतर ५-राजपुत्राचा सन्मान करेल. राजा असताना त्याच्याकडे काहीही जबाबदारी नाही आणि तो मॅच्युअर्ड सुद्धा नाही म्हणून – ८ शनी, ७ केतू, ४ राहू , ९-सेनापती ला
तो सम मानेल जास्त जवळ पण नाही जास्त लांब पण नाही. म्हणजे ५ अंकाला ( मित्र-१/२/६,३/५) (शत्रू-कोणी नाही) (सम-८/७/४/९) असतील.

५ अंकाला कोणताही शत्रू लोषु ग्रीड मध्ये दिला नाही ह्याचे दुसरे कारण तो नंबर ग्रीड मध्ये मधोमध येतो आणि सर्व नंबरचा प्रभाव
त्याच्यावर असतो किंवा तो सर्वांच्या सर्कल मध्ये येत असतो.

६- शुक्र

अंक ६ हे दैत्य दानव गुरु शुक्राचार्य चे प्रतिनिधित्व करतात. म्हणून ते सर्वात प्रथम १-राजा, ७-केतू, ५-प्रिन्स, ६-इतर दैत्य दानव शुक्र यांना जवळचे मानतात. पण ३-देवगुरु ला ते आपला कट्टर शत्रू मनातील. तसेच ८-शनी, ९-सेनापती, २-राणी,आणि इतर दानव-४ राहू
यांना ते सम दर्जा देतात. म्हणजे ६ अंकाला (मित्र १/७/५/६) (शत्रू-३) (सम-८/९/२/४) असतील.

७- केतू

अंक ७ ला केतूचा दर्जा दिला आहे. हा एक अध्यात्मिक सल्ला देणारा मानला जातो . म्हणून ४-राहू (त्याचेच शरीर) , ६-शुक्र, १-
राजा, ३-गुरु,आणि ५-प्रिन्स ह्यांना आधी मानसन्मान देईल. आणि तो कोणालाही शत्रू मानणार नाही. पण ८-शनी न्यायाधीश , ९ मंगळ सेनापती , २-चंद्र राणी, ७-इतर अध्यात्मिक गुरु ह्याच्याशी तो सम असेल.

म्हणजेच ७ अंकाला (मित्र ४/६/१/३/५) ( सम-८/९/२/७). ७ अंकाला म्हणजे केतूला कोणी शत्रू दिला नाही ह्याचे कारण केतूला शीर नाही आणि डोके डोळे नसल्यामुळे तो कोण शत्रू आहे हे ओळखू शकत नाही. म्हणून ७ मूलांक किंवा भाग्यांक असणाऱ्या व्यक्ती जीवनात बऱ्याच वेळा फसले जातात कुणाकडून ना कुणाकडून.

८- शनी

अंक ८ हा शनीच्या प्रभावात येतो. शनी एक न्यायाधीश आहे. शिक्षा देण्याचे काम असल्यामुळे तो सर्वात आधी राजाला शत्रू
मानतो कारण तो राजाचे सुद्धा ऐकणारा नाही आणि दुसरे कारण (शनी – रवी) तसेच तो २-राणी, आणि केव्हा केव्हा ४-राहू आणि ८-इतर न्यायाधीश यांना आपला शत्रू मानतो — तो ५-प्रिन्स, ३-गुरु, ६ शुक्राचार्य, आणि ७-केतू आध्यात्मिक गुरु ह्यांना जवळ करेल सल्ला
घेण्यासाठी. पण तो राजाच्या सर्वात जवळ असलेल्या ९- सेनापती ला लांब ठेवेल आणि सम दर्जा देईल. म्हणून ८ अंकाला (मित्र ५/३/६/७) (शत्रू-१/४/८/२) (सम-९) असतील.

९- मंगळ

अंक ९ वर हा मंगळाचे म्हणजेच सेनापतीचे प्रभुत्व असते. म्हणून तो सर्वात जवळ १-राजा, ५-प्रिन्स आणि ३ गुरु ह्यांना जवळ करेल. पण ४-राहू आणि २-राणी ह्यांना आपला शत्रू मानेल. आणि ९-इतर सेनापती आणि ७-केतू, ६-शुक्र, ८-शनी ह्यांना सम दर्जा देतो.
म्हणून अंक ९ ला ( मित्र अंक १/५/३) (शत्रू अंक -४/२) (सम-९/७/६/८) असतील. जिथे जिथे आपल्या मूलांक आणि भाग्यांकाचा अंक हा त्या शत्रू अंकाशी जुळेल तिथे तिथे आपल्याला त्या वस्तू/व्यक्ती/आणि तेथील वातावरणात ह्यात नक्की त्रास जाणवेल.

मी इथे आपल्याला एक उदाहरण देतो — समजा एखाद्या व्यक्ती ची जन्म दिनांक कोणत्याही महिन्यातील १/१० किंवा २८ असेल किंवा त्याच्या पूर्ण जन्म तारखेची बेरीज केली असता १ वर जाईल तर त्याचे मूलांक किंवा भाग्यांक हे १ असेल. आणि जर अशा व्यक्तीने त्याच्या शत्रू शी रिलेशन ठेवले (८ अंकाबरोबर) तर दोघांचेही भले होईल ह्यावर शंका असेल .

तेव्हा वरील दिलेला तक्ता हा एव्हढा महत्वाचा आहे कि जर ह्याचा वापर आपल्या मूलांक आणि भाग्यांक बरोबर बॅलन्स केला तर जीवन हे अगदी सुरळीत होण्यास हरकत नसेल.

बऱ्याच जणांचे जन्म हे एकाच दिवशी होत असतात पण त्यातील काही जणांचे नशीब असे असते कि त्याच्या जीवनात त्यांच्या नावाचे स्पेलिंग, त्यांचा शाळेतील रोल नंबर , त्याच्या घरातील व्यक्तींचा नंबर, त्याच्या कोणत्याही सर्टिफिकेट चा नंबर, गाडीचा, घराचा, पतीचा, पत्नीचा अंक , बँक अकाउंट नंबर, हा नेहमी त्याच्या मूलांक आणि भाग्यांकाशी जुळत नसतो आणि मग दिवस फिरतात.

म्हणून आपणास विनंती आहे कि ह्याला हलके मुळीच घेऊ नका. आपण ज्या ज्या नंबरच्या जवळ आहोत ते ते शोधा आणि त्याला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. जर समजत नसेल तर एखाद्या नुमरॉलॉजिस्ट ची नक्की मदत घ्या.

धन्यवाद…..!

Leave a Reply