You are currently viewing कुंभ राशी/ लग्न — राहू परिवर्तन ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

कुंभ राशी/ लग्न — राहू परिवर्तन ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

राहू-केतू राशी परिवर्तन : ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

राहू चे १८ महिन्याचे मीन राशीतून जे भ्रमण होत आहे त्याचे टाइम टेबल वरील लिंक मध्ये वाचून घ्या.

कुंभ राशी आणि कुंभ लग्न साठी हे मीन राशीतून होणारे भ्रमण पुढे देत आहे.

जर आपली राशी कुंभ कर असेल किंवा आपली राशी दुसरी कोणतीही असेल पण जर आपले लग्न कुंभ असेल तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.

वर दिलेली कुंडली इमेज हि कुंभ राशी किंवा कुंभ लग्नाची आहे. जर आपली कुंभ राशी नसली तरी जर कुंभ लग्न असेल तर आपली लग्न कुंडली हि अशी असू शकेल.

नोट — मी इथे चांगले आणि वाईट दोन्ही बाजू मांडेन. आपल्याला राशी कुंडली आणि लग्न कुंडली दोन्ही चेक करावी लागेल. ह्यासाठी आपली राशी कोणती आणि आपले लग्न कोणते हे आपणास माहित हवे. आपण दोन्ही पोस्ट वाचल्यानंतर (आपले लग्न आणि आपली राशी) जर राशी कुंडलीत आणि लग्न कुंडलीत एखादा विषय हा दोन्ही ठिकाणी चांगला असेल तर ती गोष्ट पॉसिटीव्ह समजावी आणि दोन्ही ठिकाणी वाईट असेल तर काळजी घ्यावी लागेल. तरी सुद्धा आपल्या मूळ कुंडलीत राहू जिथे जन्माच्या वेळी आहे ते पाहूनच फायनल डिसिजन घ्यावे हि विनंती. जे विषय इथे मांडण्यात येतील त्या घटना घडण्यासाठी आपली परिस्थिती आणि आपले वय त्यास सूट होत असतील तरच त्या घडतील नाहीतर घडणार नाही.

नोट — २५/३/२००५ ते १२/१०/२००५ ह्या कालावधीत राहु १८ वर्षापूर्वी मीन राशीतून भ्रमण करत होता त्यावेळी शनी कर्क राशीतून भ्रमण करत होता — राहू ची ७ वि दृष्टी ज्या स्थानावर येत होती तिथेच शनी आपली ३ री दृष्टी कर्क राशीतून टाकत होता. आणि ते स्थान ८ वे (अष्टम) स्थान होते ( जिथे ६ नंबर ची कन्या राशी असेल आपल्या पत्रिकेत) शनी आणि राहू दोघे एकदम पाहत होते त्या स्थानाला. २५/३/२००५ पासून च्या १८ महिन्याच्या कालावधीत कुंभ राशी आणि कुंभ लग्नाला ८ व्या (भाग्य) ह्या स्थानाचे फळ जरूर मिळाले असेल. ह्या स्थानावरून आयुष्यातील सर्व प्रकारचे अचानक होणारे अपघात, पीडा पहिल्या जातात, इथूनच मृत्यू बद्दल (आयु) आकलन केले जाते, इथून कमी मेहनतीचा पैसा सुद्धा पहिला जातो, गूढ (गुप्त) गोष्टी बद्दल सर्व काही चेक केले जाते, वारसा हक्काने मिळणारे सर्व प्रकारचे लाभ, कमरेच्या खालील भागाचे रोग, गुप्तांग, आकस्मित धन, ऑपेरेशन आणि शारीरिक मानसिक सर्व प्रकारच्या व्यक्तीला होणाऱ्या पीडा चेक केल्या जातात. ह्यातील एक तरी विषय खूप चांगला किंवा खूप वाईट गेला असेल. आठवून पहा ह्याच विषयाच्या बाबतीत आपली धावपळ होती का?

आता पुढे …….ह्याचे काय परिणाम होईल ते पाहू.

दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५ पर्यंत राहू मीन राशीत आहे आणि आपल्या कुंभ कर राशी कुंडलीत किंवा कुंभ लग्न कुंडलीत मीन राशी हि कुंडलीच्या २ ऱ्या (द्वितीय) स्थानी येत आहे ह्या स्थानावरून पैसा, वाणी, कुटुंब हे मुख्य विषय पहिले जातात. कुटुंबापासून जे जे लाभ आहेत त्यांना पैसा मिळविण्यासाठी हा काळ उत्तम असेल. किंवा जे कुटुंबात राहत आहेत त्यांना आता फॅमिली पासून लांब जाऊन पैसे कामविता येईल. मात्र ह्या कालावधीत कुणाला पैसे उधार दिले तर येण्याचे प्रकार कमी दिसतील. कुटुंबासाठी पैसा बराच खर्च होऊ शकेल आणि जर आपल्या स्वतःच्या जन्मपत्रिकेत राहू जर उत्तम स्थितीत नसेल तर हा पैसा वाया जाऊ शकेल काळजी घ्यावी. कुटुंबात काही तंटे असतील आधीपासून तर वाणीवर कंट्रोल ठेवण्याचा सल्ला सुद्धा देण्यात येतो.

राहूची ६ व्या स्थानावर ५ वी दृष्टी

राहू वरील दिलेल्या कालावधीत मीन राशीत असताना कुंडली इमेज मध्ये दाखविल्याप्रमाणे तिथून तो सहाव्या (षष्ठ) स्थानाला पाहणार आहे. म्हणजे जिथे ४ नंबर लिहिले आहे. म्हणजे हे स्थान आता आपले ऍक्टिव्हेट राहू करणार. पत्रिकेत सहाव्या स्थानावरून नोकरी – आजार – स्पर्धा – कर्ज – शत्रू – कोर्ट कचेरी विषय – चिंता हे विषय पहिले जातात. ह्या कालावधीत जर आपल्याकडे कोर्ट कचेरीचे विषय असतील तर ते बाहेरच्या बाहेर सोडविण्याचा प्रयत्न होईल. किंवा त्यात आपण विजय मिळवाल. जॉब मधील मोठे बदल दिसतील. ज्यांच्याकडे स्पर्धा परीक्षा हे विषय असतील त्यांना यश मिळेल.

राहु ची ८ व्या स्थानवार ७ वी दृस्टि

कुंडली इमेज मध्ये पहा राहु ३ ऱ्या स्थानातून आठव्या (अष्टम) स्थानवार आपली ८ वी दृस्टि देत आहे जिथे ६ नंबर लिहिले आहे हे कुंडलीचे ह्या स्थानातून आयुष्यातील सर्व प्रकारचे अचानक होणारे अपघात, पीडा पहिल्या जातात, इथूनच मृत्यू बद्दल (आयु) आकलन केले जाते, इथून कमी मेहनतीचा पैसा सुद्धा पहिला जातो, गूढ (गुप्त) गोष्टी बद्दल सर्व काही चेक केले जाते, वारसा हक्काने मिळणारे सर्व प्रकारचे लाभ, कमरेच्या खालील भागाचे रोग, गुप्तांग, आकस्मित धन, ऑपेरेशन आणि शारीरिक मानसिक सर्व प्रकारच्या व्यक्तीला होणाऱ्या पीडा चेक केल्या जातात. वरील विषय काळजीचे दिसतील तेव्हा सतर्क राहावे.

राहू ची १० व्या स्थानावर ९ वी दृष्टी

कुंडली इमेज मध्ये राहू जिथे आहे तिथून तो पत्रिकेतील दशम (कर्म) स्थानावर दृष्टी टाकत आहे. जिथे ८ नंबर लिहिले आहे. कुंभ राशी किंवा कुंभ लग्नाच्या व्यक्तींसाठी पुढील १८ महिने हे ह्या स्थानावरील घटनांचा जास्तीत जास्त परिणाम दिसू शकतो. ह्याच स्थानावर शनी ची कुंभ राशीतून १० वी दृष्टी सुद्धा येत आहे त्यामुळे ह्या कालावधीत ह्या स्थानाची फळे व्यक्तीला १००% मिळू शकतील. ह्या स्थानाबद्दलचे जे जे विषय असतील जे आधी पेंडिंग होते ते सर्व सुटतील. ह्या स्थानावरून पत्रिकेत करिअर, आपले प्रोफेशन आणि आपले सर्व कर्मे , पद,प्रतिष्ठा, राजयोग पाहिले जातात. ह्या स्थावर राहूची दृष्टी शुभता निर्माण करेल. करिअर मधील मोठे बदल करण्यास उत्सुक असाल, पद प्रतिष्टेसाठी अग्रेसिव्ह व्हाल.

वरील सर्व बॅलन्स करण्यासाठी उपाय — आपण कुंभ राशीचे आहात किंवा कुंभ लग्नाचे असाल राहू च्या विषयी च्या कोणत्याही त्रासाबद्दल
आपण वरील १८ महिन्याच्या कालावधीत जास्तीत जास्त शिव उपासना सुरु ठेवा. जसे प्रत्येक सोमवारी शिव मंदिरात जाऊन अभिषेक करणे. दुसरा उपाय असा आहे कि दोन चमचे गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ त्यात दोन चमचे साखर मिक्स करून आपल्या विभागातील कोणत्याही मोठ्या झाडांच्या आजूबाजूला टाका. ह्याने तेथील किडी मुंग्यांना पोषण मिळेल. आणि हाच उपाय कुंभ राशी साठी राहू पासून सर्व प्रकारचे लाभ किंवा नुकसान पासून रक्षण करणारा असेल. करून पहा.

धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८
७५०६७३७५१९

Leave a Reply