You are currently viewing ४ नंबर मूलांक/भाग्यांक

आपला मूलांक मूलांक नंबर ४ कसा ?

आपला मूलांक ४ आहे जर आपला जन्म कोणत्याही महिन्यात ४,१३,२२,३१ तारखेला झाला असेल.
४ = ४
१३ = १+३ = ४
२२ = २ + २ = ४
३१ = ३ + १ = ४

वरील सर्व जन्म तारखेची बेरीज ४ वर येते म्ह्णून आपणा सर्वांचा मूलांक ४ असेल जर आपला जन्म ह्या तारखेने झाला असेल.

किंवा जर आपल्या जन्म तारखेची पूर्ण बेरीज केली असता ४ येते तर आपला भाग्यांक ४ आहे. 19 नोव्हेंबर १९८१ = १+९+१+१+१+९+८+१ = ३१ = ३+१ = ४ भाग्यांक होतो.

हेही वाचा :- ३ नंबर मूलांक / भाग्यांक

४ नंबर आणि राहू = स्वभाव/व्यक्तिमत्व

४ नंबर च्या व्यक्तींवर राहू चा प्रभाव पाहण्यात येतो म्हणून अशा व्यक्ती नेहमी परंपरा रूढी ह्या गोष्टीत जास्त रस घेत नाहीत आणि त्यामुळे एक रहस्यात्मकता ह्यांच्याकडे दिसून येत असते. राहू हा इतर ग्रहांप्रमाणे फार वेगळा आहे आणि विरोधी सुद्धा म्हणून अशा व्यक्ती नेहमी काही ना काही वेगळे वागतात किंवा विरोध करणारे असू शकतात.

ह्यांचे व्यक्तिमत्व स्ट्रॉंग असते. रुबाबदार, जिज्ञासू वृत्तीचे आणि ह्यांना समजाविणे हे सर्वाना जमत नाही. बोलणे सुद्धा खूप रुबाबदार असते, कोणत्याही गोष्टीत सहनशीलता दिसत नाही. सतत फाईट करण्याच्या तयारीत असू शकतील.

ह्याचे विचार हे थोडे हटके असू शकतील. संघर्ष, खूप अडचणीचा सामना ह्यांना करावा लागतो. प्रतिकार करण्याची क्षमता ह्यांच्यामध्ये मुळात असते. नेतृत्व क्षमता ह्याच्यात दिसून येते. कुणावर लगेच विश्वास न दाखविण्याचा स्वभाव सुद्धा पाहण्यात येतो. कुणाच्या बंधनात राहणे ह्यांना कधी आवडत नसते. ह्यांची कुणी छेड काढलेली ह्यांना आवडत नाही. राग नाकावर येतो आणि तो दिसतोही तेव्हढाच.

बदला घेण्याची क्षमता ह्याच्याकडे असते. आपल्या मतावर ठाम असणारे हे असतात. समाजातल्या खालच्या लोकांना नेहमी हे मदत करत असतात. ह्यांना कोणी व्यक्ती आवडली तर ती जरी चुकीची असली तरी त्याची साथ हे सोडत नाहीत मग मोठ्यात मोठ्या व्यक्तीबरोबर हे त्याच्यासाठी झगडू शकतील. वरिष्ठांबरोबर नेहमी वादात हे सापडतात. कुटुंबात कुणा एका तरी नात्यात ह्यांना सतत त्रास असतो किंवा त्या व्यक्तीपांसून हे मतभेद-नाराज असतात.

सतत खाली वर जात राहतात जीवनात स्थिरता मिळताना जरा त्रास पाहण्यात आला आहे. घरातून पळून जाण्याचा विचार बऱ्याच ४ नंबर वाल्याना येत असतो. काही ४ नंबर वाल्या व्यक्ती असे करताना दिसतात सुद्धा पण पुन्हा येतात. १/२/६/७ शी लग्न करण्यात हरकत नाही. विवाहाला ४ चे ४ शी किती जुळेल ह्यावर शंका आहे. विवाह झाला असेल तर नावाच्या नंबर चे स्पेल चेक करून ह्यावर काही उपाय करता येतात.

वाकपटुता, विरोधक, फायटर-वादविवाद रागीट, कलात्मकता, लीडरशिप, सतत सर्चिंग, असहनशीलता हे गुण घेऊन हे जीवन जगत असतात.

करिअर / पैसा

चांगले शासक, मॅनेजर, टेक्निकल फिल्ड्स, बँकिंग क्षेत्रे, शेती, शेअर मार्केट, बेटिंग, जुगार, लॉटरी अशा फिल्ड मध्ये हे काही वेळा मजल मारतात पण एकदम खाली येण्याचे नाकारता येत नाही.

ज्योतिषी , रेकी, इन्शुरन्स एजेंट, पोलीस, केमिस्ट, सेक्युरिटी एजेन्सी हि क्षेत्रे ह्यांना नेहमी चांगली. पाण्याच्या आणि आगीच्या संबंधित कामे ह्यांनी करू नये. केमिकल संबंधित कामांत ह्यांनी जीवाला जपण्याचा सल्ला दिला जातो.

करिअर मध्ये शारीरिक मेहनत, धावाधाव जिथे असेल असे क्षेत्र निवडले तर ह्यांना ट्रेस कमी पाहण्यात आला. प्रायव्हेट जॉब थोडे त्रासाचे असतील. स्वतःचा व्यवसाय किंवा गव्हर्नमेन्ट जॉब उत्तम. सामाजिक संस्था चे अध्यक्ष.

आपल्यातील कमीपणा आणि मार्गदर्शन

आपण बऱ्याच वेळा बिनधास्त वागत असता, आपल्यात सहनशीलता नसेल तर काही वेळा आपल्याला नुकसान होईल, वादविवाद टाळावा लागेल. सतत आपल्याबरोबर चीटिंग होत असेल तर सावधान, कोर्ट केस, कायद्याच्या गोष्टी ह्यात आपले नुकसान दिसते म्हणून बाहेरच्या बाहेर ह्या गोष्टी मिटवा. सल्ला देताना काही वेळा ऑर्डर देण्याची चूक आपल्याकडून होईल त्यावर लक्ष द्या. रिलेशन जपण्यामध्ये ४ वाल्याना जास्त त्रास होताना पाहिला आहे त्यामुळे कधीही जास्त त्यात समोरच्यांकडून आशावादी राहू नका. रिटर्न गिफ्ट चा विचार केला नाही तर खूप त्रास कमी होईल.

 • शुभ रंग= निळा, वांगी कलर, पिवळा, नारंगी,सफेद.
 • अशुभ रंग= लाल आणि काळा
 • भाग्यवान दिवस= शुक्रवार, रविवार
 • लकी नंबर्स= ४ नंबर साठी ४ वाले नेहमी शत्रू असतात पण हे एकमेकांपासून दूर असतील तर मित्र सुद्धा असतील. १,६,२,७ हे नंबर त्यात १ सर्वात चांगला
 • त्रू नंबर= ८ आणि ९
 • महिन्याच्या शुभ तारखा= १,१०,१९,२८,७,१६,२५
 • जीवनातील शुभ वर्षे= ज्या वर्षाची बेरीज ४ येते किंवा ज्या वयाची बेरीज ४ येते अशी सर्व वर्षे आपल्याला शुभ असतात. ह्यात काही नवीन निर्णय सुरुवात करू शकता. पण ह्याच वर्षी काही दुसऱ्या मोठ्या हलविणाऱ्या घटना सुद्धा होतात त्या अति वाईट सुद्धा पाहण्यात आल्या आहेत.

उदाहरण – असे वर्ष ज्याची बेरीज ४ येते २०११ — २+०+१+१ = ४
किंवा असे वय ४थें १३ वे ३१,४० वे आणि इतर ह्या वयात सुद्धा आपल्याला काही वरील घटना घडू शकतात.

 • आजार= नाकापासून ते छातीपर्यंतचे सर्व आजारांचे त्रास, पचन संस्था विकार, स्पॉडिलायसिस, कोणत्याही नशेपासून होणारे त्रास, मुलींना कन्सिव्ह करताना त्रास पहिला आहे. एखाद्या आजारावर चुकीची ट्रीटमेंट सुद्धा होताना दिसते म्हणून २ वेळा कंसल्ट करून आजाराचे निदान करावे ह्यांनी.
 • शेनवॉर्न – १३ सप्टेंबर १९६९
 • अजित पवार २२ जुलै १९५९
 • प्रीती झिंटा ३१/१/१९७५
 • अनिल अंबानी ४/६/१९५९
 • किशोर कुमार ४/८/१९२९
 • श्रीदेवी, तब्बू , जुही चावला, ऋषी कपूर, सरोज खान, श्री श्री रवी शंकर, बाराक ओबामा.

वरील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती ह्या ४ शी संबंधित आहेत.

धन्यवाद…..!

Leave a Reply