You are currently viewing ९ नंबर मूलांक/भाग्यांक

आपला मूलांक – भाग्यांक नंबर ९ कसा?

आपला मूलांक ९ आहे जर आपला जन्म कोणत्याही महिन्यात ९,१८,२७ तारखेला झाला असेल.
९ = ९
१८ = १ + ८ = ९
२७ = २ + ७ = ९

वरील सर्व जन्म तारखेची बेरीज ९ वर येते म्ह्णून आपणा सर्वांचा मूलांक ९ असेल जर आपला जन्म ह्या तारखेने झाला असेल.

किंवा जर आपल्या जन्म तारखेची पूर्ण बेरीज केली असता ९ येते तर आपला भाग्यांक ९ आहे.
२१ – ५ – १९९० = २+१+५+१+९+९+० = २७ = ९ भाग्यांक होतो.

९ नंबर आणि मंगळ- स्वभाव/व्यक्तिमत्व आणि इतर बाबी

नुमरॉलॉजि मध्ये ९ नंबर हा मंगळाचा आहे. आपल्या जीवनावर मंगळाचे सर्व गुणधर्म लागू होऊ शकतील. मंगळाला एका अर्थाने सैनिकीचा / सेनापतीचा दर्जा आहे. त्यामुळे जसा एखादा सैनिक आपल्या शत्रूबरोबर लढत असतो, जसे त्याचे जीवन सैनिकी पेशातील असते तसेच काही संघर्ष ९ नंबरच्या मूलांक आणि भाग्यांक असणाऱ्या व्यक्तीमध्ये जरूर पाहण्यात येतात. एक सैनिक जसा लढाऊ, साहसी, आणि योद्धा असतो तोच गुण ९ नंबरच्या व्यक्तींमध्ये दिसतोच.

मंगळामध्ये आग आहे म्हणून ९ नंबरच्या व्यक्ती अति रागीट असू शकतील, राग नाकावर दिसतो. मंगळाचा रंग लाल आहे म्हणून लाल रंग जसा उठावदार असतो तसे ह्यांचे व्यक्तिमत्व रुबाबदार असते. लाल हा रंग स्थिरतेचे प्रतीक सुद्धा आहे त्यामुळे अशा व्यक्ती आपल्या निर्णयावर ठाम असतात. ह्यांच्या शरीरावर खास कपाळ, चेहरा ह्यावर एक तरी खूण जन्माची किंवा नंतर झालेल्या छोट्या मोठ्या अपघाताने झालेली दिसतेच.

ह्या व्यक्ती सतत गतिवान आणि तेजवान असतात. जलद चालणाऱ्या ह्या व्यक्ती असतात. सतत पुढे जाण्याची इच्छाशक्ती, मोठ्याने बोलणारे, इतरांपेक्षा मस्ती जास्त करणारे लहान मुले हे ९ नंबर च्या अधिपत्याखाली येतात.

कोणत्याही गोष्टी लगेच मिळविण्याची ह्यांची सवय आणि घाई ह्यांना प्रेम मिळविताना आणि कुणाला प्रेम देताना त्यात त्रास पाहिला गेला आहे ह्याचे दुसरे कारण ह्यात ह्यांचा राग आणि अति ऑर्डरफूल असणे हे सुद्धा पाहण्यात आले. दुसऱ्यावर जबरजस्ती ने आपले मत हे लादू शकतील असा स्वभाव ह्यांच्यात पाहण्यात येतो. जिथे जिथे अर्ग्युमेण्टस आहेत, डेरिंग आहे, आणि जिथे मारामारी सुद्धा करावी लागत असेल तिथे तिथे ह्या व्यक्ती पुढे येऊन त्यात आपला रोल १००% दाखवतात. मुक्या प्राण्याबद्दल ह्यांना प्रेम असते. स्पर्धा, ऍक्शन, खेळाडूपण हे सुद्धा जास्त ९ नंबर मध्ये ऍक्टिव्ह असतील. जीवनात नेहमी ह्यांना अपघात वारंवार होतात छोटे मोठे शारीरिक इजा होताना दिसतात.

हेही वाचा :- ८ नंबर मूलांक/भाग्यांक

करिअर / पैसा

जिम इन्स्ट्रक्टर, जिथे जिथे जोखीम डेरिंग आहे असे सर्व क्षेत्रात ९ नंबर ने करिअर करायला हरकत नाही. खेळ, पोलीस, आर्मी, नेव्ही, अग्निशमन, डिफेन्स अशा क्षेत्रात चांगली प्रगती करता येते. रेसिंग, स्टण्ट क्षेत्रात हे नेहमी चमकताना दिसतात. मेडिकल फिल्ड मध्ये सर्जरी करण्यामध्ये ह्यांचा हात चांगला मानला जातो. व्यवसाय करताना बेकारी व्यवसाय, इलेक्टिक व्यवसाय जिथे आग येते असे सर्व व्यवसाय. ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग सुद्धा उत्तम असेल.

आपल्यातील कमीपणा आणि मार्गदर्शन

वरील सर्व जे जे आपल्या स्वभावाबद्दल लिहिलेले आहे त्यात मुख्य गोष्ट म्हणजे आपला राग – जर राग कंट्रोल केला तर बऱ्याच काही गोष्टींचा जीवनात त्रास होणार नाही. त्यामुळे आपल्याला जीवनात रिलेशन सुद्धा सांभाळताना त्रास होत असेल तर समोरच्या व्यक्तीवर आपली मते थोपण्याचे विचार आपल्याकडे नसावेत. आपल्या सवयींमध्ये अजून एक असा अवगुण असू शकतो कि आपण समोरच्या बद्दल एखादे मत लवकर बनवून तेच डोक्यात ठेवून त्याच्याकडे चुकीच्या अँगल ने पाहता आणि तो तसाच असेल हे मत बनवून घेता पण तो व्यक्ती असा का आहे ह्याचा खूप कमी वेळा विचार करता. आणि त्या व्यक्तीबद्दल लगेच आपले मत मांडण्यात घाई करता.

  • शुभ रंग: सफेद, पिवळा, नारंगी
  • अशुभ रंग: काळा आणि लाल
  • भाग्यवान दिवस: मंगळवार, शुक्रवार
  • लकी नंबर्स: ९ हा लकी नंबर आहे पण कमीत कमी ह्याचा वापर करावा कारण ह्यात ऑपरेशन आणि अपघात सुद्धा दिसतात. ३,६,९,५ ह्यांच्याशी जमते पण ९ बरोबर ९ विवाह करताना काळजी घ्यावी.
  • शत्रू नंबर: ९,२,४ किंवा ज्या वर्षाची बेरीज ८,२,४ येईल जसे २०१५,२००६ २०२७ वगैरे आणि जे वय सुरु असताना त्या वयाची बेरीज ८,२,४ असेल जसे १७,२६,३५,२०,२९,३८,१३,२२,३१.
  • महिन्याच्या शुभ तारखा: ९, १८, २७ ,६,१५, २४ ज्यांची बेरीज ६ आणि ९ येते.
  • जीवनातील शुभ वर्षे: ज्या वर्षाची बेरीज ६ किंवा ९ येते जसे २००४, २०१३, २०२२. किंवा वय वर्षे १५,२४,३३,१८,२७,३६.
  • आजार: छोट्या मोठ्या अपघातातून झालेले आजार, ऑपरेशन, पचनसंस्था, पाइल्स जिथे असे आजार जिथे रक्तस्त्राव आणि गर्मी असेल. अपेंडिक्स चे त्रास सुद्धा दिसू शकतील. महिलांमध्ये सिझेरीन वगैरे जास्त पाहण्यात येतात.शुगर, नर्वस सिस्टम वगैरे पासून सावध राहावे.

अक्षय कुमार,सलमान खान, झाकीर हुसेन, पी टी उषा, इरफान पठाण, प्रियांका चोप्रा, नेल्सन मंडेला, संजीव कुमार, ब्रुसली.

वरील सर्व प्रतिष्ठीत व्यक्ती ह्या ९ शी संबंधित आहेत.

धन्यवाद…..!

Leave a Reply