You are currently viewing लोशु ग्रीड मधील ८ महत्वाचे प्लान

लोशु ग्रीड मधील ८ महत्वाचे प्लान

लोशु ग्रीड मधील ८ महत्वाचे प्लान- 8 IMPORTANT PLANS IN LOSHU GREED

१) बौद्धिक क्षमता: INTELLECUAL / MENTAL PLAN – 4,9,2
२) अध्यात्मिक क्षमता: SPIRITUAL PLAN / EMOTIONAL PLAN – 3,5,7
३) भौतिक क्षमता: MATERIAL PLAN / PRACTICAL PLAN – 8,1,6
४) वैचारिक क्षमता: THOUGHT PLAN – 4,3,8
५) इच्छाशक्ती क्षमता: WILL PLAN – 9,5,1 (SYMBOL OF SUCCESS)
६) क्रिया क्षमता: ACTION PLAN – 2,7,6
७) संपत्ती क्षमता: PROPERTY PLAN – 2,5,8
८) नशीब क्षमता: LUCK PLAN – 4,5,6

लोशु ग्रीड मधील वरील ८ प्रकारचे प्लान हे दर्शवितात कि त्या व्यक्तीकडे कोणत्या प्रकारची क्षमता आहे.

हे सर्व प्लान तुम्ही सुद्धा चेक करू शकता कि आपल्या जन्मतारखेप्रमाणे आपल्याकडे किती % प्रत्येक प्लान बसतो.

१) बौद्धिक क्षमता: INTELLECUAL / MENTAL PLAN – 4,9,2

जर आपल्या जन्मतारखेत 4,9,2 हे तिन्ही अंक येत असतील ( मूलांक भाग्यांक) दोन्ही भरून तर हा प्लान आपला १००% बसतो.
पण ह्यात एक अंक आपल्या जन्मतारखेत नसेल तर मात्र हा प्लान ६६% आणि २ अंक नसतील तर ३३% .

जन्मतारखेत वरील तिन्ही अंक असतील तर अशा व्यक्तीची बौद्धिक पातळी फार उंचावलेली असते. हे फार हुशार असतात. तल्लख बुद्धिमत्ता दाखवून समाजामध्ये खूप प्रसिद्धी मिळवितात किंवा स्वतःला चांगले प्रेझेंट करतात. अशा व्यक्तींना फार जुन्या गोष्टी लगेच आठवतात. एकदा एखाद्या गोष्टी पहिल्या तर त्या लगेच आत्मसात करून घेतात. लहानपणीच्या गोष्टी ह्यांना मोठेपणी सुद्धा लक्षात राहतात.

४ अंक राहुचा अंक असल्याने ह्या प्लान मध्ये त्याचा उपयोग वेगवेगळ्या युक्यता करण्यासाठी आहे.
९ अंक हा मंगळाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे त्या बौद्धिक क्षमतेची ताकद वाढवणारा आहे
२ अंक हा चंद्राचा अंक असल्यामुळे ह्या प्लान मध्ये तो सामाजिक सपोर्ट देणारा आहे.
तर असा एखादा प्लान जर आपल्या जन्मतारखेत होत असेल तर आपण फार लकी आहात. एखादा अंक जर ह्यात नसेल तर मात्र त्या अंकाची उणीव भरून काढावी लागेल.

२)अध्यात्मिक क्षमता: SPIRITUAL PLAN / EMOTIONAL PLAN- 3,5,7

जर आपल्या जन्मतारखेत 3,5,7 हे तिन्ही अंक येत असतील ( मूलांक भाग्यांक) दोन्ही भरून तर हा प्लान आपला १००% बसतो.
पण ह्यात एक अंक आपल्या जन्मतारखेत नसेल तर मात्र हा प्लान ६६% आणि २ अंक नसतील तर ३३% .

ज्यांच्या जन्मतारखेत हे तिन्ही अंक असतील अशा व्यक्ती फार इमोशनल असतात. देवभोळ्या असू शकतात. दुसर्यांचा आदर कसा करावा हे ह्यांना बरोबर कळत असते. समाजात हे चांगले मदतनीस असतात. हा प्लान वैवाहिक सुखासाठी पाहिला जातो.

ह्याबद्दल अधिक माहिती साठी लिंक वर क्लिक करून वाचून घ्या. (लग्न करताय ३/५/७ अंकांचे खेळ)
https://shreedattagurujyotish.com/magic-of-number-357-in-married-life/

३)भौतिक क्षमता: MATERIAL PLAN / PRACTICAL PLAN- 8,1,6

जर आपल्या जन्मतारखेत 8,1,6 हे तिन्ही अंक येत असतील ( मूलांक भाग्यांक) दोन्ही भरून तर हा प्लान आपला १००% बसतो.
पण ह्यात एक अंक आपल्या जन्मतारखेत नसेल तर मात्र हा प्लान ६६% आणि २ अंक नसतील तर ३३% .

हे तिन्ही अंक असलेला व्यक्ती फार मेहनत करणारा असेल. अशा वक्ती प्रत्येक वेळेस नेहमी खोलवर जाऊन चौकशी करतात आणि त्यानंतरच ऍक्टिव्ह होतात. समोरच्या व्यक्तीला ह्यांना खूप समजावयाला कठीण होते कारण त्यांच्या डीप चौकशीला ते उत्तरे देताना कंटाळतात. कधी,कुठे, कसे, केव्हा असे प्रश्न नेहमी हे उभे करतात.

हे तिन्ही अंक असलेल्या व्यक्तीचा पाय ठिकाणावर नसतो सतत धावपळीत असतात आणि हीच धावपळ ह्यांना प्रगती आणि करिअर च्या दृष्टीने खूप प्रगतशील होते. म्हणून अशा व्यक्तींना सल्ला दिला जातो कि एका जागेवर बसून काम करू नकाच कारण असे काम केलेले त्यांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करू शकते किंवा भाग्योदयाला उशीर होतो.

ह्यातील ८ अंक जो शनी चा आहे त्यास खूप मेहनत करायला लावतो आणि मग त्यास लायक करतो
ह्यातील १ अंक जो सूर्याचा आहे तो ऊर्जा आणि प्रसिद्धी देतो
ह्यातील ६ अंक जो शुक्राचा आहे तो केलेल्या मेहनतीचे फळ देतो आणि त्यात आनंद निर्माण करतो.

समजा आपल्याकडे ८ आणि १ आहे म्हणजे तुम्ही फार मेहनत आणि ऊर्जेचा उपयोग कराल पण ६ नसल्यामुळे आनंद घेता येत नाही
समजा १ आणि ६ आहे पण ८ नाही तर मेहनत आणि ऊर्जा लावण्याची कार्याची तयारी तर असते पण अपॉर्च्युनिटी येत नाहीत
समजा ८ आणि ६ असेल पण १ नसेल तर असा व्यक्ती मेहनत करून आनंद घेत असेल पण त्याला उत्साह नसेल किंवा त्याचे नाव प्रसिद्धी होणार नाही.

४) वैचारिक क्षमता: THOUGHT PLAN- 4,3,8

जर आपल्या जन्मतारखेत 4,3,8 हे तिन्ही अंक येत असतील ( मूलांक भाग्यांक) दोन्ही भरून तर हा प्लान आपला १००% बसतो.
पण ह्यात एक अंक आपल्या जन्मतारखेत नसेल तर मात्र हा प्लान ६६% आणि २ अंक नसतील तर ३३%.

हे तिन्ही अंक जन्मतारखेत म्हणजे व्यक्तीकडे वैचारिक पातळी फार उंचावलेली असते. त्याने तो आपल्या आयुष्यात फार प्रगती करताना दिसतो. ह्यांनी जो विचार केलेला असतो तो उत्तम होतो आणि त्या विचारांचे चांगले फळ त्यास मिळतेच. जिथे इतरांच्या युक्त्या एका विशिष्ट वेळेस येऊन थांबतात हे तेथून सुरुवात करतात आणि मग त्यांचा हा मार्ग इतरांना पटतो. शिस्तप्रिय होऊन अशा व्यक्ती समाजात त्यांच्या विचाराने चमकतात.

ह्यातील ४ अंक हा राहू चा असल्याने तो वेगवेगळ्या कल्पना डोक्यात शिजवित असतो
ह्यातील ३ अंक हा गुरु चा असल्याने त्या व्यक्तीला त्याच्याकडे असलेल्या ज्ञानाचा सदउपयोग होतो.
ह्यातील ८ अंक शनी चा असल्याने आपल्या विचाराने तो त्यावर मेहनत करू शकतो.
ह्यातील कोणताही एक अंक किंवा दोन अंक नसतील तर त्यास त्या अंकामुळे मिळणाऱ्या गोष्टींचा फायदा होत नसेल

५) इच्छाशक्ती क्षमता: WILL PLAN- 9,5,1 (SYMBOL OF SUCCESS)

जर आपल्या जन्मतारखेत 9,5,1 हे तिन्ही अंक येत असतील ( मूलांक भाग्यांक) दोन्ही भरून तर हा प्लान आपला १००% बसतो.
पण ह्यात एक अंक आपल्या जन्मतारखेत नसेल तर मात्र हा प्लान ६६% आणि २ अंक नसतील तर ३३% .

जर आपल्याकडे 2,5,8 किंवा 4 ,5 ,6 चा कोणताही प्लान नसेल आणि जर हा प्लान असेल तरी तो त्याची कसर भरून काढेल.
कारण अशा व्यक्तीकडे हे तिन्ही अंक असतील तर ते फार भाग्यवान समजले जातात. राजकारणात असलेल्या व्यक्ती , किंवा मोठे बिझिनेस करणाऱ्या व्यक्तींकडे असा प्लान असतोच ज्याने ते समाजात नावारूपाला येतात. बिल गेस्ट, श्री श्री रवी शंकर, मुकेश अंबानी, नरेंद्र मोदी हे त्याचे खास उदाहरण आहे.

विल म्हणजे अशा माणसाची इच्छा शक्ती फार असते स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणताही त्याग करण्याची त्याची तयारी असते.
कित्येक वर्षे अशा व्यक्ती स्वतःच्या इच्छा घेऊन काम करताना दिसतात. असे लोक फायटर असतात. कितीही नुकसान झाले तरी ह्याच्या चेहऱ्यावर तिळमात्र ते झालेले नुकसान दिसत नाही. नेहमी स्टेबल असतात. म्हणजे हे गरीब असताना सुद्धा तसेच असतात आणि पुढे श्रीमंती मिळाली तरी तसेच वागतात. त्यांच्यात आदर भाव असतोच. ह्यांच्या वागणुकीत आणि चेहऱ्यावरील हावभाव कोणत्याही परिस्तिथीत बदलत नाहीत. सहसा हे चुका करत नाहीत.

ह्यातील ९ अंक हा मंगळाचा आहे त्याने ह्यांच्याकडे सहासपणा येतो.
ह्यातील ५ अंक हा बुधाचा आहे म्हणून बुद्धी कौशल्याता ह्यांच्याकडे असते आणि हा अंक त्यांना बॅलन्स करवून ठेवतो कारण ५ अंक हा सर्वांच्या मधोमध आहे.
ह्यातील १ अंक हा त्यांना नेहमी उर्जावान ठेवतो आणि प्रसिद्धी देतो. पितरांचा आशीर्वाद सुद्धा ह्यांना मिळत असतो.

६) क्रिया क्षमता: ACTION PLAN- 2,7,6

जर आपल्या जन्मतारखेत 2,7,6 हे तिन्ही अंक येत असतील ( मूलांक भाग्यांक) दोन्ही भरून तर हा प्लान आपला १००% बसतो.
पण ह्यात एक अंक आपल्या जन्मतारखेत नसेल तर मात्र हा प्लान ६६% आणि २ अंक नसतील तर ३३%.

हे तिन्ही अंक असलेला व्यक्ती नेहमी लगेच ऍक्टिव होऊन कोणतेही कार्य करण्यासाठी उतावळा होतो. मागचा पुढचा विचार न करता ऍक्शन घेत असतो. नेहमी दन दनादन दन असा व्यक्ती आपल्या आयुष्यात स्पीड घेत असतो. ह्यांना जे करायचे असते त्यात नेहमी हे २४ तास ऍक्टिव्ह राहतात. आळशीपणा नसतो. एकदा विचार केला असेल तर तो बदलत नाही.

ह्यातील २ अंक जो चंद्राचा हा घरातून तुमच्या ऍक्शन ला मदत होते. खास आईचा सपोर्ट मिळतो. किंवा तुमच्या ऍक्शन साठी पैसा कधीही कमी पडत नाही.
ह्यातील ७ अंक जो केतू चा आहे तो तुम्हाला तुमच्या ऍक्शन मध्ये सात्विक पण देतो आणि त्यात तुम्ही धावपळ करण्या पासून कधीही कंटाळत नाहीत.
ह्यातील ६ अंक जो शुक्राचा आहे तो तुमच्या ऍक्शन मधील आनंद द्विगुणित करतो आणि तुमच्या जन्मस्थानापासून तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या ऍक्टिव्हिटीमुळे प्रसिद्धी मिळविता
ह्यातील कोणताही एक अंक किंवा दोन अंक नसतील तर त्यास त्या अंकामुळे मिळणाऱ्या गोष्टींचा फायदा होत नसेल
उदाहणार्थ — सचिन तेंडुलकर २४/४/१९७३ – २४ ने ६ मूलांक ग्रीड मध्ये येतो

७) संपत्ती क्षमता: PROPERTY PLAN- 2,5,8 (SUPER SUCCESS LINE – RAJYOGA)

जर आपल्या जन्मतारखेत 2,5,8 हे तिन्ही अंक येत असतील ( मूलांक भाग्यांक) दोन्ही भरून तर हा प्लान आपला १००% बसतो.
पण ह्यात एक अंक आपल्या जन्मतारखेत नसेल तर मात्र हा प्लान ६६% आणि २ अंक नसतील तर ३३%.

हे तिन्ही अंक असतील तर आशा व्यक्तीच्या जीवनात त्याला प्रॉपर्टीज जमा करताना जास्त त्रास होत नाही. करिअर च्या सुरवातीलाच अशा व्यक्तीला प्रॉपर्टीज जमा होताना दिसतात. प्रॉपर्टीज म्हणजे जमीन जुमला गाडी बांगला हेच नव्हे तर त्याच्याजवळ ज्या ज्या गोष्टी येतात त्या त्याच्या प्रॉपर्टीज असतील. मग अशी माणसे आयुष्यात लवकर सेट होतात. समाजात त्याच्याकडे असलेल्या पद प्रतिष्ठा ने अशा व्यक्ती ओळखल्या जातात.

ह्यात २ अंक हा चंद्राचा आहे पैसा प्रतिष्ठा देतो आणि घरातून ह्यांना ते मिळविण्यास मदत होते. अशा व्यक्तींना आईवडिलांच्या प्रॉपर्टीतला हिस्सा नक्की मिळतो. किंवा त्यांनी ह्यांच्यासाठी बरेच काही करून ठेवलेले असते. स्वतःच्या मेहनतीचे घर घेण्याच्या अगोदर घरातून ह्यांच्या नावावर काही ना काही प्रॉपर्टीज आलेली असते.

ह्यात ५ अंक हा बुधाचा आहे हा अंक बरोबर मधल्या जागी असल्याने तो बॅलन्स करून ठेवतो सर्व मिळालेल्या प्रॉपर्टीज चा किंवा प्रॉपर्टीज जमा करताना आपल्या बुद्धीचा सदुपयोग करतो.
ह्यात ८ अंक आपल्या मेहनतीने प्रॉपर्टीज जमा करण्याच्या लायक होऊन जातात.
ह्यात माझे विचार — जर ८ नसेल तर वयाच्या ४२ शिवाय आपल्याकडे स्वतःच्या मेहनतीने घेतलेली प्रॉपर्टी चा आनंद मिळत नाही. किंवा तो ४२ च्या आधी प्रॉपर्टीज घेत नाही आई वडिलांच्या घरातच असेल.
५ नसेल तर मिळालेल्या प्रॉपर्टी ला तो बॅलन्स करून ठेवत नाही किंवा प्रॉपर्टीज घेतल्यावर बराच पैसा वाया जातो.
२ नसेल तर स्वतःच्या प्रॉपर्टीज जमा करताना घरातून सहकार्य मिळत नाही. कारणे वेगवेगळी असू शकतील.

८) नशीब क्षमता: LUCK PLAN- 4,5,6.

जर आपल्या जन्मतारखेत 4,5,6 हे तिन्ही नंबर येत असतील ( मूलांक भाग्यांक) दोन्ही भरून तर हा प्लान आपला १००% बसतो.
पण ह्यात एक अंक आपल्या जन्मतारखेत नसेल तर मात्र हा प्लान ६६% आणि २ अंक नसतील तर ३३% .

ह्या प्लान ला गोल्डन प्लान सुद्धा म्हणतात. लोशू ग्रीड मध्ये हा प्लान फार महत्वाचा असतो. ज्याच्या ग्रीड मध्ये हा प्लान असेल त्यांना भाग्य चांगल्या प्रमाणात साथ देते. ह्यात व्यक्ती खूप प्रसिद्धीला असतात. खूप कमी जणांकडे हा प्लान असतो. सर्व बाजूनी त्यास सफलता दिसते. अनिल कपूर जॉनी लिवर.

नोट — मी दिलेले इथे ८ प्लान आपण वाचून पहा आणि लोशू ग्रीड आपल्या जन्मतारखेप्रमाणे किती तंतोतंत बसते ते सांगा.
आपल्या कॉमेंट्स ची वाट पाहत आहे.
जिथे खूप चांगले चांगले लिहिले आहे आणि जर तसे आपल्याला काहीही वाटत नसेल तर जरूर ह्यावर चर्चा करून घ्यावी कारण काहीतरी बिघडलेले नक्की असेल एक तर तुमचा मूलांक आणि भाग्यांक किंवा आपले नाव तास कारणीभूत असू शकते.

हे वाचून ज्यांना समजले नसेल त्यांनी पूर्ण लोशू ग्रीड रिपोर्ट मिळवून रीड करून घ्यावा. आणि आपल्या आयुष्यात जे अंक साथ देत नाहीत त्या साठी उपाय करावेत किंवा त्याची खबरदारी आधीपासून घ्यावी.

आपला लोशू ग्रीड कसा बनवावा ह्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून माहिती मिळावा.
https://shreedattagurujyotish.com/what-is-lo-shu-grid-in-marathi/

धन्यवाद…..!

Leave a Reply