***श्री दत्तगुरु ज्योतिष च्या सर्व्हिस बद्दल विशेष नोट***

आपणास कळविण्यात येते कि दिनांक १ जानेवारी २०२१ पासून खालील सर्व सर्व्हिस मध्ये बदल करण्यात येत आहेत

१) कुंडली जी पहिल्यांदा रिडींग साठी येईल त्याची फीस जी पहिली रुपये ७०० होती ती आता १०००/- असेल ह्यावर एक तासाची चर्चा असेल आणि तिथेच काही उपाय सुद्धा सांगितले जातील. नंतर काहीही लिहून देणे बंद केले आहे.

२) नंतर च्या कॉल वर पत्रिकेवरील कोणतेही प्रश्न असतील तर १५ मिनिट साठी रुपये ३००/- असतील. आणि अर्ध्या तासासाठी ५००/- असतील. (हे सध्याच्या सर्व जुन्या कलाइंट्स साठी सुद्धा तसेच राहतील आधी कधीही एकदा पत्रिका पहिली असेल तर.) पत्रिका दाखवून २ वर्षात एकही सेवा घेतली नसेल तर पुन्हा तीच पत्रिका असेल तर फ्रेश फी १०००/- भरूनच चर्चा करावी.

३) नवीन कोणतीही पत्रिका संतती प्रोसेस च्या प्रश्नाबद्दल असेल तर रुपये ३०००/- त्यात दोघांच्या पत्रिकेनुसार संतान योगाबद्दल चर्चा करून पुढे उपाय किंवा कोणत्या प्रोसेस कराव्या लागतील ह्यावर चर्चा असेल. नंतर ह्या विषयी प्रत्येक कॉल ला रुपये ५००/- फीस असेल.

४) संतती च्या प्रश्नांत कुणाला नवीन बाळाला जन्म देताना सिझरिन च्या तारखा द्याव्या लागतात त्या प्रोसेस साठी जर आधीपासून ९ महिने ह्या विषयावर चर्चा सुरु असेल तरच ह्यापुढे तारखा देण्यात येतील. त्याचे चार्जेस १०००/- असतील.
जर ती पत्रिका माझ्याकडे पहिल्यांदा आली असेल तर फीस ३०००/- असेल. (कारण त्या पत्रिकेवर आधी कधीच चर्चा झालेली नसेल यासाठी)

५) डिवोर्स च्या केसेस , कोणत्याही विषयावरील कोर्ट केसेस, अशा सर्व पत्रिकेवरील सर्विस घेताना पहिले बेसिक चार्जेस हे १०००/- नंतर च्या प्रत्येक कॉल ला रुपये ७००/- चार्जेस असतील.

६) १०० पानांची कुंडली पीडीएफ + २० पानांची कुंडली प्रिंट करण्यासाठी पीडीएफ मिळविण्यासाठी रुपये २००/- चार्जेस असतील. ह्यात पत्रिकेची कॉल वर कोणतीही चर्चा करू शकणार नाही. फक्त पत्रिका पाठविली जाईल.

७) श्री दत्तगुरु ज्योतिष ब्लॉग वर दिलेल्या ज्योतिष पोस्ट वाचून त्या बद्दल आपल्या पत्रिकेत तसाच योग दिसत असेल तर त्या नियमावर बोलण्यासाठी फक्त १०० रुपये १५ मिनिटासाठी असतील. २०१८ नंतर वाचलेल्या पत्रिकेसाठी हि सुविधा आहे. त्या आधी आपली पत्रिका वाचली असेल आणि नंतर इथे एकदाही चर्चा केली नसेल तर त्यासाठी फीस ३०० असेल. (आपण मागे पहिल्यांदा केव्हा कन्सल्टिंग घेतली होती आणि किती वेळा नंतर त्यावर चर्चा केली होती ह्याचा रेकॉर्ड माझ्याकडे २०१४ पासूनचा आहे.)

वरील कोणतीही सर्व्हिस घेणाऱ्यांसाठी वॉट्सप ब्रॉडकास्ट सेवा ज्यात माझे ज्योतिष विषयक लेख आणि वेब लिंक सेवा ह्या फ्री असतील.

***अपॉइंटमेंट आणि पेमेंट प्रोसेस***

**वरील सर्व सर्व्हिस ची फीस हि कॉल वर चर्चेची असेल. सध्या घरी अपॉइंटमेंट देणे बंद आहे मार्च २०२० पासून. पुढे जेव्हा सुरु होईल त्याबद्दल ची फीस आणि सेवा कळविण्यात येईल.

**कृपया कुणीही अपॉइंटमेंट साठी डायरेक्ट कॉल करू नये. आणि अपॉइंटमेंट फिक्स झाल्याशिवाय पैसे ट्रान्सफर करू नये.

**आपण जर पहिल्यांदाच अपॉइंटमेंट घेत असाल तर वॉट्स अप वर आपले पूर्ण नाव, जन्म दिनांक, जन्म वेळ, जन्म ठिकाण ह्या ४ गोष्टींची माहिती टाकावी. आणि आपल्याला कोणत्या दिवशी अपॉइंटमेंट हवी आहे ते कळवावे.
पुढील सर्व पेमेंट प्रोसेस आपल्याला मॅसेज द्वारे दिले जाईल. आणि पेमेंट झाल्यावर आपल्याबरोबर दिलेल्या वेळेत पत्रिकेवर चर्चा होईल.

**श्री दत्तगुरु ज्योतिष वॉट्स अप आणि कॉलिंग साठी एकच नंबर 9821817768 .

नोट — आपण जर हि ज्योतिष सर्व्हिस घेत असाल तर खाली दिलेल्या नियमांत बसाल.

आपण आपल्या मर्जीने ह्या शास्त्राची मदत घेत आहात तेव्हा कोणतेही रिझल्ट आपणास मिळाले नाहीत तर कोणताही वाद करण्याचा अधिकार नसेल. जसे एखादा डॉक्टर चुकतो तसा ज्योतिषीही चुकू शकतो पूर्ण जबाबदारी हि आपली असेल.
डॉक्टर चुकला तर पूर्ण मेडिकल सायन्स चुकीचे ठरत नाही तसेच इथे आहे.

कोणतेही उपाय इथे काळी जादू , करणी , उतारे , ह्याबद्दलचे दिले जात नाहीत. पत्रिकेत जे ग्रह आपल्याला काय देण्याची ताकद ठेवतात आणि आपल्याकडून काय हिसकावून घेतले जाऊ शकते ह्यावर पूर्ण चर्चा असेल. जीवनात कशासाठी त्रास होतील आणि कशासाठी आनंद घ्याल. घटना केव्हा कशा घडतील ह्यावरील चर्चा करून आपल्या ग्रहांना कशाने समाधान मिळेल ह्यावर फोकस केला जाईल मग कोणतेही उपाय करण्याची गरज नसेल. माझ्या मते प्रत्येक जण ज्योतिष शास्त्राचे उपाय करून पुढे गेलेला नसतो त्याच्या नशिबात असते म्हणून तो त्याच्या पत्रिकेतील ग्रहांप्रमाणे वागतो आणि नाव कमावितो. आणि हे कळत नसेल तर एकदा योग्य ज्योतिषाचा सल्ला जरूर घ्यावा.

तेव्हा तयारी करा १ तासाच्या चर्चेची आणि ह्या चर्चेने आपले समाधान होईलच हा माझा गेल्या १४ वर्षाचा अनुभव सांगतो.

धन्यवाद।

This Post Has 7 Comments

 1. Vikrant dhotre

  Want to fix an appointment

 2. Vikrant dhotre

  Want to fix an appointment .

 3. Shubhadeep Sawant

  Please Fix appointed on sunday

 4. Arvind Pawar

  Sir,
  Please give me appointment on
  Tommarrow or next day.

Leave a Reply