You are currently viewing २ नंबर मूलांक/भाग्यांक

आपला मूलांक नंबर २ कसा?

 • आपला मूलांक नंबर २ आहे जर आपला जन्म कोणत्याही महिन्यात २,११,२०,२९ तारखेला झाला असेल.
 • २= २
 • ११ = १+१ =२
 • २० = २ + ० = २
 • २९ = २ + ९ = ११ — १+१ = २

वरील सर्व जन्म तारखेची बेरीज २ वर येते म्ह्णून आपणा सर्वांचा मूलांक २ असेल.

किंवा जर आपल्या जन्म तारखेची पूर्ण बेरीज केली असता २ येते तर आपला भाग्यांक २ आहे. जसे ३ नोव्हेंबर १९९५ =३+१+१+१+९+९+५ = २९ = २ भाग्यांक २ होतो.

२ नंबर आणि चंद्र- स्वभाव/व्यक्तिमत्व

जसा १ अंक सूर्याचा आहे तसा २ हा चंद्राचा अंक मनाला जातो. जेव्हा सकाळ दुपार संध्याकाळ सूर्य आपला रोल संपवितो तेव्हा चंद्र हा सपोर्ट सिस्टम मध्ये येतो त्या तापाचा परिहार करण्यासाठी तशा प्रकारे चंद्र हा सपोर्ट सिस्टम आहे. चंद्र हा शीतलतेचा प्रतीक आहे.
म्हणून २ वाले शीतल आणि सपोर्टिव्ह असतात.

चंद्र हा मनाचा कारक आहे म्हणून २ वाल्या व्यक्ती ह्या भावुक असतात. अशा व्यक्ती बुद्धीपेक्षा मनाला जास्त महत्व देत असतात. म्हणून अति विचार करणाऱ्या मनाला लावून घेणाऱ्या व्यक्ती २ नंबर च्या असतील. ह्यांना कुणी बोलले तर त्याचा सतत विचार करणाऱ्या आपल्या बद्दल ज्या ज्या घटना होत असतील त्यावर अति ऍक्टिव्ह होत असताना दिसतात.

चंद्र हा एका आकाराचा नसतो त्याचा आकार रोज बदलणारा असल्यामुळे मूलांक/भाग्यांक २ असणाऱ्या व्यक्ती ह्या अति चंचल पाहण्यात येतात. ह्यांच्या आयुष्यात फार मूव्हमेंट रोज दिसतात. सतत बदल हा मूळ स्वभाव घेऊन आयुष्य जगत असतात. स्थिर राहणे थोडे कठीण होते अशा व्यक्तींना.

चंद्र अमावस्या पूर्णिमा दोन्ही देतो म्हणून सतत परिवर्तनशील असणाऱ्या व्यक्ती ह्या असू शकतात. कधी खूप शांत पण कधी खूप तापट सुद्धा व्यक्ती ह्या पाहण्यात आल्या आहेत. कवी, लहान मुले ह्यांना चंद्र हा फार आवडता असतो त्यामुळे ह्यांचा स्वभाव सुद्धा एखाद्या कवीसारखा आणि लहान मुलांप्रमाणे होतो. समाजात वावरताना अशा व्यक्ती लगेच मिळून मिसळून वागतात. ६०% हे लोक सुंदर दिसतातच.

शारीरिक जडण घडण हसमुख असते. चेहऱ्यावर तेज आणि डोळे रेखीव असतात. कोणालाही आपलेसे करून घेण्याचा ह्यांचा स्वभाव त्या वातावरणात हे लोक अति उत्साही आणि विनोदी स्वभावाने सर्वाना आपलेसे करतात. हे सर्वांचे चांगले होण्यासाठी धडपड करतात.
एखाद्या गोष्टी / व्यक्ती बद्दलचे आकर्षण झाले कि ह्यांना त्या गोष्टीचा मोह आवरता येत नाही.

ह्यांचे निर्णय झटपट असतात. एखाद्या गोष्टीवर काम सुरु लगेच करण्याऱ्या व्यक्ती आणि ऍक्टिव होणाऱ्या व्यक्ती पाहण्यात येतात.
पण केव्हा केव्हा ते कंटिन्यू राहतील ह्यात शंका वाटते. कधी कधी हे आळशी सुद्धा पाहण्यात येतात त्याचे हे कारण असावे.

अशा व्यक्ती दुसऱ्यांच्या जीवनात अति लुडबुड करण्याऱ्या सुद्धा असू शकतील. केव्हा केव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल ते अति लागाव करतील खूप आपली सर्विस द्यायला जातील तिथे केव्हा केव्हा ह्यांना त्या व्यक्तीकडून निराशा मिळते. ह्यांना पूर्वाभास होताना नेहमी दिसतो म्हणजे नंतर होणाऱ्या घटना ह्याचा अंदाज ह्यांना फार आधी होतो.

अस्थिरता I क्रिएटिव्हिटी I आळशी I चंचलता I अनिरंतरता I अपरिपक्वता I कल्पनाशील I भावुक I कलाप्रिय I कलाकार I दयावान I लहान मुलांवर, प्राणीमात्रावर दया करणारे I सर्वांचा विचार करणारे I मूड स्विंग I तणाव डिप्रेशन — हे सर्व गुण ह्याच्याकडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

1 नंबर मूलांक/भाग्यांक

करिअर / पैसा

आपल्या आतील कलागुणांना वाव द्या, कुकिंग, स्टिचिंग, चित्रकला, नाचणे, गाणे अशा काही कला आपल्या लपलेल्या असतील तर आधी बाहेर काढा करिअर चा हाच स्तोत्र आपण आधी ह्यावर फोकस केला पाहिजे , ज्योतिषी, सायकरास्ट्रिक्स, डॉक्टर्स स्किन स्पेसिऍलिस्ट (ह्याच्या हाताला गुण असतो), मीडिया जिथे पब्लिक शी संपर्कात असतात असे क्षेत्र, तरल पदार्थ चे काम (पाणी दूध चहा वगैरे),
चंद्र हा सफेद रंगाचा म्हणून ह्यांना सफेद रंगाच्या कोणत्याही वस्तूंची निर्मिती किंवा सेल करणे जास्त हितावह ठरेल. न शिवलेले कोणतेही कापड निर्मिती किंवा विकणे ह्यांना कधीही फायद्याचे ठरेल. शिवलेले कपडे हे शुक्राच्या अधिपत्याखाली येतात.

औषध निर्मिती, केमिस्ट, वास्तू रेकी, शाळा महाविद्यालये ह्याच्याशी संबंधित नोकऱ्या, ह्यांना बिझिनेस जास्त जमत नाही. (पत्रिका सुद्धा पाहावी) मात्र ह्याच्याकडे वरील सर्व गोष्टीतून पैसा चांगला मिळतो.

आपल्यातील कमीपणा आणि मार्गदर्शन

आपण कुणावर लगेच विश्वास दाखविणाऱ्या व्यक्ती आहात. त्यामुळे लगेच कुणावर विश्वास ठेऊ नये. जास्त कुणाला आपली सर्व्हिस देण्याच्या अगोदर १० वेळा आपल्या फायद्याचा विचार नक्की करावा. एखादी गोष्ट मनाला लागली तर त्यावर जास्त विचार करत बसू नये. लगेच मेडिटेशन चा सपोर्ट घ्या आणि पुढील कार्यक्रमास लागा जास्त त्रास होणार नाही जीवनात.

शरीरातील जल तत्व बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. जास्त शीतल पदार्थ आपल्या प्रकृतीला परवडणारे नव्हेत. भाग्य कमी करण्यास मदत होईल आणि चिंता वाढेल. सर्दी कफ ह्यांसारखे वातावरणातील बदला मुळे होणाऱ्या आजारांपासून सावध राहा. जीवनात एकदा तरी फसविले जाल – कुणाकडून चिट व्हाल म्हणून अति सावध राहा.

जर आपण एक स्त्री असाल तर मासिक धर्माच्या त्रासातून जावे लागत असेल तर योग आणि मेडिटीशन चा सपोर्ट घ्या.
स्त्री रोग आणि गर्भधारणा होण्यास सुद्धा त्रास २ नंबर च्या स्त्रियांकडे ६०% पाहण्यात आला आहे.

 • शुभ रंग= क्रीम,चंदेरी, पिवळा, हलका सफेद, नारंगी.
 • अशुभ रंग = गडद काळा आणि गडद चॉकलेटी आणि गडद निळा — कोणतेही गडद उठावदार रंग
 • भाग्यवान दिवस= रविवार, बुधवार, सोमवार, गुरुवार.
 • २ नंबर साठी लकी नंबर्स= १/५/३/७/२ हे नंबर आपल्याला चालतील पण १/७ जास्त लकी आणि ६/२ न्यूट्रल नंबर आहेत. २ वाले २ च्या संपर्कात आले तर खूप चांगले होते किंवा खूपच वाईट होते. (ज्यांचा जन्म दिनांक किंवा भाग्यांक २ असेल) २/११/२०/२९ = २. ज्या वर्षाची टोटल २ येते ते वर्ष सुद्धा खूप चांगले किंवा खूप वाईट अनुभव देते उदाहरण – २०००/२०१८ वगैरे. ज्या वेळी आपले वय १ किंवा ७ वर जाते तेव्हा सुद्धा ह्या वयात चांगले अनुभव येतील उदाहरण – १०/२५/२८/३४/३७ = १ किंवा ७
 • शत्रू नंबर= ४/८/९/६ हे शत्रू अंक आहेत. वर्षाची टोटल जेव्हा ४ किंवा ८ येते तेव्हा फार त्रास होण्याची शक्यता असते. ४/८/९ लग्नासाठी नको
 • महिन्याच्या शुभ तारखा= १/१०/१९/२८/७/१६/२५

मूलांक 2 असणाऱ्या मान्यवर व्यक्ती

 • महात्मा गांधी २ ऑक्टोबर १८६९
 • अमिताभ बच्चन ११ ऑक्टोबर १९४२
 • शारुख खान २ नोव्हेंबर १९६५
 • मायकल जॅक्सन २९ ऑगस्ट १९५८
 • राजेश खन्ना २९ डिसेंबर 1942
 • निशिगंधा वाड ११ ऑक्टोबर,नागराज मंजुळे (सैराट), संजय दत्त २९ जुलै, बेजान दारूवाला.

वरील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती ह्या २ नंबर च्या अधिपत्याखाली येतात.

धन्यवाद…..!

Leave a Reply