You are currently viewing साडेसाती आणि माझे विचार

शनी जेव्हा आपल्या राशीच्या मागच्या राशीत येतो २.५ वर्षासाठी तेव्हा आपल्या राशीला साडेसाती सुरु होते ह्याचा अर्थ आपला चंद्र ज्या राशीत आहे त्या राशीच्या मागच्या राशीत शनी आला तर चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे आपल्या चंद्राच्या मागे असलेला शनी हा एक भीती निर्माण करतो आणि मानसिक टेंशन वाढवितो.

नंतर तो मधली अडीच वर्षे आपल्या राशीत म्हणजे मूळ चंद्रावरून जातो ह्यात आपले मनच शनी बरोबर असते. म्हणून काही मनाल्या लागणाऱ्या गोष्टी इथे होतात.

मग शनी पुढची अडीच वर्षे आपल्या राशीच्या पुढील राशीत जातो. तेव्हा मन किंवा चंद्र हा सुटकेचा स्वास घेतो पण इथे मात्र तो व्यक्ती तरीही चिंतेत असतोच कि मागच्या २.५ + २.५ = ५ वर्षात माझ्या मनाला झालेल्या यातना त्रास ह्यातून बाहेर पडायला पुन्हा २.५ वर्षे लागतातच. म्हणून मग तुम्ही पूर्ण फ्रेश होता जेव्हा साडेसाती संपते.

एक लक्षात असू द्या साडेसाती मध्ये शनी कधीही त्या व्यक्तीचे नुकसान करत नाही. तर त्या व्यक्तीला आपले कोण आणि परके कोण आहेत ह्याची लगेच जाणीव करून देतो.

कामे का उशिरा होतात साडेसातीत

साडेसातीत लोकांच्या एकच तक्रारी असतात कि काही कामे वेळेवर होत नाहीत. ह्याचे उत्तर असे आहे कि शनी हा कर्माचा देवता आहे.

शनी हि ज्ञायदेवता सुद्धा आहे म्हणजे तुमच्या कर्माला तो ज्ञाय देत असतो. साडेसातीत हेच होते शनी ची तुमच्या राशीवर छाप असल्याकारणामुळे शनी अशाच कर्माचा ज्ञान निवाडा करेल जेव्हा तुम्ही त्या कर्माच्या लायक असाल.

त्या तुमच्या कामामध्ये जर तुम्ही लायक नसाल किंवा तुम्ही त्या कर्माला जोपर्यंत लायक होत नाहीत तोपर्यंत अशा कोणत्याही टार्गेट तो पूर्ण करत नाही. आणि साडेसातीत जे जे तो तुमच्याकडून अशी कामे पूर्ण करून घेईल ज्यात तुम्ही लायक असाल आणि मग त्या टार्गेट ची फळे व्यक्तीला जीवनभर उपयोगी पडतात.

आता सध्या हेच सुरु आहे धनु, मकर आणि कुंभेसाठी.

  • धनु राशीला २/११/२०१४ साली सुरु झालेली साडेसाती २६/१/२०१७ पर्यंत पहिला टप्पा. २६/१/२०१७ ते २४/१/२०२० दुसरा टप्पा आणि तिचा शेवटचा टप्पा सुरु आहे साडेसातीचा तो २४/१/२०२० पासून १७/१/२०२३ पर्यंत आहे.
  • मकर राशीला २६/१/२०१७ पासून ते २६/१/२०२० पहिला शनी चा साडेसाती टप्पा सुरु होता. आणि आता सध्या २४/१/२०२० ते १७/१/२०२३ पर्यंत शनी चा दुसरा टप्पा सुरु आहे म्हणजे शनी हा सध्या ह्या कालावधीत मकर राशीत म्हणजे तुमच्याच राशीत आहे. १७/१/२०२३ ते २९/३/२०२५ हा टप्पा शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा असेल.
  • कुंभ राशीला २४/१/२०२० ला शनी साडेसातीचा पहिला टप्पा सुरु झाला आहे तो १७/१/२०२३ पर्यंत असेल. दुसरा टप्पा १७/१/२०२३ ते २९/३/२०२५ पर्यंत असेल. तिसरा टप्पा २९/३/२०२५ ते २३/२/२०२८ पर्यंत असेल

तिन्ही राशी चा शनी साडेसातीचा चा पहिला टप्पा

तर वरील तिन्ही राशी ला अनुसरून शनी पहिल्या टप्प्यात देणारे फळ हे खूप टार्गेट अंगावर उचलण्याच्या धावपळीचे असेल. पण त्यात तुम्ही एक जाणून घ्या जर ते तुमचे टार्गेट असामाजिक तत्वाचे असेल तर शनी कधीही माफ करणार नाही.

मुळात शनीच्या साडेसातीत व्यक्ती चुकीची कामे करूच शकत नाही. ह्या टप्प्यात शनी फक्त इमानदार लोकांनाच मदत करतो. आणि बेईमान लोकांना अशीच कर्मे करायला लावतो कि पुढील ५ वर्षे त्याला त्या कर्मातून फटके खावे लागतात. म्हणून शनी च्या पहिल्या टप्प्यातील फळे हि स्वतः आपण बनवलेली नसतात हे लक्षात घ्या.

शनी तुमच्या समोर ती आणून तुमची परीक्षा घेत असतो. आणि त्यात तुम्ही सावध राहिलात तरच तो दुसऱ्या टप्प्यात तुमच्या राशीत येऊन तुम्हाला सावरतो. मग तुम्हाला दुसरा टप्पा शनीचा चांगला जातो नाहीतर नाही.

तिन्ही राशी चा शनी साडेसातीचा चा दुसरा टप्पा

शनी च्या दुसऱ्या टप्प्यात शनी तुमच्या बरोबर असतो म्हणजे तुमच्या राशीतच असतो. म्हणजे तो तुम्हाला नेहमी सावध करत असतो कि हे कर्म बरोबर आहे – आणि – हे चुकीचे आहे.

आधीच्या अडीच वर्षातील फळे तो तुम्हाला तिथे येऊन देत असतो वाईट किंवा चांगली. ह्या कालावधीत तुम्हाला कोणतीही फॅशन , जास्त सुखाच्या मागे धावणे परवडणार नाही हे लक्षात घ्या. येथे साधी राहणी उच्च विचारसरणी राहिली तरच हा तुमचा मित्र नाहीतर शत्रू हे लक्षात असू द्यात.

तिन्ही राशी चा शनी साडेसातीचा चा तिसरा टप्पा

शनी च्या तिसऱ्या टप्प्यात शनी हा तुमच्या राशीच्या पुढील राशीत असतो त्यामुळे मागील ५ वर्षाच्या कष्टाचे चीज देताना दिसतो.

हळू हळू हि अडीच वर्षे तुम्हाला गोष्टी सोडविण्यात मदत करतो. आणि जाता जाता तुम्ही ५ वर्षात ज्या साठी धावत होतात त्याचे चीज करतो आणि तुम्हाला काही तरी देतो जे तुमच्या आयुष्यभर आठवणीत राहील. मग हे चांगले किंवा वाईटही समजा. वाईट लोकांसाठी हा काळ खूप वाईट जातो.

उदाहरणार्थ : एका चोराला शनी पहिल्या टप्प्यात खूप चोरीच्या संधी देतो, दुसऱ्या टप्प्यात तो त्याची चोरी बंद करतो आणि तिसऱ्या टप्प्यात तो जेल मध्ये जातो.

आपण ह्या चोराची जागा घेत नाही नाही ह्याचा विचार आत्ताच करायला पाहिजे ज्यांना साडेसाती असेल आणि तुम्ही कोणत्या टप्प्यात आहात ह्याचा विचार व्हावा.

साडेसाती यायच्या आधीही काही जणांना शनी तयार करत असतो असे माझे मत आहे म्हणजे तुमच्या कर्माचे फळे तिथेच तयार होत असतात. शनी माहात्म्यामध्ये गर्वाचे घर खाली करणारी गोष्ट हेच सांगते कि कोणताही अहंकार, माज शनी साडेसातीत उतरल्याशिवाय राहत नाही. म्हणून व्यक्तीला त्याच्या पूर्ण आयुष्यात दर २२.५ वर्षानंतर साडेसाती येतेच.

उपाय साडेसातीचा

ह्या काळात कमीत कमी चुका करणे हाच एक उपाय तुम्हाला तारून जाईल. अहंकार, गर्व, लालच, चुगली, नशा, ग्ल्यामर, शोबाजी, आतिषबाजी साडेसातीत परवडत नाही व्यक्तीला.

शनी ची अडीचकी मिथुन आणि तुला राशी साठी.

अडिचकीचा नियम : आपली जी राशी असेल तिच्या चौथ्या आणि आठव्या स्थानी शनीदेव आले तर तुम्हाला तुमच्या राशीवर अडीचकी लागते. काही ठिकाणी ह्यालाच ढैय्या , लहान पनौती असेहि म्हणतात.

म्हणून सध्या मकर राशीत शनी २४/१/२०२० पासून आले आणि मिथुन ह्या ३ नंबर च्या राशी पासून ८ व्या राशीत म्हणजे मकर राशीत शनी आल्यामुळे. आणि तुला ७ नंबर च्या राशीपासून शनी ४ थ्या राशीत म्हणजे मकर राशीत आल्यामुळे ह्या दोन्ही राशींना सध्या २४/१/२०२० पासून ते २३/१/२०२३ पर्यंत अडीचकी सुरु आहे.

साडेसात वर्षातील शनी ची फळे हि हळू हळू मिळतात कारण शनी कडे खूप वेळ असतो तुम्हाला चेक करून फळे द्यायला. पण अडीचकी मध्ये हीच फळे तो फटाफट तुमच्या समोर आणून ठेवतो.

एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल कि शनी एकाच वेळी प्रत्येक राशीच्या त्याच्या भ्रमणात (गोचरीत) ५ राशीवर आपला प्रभाव टाकत असतो. ३ राशीला साडेसाती आणि २ राशीवर अडीचकी. हा सामाजिक समतोल राखण्याचा शनीचा प्रयत्न मानावा लागेल नाहीतर सर्व उच्च व्यक्ती ह्या समाजाला अजून पिळत राहिल्या असत्या शनी च्या ज्ञाया मुळे हा समतोल राखला जात आहे.

आत्ताचे जे जेल कारागृह भरले आहे ते रिकामे असते शनी जर ज्ञाया ची देवता नसती तर. किंवा वकील कोर्ट जज ह्यांची गरजच समाजाला भासली नसती.

प्रत्येक राशी प्रमाणे शनी च्या साडेसाती बद्दल काही महत्वाचे

  • जर शनी ची साडेसाती किंवा अडीचकी तुला, वृषभ, मकर, कुंभ ह्या राशीवर आली तर काही तरी डेव्हलोपमेंट शनी तुमच्या कडून करून घेत असतो. पण त्या राशी चा चंद्र हा किती डिग्री वर आहे ह्यावर ते अवलंबून असते कमी जास्त प्रमाणात.
  • शनी च्या आवडत्या राशी तुला आणि ऋषभ आहेत कारण त्या शुक्राच्या राशी आहेत. कारण तुला राशीत शनी उच्चत्व प्राप्त करतो आणि वृषभ राशी हि कृष्णाची असल्यामुळे शनी जर कुणाला आपला खरा गुरु मानत असेल तर तो कृष्ण आहे. तरीही कृष्णाला मानवी रूपात साडेसातीचा सामना करावा लागला आणि त्याने जे जे केले त्यात ते बोल्ड आहे असे मला वाटते.
  • मकर राशी आणि कुंभ राशी सुद्धा त्याची स्वतःचीच असल्यामुळे शनी साडेसातीत किंवा अडीचकी मध्ये एव्हढे त्रास होत नाहीत उलट तुमच्या खूप वर्षाच्या इच्छा इथे पूर्ण करताना दिसतो तो.
  • मेष आणि वृश्चिक राशीला साडेसाती किंवा अडीचकी खूप त्रासाची जात असते खूप संघर्ष होत असतो ह्या कालावधीत मात्र हे प्रमाण स्वतःच्या पत्रिकेत शनी कसा आहे ह्यावर असते.
  • मिथुन आणि कन्या राशीत शनी साडेसातीत किंवा अडीचकी मध्ये आला कि बौद्धिक पातळी उच्च करतो तेव्हढीच तो भीती सुद्धा जास्त दाखवेल
  • कर्क राशी आणि सिंह राशी साठी शनी साडेसाती किंवा अडीचकी हि त्रासाचीच जाते त्यात कर्क राशीला मान अपमान ह्यांचे जास्त त्रास होऊन मानसिक त्रास होतात आणि सिंह राशी ला आरोग्याचे किंवा करिअर चे त्रास होतात हे वयोमानाप्रमाणे असेल.

नोट : वरील सर्व विवेचन हे कॉमन आहे शनी च्या साडेसातीचा किंवा अडीचकी चा इफेक्ट हा स्वतःच्या पत्रिकेवर तंतोतंत काढता येत असेल तर अष्टक वर्ग खूप चांगले रिझल्ट देतो हा विषय योग्य ज्योतिषांकडे जाऊन समजून घ्यावा. हि विनंती.

ज्यांच्याकडे मोठे मोठे टार्गेट्स आहेत जे मोठ्या मोठ्या व्यवहारात आहेत त्यांनी जरूर आपली शनी ची स्थिती आपल्या पत्रिकेवर चेक करून पाहावी कारण हा विषय साडेसात वर्षासाठी किंवा अडीच वर्षासाठी असतो. म्हणून योग्य ज्योतिषाचा सल्ला घेण्यासाठी कंजूसी करू नये.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. Mohan more

    डोक्यात खुप चन चण चावताय मन असंतुलित होतंय
    झोप येत नाही

Leave a Reply