Mithun Rashi -मिथुन राशी-बोलकी ,खेळकर

आज मिथुन राशीचे ( Mithun RashiGemini ) पूर्ण विश्लेषण करू. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला कळेल असेच लिहिणार आहे.

मिथुन राशी स्वभाव – Gemini Personality

मिथुन राशी चा मालक हा बुध (Mercury) आहे. अवकाशात बुध हा ग्रह कधीच रवी पासून २७ डिग्रीच्या पुढे जात नाही. म्हणून पत्रिकेत बुध हा रवीच्या मागच्या स्थानी , रवीबरोबर किंवा रवीच्या पुढच्या स्थानी पाहायला मिळेल चेक करा. ह्याचा अर्थ असा कि बुध हा आपल्या अवकाशातील रवी (ग्रहांचा राजा) ह्याच्या छत्रछायेखाली राहतो त्याला सोडून पुढे जातच नाही. म्हणून कुणाचा तरी सपोर्ट  घेण्याचा गुणधर्म आपोआप येतो. स्वतःचे निर्णय घेताना कभी इधर कभी उधर असे होते. बुध ह्या ग्रहांजवळून जे जे ग्रह जातात किंवा युतीत असतात त्याच्यासारखा बुध हा आपले परिवर्तन करतो. ह्याने ह्या राशीच्या लोकांवर दुसऱ्याची छाप लगेच पडण्याची शक्यता फार असते.

मिथुन राशी करिअर व्यवसाय शिक्षण -Gemini Career & Education

मिथुन राशी द्विस्वभाव राशी आहे. हि एक वायू तत्वाची राशी आहे. म्हणून वाहन हे वायुतत्वात मोडते. ह्याने ह्यांना वाहनांची बरीच माहिती असते किंवा वाहनांच्या बाबतीत ला कोणतेही करिअर मिथुन राशीला सूट होते.

ह्या राशीला घराची सजावट करण्याचा सुद्धा छंद असतो. घर टापटीप असावे असे ह्यांना नेहमी वाटते म्हणून इंटिरिअर डिझाईन च्या शिक्षण करिअर क्षेत्रात डोळे मिटून पदार्पण करावे. वायू राशी असल्याने पायलट खगोलशास्त्रज्ञ ह्यात सुद्धा करिअर करण्यास हरकत नाही.

हि राशी बुद्धीची सुद्धा आहे ह्याने कोणत्याही शिक्षण पदव्या घेऊन त्यात शिक्षकी पेशा सुद्धा अजमावू शकता. विद्यालय चालविणे, क्लासेस चालविणे हे सुद्धा ह्यांना सूट होते जर पत्रिकेत गुरु-बुध ह्यांचा चांगला योग असेल. 

गोचरीने ह्या राशीत राहू हा उच्च राशीत मानला आहे. म्हणून मिथुन राशीला राहू चांगले फळ देतो. ह्यासाठी कोणतेही कमर्शिअल शिक्षण, कमर्शिअल कोर्सेस , आणि करिअर सुद्धा जर बाहेर जाऊन केले तर मिथुन राशी सर्व बाजूने स्ट्रॉंग होते. जन्म आणि मातृस्थानात जर करिअर झाले तर वैवाहिक अडचणी येतात ह्यांना. असे माझे मत आहे स्वतःबद्दल अभ्यास करून टिपणी द्या.

मिथुन राशी वायुतत्व असल्याने कोणत्याही उपकरणात जिथे वीज लागते किंवा कोणतेही विजेवर चालणारे यंत्र वगैरे ह्यांचा कोर्स किंवा वायरमन सुद्धा मिथुन राशीला जास्त दिसतात. आणि ह्याच कारणाने पेट्रोल च्या कोणत्याही व्यवसायात करिअर करू शकतात कारण अग्नी तत्व हे वायुतत्वानेच पूरक होते. ट्रॅव्हल एजन्सी , मार्केटिंग एजन्सी चालवू शकतात.

कोणतेही जलत्वाचे काम मिथुन राशीला जमणार नाही असे माझे मत आहे.  त्यात रसायने सोडून बाकीचे लिक्विड समजावे कारण हे राहू च्या आधीन आहे.

मिथुन राशी हि १२ वर्ष्याच्या मुलासारखी असते त्यामुळे कोणत्याही कलाक्षेत्रात मिथुन राशी दिसतेच. कारण १२ वर्षाखालील मुले गोंडस असणे , चेहऱ्यावरील भाव बदलत राहणे हि कला त्यांना आपोआप येते त्यामुळे जर मिथुन राशीला जर हिरो हिरोईन बनताना वेगवेगळी रोल करताना जे चेहऱ्यावरील भावाबद्दल असतील त्यात चमकताना पहिले जाते. मात्र ह्यात पत्रिकेतील बुध हा स्ट्रॉंग असावा लागतो शुक्राच्या सान्निध्यात.

हॉटेल मॅनॅजमेण्ट , इव्हेंट मॅनेजमेंट , फायनान्स , बँकिंग क्षेत्रात सुद्धा मिथुन राशीच्या व्यक्ती प्रगती करू शकतात.

मिथुन राशीचे प्रेम- Gemini Love Life

बुध ग्रह हा बुद्धीचा कारक आहे म्हणून कॅल्क्युलेशन मध्ये प्रवीण असतात. हा गुण प्रेमात हे कधीही दर्शवतात. पण बुध हा ग्रह १२ वर्ष खालील मुलासारखे सुद्धा परिणाम देतो. खट्याळपण असणे हा गुण ह्या राशीचा मुख्य असतो.

ह्याने जसे एखादे लहान मूल स्वतःला जे हवे असते आता हे आवडले नंतर ते सोडून दुसरे हाती घेतले तसे यु टर्न घेते तसे प्रत्येक वेळी ह्यांना आयुष्यात असा अनुभव काही परीस्थीने सुद्धा येतो आणि काही वेळा हव्यासापोटी , लालसेपोटी स्वार्थी पण घ्यावे लागते. म्हणून प्रेमात ह्या राशी चा स्वभाव हा खास विश्वासपात्र होईल का ह्यावर प्रश्नचिन्ह असतो.

मिथुन राशीचे चिन्ह हेच मुळात जुवळे आणि एन्जॉय करत असणारे आहे. त्यामुळे प्रेमात ह्या राशीकडून फार एंज्योमेन्ट दिसतो. स्वतःला काय पाहिजे ते सहज मिळवतात. पण त्याने ह्यांचे प्रेम फार वेळा सक्सेस झालेले दिसत नाही.

सल्ला — प्रेमात नेहमी जास्त चुका करू नयेत समोरच्याला जास्त ताटकळायला राहू नये, आपला निर्णय लगेच ठरवावा आणि फिक्स करून घ्यावे असे केले नाही तर मात्र प्रेमात व्यत्यय येऊ शकते. 

एकदा प्रेम सक्सेस झाले तर नंतर ह्या व्यक्ती इमाने इतबारे आपल्या पार्टनर बरोबर सुखी संसार करण्यास पात्र ठरतात.

मिथुन राशी चे वैवाहिक जीवन- Gemini Married Life

मिथुन राशी चे चिन्ह हे स्त्री पुरुष दाखविले आहेत तेव्हा हि राशी प्रणयाची असल्यामुळे वैवाहिक जीवनात ह्या विषयी ह्या व्यक्ती प्रथम दंग असतात. मात्र हीच राशी एक नपुंसक राशी आहे. पत्रिकेत कोणाच्याही ५ व्या ठिकाणी मिथुन राशी हि असली किंवा स्वतः तुम्ही मिथुन राशीचे असलात तर कन्सिव्ह करताना थोड़ा इशू होण्याची दाट शक्यता असते. आणि असे झाले नाही तर मुले झाल्याबरोबर खूप गडबड होते धावपळ होते मागील परिस्तिथीत बदल झालेला अचानक दिसतो.

तसे वैवाहिक जीवन चांगले असते असे म्हणायला हरकत नाही पार्टनर ला सपोर्ट मिथुन राशी जास्त करते. 

माझा सल्ला- जर मिथुन राशीला वैवाहिक जीवन उत्तम साधायचे असेल तर एन्जॉयमेंट हवीच भले ती शारीरिक आणि थोडी खर्चिक वृत्तीची झाली तरी चांगली. 

मिथुन राशीच्या व्यक्ती लवकर म्हातारे होत नाहीत किंवा दिसतही नाहीत असा माझा अभ्यास आहे स्वतःचा. ह्यावर टिपणी द्या.

तेव्हा संसार करताना कितीही अडचणी आल्या तरी वरील विषय हा आपल्या जीवनातून इग्नोर करू नये.

मिथुन राशी च्या ५ ते १२ वर्षे वयातील मुलांच्या पालकांना – Mithun Rashi For Small Childrens

आपल्या घरात जर मिथुन राशीची बालके असतील तर ह्यांच्यावर खोटे बोलणे , लपविणे , खोड काढणे ह्या विषयांवर लक्ष ठेवावे लागेल. खाज , खरूज , त्वचेची कोणतीही एलर्जी ह्यांना त्रासदायक होऊ शकते. विसरणारी मुले- मंद मुले ह्या वयात दिसतील तर त्याची खूप खबरदारी घ्यावी लागते अशा वेळी एकाच घरात मिथुन राशींचे बरेच लोक असण्याची शक्यता फार असते. 

म्हणून हा प्रकार येऊ नये म्हणून मिथुन- मिथुन ह्यांच्या कितीही पत्रिका जुळल्या तरी विवाह करताना पंचम स्थान आणि गुरु ची पोजिशन खूप चांगली चेक करावी लागेल ह्यावर सर्व पालकांना हा इशारा समजा.  नपुंसक राशींचे प्रकार असल्याने ह्या राशींच्या लोकाना एक विशेष सल्ला पालकांना किंवा मुलांना सुद्धा.

तुम्ही कधीही शारीरिक सुखाची एंज्योयमेन्ट हि विवाह पूर्व अजमावू नका कारण होणारी मुले हि तुम्हाला व्याप असू शकतील. तसा हा सल्ला सर्वच राशींच्या व्यक्तींसाठी असेल पण  मिथुन राशी साठी खास समजावा.

ह्या विषयी पालकांनी कोणतेही गैरसमज आपल्या पार्टनर बद्दल समजू नये असे त्रास होत असतील तर मुलाच्या बाबतीत पत्रिकेतील इतर योग सुद्धा खूप कारणीभूत असतील.

असो तर ह्या मुलांसाठी प्राथमिक अभ्यास करताना ह्यांना जास्त चंचल पणा सुद्धा दिसेल १२ वर्षापर्यंत नंतर गुरु चांगला असेल तर पुढे हीच मुले चांगला अभ्यास करून पुढे येतील ह्यात शंका नाही.

मिथुन राशींच्या सर्व वयातील स्त्रियांना- Mithun Rashi For Womens 

आपण खूप सुंदर आहोत हा टच नेहमी मिथुन राशींच्या स्त्रियांना असतोच. त्यामुळे निटनेटके राहणे , फॅशन करणे , हे मुळात असते. अज्ञानात सुद्धा आनंद असतो तुम्हाला, भावना आतून जास्त इनोसेंट असतात. प्रत्येक वेळी प्रश्न पडतात ह्यांना जसे लहान मुलांकडे असतील.

मुड चेंज जास्त असतो कोणत्याही विषयात. तसे चॉईस फार महाग नसतात वृषभ सारखे पण त्यात खूप चेंजेस फार असतील. एकट्या कुठेच जाणाऱ्या नाहीत तुम्ही. बोलका स्वभाव हा तुमचा गुणधर्म आहे. असा समोरील व्यक्ती नाही मिळाला तर सध्याच्या युगात सोशल साईट वर जास्त ऍक्टिव्हेट असतात.

पण जरा सांभाळून जेव्हढ्या सोशिअल साईट वर मुली फसतात किंवा स्त्रिया अडकतात त्या ह्या मिथुन राशीच्या जास्त असतील असा माझा समज आहे.   जर ह्याचा अतिरेक झाला तर एकदा तरी अनुभव येणारच तेव्हा पुन्हा एकदा सावधान करत आहे.

बाहेरील खाण्यापिण्याची सवय हि फार असेल तर त्यात सुद्धा कंट्रोल असणे आवश्यक आहे नाहीतर हे वयाच्या ४० नंतर मिथुन राशीला आपले वजन आणि सौंदर्य सांभाळता येत नाही ह्यावर आपली टिपणी जरूर द्या.

सर्व राशीच्या पुरुषांना सल्ला – जर मिथुन राशीच्या कोणत्याही व्यक्तीने तुमच्याशी हळू हळू बोलायचे कमी केले तर समजावे कि हे रिलेशन पुढे जास्त टिकणार नाही आणि हळू हळू तुटत जाईल. त्यामुळे नेहमी बोलके ठेवणे , फिरायला नेणं , हे सुरु ठेवा.

एकत्र कुटुंबात ह्या स्त्रियांनी जाताना विचार करावा कारण तिथे जर जास्त इतरांना सर्व्हिस द्यावी लागती तर विचार करून त्या कुटुंबात जा कारण तुम्हाला फिजिकल मेहनत किती जमेल ह्यावर शंका येते. त्यामुळे जिथं कामे कमी अशाच घराण्याची निवड करा. नाहीतर पुढे हिरमोस व्हायचा.

मिथुन राशींच्या वृद्धांसाठी – Mithun Rashi For Senior Citizen

६० + मिथुन राशींच्या वृद्धांना योग्य पद्धतीने बुद्धीला तीव्र ठेवले पाहिजे. ह्या वयात ज्या व्यक्तींना मेंदूचे किंवा विसरण्याचे आजार होतात त्यात मिथुन राशींचे जास्त दिसतात. ज्यांना हे होणार नाही ते सतत कोणत्या ना कोणत्या कॅल्क्युलेशन  मध्ये सतत बिझी असतील. म्हणून हा उपाय सुद्धा समजावा.

त्वचा रोग ह्या वयात असण्याची शक्यता फार असेल जेव्हा राहू ची गोचरी पत्रिकेत निगेटिव्ह होत असेल. वरील विषय सुद्धा राहू मुळेच समजावा.

बाकी तसे ह्या वयातील मिथुन राशीच्या व्यक्ती खुश असतात. जीवनात ह्या वयात येऊन मागच्या काही चुकांवर स्वतःला हसताना पाहतात जेव्हा तरुण होते. पण कदाचित काही मिथुन राशींच्या व्यक्तींना ह्या वयात त्याच चुका करण्याची परिस्तिथी किंवा उकळी येते.

उदाहरण – जर वयाच्या २४/२५ वयात एखादा हा व्यक्ती जुगार खेळात असेल तर मध्ये सोडून दिल्यानंतर तेच रिटायर झाल्यानंतर पाहाल. बाकीच्या चुकांसाठी सुद्धा हेच समजावे समजणाऱ्याना जास्त समजावण्याचा प्रयत्न मी करत नाही.

मिथुन राशी शुभाशुभ

 • शुभ वार – बुधवार 
 • शुभ रंग  – हिरवा, पिवळा, केसरी
 • शुभ अंक –  ५
 • दान — हिरव्या मुगाची डाळ , पाचू , कासा , साखर , सुवासिक फुले , हिरवी वस्त्रे , हिरवी फळे , कापूर. 

कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना ह्या राशीच्या लोकांनी खडीसाखर खावी. स्वतःजवळ हिरव्या कपड्यात ४ वेलच्या नेहमी असाव्यात चांगले डोके चालेल.  

शेवटी मिथुन राशीला एक विशेष उपाय प्रत्येक बुधवारी करणे.

सकाळी गणेशाला दुर्वा वाहून गणेश अथर्वशीर्ष आणि घरातील कृष्णाला अंघोळ घालून दही + खडीसाखरेचा नैवेद्य दाखविणे.  

हा उपाय प्रत्येक बुधवारी केल्याने मिथुन राशींचे लोक संकटसमयी शांत संयमी आणि बऱ्याच संकटाना योग्य प्रकारे हॅण्डल करू शकतील असे माझे मत आहे.

सध्या एव्हढे पुरे…

विशेष नोट — सर्व राशींबद्दल लिहिताना तुमच्या कंमेंट वाचून किंवा अजून काही अभ्यास करता करता ह्यात बदल केले जातील किंवा अजून काही पॉईंट्स टाकले जातील. तेव्हा सर्व मिथुन राशींच्या माझ्या मित्र मैन्त्रिणींसाठी एक विनंती आहे कि हा लेख पूर्ण समजू नये. वेळोवेळी ह्याचे अपडेट वाचत जावे. निदान वर्षातून २/३ वेळा तरी.

शेवटी प्रत्येकाने आपल्या राशी बद्दल जे जे मिळेल ते ते घेत राहावे जीवन सुखकर होण्यासाठी.

आणि महत्वाचे — काहीही चुकीचे असेल तर ते पॉईंट इग्नोर करावेत सोडून द्यावेत.

This Post Has 2 Comments

 1. राज

  सिंह लग्नात, लग्नी मंगल – चतुर्थात राहू आणि दशमात केतु व सप्तमस्त शनी याचा अर्थ काय समजावा?

  Date of birth- 20/06/1993

  वेळ सकाळी 11:45 रविवार

  1. राज

   जन्मस्थळ : परभणी

Leave a Reply