शनी चे मीन राशीतून भ्रमण
३ राशींना साडेसाती २ राशींना अडीचकी
दिनांक 29/3/2025 पासून शनी मीन राशीत जात आहे. शनी एका राशीत साधारण २.५ वर्षे असतो त्या प्रमाणे जेव्हा आपल्या मागील राशीत शनी येतो तेव्हा तुम्हाला साडेसाती सुरु होते. जर तुमची राशी मेष आहे तर 29/3/2025 ला जेव्हा शनी मीन राशीत येईल तेव्हा मेष राशीला साडेसाती सुरु होईल.
मेष राशी च्या साडेसाती चे 3 चरण
- 29/3/2025 ते 23/2/2028 साडेसाती चे पहिले चरण (शनी मीन राशीत असेल)
- 23/2/2028 ते 17/4/2030 साडेसाती चे दुसरे चरण ( शनी मेष राशीत असेल)
- 17/4/2030 ते 31/5/2032 साडेसाती चे तिसरे चरण (शनी वृषभ राशीत असेल) साडेसाती संपेल 31/5/2032
मीन राशी च्या साडेसाती चे 3 चरण
- 17/1/2023 ते 29/3/2025 साडेसाती चे पहिले चरण (शनी कुंभ राशीत)
- 29/3/2025 ते 23/2/2028 साडेसाती चे दुसरे चरण (शनी मीन राशीत असेल)
- 23/2/2028 ते 17/4/2030 साडेसाती चे तिसरे चरण ( शनी मेष राशीत असेल) साडेसाती संपेल 17/4/2030
कुंभ राशीच्या साडेसाती चे 3 चरण
- 24/1/2020 ते 17/1/2023 साडेसाती चे पहिले चरण (शनी मकर राशीत होते)
- 17/1/2023 ते 29/3/2025 साडेसातीचे दुसरे चरण (शनी कुंभ राशीत होते)
- 23/2/2025 ते 23/2/2028 साडेसाती चे तिसरे चरण ( शनी मेष राशीत असेल) साडेसाती संपेल 23/2/2028
सिंह राशीला शनी ची अडीचकी असेल
23/2/2025 ते 23/2/2028
कारण सिंह राशी पासून शनी ज्या राशीमध्ये आहेत (मीन) ती राशी 8 वी आहे. शनी जेव्हा आपल्या राशी पासून 8 व्या किंवा 4 थ्या राशीमध्ये येतात तेव्हा त्या राशीला अडीचकी (लहान पनौती) किंवा ढैय्या म्हणतात.
धनु राशीला शनी ची अडीचकी असेल
23/2/2025 ते 23/2/2028
कारण धनु राशी पासून शनी 4 थ्या क्रमांकाच्या मीन राशीत आले आहेत.
कुंभ मीन मेष धनु आणि सिंह राशीवर हे शनी चे गोचर विशेष परिणाम देतील. काळजी घ्या घाबरू नका. शनी महाराज हि न्याय देतात तेव्हा जर चांगली कामे मागील काही वर्षात केली असतील तर काहीच घाबरण्याचे कारण नाही. ह्या कालावधीत जास्तीत जास्त सरळ राहण्याचा प्रयत्न करा अति घाई अति हाव/लोभ बरा नव्हे. जास्तीत जास्त गरजूना मदत करा. वृद्धांची सेवा करा. आणि पिंपळ पूजा. किंवा पिंपळाचे एक तरी झाड आपल्या राहता घरापासून लांब लावा. शिव उपासना आणि कृष्ण उपासनेत राहिलात तर हा कालावधी आपणास सुंदर जाईल. मेहनत करा पुढे जा.
आपणास हा कालावधी आरोग्याने आणि प्रगतीने खूप चांगला जावो हीच शनी महाराजांकडे प्रार्थना
धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८