You are currently viewing धनु राशी I Sagittarius I अर्धा माणूस अर्धा घोडा

धनु राशी अक्षर:- ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे (Sagittarius Sign)

राशीचक्रातील ९ वि राशी (धनु राशी) , शरीरावरील मांड्यांची राशी, अर्धा माणूस अर्धा घोडा, हाती बाण असलेल्या चिन्हाची राशी , अग्नितत्त्वचि राशी, गुरु ची राशी. (Sagittarius in marathi)

आधी धनुतल्या नक्षत्रांची ची माहिती देतो.

ह्या राशीत ३ नक्षत्र — मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा 

 • जर तुमचा जन्म चंद्र ० ते १३:२० पर्यंत पत्रिकेत लिहिला आहे तर मूळ नक्षत्र आहे तुमचे. गण – राक्षस आणि नाडी – आद्य असेल.
 • जर पत्रिकेत आपला जन्म चंद्र १३:२० ते २६:४० डिग्री पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल तर पूर्वाषाढा नक्षत्र आहे. गण – मनुष्य आणि नाडी – मध्य असेल 
 • जर जन्म चंद्र २६:४० ते २९:५९  पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल तर उत्तराषाढा नक्षत्र आहे आपले. गण – मनुष्य आणि नाडी – अंत्य असेल.

ज्या डिग्री वर तुमचा जन्म चंद्र असेल त्याप्रमाणे नक्षत्र गण नाडी ह्यांच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला मिळतील.  

नक्षत्र गण नाडी ह्या एकाच राशीत वेगवेगळ्या असतात म्हणून इथे देणार नाही जेव्हा ह्यावर अधिक प्रकाश पडेल तेव्हा तुमची डिग्री पाहून नक्षत्र गण नाडी बद्धल वाचू शकता आणि तुमच्या राशीचे कॉमन इफेक्ट त्यात मिक्स करू शकता.

सध्या कॉमन धनु राशी कशी आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

धनु राशीचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव

धनु राशी चा मालकी हक्क हा गुरु ग्रहाकडे आहे. गुरु ह्या राशीचा लीडर असल्याने एक सुशिक्षितपण, सात्विकता ह्या राशीत आपोआप येते.

सत्यता ह्या राशीत ठासून भरलेली असते, गुरु मूळे न्यायप्रिय सुद्धा असतात,   गुरूचा प्रभाव ह्या राशीला धार्मिकपणा देतो.

पण मीन राशी सुद्धा गुरु ची राशी आहे. मीन राशी हि देवभोळी राशी आहे तशी धनु हि राशी देवभोळी नव्हे हा फरक दोन्ही मध्ये दिसण्यात येतो. (Sagittarius Personality)

माझ्या मते गुरु ची राशी असल्यामुळे ह्यांना स्पर्धा करणे , टार्गेट वर लक्ष ठेऊन कॉम्पिटिशन करणे, दुसऱ्याला वरचढ दाखविणे जमत नाही. त्यात काही धनु राशीच्या व्यक्ती एक पाऊल मागेच दिसतील.

आदर्श जीवन , सहिष्णुता , आदरभाव दुसऱ्या बद्दल , मनाचे पक्के , संयमित , मोठे विचार हे सर्व ह्या राशीत गुरु मुळे पाहण्यास मिळते.

पण जर गुरु पत्रिकेत पीडा अवस्थेत असेल तर कदाचित ह्या उलट असण्याची शक्यता असेल हे पुढील अभ्यासाने कळते एखाद्या धनु राशीचे.

हि राशी अग्नितत्वाची सुद्धा आहे त्यामुळे प्रचंड ऊर्जा ह्या राशीत पाहायला मिळते. प्रत्येक कार्यात हिरहिरीने भाग घेणे, मोठ्या मोठ्या इव्हेंट्स ची जबाबदारी उचलणे, संसारात झोकून मेहनत करणे ह्या राशीचा मूळ स्वभाव बनतो. पण अग्नीतत्व ह्यांना कधी कधी रागीट सुद्धा बनवितो. 

ह्या राशीचे चिन्ह अर्धा घोडा अर्धा माणूस आणि वर उगारलेला बाण त्यामुळे ह्यांच्या स्वभावात अति जलद होणारा बदल दिसेल. सकाळी एक संध्याकाळी एक दिसतील. ह्या राशीचा असा स्वभाव आणि हाती बाण असल्यामुळे आयुष्यात कुणाला तरी एकाला टार्गेट वर ठेवतात असा माझा अभ्यास आहे.

जर पती असेल धनु चा तर पत्नीला बाण रोखतील आणि ह्या उलट सुद्धा समजावे. नाहीतर रिलेशन मध्ये घरातील एकाला तरी टार्गेट करतात. आई किंवा वडील. ह्याने घरातील कुणीही धनु राशीला ओळखत नाही म्हणून ह्याच कारणाने ह्यांचे होणारे नुकसान जास्त दिसते. उदाहरणार्थ — करिअर आणि शिक्षण आणि वैवाहिक जीवनात मॅनेज करताना मग ह्यांना त्रास होतो.

धनु राशीचे शिक्षण आणि करिअर

धनु राशी हि मुळात गुरु ची राशी असल्यामुळे ह्या राशी च्या व्यक्ती आपले शिक्षण मेहनतीने घेताना दिसतात. आणि त्यांच्याकडे शिक्षणात कितीही अडचणी आल्या तरी ते आपले शिक्षण पूर्ण करताना दिसतात. जरी असे झाले नाही तरी ते एखाद्या सर्टिफाइड व्यक्तीला आपल्या ज्ञानाद्वारे किंवा आपल्या कडे असलेल्या अनुभवाच्या जोरावर जिंकू शकतात.

गुरु ची राशी असल्यामुळे कोणतेही शिक्षण घेऊन ह्या व्यक्ती लीडर शिप , मार्गदर्शक ठरू शकता. (कन्स्लटंसी).

एखादी संस्था चालविण्याची जबाबदारी , किंवा स्वतःची मोठी संस्था काढून लोककल्याण करणे ह्यावर सुद्धा गुरु मुळे ह्यांना चांगले रिझल्ट मिळतात करिअर मध्ये. (Sagittarius education & career)

करिअर मध्ये ह्या राशीचे जे चिन्ह आहे म्हणून ह्यांना करिअर च्या एका वयात कॉन्फयुज्ड हा प्रकार दिसेल. आणि धावावे सुद्धा लागेल 

चिन्हामधे असणारा बाण करिअर करताना आपल्याला जास्त लढाई करावी लागेल असे दिसते. सहज साध्य होत नाहीत काही गोष्टी. टार्गेट ला लक्ष करावे लागेल हेच हे चिन्ह सांगते.

हि राशी अग्नी तत्वाची असल्याने ह्या व्यक्तींकडे ऊर्जा फार असते. दाहकपणा ह्यांना करिअर मध्ये तापवितो तळपवितो, त्यासाठी करिअर मध्ये अशी निवड करावी कि ज्यात वरील सर्व गोष्टी येतील. शारीरिक कष्ट सुद्धा धनु राशी च्या व्यक्ती करिअर मध्ये निवडवताना दिसतात.

ज्या करिअर मध्ये तिन्ही शिप मध्ये काम होते असे सुद्धा करिअर मध्ये धनु राशी च्या व्यक्ती जास्त पाहायला मिळतात.

ट्रॅव्हलिंग सुद्धा धनु राशीला सूट होते अग्नी तत्व असल्यामुळे. त्यामुळे ह्यात सुद्धा व्यवसाय आणि नोकरी असेल तर ह्या व्यक्ती अग्रेसर असतील.

धनु राशीच्या व्यक्तीना जर जॉब मध्ये उशिरा प्रमोशन किंवा चांगली संधी मिळत नसतील तर त्यांचा साधेपणा प्रामाणिक पण आणि सरळ राहण्याचा, कोणाची स्पर्धा न करण्याचा स्वभाव आड येतो.

धनु राशीला — नाट्य, ललित कला गोल्ड-सिल्वर, मॅनेजर, संस्थान अधिकार, हॉटेल संचालन, बँकिंग क्षेत्र, ह्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये जास्त प्रगती दिसते.

धनु राशीचे शिक्षण – सायन्स गणित/अकाउंट  कॉमर्स , बँकिंग  क्षेत्री शिक्षण घेतले तर पुढे वाव मिळण्यास जास्त त्रास दिसत नाही.

धनु राशीचे वैवाहिक जीवन

धनु राशीच्या व्यक्ती वैवाहिक जीवनात फार मेहनती असतात. जर एकत्र कुटुंबात धनु राशीची स्त्री आपले वैवाहिक जीवन व्यतीत करीत असेल तर सर्व जबाबदारी हि एकटी धनु राशीची स्त्री उचलते. मात्र ह्यांना जरा समजून घ्यावे त्याच्या साधेपण सरळ स्वभावाकडे हीच त्याची अपेक्षा असते. असे जर झाले तरच ह्या वैवाहिक जीवनात ते अति आनंदाने सर्व खराटा उचलण्याची जबाबदारी घेताना दिसतात. (Sagittarius Married life)

धनु राशीचे पुरुषांना आपल्या द्विस्वभाव व्यक्तिमत्वामुळे थोडा त्रास होऊ शकतो पण हे सुद्धा आपली जबाबदारी पार पडण्यास मेहनती दिसतात.

धनु राशीच्या कोणत्याही स्त्री अथवा पुरुषाला आपले वैवाहिक जीवन अर्थ, काम, प्रेम आणि इतर रिलेशन ह्यात सरळपणाने राहायला आवडते.

एक पत्नी-एक पती, जास्त पैशाच्या मागे न लागता सर्वाना बॅलन्स करून धरून राहण्याचा स्वभाव हा वैवाहिक जीवन ह्यांचे सुखी करतो.

धनु राशीच्या स्त्रियांना येथे एक सल्ला देण्यात येतो कि आपल्या जोडीदाराशी वागताना जास्त तोंडाचा पट्टा चालविण्याचा सपाटा दाखवू नये स्वतःला त्रास होण्याचा जास्त संभव असेल. असे नसेल तर वैवाहिक जीवनातील ह्या स्त्रिया सहन करताना सुद्धा दिसण्यात आल्या आहेत.

धनु राशीच्या वैवाहिक जीवनात मला असे अनुभवास आले कि ह्या व्यक्ती जर एकत्र कुटुंबात असतील तर कोणत्या ना कोणत्या रिलेशन ची जबाबदारी ह्यांच्या वैवाहिक जीवनात त्रासदायक ठरते. उदाहरणार्थ – एखादा दीर काही करतच नाही , किंवा सासू सासऱ्यां पैकी कोणी तरी बेड रेस्ट असतो. कुटुंबाची पूर्ण जबाबदारी ह्याच्यावर पडतेच. हे स्त्री च्या बाबतीत पाहायला मिळते.

पुरुषांच्या बाबतीत पाहताना धनु राशी ला त्याच्या वैवाहिक जीवनात फार मेहनत करावीच लागते सर्व बाजू सांभाळण्यासाठी. एव्हढे स्मूथ आणि एन्जॉयमेंट नसतात हे पुरुष.

धनु राशी हि एक अग्नी तत्वाची राशी आहे आणि ह्यांनी वृषभ कन्या  मकर ह्या पृथ्वी तत्वाच्या राशींबरोबर लग्न केले तर त्याच्या हट्टी पणा मुळे त्रास होऊ शकतो. ह्यात शक्यतो धनु ला वृषभ राशी चालत नाही.

धनु ने अग्नी तत्वाच्या राशी बरोबर म्हणजे मेष सिंह धनु राशीबरोबर विवाह सुख घेताना दोन्ही जास्त आपल्या कर्तबगारीवर काम करताना करिअर करताना दिसतील मात्र ह्यात सिंह राशी थोडी त्रासदायक दिसेल धनु ला. व्यवहाराच्या बाबतीत क्लिअर करून लग्न करावे.

धनु राशीला वैवाहिक जोडीदार पैकी वायू तत्वाच्या राशी सूट होतात मिथुन तुला कुंभ दोन्ही पती पत्नी आपल्या एकमेकांना सपोर्ट करताना दिसतील जसे अग्नी ला वायू तेज करतो तसे. ह्यात मिथुन राशी च्या बाबतीतील कॅरॅक्टर किंवा त्याच्या हौशी मौजी चेक करून घ्यावे असा सल्ला देण्यात येतो. 

वरील विवेचन हे फिक्स नाही हा ठोकळा अभ्यास पद्धती आहे इतर गोष्टी पत्रिका चेक करूनच निर्णय घ्यावा. मात्र वरील पॉईंट वर सुद्धा लक्ष ठेवून राहावे.

धनु राशी चे प्रेम 

धनु राशीच्या व्यक्ती जर प्रेमात पडल्या तर त्याचे प्रेम एकदम सरळ असते. उदार व्यक्तिमत्वाने त्या समोरील व्यक्तीवर विश्वास ठेवतात.

प्रेमात जास्त रोमँटिक न राहतात आपल्या ज्ञानाचा प्रसार करण्याचा विचार सतत ह्यांच्या बोलीत असतो. 

ह्यांच्या प्रेमात जर ब्रेकअप आला तर फक्त ह्यांनी केलेल्या व्यावहारिक पण आड आलेले दिसेल. जसे दोन व्यावसायिक अग्रीमेंट करतात तसे न होता सरळ प्रेम करून लग्न करावे हा सल्ला येथे देण्यात येतो. कारण तुम्ही गुरु च्या राशीचे आहात आणि गुरु म्हणजे प्रेम करताना व्यवहार नव्हे फक्त ज्ञान चा प्रसार असतो. (Sagittarius Love life)

धनु राशीच्या व्यक्तींना प्रेमात जोडीदार हा शिकलेलाच पाहिजे त्याच्या बरोबरीचा नसेल तर प्रेम सफल होताना दिसत नाही. तेव्हा असा सल्ला देण्यात येतो कि आपल्या बरोबरीचा जोडीदार प्रेमात निवडावा.

धनु राशीच्या तरुण मुलींना खास लिहिण्यात येते कि आपणाला आपल्या कुटुंबापासून त्याच्या जबाबदारीपासून वेगळे होताना त्रास होईल म्हणून प्रेम सक्सेस करताना आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो तेव्हा आधीच काय तो निर्णय घेऊन पाऊल उचलावे. आणि समोरील व्यक्तीला आपल्या कौटुंबिक जबाबदारी सांगूनच निर्णय घ्यावा.

कारण असे बरेच वेळा अनुभवास आले आहे कि धनु राशीच्या मुलींनी प्रेमात पाऊल टाकले कि त्यांना आपल्या घरातील वातावरणाची जबाबदारी सोडता येत नाही आणि प्रेमात अर्ध्यावर आले कि त्यांना त्रास होतो पुढे जाण्यासाठी.

गुरु ची राशी असल्यामुळे कुणाचे मन दुखावून तुम्ही स्वतःचा फायदा करणार नाही म्हणून हे विवेचन केले आहे.

कित्येक धनु राशीच्या मुलींना प्रेमात हाच त्रास होतो आणि नंतर ते अडजस्टमेन्ट करून दुसऱ्या बरोबर विवाह करताना दिसतात.

धनु राशीच्या ५ ते २० वर्षातील मुलाच्या पालकांसाठी

जर आपल्या घरात धनु राशीची मुलं असतील तर खास मूळ नक्षत्र आणि धनु राशी असेल तर ह्यांच्या विद्येत त्यांच्या वागणुकीसाठी आपल्याला मेहनत करावी लागेल ह्यास कारण राक्षस गण. 

पूर्वाषाढा आणि धनु राशीची मुलं असतील तर खास त्याच्या आवडीनिवडीवर मेहनत करावी लागेल.

धनु राशी आणि उत्तराषाढा नक्षत्र असेल तर तुम्ही तयार राहा त्यांच्या टार्गेट वर त्यांच्या ऑर्डर वर काहीतरी मॅनेज करून सॅक्रिफाईस व्हावे लगेल.

वरील विवेचन करताना नक्षत्रांचा विचार केला आहे पण पूर्ण धनु राशीची मुलं तुमच्यासाठी काहीतरी जीवनात स्वतःचे अडजस्टमेन्ट करताना जरूर दिसतील ह्यात आईवडिलांच्या संसारातील काही ना काही इशूज मुळे ह्यांना तसे करावे लागते.

उदाहरणार्थ – ह्यात कधी असे दिसेल कि धनु राशीच्या मुलांनी शिक्षण सोडून लगेच मार्केट मध्ये पदार्पण केले. किंवा करिअर चांगले असताना विवाह उशिरा केला. किंवा अशी कोणतीही अडजस्टमेन्ट हि परिस्थितीनुरूप केलेली दिसते.

धनु राशीची मुलं आपल्याला असताना आपण आपल्या म्हातारपणाची अजिबात काळजी करू नये. कारण खूप कमी पाहण्यात आले आहे कि धनु राशीच्या मुलांनी आपल्या आईवडिलांची काळजी घेतली नाही असे.

म्हणून आपल्या धनु राशीच्या मुलांना समजून घ्येण्याचे त्यांच्या मानसिक इच्छा पूर्ण करण्याचे पाहणे हे प्रत्येक धनु राशीच्या पालकांचे कर्त्यव्य आहे. 

ह्यांच्या करिअर ची काळजी आपल्याला नसावी कारण शिक्षण होवो अथवा न होवो ह्या राशीची मुलं आपल्या पायावर उभी राहतातच.

कारण आत्मसन्मान , आदर्शपणा, मनाचे पक्के, प्रभावीपणा ह्या सर्व पॉईंट वर ह्यांचे जीवन कार्य सुरु असते.

धनु राशी आणि रोग – आजार 

शरीराच्या मांड्यांवर ह्या राशीचा प्रभाव असतो म्हणून धनु राशीच्या व्यक्तींना मांड्यांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

एखादे वेळी पायाचे ऑपरेशन सुद्धा होण्याचा संभव जास्त असतो.

एखादे हाड तुटणे सुद्धा धनु राशीच्या व्यक्तीना पुढे त्रासदायक ठरू शकेल  काळजी घ्यावी अति उत्साहाने धावपळ करताना.

धनु राशीला स्थूल पण (जाड होणे) सुद्धा पुढील वयात त्रासदायक ठरते. वात वाढत जातो म्हणून कधीही शिळे न खाण्याचा सल्ला ह्यांना देण्यात येतो.

धनु राशीला व्यसन किंवा नॉनव्हेज सुद्धा जास्त सूट होत नाही. ह्याने जेव्हा जेव्हा जीवनातील स्पर्धा परीक्षा असतील तेव्हा तेव्हा त्रास होतो. तब्येतीत खास ताप, सर्दी , खोकला, आतड्यातील आजार.

कालपुरुषाच्या पत्रिकेत धनु राशीच्या रोग स्थानी वृषभ राशी येते म्हणून ह्या राशीला युरीन,पाइल्स,मधुमेह ह्यापासून सावधान राहावे. 

खाण्यापिण्यात सात्विक असलेली धनु राशीची व्यक्ती कमी आजारी दिसतात.

धनु राशी ६०+ च्या वृद्धांसाठी —

वरील सर्व रोगांमधील विवेचन वाचून घ्यावे जर ६० च्या आधी वरील एखादा आजार डिटेक्ट झाला असेल तर तो धनु राशीला वाढतच गेला आहे असे पाहण्यात येते म्हणून काळजी घ्यावी. उत्तम योग, प्राणायाम , गुरु मंत्र जप  करावा. अध्यतिमीक राहावे.

ह्या वयातील व्यक्तींना असा सल्ला देण्यात येतो कि ६० च्या आतील जीवन हे श्रमाचे अंगमेहनतीचं गेले असेल तर आता पुढील आयुष्यात आराम करावा जास्त दगदग करू नये. असेच दिसते ह्यासाठी हे मांडले आहे. ह्यांना सतत धावपळ करण्याची सवय असते.

धनु राशी हि शिस्तबद्ध राशी, नियम पाळून जीवन जगणारी राशी असली तरी ह्या वयात ह्यांना ह्याच गोष्टींचा इंतारांमुळे त्रास होत असेल तर ऍडजेस्टमेंट करावी नाहीतर पुढील आयुष्यात त्रास होण्याचा जास्त संभव असेल.

हि गुरु ची राशी असल्यामुळे ६० नंतर बऱ्याच धनु राशी च्या व्यक्ती ह्या सर्वाना मदत करून आयुष्याचा आनंद घेताना दिसतील.

ह्याचे कारण धनु राशीच्या १२ व्या स्थानातील राशी हि तुला आहे सर्वाना बॅलन्स करताना दिसतात हे. आणि पैसे अडका ह्यात सुद्धा जास्त इशू दिसत नाही ह्यांच्या ह्या वयात. सर्व काही सेट करून ठेवलेले असते.

काळजी करू नये.

धनु राशी आणि शुभाशुभ

 • शुभ अंक:- ३ त्याखालोखाल ९ 
 • सम अंक:- ४,७,८ (नफा नुकसान काहीच नाही)
 • अशुभ अंक:- ५,६
 • भाग्यशाली रंग:- पिवळा , त्याखालोखाल हलका ब्लू, हलका हिरवा , जांभळा  

(स्वतःजवळ पिवळ्या रंगाचा रुमाल अव्यश्य ठेवावा किंवा कपडे परिधान करावेत) खास गुरुवारी हे करावेच 

 • शुभ दिवस:- गुरुवार , त्याखालोखाल सोमवार, मंगळवार   
 • इष्ट देव:- हनुमंत आणि दत्तात्रय किंवा तुम्ही ज्या गुरु ला मानता ते 
 • शुभ मंत्र:- ॐ गुं गुरवे नम: , किंवा ॐ बृं बृहस्पतये नम:

सध्या एव्हढे पुरे…

विशेष नोट — सर्व राशींबद्दल लिहिताना तुमच्या कॉमेंट वाचून किंवा अजून काही अभ्यास करता करता ह्यात बदल केले जातील किंवा अजून काही पॉईंट्स टाकले जातील. तेव्हा सर्व धनु राशींच्या माझ्या मित्र मैन्त्रिणींसाठी एक विनंती आहे कि हा लेख पूर्ण समजू नये. वेळोवेळी ह्याचे अपडेट वाचत जावे. निदान वर्षातून २/३ वेळा तरी.

शेवटी प्रत्येकाने आपल्या राशी बद्दल जे जे मिळेल ते ते घेत राहावे जीवन सुखकर होण्यासाठी.

आणि महत्वाचे — काहीही चुकीचे असेल तर ते पॉईंट इग्नोर करावेत सोडून द्यावेत.

धन्यवाद…..!

This Post Has 3 Comments

 1. Sonal Shinde

  saglya categories chi uttam mahiti dele ahe, aschi ch pudhe hi mahiti det raha

 2. Shilpa

  अगदी बरोबर लिहिलेल आहे गुरुजी तुम्ही.
  स्वभाव, प्रेम, आजार,mood swings इत्यादी….
  Very well study u have done on Sagittarius zodiac sign…
  As I m ♐ person so I know about myself very well…

Leave a Reply