You are currently viewing कन्या राशी- Kanya Rashi- बुद्धीची राशी

कन्या राशी अक्षर :- ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो (Virgo Sign)

राशीचक्रातील हि ६ वी राशी. ह्या राशीत ३ नक्षत्र –उत्तर फाल्गुनी – हस्त आणि चित्रा  

  • जर तुमचा जन्म चंद्र ० ते १०:०० पर्यंत पत्रिकेत लिहिला आहे तर उत्तर फाल्गुनी नक्षत्र आहे. गण- मनुष्य आणि नाडी- आद्य असेल.
  • जर तुमचा जन्म चंद्र १०:०० ते २३:२० पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल तर हस्त नक्षत्र आहे तुमचे गण – देव आणि नाडी – आद्य असेल 
  • तुमचा जन्म चंद्र २३:२० ते २९:५९  पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल तर चित्रा नक्षत्र आहे तुमचे गण – राक्षस आणि नाडी – मध्य असेल.

ज्या डिग्री वर तुमचा जन्म चंद्र असेल त्याप्रमाणे नक्षत्र गण नाडी ह्याच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला मिळतील.  

नक्षत्र गण नाडी ह्या एकाच राशीत वेगवेगळ्या असतात म्हणून इथे देणार नाही जेव्हा ह्यावर अधिक प्रकाश पडेल तेव्हा तुमची डिग्री पाहून नक्षत्र गण नाडी बद्धल वाचू शकता आणि तुमच्या राशीचे कॉमन इफेक्ट त्यात मिक्स करू शकता. (Virgo rashi in marathi)

सध्या कॉमन कन्या राशी कशी आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

कन्या राशी आणि स्वभाव 

ह्या राशीचे चिन्ह हे हातात फुल घेऊन उभी असलेली स्त्री आहे ह्याने ह्या राशीला नेहमी दुसऱ्याचा आदर करणारी राशी मनाली जाते.

लगेच कुणाचा अपमान करणार नाहीत. पण ह्याच्यावर कुणी आळ टाकला तर मात्र हे उलट फिरून प्रतिकार करतील कारण ह्यांना चुकीचे असे काहीच चालत नाही. तसे चुका तर प्रत्येक व्यक्ती करतोच पण अशा चुका हे कधीही करणार नाहीत ज्यात समोरच्याचे नुकसान होईल. (Virgo Personality)

स्वतःचे नुकसान झाले तरी चालेल मग.—ह्यावर टिपणी द्या. 

पूर्ण १२ राशींमधील सर्वात जास्त कॉन्फयुज्ड होणारी राशी आहे हि असे मानले जाते. परंतु ह्याच स्वभावावर ह्या व्यक्ती इतरांवर आपली छाप पाडतील ह्यात शंका नाही. हे माझे स्वतःचे मत आहे.

केव्हा केव्हा हाच स्वभाव ह्यांना त्रासाचा जाऊ शकतो – सल्ला आहे कि फार विचार करू नका झटपट निर्णय घ्या. कारण तुमची राशी हि बुधाची राशी आहे. बुध म्हणजे बुद्धी.

ह्यामुळे ह्या राशीत कॅल्क्युलेशन चा पार्ट जास्त येतो त्यामुळे अर्थात ह्या राशीच्या व्यक्ती सतत गणित करत असल्यामुळे समोरच्याला हि राशी कन्फयुज्ड वाटते. त्यात त्यांचा दोष आहे असे सध्या समजू.

पण ह्या राशीचा बुद्धिमत्ता स्वभाव आणि इमाने इतबारे राहण्याचा स्वभाव इतरांना मोहात टाकू शकतो. असे माझे मत.

स्वभावाने ह्या व्यक्ती थोड्या भित्र्या सुद्धा असतात त्यामुळे निर्णय घेताना ह्यांना इतरांचा सपोर्ट लागतोच. एकट्याने कोणताही निर्यण घेताना ह्या एक पाऊल मागे दिसतील. पण ह्यात सुद्धा ते नेहमी सावध-सेफ असतात असे मला वाटते.

मिथुन राशी हि सुद्धा बुधाची आहे पण ती बालिश आहे कारण वायू तत्वाची असल्याने त्या राशीचा स्पीड हा कुठेही कसाही असेल. 

आणि ह्या राशीचा मालक सुद्धा बुध आहे पण हि पृथ्वी तत्वाची असल्याने जसे पृथ्वी सर्वाना आपल्या बाहुत आपलेसे करते सांभाळून घेते तशी हि राशी सर्वांचे स्वागत करणारी सुद्धा आहे .पण ह्याने ह्या जेव्हढ्या मेहनती दिसतात तेव्हढाच आळशीपणा सुद्धा ह्यांना जीवनात आलेला असतो. मिथुन राशी सारखे सतत ऍक्टिव्ह दिसणार नाहीत. 

कन्या राशी चे शिक्षण करिअर

करिअर मध्ये नियम अटी पाळण्याचा ह्यांचा स्वभाव ह्याच्या करिअर मधील एक गुण आहे. चुकीचे काहीच चालत नसल्याने लगेच विरोध करताना आपले काय नुकसान होईल करिअर मध्ये मागे पुढे ह्या राशी पाहत नाहीत. (Virgo education horoscope)

सल्ला — बघून सुद्धा काना डोळा करण्याची सवय कधी कधी आपल्याला एखाद्या मोठ्या त्रासातून वाचवू  शकेल.

बौद्धिक कौशल्याचे कोणतेही करिअर ह्यांना चालते. जास्तीत जास्त कन्या राशीला अकॉऊंट मध्ये पहिले जाते एखाद्या फर्म चा हिशोब तपासनीस कन्या राशीचा जरूर दिसेल. 

गणित, बँकिंग क्षेत्र , वित्त, इंजीनियरिंग, चिकित्सा, डॉक्टर , नर्स, वास्तुकला, निवेश , शेअर बाजार, ज्योतिषी , एखाद्या कंपनीत डेटा विश्लेषक, ठेकेदारी व्यवसाय.

दोन मोठ्या व्यक्तींमध्ये सहमती आणून मध्यस्ती करण्याची कला ह्याच्याकडे आहे त्यामुळे कोणत्याही मोठ्या फर्म साठी एक मध्यस्ती वक्ता म्हणून हे सुंदर काम करू शकतात. जसे भाषा ट्रान्स्लेटर सुद्धा ह्या व्यक्ती अधिक चांगले करू शकतात.

अशा पद्धतीने घेतलेले कोणतेही शिक्षण घेऊन तुम्ही करिअर ची सुरुवात करू शकता.

करिअर सल्ला —

कोणतेही कार्य करताना तुमचा कल हा नेहमी ते कार्य चांगले प्रेसेंट करण्याचा असतो पण तुमचे ह्याकडे लक्ष राहणार नाही कि ते काम आपल्याला केव्हा पूर्ण करायचे आहे . जरा ह्यावर लक्ष दिलात तर तुम्ही करिअर मधील कोणत्याही क्षेत्रात जास्त प्रगती करू शकता.

राशीच्या ५ ते २० वर्षाच्या मुलं-मुलींच्या पालकांसाठी

आपल्या घरातील हि मुले फार भोळी आहेत असे समजा. तेव्हा बाहेरील अशा कोणत्याही व्यक्तीं पासून ह्यांना सावध करणे कन्या राशीच्या पालकांचे कर्त्यव्य आहे असे मी मानतो आणि आपल्याला सल्ला देखील आहे समजा.

एकदम लहानपणापासून काही मुले ह्यांना चिडविणार नाही ह्याकडे जास्त लक्ष द्या त्या मुळेच नंतर ह्या राशीच्या मुलांना कॉन्फिडन्स जाताना दिसतो. एका गोष्टीची कोणतीही भीती ह्या राशीच्या व्यक्तींना कायम त्रास देते. जसे अडखळत बोलणे , अंधार , पाणी , वगैरे वगैरे.

अभ्यासात पहिली हि मुलं चांगली किंवा एव्हरेज दिसतील पण पुढे ह्यांना कन्फयुज्ड हा विषय असतोच म्हणून ह्यांना सल्ला हा योग्य वेळी देत जा. सारखे मागे मागे नको ते सुद्धा घातक आहे ह्यांना दुबळे करण्यासाठी.

ऐन वेळी एखादा गोधळ , किंवा तब्येतीची कुरबुर ह्या विद्यार्ध्यांना असतेच ह्यावर सुद्धा वॉच असला पाहिजे.

ह्या राशीला एकदम दुबळी समजू नये इतरांना चिंतेत ठेऊन स्वतः मजेत राहणारी व्यक्ती म्हणजे कन्या राशी. इतरांना काळजी देतील घाबरवून सोडतील काही वेळाने स्वतः निश्चिंत असतील.

कन्या राशींच्या वृद्धांसाठी -६० +

कन्या राशीला पचन संस्था , आतड्यातील एखादी जखम, आयरन ची कमी ने एनिमिया, मसल्स घाव, हड्डी ठिसूळ होणे , कॅल्शिअम ची कमी, ह्या रोगांकडे ह्या वयात जास्त लक्ष द्या.

जास्तीत जास्त कन्या राशीला कंबर आणि सांधेदुखी होताना ह्या वयात पहिले आहे. स्वभावात ह्या वयात जास्त चिडचिड होणार नाही ह्यावर सुद्धा जास्त लक्ष दिले पाहिजे, वयाच्या ४३ वर्षी जे रोग उत्पन्न होतील त्यात तेव्हा पासून कष्ट होतात का ते पाहावे लागेल.

कन्या राशी साठी भाद्रपद महिना ह्या वयात जास्त लक्ष देण्याचा असेल.

कन्या राशीच्या महिलांसाठी

हि राशी पृथ्वी तत्वाची असल्याने ह्या राशीच्या महिला फार सरळ स्वभावाच्या असतात. आपला परिवार नातलग ह्यांच्याबद्दल एक विशेष आदर ह्यांना असतोच. पण हाच स्वभाव ह्यांना त्रासदायक ठरू शकतो. त्यात ह्यांना स्वभावाने मानसिक पीडा सहन करावी  लागतेच.

ह्या राशीचा मालक बुध असल्याने कशाही परिस्थितीत ह्याच्याकडे पैसा कमविण्याचे साधन स्तोत्र असतेच. कन्या राशीच्या स्त्रिया ह्या आपल्या परिवारासाठी शुभ असतात. (Virgo female personality)

कन्या राशीच्या मुली शैक्षणिक वयात असताना कोणत्याही परिस्थितीत शिक्षण सोडत  नाहीत. परिस्तितीशी सामना करण्यासाठी कन्या राशी च्या मुली महिला खूप सहन करताना दिसतात.

हि राशी भावना प्रधान असल्याने ह्या महिलांना जास्त त्रास हा संसारातील झालेल्या छोट्या मोठ्या घटनांचा अति विचार केल्याने होतो.

धन संबधी मध्ये तुम्ही फार भाग्यशाली आहात. पैसा कसा वापरावा किती आणि कुठे खर्च करावा हे कन्या राशीला बरोबर माहिती असते.

ह्या स्त्रियांचा कामभावनेत एक वेगळा लुक असतो  शारीरिक सौंदर्याकडे अट्रॅक्शन कमी असते. त्यात समोरच्याला पूर्ण ओळखल्याशिवाय त्या समोर प्रेजेंट होणारच नाहीत. हा प्रत्येक स्त्रीचा गुण असतोच पण त्यात ह्या स्त्रिया अति अलर्ट असतात. खूप विचार करत बसतील. म्हणून ह्यात कन्या राशीला समाधान किती असेल ह्यावर शंका असते.

संतान सुखासाठी कन्या राशीला काही ना काही त्रास होतोच. कारण कालपुरुषाच्या पत्रिकेत ५ वे स्थान हे कन्या राशीच्या मागील स्थान आहे.

ह्या राशीच्या तरुण मुलींना एक सल्ला – कुणाकडूनही इमोशनली ब्लॅकमेल होऊ नका. सावध राहा. जर तुमच्या टेन्शन चा तुमच्या गोंधळी स्वभावाचा कोणी फायदा उचलत असेल तर लगेच तेथून काढता पाय काढा पुन्हा त्यात इमोशनल होऊन गुंतू नका.

कन्या राशी विवाह जीवन

कन्या राशीला वैवाहिक जोडीदार मिळताना फार लकी मानले आहे. काही वेळी कन्या राशींना त्यांच्या स्टेटस पेक्षा चांगले पती किंवा पत्नी मिळताना दिसते. मित्र राशी धनु मीन मिथुन हे जोडीदार चालतात. मेष आणि वृश्चिक राशी चा वैवाहिक जोडीदार थोडा त्रासदायक ठरू शकेल. (Virgo Married Life)

ह्या राशीच्या वैवाहिक जीवनात सतत मॅनेजमेन्ट हा विषय थोडा त्रास देऊ शकतो. काही ना काही सतत मॅनेज करण्यासाठी आयुष्य जाते कि काय असे वाटेल. पण शेवटी जमापुंजी करूनच हा संसार पूर्ण होणार ह्यात शंका नाही.

वैवहिक जीवनातील कन्या राशी हि फार कॉंफुस्ज्ड असेल तर त्यांना त्रास होतो.

एकत्र कुटुंबातील वैवाहिक जीवन हे घरातील वृद्धांच्या जबाबदारीतून ह्यांना बाहेर काढू शकत नाही तेव्हा विवाह करताना दोघांना ह्याचा विचार करून पहिले १० वर्षे तरी वैवाहिक जीवनातील आनंद उपभोगण्यासाठी ह्यांनी उत्तम प्लॅन करावा कारण हाच पिरियड स्वतःकडे वैवाहिक जीवन जगताना ह्यांना कमी पडतो असे वाटेल.

टीप – वैवाहिक जीवनात आपला पार्टनर रुसला कि सरळ निसर्गमयी वातावरणात फिरायला घेऊन जा. टूर ला जाणे हा सल्ला देण्यात येतो कारण ह्यांना हेच जास्त आवडते. निसर्गाशी एकरूप होऊन त्याचा आनंद घेणारी जर राशी  पाहिली तर ती कन्या.

कन्या राशी आणि प्रेम

कन्या राशी च्या व्यक्ती प्रेमात सहसा पडत नाहीत आणि पडल्याच तर कॉन्फयुज्ड झाल्याशिवाय राहत नाहीत म्ह्णून काही वेळा ह्याच कारणांमुळे ह्याचे प्रेम किती सक्सेस होईल ह्यावर शंका असेल. ह्यात लवकर विश्वास न टाकण्याचा स्वभाव प्रेमाचे रूपांतर विवाहात लवकर होणे कठीण. (Virgo love life)

हि राशी प्रेमात असताना ह्यांना घरातील जास्त काळजी असण्याची शक्यता फार आहे. असे नसेल तर ह्यांचा प्रेमी त्याला तरी त्यांच्या घरातील विवंचना फार सात्विक असतील त्यामुळे ह्याचे प्रेम किती पुढे जाईल आणि केव्हा सक्सेस होईल ह्यात बऱ्याच शंका असतात.

हा मी पत्रिका पाहताना वेळोवेळी घेतलेला अमुभव आहे. टिपणी द्या.

जर कन्या राशी प्रेमात सक्सेस झाली तर समोरच्याने जग जिंकले समजावे.

कन्या राशी च्या प्रेमात असेही आढळून आले आहे कि ह्या मागे कधीतरी एखाद्याच्या प्रेमात असतात आणि बऱ्याच वर्षांनी तो जीवनात एकदा तरी येतो. (खास थोड्या पिरियड साठी असते हे ।  जोडीदार म्हणून शक्य नाही येथे)

ह्यावर सुद्धा टिपणी द्या.

प्रेमात कन्या राशीच्या व्यक्ती जास्त पैसा फुकट घालविणाऱ्या नव्हेत.

कन्या राशी च्या पुरुषांना एक सल्ला प्रेमाच्या मर्यादेत राहता येत असेल तरच एखाद्याच्या प्रेमात पडा कारण ह्या प्रोसेसचा बराच कालावधी नशिबात असू शकतो.

कन्या राशी आणि शुभाशुभ

  • शुभ अंक- ५ 
  • तारखा- ५,१४, २३ 
  • शुभ रंग- हिरवा , निळा 
  • शुभ दिवस- बुधवार , शुक्रवार  

कन्या राशीला कधीही मीन राशीचा सल्ला वाया जात नाही. जर ह्यांनी काही सल्ला दिला तर मागे पुढे पाहू नये. संकट समयी  मीन राशीच्या व्यक्ती कामी आल्या तर लगेच ह्या तेथून बाहेर पडतील.

  • शुभ फुल- चंपा आपल्या पर्स मध्ये ठेवणे शुभ असेल 
  • शुभ मंत्र – गणेश मंत्र 

ह्या राशीच्या व्यक्तींनी बुधवारी गणेश अथर्व शीर्ष पठण करणे हे शुभ आणि कार्यसिद्धी कडे नेणारे असते .

  • दान – हिरव्या वस्तू , बुधवारी किन्नर ला दान देणे शुभ असेल.

कोणत्याही झाडाचे खाली पडलेले हिरवे पान हे पर्स मध्ये किंवा वरील खिशात ठेवल्याने कार्य क्षेत्री प्रगती दिसेल. 

सध्या एव्हढे पुरे…

विशेष नोट- सर्व राशींबद्दल लिहिताना तुमच्या कॉमेंट वाचून किंवा अजून काही अभ्यास करता करता ह्यात बदल केले जातील किंवा अजून काही पॉईंट्स टाकले जातील. तेव्हा सर्व कन्या राशींच्या माझ्या मित्र मैन्त्रिणींसाठी एक विनंती आहे कि हा लेख पूर्ण समजू नये. वेळोवेळी ह्याचे अपडेट वाचत जावे. निदान वर्षातून २/३ वेळा तरी.

शेवटी प्रत्येकाने आपल्या राशी बद्दल जे जे मिळेल ते ते घेत राहावे जीवन सुखकर होण्यासाठी.

आणि महत्वाचे- काहीही चुकीचे असेल तर ते पॉईंट इग्नोर करावेत सोडून द्यावेत.

This Post Has 4 Comments

  1. Preetam shetty

    खूप छान ब्लॉग सुरू केला आहे आपण गुरुजी

  2. प्रविणकुमार दत्तात्रय कुंभार

    खुप छान विश्लेषण आपण या लेखात केले आहे
    आणि बऱ्यापैकी सर्व विषय यामध्ये आपण खुप सध्या सरळ भाषेत मांडले आहेत.
    वाचून खुप बरे वाटले
    माझ्या बाबतीत सर्व गोष्टी बऱ्यापैकी तंतोतंत आहेत.
    धन्यवाद

  3. Pravin

    मला खुप बर व्हटलं लेख व्हाचून

Leave a Reply