You are currently viewing Cancer- कर्क राशी – खेकडा, भावनाशील.

आज कर्क राशीचे ( Cancer ) पूर्ण विश्लेषण करू. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला कळेल असेच लिहिणार आहे.

कर्क राशी (Cancer)हि राशी ४थ्या नंबर ची राशी आहे. पत्रिकेच्या ४थ्या स्थानावरून हि राशी मातृप्रधान राशी असते असे माझे मत आहे. आई जशी सर्वांची काळजी करते तशी हि राशी फार सर्व्हीसेबल असेल सर्वांसाठी.

चंद्र एका राशीत जवळ जवळ सव्वादोन दिवस असतो अशा पद्धतीने सर्व राशी फिरता फिरता त्याला २७ दिवस लागतात. सर्व राशीतून फिरता फिरता जेव्हा तो कर्क राशीत येतो तेव्हा तो स्वतःच्या राशीत अगदी आनंदी असतो. 

ह्या राशीचा चंद्र लीडर असल्यामुळे चंद्राच्या गुणधर्माचा अनुभव ह्या राशीला नक्की येतो. चंद्र हा मनाचा कारक आहे चंद्र हा पाण्याचा कारक आहे. त्यामुळे ह्या राशी च्या व्यक्ती हळव्या स्वभावाच्या असतात. सतत ऍक्टिव्हेट राहणे, कार्यशील राहणे आणि पाण्याचा गुणधर्म मुळे सतत चंचलता येते.

ह्या राशीचे चिन्ह हे खेकड्याचे असते. हा पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी वावर करू शकतो. म्हणून ह्या राशीच्या व्यक्ती जसे आजूबाजूचे सर्कल असते तसे त्यात ऍडजस्ट होऊ शकतात. खेकढ्याचा वरचा भाग हा खूप कठीण असतो आणि आत मांसल पदार्थ असल्याने ह्या राशीच्या व्यक्ती जर वरून कठीण दिसत असल्या तरी आपला कठोरपणा हा दाखवीत नाहीत. 

स्वतःला सुरक्षित करण्याचा सतत प्रयत्न सुद्धा ह्याच चिन्हामुळे ह्यांना सतत अनुभवायला मिळतो. नेहमी सेफ राहण्याची चिंता ह्यांना थोडी तरी सतावत असते. संकटसमयी ह्या राशी खेकड्याप्रमाणे बिळात घुसतील आणि आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करतील. जर पत्रिकेत मंगळ स्ट्रॉंग असेल कर्क राशीच्या(Cancer) व्यक्तींचा तरच डिवचू शकतील नाहीतर पळ काढण्याकडे जास्त लक्ष केंद्रित असेल.

ह्या राशीत ३ नक्षत्र असतात –पुनर्वसू ,पुष्य ,आश्लेषा 

 • जर तुमचा जन्म चंद्र ० ते ३:२० पर्यंत पत्रिकेत लिहिला आहे तर  पुनर्वसू नक्षत्र आहे. गण- देव आणि नाडी- आद्य असेल.
 • जर तुमचा जन्म चंद्र ३:२० ते १६:४० पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल तर पुष्य नक्षत्र आहे. गण – देव आणि नाडी – मध्य असेल 
 • जर तुमचा जन्म चंद्र १६:४० ते २९:५९  पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल तर आश्लेषा नक्षत्र आहे. गण – अंत्य आणि नाडी – राक्षस असेल.

ज्या डिग्री वर तुमचा जन्म चंद्र असेल त्याप्रमाणे नक्षत्र, गण, नाडी ह्याच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला मिळतील.  

सध्या नक्षत्र गण नाडी ह्या एकाच राशीत वेगवेगळ्या असतात म्हणून इथे देणार नाही जेव्हा ह्यावर अधिक प्रकाश पडेल तेव्हा तुमची डिग्री पाहून नक्षत्र गण नाडी बद्धल वाचू शकता आणि तुमच्या राशीचे कॉमन इफेक्ट त्यात मिक्स करू शकता.

सध्या कॉमन कर्क राशी कशी आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

कर्क राशी आणि स्वभाव – Cancer Personality

ह्या राशीचा स्वभाव हळवा आहे. अति विचार, थोडासा घाबरट पणा , भावुक पणा , मायाळू स्वभाव, सर्वांची काळजी जबाबदारी घेणारा स्वभाव. चंद्र हा एका जागेवरून उगवत नाही आणि मावळतही नाही. तो पाण्यावर आपला प्रभाव टाकत असतो पृथीवरील ३ पट पाणी हे त्याच्या अधिपत्याखाली असते भरती ओहोटी वगैरे. त्यामुळे चंचलता आपोआप स्वभावात येतेच. सतत कार्यशील राहणे स्वभावातच असते . 

अस्थिर मन होण्याचा स्वभाव चेहऱ्यावर दिसत नसेल तरी मनातून फार धावपळ चंचलपणा दिसतो.

कर्क राशी पुरुष -( Cancer )

वरील सर्व स्वभाव हे एखाद्या स्त्री च्या आधीन असतील तर चालू शकते पण कर्क राशीच्या पुरुषांना  स्वतःबद्दल कॉन्फिडन्स हा कमी मिळत असेल तर कर्क राशी हि खूप ऍक्टिव्हेट आहे असे समजावे.

जीवनात डेली नीड्स ह्या सर्व कर्क राशींना मिळतात जसे वृषभ ला मिळतात.

कर्क राशी आणि गुरु ह्याचा पत्रिकेत चांगला योग किंवा पुष्य नक्षत्री असलेला एखादा पुरुष हा मजबूत असतो सर्वसंपन्न असू शकतो जर वरील स्वभाव त्याच्याकडून इग्नोर होत असतील तर स्वतःकडे असलेल्या कलांना वाव देत असे पुरुष सामाजिक क्षेत्रात आपली छबी सुंदर करतात ह्यात शंका नाही. कर्क राशी च्या पुरुषांना नेहमी एक सल्ला द्यावासा वाटेल कि झालेल्या मानसिक त्रासाचा तुम्ही जास्त विचार करत बसू नका त्यातून बाहेर पडा. पुढे खूप चांगले आहे तुमच्याबद्दल.

कर्क राशी स्त्री –( Cancer )

भावनाशील स्वभाव हा ह्या स्त्रियांचा मूळ स्वभाव आहे. घर मुले पती सासू सासरे ह्यांना जास्त सर्व्हिस देणारी स्त्री जर असेल तर नक्की कर्क राशीची असेल असे समजावे. जर गुरु पत्रिकेत कर्क राशीत असेल किंवा चंद्र कर्क राशी असेल तर अशा कोणत्याही स्त्री ला हे गुणधर्म मिळतातच. अशा स्त्रिया सहन जास्त करण्याऱ्या असू शकतात.

माहेरकडील एकही वाईट साईट एकही गोष्ट खपवून घेत नाहीत मग मात्र ह्याचा रोष हा समोरील व्यक्तीवर असतो. नॉर्मल फॅशन करणे कधी कधी सिम्पल राहणे आवडते ह्यांना. जास्त डिमांड करणार नाहीत स्वतः दुसर्यांना दिल्यानंतर आनंदी असतील. आणि खास आईशी जास्त संवेदनशील असतात ह्या स्त्रिया आदर्श गृहिणी असू शकतात. घर आणि करिअर ह्याचा पहिला चॉईस सर्व्हिस देण्यासाठी घर असेल नंतर करिअर.

कर्क राशी आणि शिक्षण-करिअर – Cancer Education & Career

अभिनय, नर्सिंग, दर्शनशास्त्र, अर्थशास्त्र, कानून, इंजीनियरिंग, ज्योतिष, गणित, प्रबंधकीय विषय ह्या क्षेत्रातील शिक्षण ह्या राशीला सूट होते. बऱ्याच कर्क राशीच्या व्यक्ती ह्या शिक्षिका सुद्धा पाहायला मिळाल्या आहेत त्यात जास्त प्राथमिक शिक्षक असतात. पत्रिकेत रवी गुरु मंगळ चांगला असेल तर सरकारी शिक्षण पद्धतीत किंवा सरकारी कार्यालयात ह्या नक्की कार्यशील असतात.

जिथे जिथे सेवा भाव असेल अशा कोणत्याही क्षेत्रात ह्या राशी शिक्षण घेऊन पारंगत होतील. ह्या राशींना कधीहि जीवनात पैसा हा विषय जास्त काळजी करणारा नसतो असे माझे मत आहे. म्हणून कोणतेही शिक्षण घेऊन करिअर करण्यास ह्यांना जास्त अडचणी येत नाहीत  जर पत्रिकेत चांगले इतर योग असतील तर.

सल्ला शिक्षणातील -शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही एकच निर्णय घ्या आणि पुढे व्हा.  कारण बरेच कर्क राशी च्या व्यक्ती शिक्षणात बदल करताना पहिले जाते आणि नंतर च्या आयुष्यात ते निर्णय चुकीचे असतील असे वाटते.

आयात निर्यात क्षेत्र , शेती , पशुपालन , दुग्ध व्यवसाय , पेय जल संबधी क्षेत्र , लहन मुलांचे पालनपोषण संस्था ह्या क्षेत्रात ह्यांची प्रगति दिसून येते. कैटरिंग व्यवसाय किवा नोकरी क्षेत्रात कर्क राशींच्या व्यक्ति अग्रेसर असतात. टूर ट्रैवल्स , कपडे , पब्लिशन , कर्मकांड , किराणा व्यवसाय , एखादे आर्ट्स चे क्षेत्र. ह्यात सुद्धा कर्क राशीच्या व्यक्ती चांगले काम करू शकतात. त्या पद्धतीचे क्षिशण करून स्वतःला सेट करावे.

कोणतेही करिअर हे शारीरिक मेहनतीचे तुम्हाला जमणार नाही तेव्हा त्यात पडू नये. 

कर्क राशीचे प्रेम- Cancer Love Life

प्रेमात ह्या राशी फार संवेदन असतील. लगेच मन तुटणे ह्या राशीला येतेच म्हणून प्रेमात जास्त संवेदनशील राहणे चांगले नाही. प्रेमात ह्यांना एकटेपणा येतोच. वयाच्या १६ ते २२ पर्यंत प्रेमात धोका मिळतोच. (खास मुलींना). ह्यात मुलींनी खास हळवेपणा बाजूला ठेवावा नाहीतर समोरचा व्यक्ती हा फायदा उचलू शकतो. सावध राहणे.

कर्क राशी हि ऎश्वर्य प्रधान असल्याने भौतिकताचे अधिक आकर्षण असेल त्यामुळे एखादा चुकीचा निर्णय प्रेमात असतोच. २२/२३ पर्यंत ब्रेकअप होण्याचा अति संभव. आशा वेळी स्वतःची आई हीच तुमचा देव असेल बाकी कोणी नाही तुमच्या साठी असे समजावे.

कर्क राशीच्या कोणत्याही व्यक्तींचा फायदा घेऊन समोरचा व्यक्ती कधीच सुखी राहू शकत नाही .

सल्ला – प्रेमात किती स्वतःला झोकून द्यावे ह्यावर कंट्रोल असावा. नंतर मानसिक त्रास होण्याचे संभव असतील. यदाकदाचित प्रेम सक्सेस झाले तरी नंतर एकत्र कुटुंबात ह्यांना त्रास होतो खूप सर्व्हिस द्यावी लागते ह्यांना. हे स्त्रियांसाठी. 

आणि पुरुषांसाठी पत्नीच्या अधिकाराखाली राहावे लागते. प्रेमातला बदलणारा स्वभाव प्रेमविवाह होण्यास उशीर होऊ शकतो 

कर्क राशी वैवाहिक जीवन – Cancer Married Life 

तुला मकर मेष राशी बरोबर ठीक. वृषभ धनु कुंभ राशी बरोबर वैवाहिक जीवन थोडे त्रासदायक असेल. 

वैवाहिक जीवनात स्वतःकडे असणारे सर्व पणाला लावणारे तुम्ही आहात. ह्यात नुकसान स्वतःचे होणार नाही ना ह्याकडे लक्ष दिले पाहिजे. तर तुम्ही स्वतःला बॅलन्स करू शकाल.

कर्क राशींच्या पुरुषांना नंतर नंतर जीवनात आकर्षण कमी होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. घरासाठी, आईसाठी जास्त उत्सुक असाल. वैवाहिक जीवनातील संतान पक्षासाठी जास्त लक्ष देता तुम्ही आणि त्यांना खूप सांभाळता हा संतान विषय हा खूप इमोशनल असेल तुमच्यासाठी. कर्क राशीच्या कोणत्याही जोडीदाराने त्याच्या आईबद्दल चुकीचे काही बोलू नये.

कर्क राशीच्या ५ ते १२ वर्षाखालील मुलांसाठी – खास पाल्यांसाठी – For Small Childrens

कर्क राशींचे मुलं गोंडस असतात ह्यांना नजर दोष, बाहेरील बाधा वगैरे पासून जास्त सांभाळावे लागते. डोक्याला मार लागणे वगैरे ह्याच वयात ह्यांना होत असते. ह्या वयात हि मुले शाळेत नियमित असतात पण अभ्यास करून घ्यावा लागतो. जास्त लक्ष द्यावे लागते. 

चंचल राशी आणि खेकड्याची राशी असल्यामुळे काही प्रमाणात ह्या वयात हि मुले ऐकत नाहीत. खेकडा जसा पाण्यात सुद्धा राहतो आणि जमिनीवर सुद्धा असतो त्यामुळे ह्या राशीच्या लहान मुलांमध्ये काही अभ्यासा बरोबर इतर ऍक्टिव्हिटीज सुद्धा पाहायला मिळतात.

कर्क राशी ( Cancer )आणि आई हे ह्या पृथीवरील अतूट नाते असते. पण केव्हा केव्हा ह्या मुलांना आपले पालक अमूल बटर बनवून ठेवतात ह्याकडे लक्ष असू द्या. तुमचा जास्त असणारा हा टच पुढे धोकादायक बनू शकतो त्यांच्या स्वतःच्या निर्यय क्षमतेत.

माझ्याकडे ९९ टक्के पत्रिका मुलांच्या कर्क राशी चे पालकच घेऊन येतात स्वतः कर्क राशी स्वतःचा निर्णय घेताना जास्त दिसत नाही आईचा रोल त्यात त्याच्या वयाच्या  5 ते 12 मधला असू शकतो वरील प्रमाणे. जर पत्रिकेत कर्क राशीचा चंद्रच जर केमद्रुम योगात असेल , किंवा ग्रहण योगात असेल तर अशांना त्याच्या डेव्हलोपमेंट साठी आईने केलेले प्रयत्न कधीही सफल होत नाहीत. उगाच स्वतः मुलांसाठी सर्व निर्णय घेऊन त्याचे खूप चांगले करण्याचा प्रयन्त करू नये तुमची चिंता वाढेल.

सर्दी पडसे कफ त्वचा रोग ह्यांसारख्या वायरल आजारांवर ह्या वयात लक्ष द्या. बाकी कर्क राशी ज्याच्या घरात आहेत तेथे सुखसुविधा असते घरात आणि एक खेळीमेळीचे वातावरण असते. ह्यावर टिपणी द्या.

कर्क राशींच्या वृद्धांसाठी – For Senior Citizen 

६०+ च्या सर्व कर्क राशींच्या सर्वाना एक त्रास नक्की होतो आधी लक्ष दिले नसेल तर तो म्हणजे शरीर स्थूल होण्याचा. ह्या राशींच्या म्हातारपणी सुखसुविधा जरूर असते ह्यांना चांगल्या वातावरणात ह्यांचे जीवन जाते सर्वाना घेऊन गप्पा गोष्टी करणारे वृद्ध हे नक्की कर्क राशीचे असू शकतात.

तब्येतीची कुरकुर नसेल तर घरात वातावरण चांगले असते . तरीसुद्धा काही कर्क राशींच्या पुढील ६० + च्या नंतरच्या आयुष्यात पत्रिकेतील शनी मुळे एकटेपण पाहायला मिळते. कर्क राशीचे चिन्ह मुळी खेकड्याचे आहे त्यामुळे शारीवरील एखादी सूज अथवा गाठी ह्याकडे अति लक्ष द्यावे  जरा जरी पत्रिकेत गुरु हा बिघडला असेल तर कर्क रोग सुद्धा पत्रिकेत कर्क राशी कशी आहे तिथून पहिले जाते.

तसे कोणत्याही राशीच्या व्यक्तींनी काळजी करू नये ह्या आजाराचे सिम्टम्स दिसले तर आधी कर्क राशी आणि गुरु मंगळ चेक करून घ्यावा. कँसर हा रोग कर्क राशीलाच होईल असे नाही. सर्वांच्या पत्रिकेत एक घर हे कर्क राशीचे असतेच. त्यावरून हे ठरते त्यावर शनी राहू कसा प्रभाव करतो.

ज्योतिष वाचून ऐकून चिंता करू नये चिंतन करावे. तेव्हा आधीपासूनच खास कर्क राशींच्या लोकांनी खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे हा सल्ला उगाच चांगले चांगले बनविता येते म्हणूं खात बसू नये पुढे त्रास होईलच .

कर्क राशी – शुभाशुभ 

 • शुभ रंग – सफेद , सिल्वर 
 • शुभ अंक – २,७ 
 • सामान्य फळ -३,६,८,९ ह्या अंकाकडून मिळते 
 • अशुभ अंक – ४   
 • शुभ वार –सोमवार , नंतर बुधवार आणि रविवार शुभ आहेत. 

कर्क राशीचे इष्ट दैवत हे गणेश आणि हनुमंत आहे. आणि भाग्योदय हे गुरु ग्रहाचे असल्यामुळे एखादी गुरु उपासना करणे हे हितावह असेल. संकटसमयी ह्या उपासनेचा सहारा घेणे उत्तम असेल. कर्क राशीच्या व्यक्तींनी शिव उपासना सोमवारी केली तर जीवनातील कोणत्याही मानसिक चढउताराना ते सामना करू शकतात. कर्क राशीच्या व्यक्तीं साठी वैवाहिक सुखासाठी पौर्णिमेचे व्रत हे लाभप्रद होते 

अभुभ बाबी –

ह्या राशीच्या लोकांना १४,२६,३० ह्या वयात जास्त काळजी घेतली पाहिजे ह्या वयात आयुष्यावर येणारी संकटे जास्त असतील. कर्क राशीच्या लोकांना दिलेला पैसा कधीच मिळत नाही. किंवा प्रॉपर्टीज मध्ये हिस्सा मिळविण्यासाठी जास्त काळ झगडावे लागते. इतरांना केलेली मदत हि सांभाळून करावी रिटर्न ची आशा करू नये.

माझे मत –कर्क राशीचे लग्न आणि मुळात ज्यांची कर्क राशी आहे त्यांना एकच सांगणे आहे कि व्यवहारात तुम्हाला चतुरपणा करता येत नाही. आणि तुम्ही फार त्यात हुशार नाहीत. तेव्हा आपल्या हक्काच्या हिश्यासाठी त्रास होणारच आहे असे समजून समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा. जर ह्यात जास्त हिशोबात गेलात तर मानसिक त्रास आणि यातना सुद्धा वाट्याला येतील तेव्हा समाधानी राहा परिस्थिती पाहून पाऊल उचला नाहीतर किती तरी रिलेशन ब्रेक होऊन बसतील.

हे एकत्र कुटुंबातील कर्क राशीच्या सर्व भाऊ बहिणीसाठी असेल– टिपणी द्या.

जरा जरी गुरु पत्रिकेत बिघडला असेल तर हे नक्की होणार असे समजा त्यात सुद्धा नवमांश कुंडलीत गुरु स्ट्रॉंग आहे कि नाही हे सुद्धा पाहावे लागेल.

 ह्या लोकांना मागच्या झालेल्या घटनांमधून बाहेर पडायला फार उशीर लागतो त्यामुळे आशा घटना काही स्वप्नात येणे त्याचा भास होणे हे सतत जर कष्टदायक होत असेल तर गुरु चरित्र किंवा शिव उपासना ह्यात शिवाला पाण्यात काळे तीळ घालून अभिषेक करणे प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी हे उत्तम.

सध्या एव्हढे पुरे…

विशेष नोट — सर्व राशींबद्दल लिहिताना तुमच्या कंमेंट वाचून किंवा अजून काही अभ्यास करता करता ह्यात बदल केले जातील किंवा अजून काही पॉईंट्स टाकले जातील. तेव्हा सर्व कर्क राशींच्या माझ्या मित्र मैन्त्रिणींसाठी एक विनंती आहे कि हा लेख पूर्ण समजू नये. वेळोवेळी ह्याचे अपडेट वाचत जावे. निदान वर्षातून २/३ वेळा तरी.

शेवटी प्रत्येकाने आपल्या राशी बद्दल जे जे मिळेल ते ते घेत राहावे जीवन सुखकर होण्यासाठी.

आणि महत्वाचे — काहीही चुकीचे असेल तर ते पॉईंट इग्नोर करावेत सोडून द्यावेत.

This Post Has One Comment

 1. Jayashree Nalawade chiplun

  It’s true sir

Leave a Reply