You are currently viewing राहू केतू राशी परिवर्तन २०२० : कर्क राशी आणि कर्क लग्न

राहू केतू राशी परिवर्तन २०२० खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आधी हे वाचून नंतर खालील आपल्या राशीचे आणि लग्न स्थानाचे फळ वाचावे हि विनंती.

राहुचा वृषभ राशीत आणि केतूचा वृश्चिक राशीत प्रवेश

https://shreedattagurujyotish.com/rahu-aani-ketu-bhraman-23-september-2020/

२३ सप्टेंबर २०२० ते पुढील १८ महिने कर्क राशी ला राहूचे भ्रमण हे पत्रिकेच्या अकराव्या (लाभ) स्थानी आहे आणि केतू चे भ्रमण पाचव्या स्थानी आहे.

ज्यांची राशी कर्क राशी आहे त्यांची हि चंद्र कुंडली आहे आणि खालील राहू केतू चे भ्रमण ह्यावर केलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.
आणि ज्यांची कोणतीही राशी असली तरी आपली जर लग्न कुंडली वरील कुंडली प्रमाणे असेल जिथे ४ ने सुरुवात होते तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे. तुमच्या मूळ लग्न कुंडलीत येथे राहू नसला तरी आणि असला तरी लग्न कुंडली अशीच असेल तरी हे लिखाण वाचून घ्यावे.

वरील पत्रिकेत जिथे २ लिहिले आहे हे पत्रिकेचे ११ वे स्थान आहे आणि इथे राहू चे १८ महिन्यासाठी असलेले वास्तव्य लाभप्रद असेल.

पत्रिकेचे ११ वे स्थान लाभ, इच्छापूर्ती, मित्र, मोठे भाऊ बहीण, पुत्रवधू किंवा जावई, काका, आत्या, डावा कान ह्या सर्व गोष्टींसाठी असते. राहू इथे आपल्यलाला आपल्या वयोमानानुसार वेगवेगळे फळ देत राहील.

आपल्या इच्छा वाढतील आणि प्रत्येक प्रकारच्या इच्छा ह्या पूर्ण करण्यास आपण उत्सुक असाल तसे हा राहू आपल्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करेल आणि उत्तम फळे देईल. ह्या आधी कुठे पैसे फसले असतील तर ते रिकव्हर होतील.

आरोग्याच्या बाबतीत डावा कान, जांघा ह्यांना काही त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील १८ महिने मोठ्या इच्छा जर पूर्ण करण्याची संधी असेल तर जरूर करावे पण केतूची सुद्धा इथे दृष्टी असल्यामुळे जपून राहण्याचा सल्ला दिला जातो.

राहू ची ७ वी दृष्टी पाचव्या स्थानावर

राहू ची ७ वी दृष्टी पंचम स्थानावर आहे जिथे ८ लिहिले आहे तेथे वृश्चिक राशी आहे म्हणून कर्क राशी आणि कर्क लग्न वाल्यानी कॉलेज च्या शिक्षणापर्यंत अभ्यासात काळजी घ्यावी. मेहनत करावी लागेल. इथे काहीतरी नवीन नवीन कोर्से करण्याची संधी येईल कॉलेज च्या विद्यार्थ्यांना.

जे जे विद्यार्थी आता १२ वी नंतर पुढे परंपरा नेहमीची सायकल म्हणून शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना पुढील तेच शिक्षण अवघड दिसेल काही ग्याप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जे विद्यार्थी १२ वी नंतर काही नवीन कमर्शियल शिक्षण घेताना दिसतील त्यांना यश मिळेल. पण त्यात व्यवस्थित निर्णय घेऊन करावे.

जे जे कर्क राशी आणि कर्क लग्नाचे आहेत पुढील १८ महिने प्रेमात त्रास होण्याचे दिसते त्यामुळे काही चिट होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. काही जण ह्याच राहू केतू मुळे अचानक निर्णय घेतील प्रेमात.

कर्क लग्न आणि कर्क राशी जर बिझिनेस करीत असतील तर प्रॉफिट वाढण्याची शक्यता खूप आहे.
कर्क लग्न आणि कर्क राशी जर जॉब मध्ये असतील तर त्यांना प्रमोशन होऊन लांब शिफ्ट होण्याची शक्यता खूप दिसते. तसे कोणतेही निर्णय झाले नाहीत जॉब मध्ये तरी आपले प्रमोशन नक्की समजावे. पण त्याचा लाभ हा ह्या पुढील महिन्यात लगेच मिळणार नाही. आणि काम करावे लागेल.

राहू ची ५ वी दृष्टी तिसऱ्या स्थानावर

राहू ची ५ वी दृष्टी जिथे ६ आहे कन्या राशीवर येत आहे. हे पत्रिकेचे तिसरे स्थान आहे. हे लहान भावंडांचे , पराक्रमाचे स्थान आहे म्हणून पराक्रम गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही सतत काही ना काही धावपळ दिसेल डेव्हलोपमेंट साठी. लहान भाऊ बहिणींना थोडा त्रास होईल. पण त्यात सावरता येणासारखे असेल नक्की कारण येथे राहू ची स्वराशी आहे नुकसान नाही.

राहू ची ९ वी दृष्टी

राहू ची ९ वी दृष्टी विवाह स्थानावर जिथे १० नंबर शनी ची मकर राशी आहे त्यावर येत आहे त्यामुळे वैवाहिक सुखात काही धावपळ नाकारता येत नाही. विवाहाचे बिनधास्त निर्णय काही जण घेतील ह्या १८ महिन्यात. जर ह्या आधी विवाह झाला नसेल तर विवाह ठरेल. ह्याआधी कुणाचे डिवोर्स पेंडिंग असतील तर ह्या १८ महिन्यात अशा केसेस क्लिअर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केतू पंचमात आहे त्याचे फळ राहू च्या ७ व्या दृष्टी सारखेच समजावे.

केतू च्या दृष्ट्या

भाग्यस्थानावर जिथे १२ लिहिले आहे तेथे येणारी केतू ची ५ वी दृष्टी ह्या १८ महिन्यात कधीतरी अचानक निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही अशा गोष्टी घडतील ज्याने भाग्य हे थोडे बदलेले दिसेल अचानक.

केतू ची ७ वी दृटी लाभ स्थानावर जिथे २ लिहिले आहे अचानक काही लाभ दिसतील ह्याने. पण काही झालेले लाभ मंगळाच्या राशीत केतू असल्यामुळे ते पूर्ण करण्यास संघर्ष देईल. काही तीर्थयात्रा सुद्धा होण्याचा संभव पुढील १८ महिन्यात दिसत आहे.

केतू ची ९ वी दृष्टी ४ नंबर जिथे लग्न स्थान आहे तिथे येत असल्यामुळे पुढील १८ महिने इकडून तिकडून धावपळ करण्यास तयार व्हा. ह्या धावपळी आरोग्यासाठी होणार नाहीत ह्याकडे लक्ष द्या . ह्या केतूच्या परिणामात एक गोष्ट नक्की कि तुम्ही स्वतःला बिझी ठेवताना अगदी पॉजिटीव्ह राहाल.

उपाय

ह्या राहू आणि केतू च्या भ्रमणासाठी काही उपाय देतो ते कर्क लग्न आणि कर्क राशीला पुढे उपयोगी पडतील १८ महिने.

  • सोमवारी शिव पिंडीवर जलाभिषेक करणे,
  • गुरुवारी दत्ताची कोणतीही उपासना करणे,
  • आणि मंगळवारी हनुमान चालीसा चे पठण करणे
  • पुढील १८ महिने सुरु ठेवल्याने राहू केतू पासून मिळणारे चांगले परिणाम दिसतील.

नोट — वरील सर्व आपली जन्मपत्रिका न पाहता आणि इतर सर्व ग्रहांची स्थिती न पाहता एक विवेचन आहे अधिक शुक्ष्मता हि आपली स्वतःची पत्रिका सांगू शकेल एखाद्या तद्न्य ज्योतिषाकडून. तेव्हा हे सर्व कर्क राशीच्या आणि कर्कलग्नाच्या पत्रिकेवरील कॉमन भाकीत समजावे हि विनंती.

धन्यवाद…..!

Leave a Reply