मकर राशी अक्षर- भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
बकरी + खाली माशाची शेपटी चिन्हाची राशी, शनी लीडर असलेली राशी – कर्माची राशी, पृथ्वी तत्वाची राशी, गुढग्याची राशी, यंत्र विद्या ची राशी
आधी मकरेतल्या नक्षत्रांची ची माहिती देतो.
ह्या राशीत ३ नक्षत्र — उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा
- जर तुमचा जन्म चंद्र ० ते १०:०० पर्यंत पत्रिकेत लिहिला आहे तर उत्तराषाढा नक्षत्र आहे तुमचे. गण – मनुष्य आणि नाडी – अंत्य असेल.
- जर पत्रिकेत आपला जन्म चंद्र १०:०० ते २३:२० डिग्री पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल तर श्रवण नक्षत्र आहे. गण – देव आणि नाडी – अंत्य असेल.
- जर जन्म चंद्र २३:२० ते २९:५९ पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल तर धनिष्ठा नक्षत्र आहे आपले. गण – राक्षस आणि नाडी – मध्य असेल.
ज्या डिग्री वर तुमचा जन्म चंद्र असेल त्याप्रमाणे नक्षत्र गण नाडी ह्यांच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला मिळतील.
नक्षत्र गण नाडी ह्या एकाच राशीत वेगवेगळ्या असतात म्हणून इथे देणार नाही जेव्हा ह्यावर अधिक प्रकाश पडेल तेव्हा तुमची डिग्री पाहून नक्षत्र गण नाडी बद्धल वाचू शकता आणि तुमच्या राशीचे कॉमन इफेक्ट त्यात मिक्स करू शकता. सध्या कॉमन मकर राशी कशी आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
Table of Contents
मकर राशीचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव
मध्यम बांधा सुंदर मुखाकृती, खोलगट डोळे , सुंदर सुडौल शरीर असे मकर राशीच्या व्यक्तींचे बेसिक वर्णन करता येईल. राशी चक्रातील १० वि राशी मकर राशी. कालपुरुषाच्या कुंडलीत हि राशी कर्म स्थानी येते म्हणून सतत कर्म करण्याची राशी.
हि राशी शनीची असल्यामुळे कर्म हे फार मेहनतीचे असते ह्यांचे. शनी ह्या राशीचा लीडर आहे म्हणून सहज काही मिळत नाही ह्या राशीला. आपले स्वतःचे कोणतेही टार्गेट पूर्ण करण्यासाठी सतत झगडावे लागते. जबाबदारी फार असते ह्यांच्यावर. मग ती घरातील असो वा कार्यस्थळातील.
ह्याच शनीच्या लीडर शिप मुळे ह्यांचा स्वभाव काही वेळा अरसिक सुद्धा होतो. कर्त्यव्य कठोर व्यक्ती म्हणून समाजात ह्याची जास्त ओळख होऊ शकते कधीकधी पारिवारिक जबाबदारीतून कधीही मुक्त न होणारी हि राशी कितीहि जवळच्या व्यक्तीशी पटले नाही तरी त्याची जबाबदारी घेतातच. हा सुद्धा इमानदारी पणा शनी मुळे ह्याच्याकडे आलेला असतो.
गंभीर स्वभाव, भावुक हृदय , संवेदन शील , उच्चभिलाषी , सेवाधर्मी , आत्मनियंत्रित , थोडे धार्मिक सुद्धा, हे मकर राशीच्या व्यक्तींकडे पाहण्यात येते.
हि राशी पृथ्वी तत्वाची असल्यामुळे ह्या राशीचा स्वभाव हा मुळात जिद्दी असतो. स्वतःच्या मतावर ठाम असतात. पुन्हा पुन्हा आपले निर्णय बदलत नाहीत मकर राशीचे लोक.
ह्या राशीचे चिन्ह हे वर बकरी चे मुख आणि खाली माशाची शेपटी दाखवलेली आहे. काही ठिकाणी मकर चे चिन्ह हे मगरीचे सुद्धा दाखविण्यात आले आहे.
परिस्थिती मकर राशीला थोडी कंजूस सुद्धा बनवू शकते. काटकसर करण्याची सवय हि सुद्धा ह्याच्या मुळात असते.
चांगल्या अंतःकरणाच्या व्यक्ती सुद्धा मकर राशीच्या असतात पण त्याचा कधीही ते प्रसार करत नाहीत किंवा त्यांना तसे दाखविण्यात रस सुद्धा नसतो. पण मकर राशीच्या लोकांना अहंकार, शक करण्याची सवय, आणि निंदा करणे ह्या वाईट बाबी सुद्धा असू शकतात.
मकर राशीचे शिक्षण आणि करिअर
ह्या राशी ला आधीच एक सल्ला देतो कि करिअर करताना आधी शिक्षण पूर्ण करून घ्यावे. शिक्षण आणि करिअर एकदम करताना ह्या राशीला खूप त्रास होतो.
कोणतेही यांत्रिकी शिक्षण मकर राशीचे असू शकते त्यात त्यांना फार प्रगती करता येते. आणि समाधान हि मिळते.
भवन भूमी व्यवसायात प्रगती , बँकिंग , इन्शुरन्स , हॉस्पिटल, औषधे वितरक , विजेची उपकरणे , फोन , कॉम्पुटर चे पार्ट बनवणाऱ्या कंपन्या , लॉजिस्टिक , ट्रान्सपोर्ट संबधी क्षेत्रात नोकरी अथवा व्यवसाय करणे ह्यांना प्रगतीपथावर ठेवते. अशाच अनुषंगाने ह्यांनी शिक्षण सुद्धा घेणे अनिवार्य ठरेल.
स्वतःच्या प्रॅक्टिस साठी मकर राशीला दाताचा दवाखाना चालविणे , आर्किटेक , बिल्डर रियल इस्टेट, खनिज ह्या क्षेत्राची निवड करताना लाभ होतात.
राज्यपाल मंत्री प्रशासनिक सेवेत पर्सनल सालाहकर (PA) सुद्धा मकर राशीतले लोक दिसण्यात आले आहे.
तसेच चतुर्थ श्रेणीतील कामगार, साफसफाई कर्मचारी , सिमेंट विटा ,भट्ट्या, बांधकाम, क्षयरोग विभाग,चर्मकार चामड्याच्या ब्यागा वस्तूंचे विक्रेते अशा वर्गातील जास्तीत जास्त व्यक्ती ह्या मकर राशींच्या असू शकतात.
करिअर बद्दल सर्व मकर राशीच्या व्यक्तींना आधी बरेच अडथळे प्राप्त होतात आणि नंतर ते स्थिर होतात तेव्हा काळजी करू नये. मेहनत फार करण्याची इच्छा असेल तर मकर राशीचे करिअर सुंदर होते आणि समाधानी सुद्धा.
टीप — फॅमिली साठी टार्गेट ठेऊन जर करिअर केले तर करिअर मधे प्रमोशन होत जाते असा माझा स्वतःचा अभ्यास आहे.
उदा.– जर एखाद्या मकर राशीच्या व्यक्तीवर कुटुंबाची जबाबदारी पडली आणि ती पुढे खूप वाढत वाढत गेली किंवा कुटुंबासाठी लागणारा पैसा हा कमी पडू लागला तर त्याची भर करण्यासाठी ह्यांचे प्रमोशन होत असते. म्हणून पारिवारिक सुखासाठी करिअर करणे मकर राशीच्या लोकांना फायद्याचे ठरते.
मकर राशीचे वैवाहिक जीवन
वैवाहिक जीवनात मकर राशीच्या व्यक्ती आपल्या रिलेशन शिप मध्ये इमानदार पाहिल्या गेल्या आहेत. जरी एखाद्या मकर राशीच्या व्यक्तींना आपल्या जीवनसाथी बरोबर पटले नाही तरी त्याची पूर्ण जबाबदारी घेताना दिसतात.
मकर राशीच्या स्त्रियांना वैवाहिक जीवनात फार कष्ट असू शकतात कारण हि शनी ची राशी आहे फार मेहनती असतात मकर राशीच्या स्त्रिया . कितीही केले तरी संसारात ह्यांना तो दर्जा मिळत नाही जेव्हढा कर्क राशीच्या व्यक्तीला मिळतो. तेव्हा अशा मकर राशीच्या स्त्रियांना एक सल्ला दिला जातो कि जरा आपण आपल्या तब्येतीकडे पाहून आपली सर्व्हिस द्या नाहीतर तुम्ही उद्या बिनकामाच्या झालात तर कोणी विचारणार नाही.
मकर राशीच्या वैवाहिक जीवनात संतान झाल्यावर एक तरी अडचणींचा सामना करावा लागतो असे माझे मत आहे उदा. कुणाला घर सोडावे लागते तर कुणाला करिअर मधे खाली यावे लागते. मकर राशीच्या व्यक्तीना असाही सल्ला दिला जातो कि त्यांनी सिंह राशीच्या व्यक्तीं बरोबर विवाह करू नये.
मकर राशीच्या व्यक्तीना वैवाहिक जीवनात आनंद मिळविण्यासाठी त्यांचा सह जोडीदार हा करिअर ओरिएंटेड असावा -कार्यशील असावा म्हणजे त्यांना जास्त त्रास होत नाही. मकर राशीच्या व्यक्तींचा विवाह हा जास्तीत जास्त उशिरा पहिला गेला आहे म्हणून ह्या व्यक्ती मॅच्युअर्ड असतात, गंभीर असतात.
मकर राशीचे वैवाहिक जीवनातल्या आर्थिक व्यवस्था ह्या चांगल्या प्लॅन करून केलेल्या असतात. कोणतेही जास्त अवाजवी खर्च करणारी हि राशी नाही त्यामुळे जास्तीत जास्त कष्ठाने कमाविलेला पैसा हे व्यवस्तीत हॅण्डल करतात. पृथ्वी तत्वाची मकर राशी असल्यामुळे ह्या नेहमी वैवाहिक जीवनात स्थिर दिसतात.
रोग आणि मकर राशी
मकर राशीच्या व्यक्तींना शरीरात कॅल्शिअम ची कमतरता भासू शकते, केस लवकर सफेद होणे किंवा केसात कोंडा सतत राहणे सुद्धा पहिले गेले आहे, हाडांच्या बाबतीत मकर राशीला गुढग्याचे आजार पासून सावधानता बाळगली पाहिजे, नखांपासून च्या वेदना किंवा तिथून होणार संसर्ग सुद्धा मकर राशीच्या व्यक्तींना सांभाळावा लागतो.
वात विकार, पोटाचे विकार, बवासीर, चर्मरोग, डोळ्याची कमजोरी, मधुमेह , रक्तचाप, दंत विकार ह्यातील दोन किंवा त्यापेक्षा त्रास मकर राशीच्या व्यक्तींना होण्याचा संभव जास्त असतो. ह्या राशीच्या स्त्रियांना डोकेदुखी संधिवात गर्भपात ९०% पहिला गेला आहे.
माझ्या मतानुसार ह्या राशीच्या लोकांनी कधीही थंड पाणी पिऊ नये असं केल्याने कमीत कमी आजारांचा सामना करावा लागेल.
मकर राशीचे प्रेम
जर मकर राशीच्या व्यक्ती प्रेमात असतील तर ते फार गंभीर असतात. आपले प्रेम दाखविण्याची कला फार नसते , रोमँटिक पण जास्त दिसत नाहीत, पण ते एकनिष्ठ असतात आपल्या प्रेमात , मात्र प्रेमात जर दगा फटका जाणवला तर मात्र ते त्या व्यक्तीचा नाद लगेच सोडून देतील समजविण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाहीत, आधी आपण कधी भेटलोच नव्हतो असे वातावरण करून कायमचे लगेच दूर होतील.
प्रेमात ह्या व्यक्ती अतिशय सेफ असतात कुणाशी भांडणे वगैरे न करण्याचा स्वभाव असला तरी प्रेम सफल करण्याचा दृष्टीकोन त्यांचा असतो मात्र बऱ्याच वेळा मकर राशीच्या व्यक्ती प्रेमात सक्सेस होताना पहिल्या जात नाहीत आणि झालेच तर ते आपल्या पार्टनर ला आपल्या सिस्टम मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतील जरूर.
मकर राशीच्या मुलींना जर प्रेम झाले तर त्याचे बरेच वेळा प्रेम हे घरातील वातावरणाने सफल होत नाही. एक प्रकारचा दबाव तंत्राला त्यांना सामना करावा लागेल असे माझे मत आहे. आणि जर असे नसेल आणि प्रेमाचे विवाहात रूपांतर झाले तर तिथे फार कष्ट होतील त्यामुळे प्रेम करताना मकर राशीच्या मुलींना जरा संभाळावेच लागेल ह्या विषयावर.
मकर राशीच्या ५ ते २० वर्षातील मुला मुलींच्या पालकांसाठी
आपल्या घरात मकर राशीची मुले ह्या वयातील असतील तर प्राथमिक शिक्षणात हे जर सिरिअस दिसले तर ठीक आहे नाहीतर फार गोधळ असतो ह्यांचा. जसे जसे वय वाढत जाते तेव्हाच हे अभ्यासात लक्ष देतात. पहिल्यापासून जरा लक्ष ठेवावे लागेल.
पुढे १२ वर्षावरील मकर राशीच्या मुला मुलींना विद्यार्थी दशेत थोडा त्रास होताना पहिला गेला आहे. एखादी ग्याप सुद्धा शिक्षणात होऊ शकते घरातल्या परिस्थितीने. ह्या वयातील मुलांच्या विद्यार्थी दशेत वडिलांवर फार जबाबदारी येते. कष्ट फार पाहिले गेले आहेत.
जर मकर राशी ची मुले घरात असतील आणि पालक सिंह मेष वृश्चिक राशीचे असतील तर फार त्रागा होतो ह्या मुलांना सांभाळण्यासाठी हे विशेष आहे. त्यामुळे जास्त कष्ट होत असतील तर एखादी हॉस्टेल किंवा बाहेरील शिक्षण निवडावे हा सल्ला देण्यात येईल.
अजून एक कि जर मकर राशीची मुले आपल्या घरात असतील आणि जर ती धनिष्ठा नक्षत्राची असतील तर जास्त मेहनत घ्यावी लागेल आपल्याला त्यांच्यावर. ह्या मुलांमध्ये जिद्दी पणा फार पाहण्यात आला आहे आणि त्याच्या टार्गेट पासून तुम्ही त्यांना बाजूला करू शकत नाही. ह्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मकर राशी + ६० च्या वृद्धांसाठी
आपली राशी हि शनी ची आहे ह्या वयात इथंपर्यंत येताना जर आपण जीवनातील बऱ्याच नियमांचे पालन केले असेल, खूप कष्ट केले असेल संसारात , सर्वाना सांभाळून घेतले असेल तर ह्या पुढे आपल्या राशीचा शनी हा आपणास पुढील जीवन हे सुखकारक करेल ह्यात शंका नाही.
फक्त जे वरील आजार दिले आहेत त्यांना सांभाळावे. मकर राशीच्या व्यक्ती ह्या वयात अजून मॅच्युअर्ड होतात त्यामुळे आपल्याकडील आर्थिक व्यवस्था ते पुरेपूर सांभाळू शकतील ह्यात सुद्धा शंका नाही.
ह्या वयात संतान सुखाला मकर राशीच्या व्यक्तींना थोडा त्रास होण्याचा संभव नाकारता येत नाही तरी सुद्धा हे पत्रिकेवर अवलंबून असेल. मात्र ह्या वयातील मकर राशींच्या व्यक्तींना एक समाधान जरूर मिळते कि त्यांची मुले हि आपल्या करिअर मध्ये सेट झालेली आहेत. आणि त्यांच्यासाठी केलेली मेहनत हि फळाला आलेली आहे.
मकर राशी आणि शुभाशुभ
- शुभ अंक : ४ आणि ८ त्याखालोखाल ५,६
- सम अंक : ३,७ (नफा नुकसान काहीच नाही)
- अशुभ अंक : १,२,९
- मित्र राशी : वृषभ कन्या
- राशी दिशा : दक्षिण
- शत्रू राशी : मेष, सिंह
- भाग्यशाली रंग : तांबडा, काळा, निळा, स्लेटी (स्वतःजवळ निळ्या रंगाचा रुमाल अव्यश्य ठेवावा किंवा कपडे परिधान करावेत)
- शुभ दिवस : रविवार व शुक्रवार शुभ, सोमवार मध्यम
- इष्ट देव : शिव, शनी
- शुभ मंत्र : ॐ शं शनेच्छराय नमः जीवनात एकदा तरी २३००० रोज १०८ संख्येने मंत्र जाप केल्याने शुभत्व प्राप्त होते.
सध्या एव्हढे पुरे…
विशेष नोट — सर्व राशींबद्दल लिहिताना तुमच्या कॉमेंट वाचून किंवा अजून काही अभ्यास करता करता ह्यात बदल केले जातील किंवा अजून काही पॉईंट्स टाकले जातील. तेव्हा सर्व मकर राशींच्या माझ्या मित्र मैन्त्रिणींसाठी एक विनंती आहे कि हा लेख पूर्ण समजू नये. वेळोवेळी ह्याचे अपडेट वाचत जावे. निदान वर्षातून २/३ वेळा तरी.
शेवटी प्रत्येकाने आपल्या राशी बद्दल जे जे मिळेल ते ते घेत राहावे जीवन सुखकर होण्यासाठी.
आणि महत्वाचे — काहीही चुकीचे असेल तर ते पॉईंट इग्नोर करावेत सोडून द्यावेत.
धन्यवाद…..!
सर, जी माहिती तुम्ही दिलीत ती माझ्या बाबतीत बरोबर आहे, आभारी आहे
Khupach chaaaannn…
Very true & useful information, Thank you Saheb.
आपण केलेले मकर राशीच्जीया जीवनातील घडामोडीचे विस्तृत वर्णन सत्य आहे. तरी आयष्य सुकर होण्या साठी मार्गदर्शन करावे हि विनंती