You are currently viewing तुला राशी- Tula Rashi- एक तागडी / तराजू

तुला राशी अक्षर:- रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते

राशीचक्रातील हि ७ वि राशी आहे. ह्या राशीचा मालक हा शुक्र. तसे वृषभ राशी चा मालक सुद्धा शुक्र असतो पण वृषभ आणि तुला ह्यातला फरक पाहायचे असेल तर वृषभ चा शुक्र हा दिखावा करणारा आहे आणि तूळेचा शुक्र हा प्राकृतिक आहे. 

तुळेच्या सौंदर्यात खूप ग्ल्यामर आहे आणि ती निसर्गतः लाभलेली असते. म्हणून तुम्ही तुळेच्या जेव्हढ्या स्त्रिया असतील त्यांना एक तरी खूप चांगले आकर्षण असते खास डोळ्यात हे जाणविते. पण वृषभेच्या स्त्रियांना ते आकर्षण खुलवावे लागते ह्यातील हा फरक आहे 

असो … ह्याचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव पाहू. त्याआधी तुळेतल्या नक्षत्रांची ची माहिती..

ह्या राशीत ३ नक्षत्र — चित्रा , स्वाती , विशाखा.  

 • जर तुमचा जन्म चंद्र ० ते ६:४० पर्यंत पत्रिकेत लिहिला आहे तर चित्रा नक्षत्र आहे तुमचे. गण – राक्षस आणि नाडी – मध्य असेल.
 • जर पत्रिकेत आपला जन्म चंद्र ६:४० ते २० डिग्री पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल तर स्वाती नक्षत्र आहे. गण – देव आणि नाडी – अंत्य असेल 
 • जर जन्म चंद्र २०:००  ते २९:५९  पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल तर विशाखा नक्षत्र आहे आपले. गण – राक्षस आणि नाडी – अंत्य असेल.

ज्या डिग्री वर तुमचा जन्म चंद्र असेल त्याप्रमाणे नक्षत्र गण नाडी ह्यांच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला मिळतील.  

नक्षत्र गण नाडी ह्या एकाच राशीत वेगवेगळ्या असतात म्हणून इथे देणार नाही जेव्हा ह्यावर अधिक प्रकाश पडेल तेव्हा तुमची डिग्री पाहून नक्षत्र गण नाडी बद्धल वाचू शकता आणि तुमच्या राशीचे कॉमन इफेक्ट त्यात मिक्स करू शकता.

सध्या कॉमन तुला राशी कशी आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

तुला राशी आणि स्वभाव, व्यक्तिमत्व, गुण

ह्या राशीचा मालक शुक्र असल्याने शुक्र हा भोग, विलासिता, ग्ल्यामर ह्याचा संपूर्णतः आनंद घेणारा ग्रह आहे. आणि त्यामुळे अर्थातच ह्या व्यक्तींना जीवनात ह्याच गोष्टी जास्त टच असतात. व्यवस्थित राहणे , खाणे , पिणे ह्या सर्व गोष्टी A1 .

आणि ह्यांना प्रकृती तसे वातावरण देते सुद्धा. चांगल्या वाहनांतून फिरणे , चांगले चांगले कपडे घालणे, चैनीच्या वस्तू वापरणे वगैरे (फक्त चुकत असेल तर शुक्राची डिग्री पाहावी पत्रिकेत. ० ते ५ किंवा मृत अवस्था)

ह्या राशीच्या चिन्हामुळे स्वभावात नेहमी इकडे तिकडे होणे हा फरक दाखवितो त्यामुळे लगेच एका टार्गेट वर निर्णय होत नाही. ह्याचे कारण ह्यांना सर्वाना बॅलन्स करूनच निर्णय घ्यावा लागतो. ती जबाबदारी ह्यांच्यावर येतेच.

ह्या राशीचे चिन्ह हे एक न्यायाचे चिन्ह सुद्धा मानले जाते. त्यामुळे हि व्यक्ती न्यायप्रिय सुद्धा आहे.  त्यामुळे बौद्धिक पातळी चांगली असते ह्यांची. 

हि राशी वायू तत्वात येते आणि त्यामुळे स्वभावात ह्यांच्या वेगवेगळेपणा समोरच्याला दिसून येतो. कधी रंगात तर कधी रागात , वायुतत्वामुळे स्वभाव समोरच्याला कसा आहे हे काळतच नाही. कधी खुलून बोलतात तर कधी एकदम चिडी चूप.

ह्यांचे व्यक्तिमत्व खुलून दिसते खास वयाच्या १८ ते ४० पर्यंत हे व्यक्तिमत्व ह्यांचे खुलत जाते. त्यामुळे समाजात अशा व्यक्ती ह्या आकर्षणाच्या प्रतीक बनतात. 

तुला राशीचे शिक्षण आणि करिअर

साहित्य, संगीत, नृत्य, टेलरिंग, चित्रकारी, क्राफ्टिंग, वकालत, चिकित्सा, प्रबंधन ह्या विषयात अध्ययन केल्याने विशेष सफलता प्राप्त होते.

तुला राशी साठी चतुर्थ स्थान आणि पंचम स्थान हे शनी च्या दोन राशीचे आहे मकर आणि कुंभ.  ह्याने शिक्षण करताना थोडे कष्ट येऊ शकतात.

तुला राशींच्या व्यक्तींनी आपले शिक्षण होत असताना स्वतःच्या पायावर मेहनत करून पूर्ण करावे ह्याने ते शिक्षण त्यांना भाग्योदय करण्यास मदत करेल. असे झाले तर मोठ्या पदावर तुला राशीवाले दिसतात . उदाहरणार्थ – वकील, जज  सुद्धा ह्या राशीत लहापणीच्या परिस्थितीला बदलण्याची ताकद शनी देव देतात ह्यांना. (पण परिस्थितीशी चॅलेंज घेऊन किंवा पार्टटाइम करून शिक्षण पूर्ण केले तर )

आणि जर तुला राशीच्या व्यक्तीनी सर्व आयते घेऊन शिक्षण केले असेल तर करिअर हे शुक्राच्या अधीन करावे. म्हणजे अशा क्षेत्रात कि तुमचे शालेय, विद्यालयीन सर्टिफिकेट काही कामाचे नसेल.

मग तुम्ही अभिनेता, ज्वेलरी , सौन्दर्य प्रसाधन, प्रसिद्ध व्यापारी, नृत्य निर्देशक, गायक, संगीतकार, फिल्म इंडस्ट्री, फैशन डिजाइनर, मॉडलिंग इत्यादि क्षेत्र निवडून प्रगती करा.

पण बऱ्याच वेळा वरील क्षेत्री तुला राशींना दोन वेळा प्रयत्न करावे लागतील. उदाहरण म्हणजे जर नृत्य कलेत असताना एकदम सौंदर्य प्रसाधन विकतील, किंवा मॉडेलिंग करताना नृत्य कला करतील ते सोडून.

हा माझा स्वतःचा अभ्यास आहे ज्यांनी ज्यांनी ह्या क्षेत्रात असे चेंजेस केले आहेत त्यांनी कृपया टिपणी द्यावी.

तुला राशीचे वैवहिक जीवन

बऱ्याच तुला राशींना करिअर करायच्या आधी जोडीदार मिळतोच असे निदर्शनात आले आहे.– टिपणी द्या.

विवाह करताना ह्यांना करिअर आड येत नाही. मुलींना खास.

तुला राशीच्या वैवाहिक जीवनात मंगळाचा १००% रोल असतो. म्हणून पत्रिकेत मंगळ चेक करूनच विवाह करावा. कारण कुटुंब स्थानी सुद्धा वृश्चिक राशी मंगळाचीच येते आणि विवाह स्थानी मेष राशी मंगळाची येते.

त्यामुळे तुला राशीच्या वैवाहिक जीवनात कुटुंब विखरताना दिसून येते त्याला कारणे वेगवेगळी असू शकतात.

खास तुला राशीच्या सर्वाना मेरीटल अफेअर्स ह्या विषयी सावधानता बाळगावी. कारण ह्या राशीचा शत्रू गुरु हा नैतिक आचरण किती बॅलन्स करेल ह्यावर थोडी काळजी लागते. पण चिंता करू नये आपले संस्कार, आपण ज्या वातावरणात वाढलो, ह्यावर हे अवलंबून आहे.

तुला राशी च्या वैवाहिक जीवनात आर्थिक परिस्थिती उत्तम असते हे बऱ्याच वेळा अनुभवास येते. वैवाहिक जीवनात प्रॉपर्टीज सुद्धा उत्तम रित्या होते ह्यांची. वैवाहिक जीवनात ह्यांना नेहमी कर्ज असतेच असा सुद्धा अनुभव आला आहे – टिपणी द्या. 

गुरु इथे चांगला असेल तर हे कर्ज कोणत्याही डेव्हलोपमेंट साठी असेल- म्हणजे घर, किंवा व्यवसाय. पण पत्रिकेत गुरु चांगला नसेल तर आरोग्यासाठी कर्ज होतेच — ह्यावर टिपणी द्या.

शनी ह्या राशीत उच्च असतो कारण शनी ला हि राशी फार आवडते. त्यामुळे ह्या राशीला करिअर हा विषय वयाच्या ३६ नंतर नसतोच.

माझे मत- जर एखादी राशी शनी ला आवडली तर त्या राशीच्या व्यक्तींना शनी व्यवस्थित करिअर देतो पण वैवाहिक जीवनात सुद्धा तुमच्याकडे त्याचे लक्ष असतेच. ह्यात तुम्ही जरा जरी चुकी केलीत तर ह्या राशीचा लीडर शुक्र असतो आणि त्याचा शत्रू सूर्य असतो.

त्यामुळे वैवाहिक जीवनात तुमच्या चुका प्रकाशात येतातच. सूर्य ज्या स्थानात आहे त्या स्थानाच्या बाबतीत एखादी गोष्ट तुम्ही कधीही  लपवू शकत नाही त्या कधी ना कधी प्रकाशात येतातच. मात्र हे चेक करण्यासाठी एखादा ज्योतिषीच तुम्हाला मदत करू शकेल.

कधीतरी ह्यावर सुद्धा पोस्ट टाकू.

तुला राशीच्या ५ ते २० वर्षाच्या मुला मुलींच्या पालकांसाठी

आपल्या घरात जर हि राशी असेल आणि तुम्ही तिचे पालक म्हणून कार्यरत असाल वरील वयातील मुलांचे तर — ह्या मुलांमध्ये एकांत पणा जास्त अनुभवास येतो असे दिसते त्याला दूर करण्याचे काम आपले आहे हे समजून घ्या. खास वडिलांना हा संदेश आहे असे समजा.

कारण ह्याच वयानंतर तुला राशीची मुले वडिलांपासून दूर जाण्याचे संकेत देतो.

ह्या राशीच्या व्यक्तींना शिक्षण आणि करिअर हा विषय घरापासून,  तुमच्या पासून दूर मिळत असेल तर नक्की निर्णय घ्या तर तेथे तुम्हाला सुखद अनुभव येईल. पण ह्यासाठी पत्रिकेतील शुक्र चेक करून घ्या. कारण नंतर कॅरेक्टर चा विषय नको.

ह्या वयातील मुलांकडे अपचनाचा त्रास असेल तर नॉन व्हेज कमी करायला हरकत नाही ह्यांचे. किंवा एकदम बंद.

तिखट खाण्याच्या स्वभावात ह्या मुलांना नंतर वैवाहिक जीवनात त्रास होतोच असे अनुभवास आले आहे त्यामुळे ५ ते २२ वयात तिखट खूप कमी खावे ह्याचे कारण मंगळाची वृश्चिक राशी चवीच्या ठिकाणी येते  मनात कुटुंब अस्थिरता हा विषय ह्यांना अनुभवाला नक्की येतो 

ह्या वयातील मुलांकडे घरात खूप मुबलकता असेल तर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. खास कॉलेज चे शिक्षण घेताना.

ह्या वयातील मुलांना त्यांचा परिसर हा सुगंधित स्वच्छ लागेल असा करून द्यावा. टॉयलेट बाथ , घराच्या परिसरात असणारी दुर्गंधी , एकदा नाला , गटार , अशा परिस्तितीतून येणाऱ्या दुर्गंधी तुला राशी साठी खास नव्हेत त्यांना त्रास होण्याची जास्त शक्यता असते खास निगेटिव्हिटी वाढत जाते ह्यांची. —टिपणी द्या. असे असेल तर नक्की त्याच्या प्रगतीला अडथळा निर्माण होत आहे असे दिसेल.

ती टीप खास मुलींसाठी आणि त्याच्या वागणुकीसाठी आहे हे लक्षात असू द्यात 

तुला राशींच्या वृद्धांसाठी –६० +

ह्या वयात आल्यानंतर आपल्या राशीचा मालक शुक्र आहे म्हणून आपण ताजे तवाने राहाल आणि निटनिटके राहण्याचा सुद्धा खास प्रयत्न करून स्वतःला २० वर्षे मागे नेऊ शकता ह्यात शंका नाही.

पण फक्त साखर हा विषय आरोग्यास धोका देऊ शकतो आणि जाडेपणा ह्यावर लक्ष असू द्यात. युरीन , किडनी कडे लक्ष द्यावे लागेल ह्या वयात तेव्हा ह्याबद्दल जास्त अलर्ट राहा.

बाकी तुला राशीच्या व्यक्तींचे हे नंतर चे वय फार सुखात जाते असा अनुभव आहे. मात्र कोणत्याही बाबतीत मुलांवर अवलंबून राहू नका कारण ह्या राशीच्या व्यक्तींना मुलांची सर्व्हिस मिळेलच असे नाही कारण ते काही कारणांमुळे ह्यांच्यापासून दूर राहतात असे निदर्शनास आले आहे.

तुला राशींच्या मुली – महिलांसाठी

आपल्या राशीचा मालक शुक्र असल्यामुळे सुंदरता प्रदान राशी आहे हि. पण येथे शुक्र जरा जरी बरोबर नसला तर मात्र ह्या राशीच्या मुलींनी सावधानता बाळगावी. 

तरुण वयात असताना ह्या राशीच्या मुली अगदी  न्यायप्रिय, प्रभावशाली दिसतात. पण कोमलता हा स्वभाव कधी कधी खूप मेहनत करताना त्रासदायक होईल ह्यावर लक्ष द्या.

ह्या राशीच्या मुली जास्त संघर्ष असेल तेथे जाणारच नाहीत अगदी जे जमेल तेच आणि तेव्हढेच करण्याचा ह्यांचा स्वभाव असतो. आणि जे आवडेल तेच करतील. एखादी कला जोपासण्याचा छंद फार असतो ह्यांना.

तुला राशीच्या महिला ह्या आपल्या वैवाहिक जीवनात प्रत्येक आनंद मिळविण्याचा खास प्रयत्न करतात त्यासाठी ते स्वतः फार मेहनत करताना दिसतात. म्हणून ह्या महिला ह्या करिअर ओरिएंटेड असण्याची शक्यता असते.

ह्यांना जी वस्तू आपल्यासाठी लागते ती त्या मिळवितातच. परिवारात जे जे लागेल ते हि ते अचिव्ह करण्याचा जास्त प्रयन्त करतात त्यामुळे ह्यांचे वैवाहिक जीवन सुंदर होते. 

सल्ला – ह्यांना मंगळाच्या कोणत्याही व्यक्तीबरोबर लग्न करताना खास पत्रिका पाहून चेक करून निर्णय घ्यावा.

तसाच मेष, वृश्चिक राशी , गुरूच्या राशी धनु मीन, आणि मागील राशी सिंह विवाह करताना पत्रिका चेक करणे जरुरीचे आहे.

तुला राशी ला खास होणारे रोग

वीर्य विकार, नेत्र रोग, मूत्र रोग, मुख रोग, पाण्डु, प्रमह, गुप्त रोग, वीर्य कमी, संभोग अक्षमता, कामाच्या अतिरेक मुळे स्नायुविक दुर्बलता, स्त्रीजन्य रोग, मधुमेह, वात , कामान्धत्व, शीघ्रपतन, स्वप्नदोष, धातु-क्षय कफ व वायु विकार एवं कोष्ठकबद्धता. 

ह्या रोगांपासून सावधानता बाळगावी.

तुला राशीचे प्रेम

जर तुम्ही पुरुष आहात तर तुमच्याकडे असलेल्या सुविधांमुळे प्रेमात आकर्षण असू शकेल आणि जर तुम्ही स्त्री आहेत तर तुमच्याकडे असलेले सौंदर्य हे प्रेमात उपयोगी पडू शकेल.

तुला राशीच्या व्यक्ती प्रेमात आपले सर्व समर्पण करतात. ह्यांना नेहमी प्रेमात समोरील पार्टनर कडून सहानभूती ची अपेक्षा असते.

प्रेमात तुला राशी फार रोमँटिक असते त्यामुळे ह्यांनी प्रेमाचे रूपांतर हे लगेच विवाहामध्ये करण्याचा सल्ला दिला जातो. पण इतर भौगोलिक परिस्थिती चेक करून निर्णय घावा.

तुला राशीच्या भाग्यात मिथुन राशी येते आणि पंचमात शनी ची कुंभ राशी येते त्यामुळे बुध आणि पंचमाचा संबंध कोणत्याही बाजूने  पत्रिकेत असेल तर पहिले प्रेम असफल होण्याची शंका नाकारता येत नाही. 

तुला राशी आणि शुभाशुभ

 • शुभ अंक- ६  या वातिरिक्त ४,५,८ अंक सुद्धा शुभ असतील 
 • अशुभ अंक- १,२ 
 • शुभ तारखा- ५,१४, २३ 
 • शुभ रंग- सफ़ेद ,निळा (लाइट), भूरा, क्रीम 
 • शुभ दिवस- बुधवार , शुक्रवार  
 • इष्ट देव- पंचमात शनी ची राशी येते म्हणून ह्यांनी शनी, हनुमानजी, शिव ह्यांची उपासना संकट काळी केल्याने लाभ होतील.
 • भाग्योदय वर्षे- २५,३२,३३,३५,
 • शुभ मंत्र- नमः शिवाय , आणि गायत्री मंत्र 
 • शुभ दर्शन यात्रा- महाकालेश्वर (उजैन ला शिप्रा नदी च्या किनारी असलेले)

ह्या राशीच्या व्यक्तींनी नेहमी शुक्रवारी दुर्गा चालीसा, लक्ष्मी उपासना, देवी कवच(सप्तशती पाठातील), श्रेय सूक्त चे पठण हे लाभदायक असू शकेल. हे करताना शुक्रवारी आंबट पदार्थ खाऊ नयेत. 

ह्या राशीच्या व्यक्तींनी नेहमी सफ़ेद रुमाल खिशात ठेवणे शुभ असते.

तुला राशीच्या व्यक्तींच्या इंद्रियांवर एक तरी तीळ असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ह्याना परलिंगी आकर्षण आपोआप मिळते. पण वीर्य विकार दोष सुद्धा काही वेळा ह्या राशींच्या तरुण मुलांमध्ये असण्याची शक्यता असेल.

दान- ह्या राशीच्या व्यक्तींनी वर्षातून एकदा दोनदा कुवारी कन्यांना शैक्षणिक मदत केली पाहिजे, लहान मुलींना खट्टीमिठी वस्तू , सफेद वस्तू भेट दिली पाहिजे , विधवा स्त्रियांना त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू दिल्याने वैवाहिक सुखात बाधा येणार नाही. 

दान हे शुक्रवारी करावे.

सध्या एव्हढे पुरे…

विशेष नोट — सर्व राशींबद्दल लिहिताना तुमच्या कॉमेंट वाचून किंवा अजून काही अभ्यास करता करता ह्यात बदल केले जातील किंवा अजून काही पॉईंट्स टाकले जातील. तेव्हा सर्व तुला राशींच्या माझ्या मित्र मैन्त्रिणींसाठी एक विनंती आहे कि हा लेख पूर्ण समजू नये. वेळोवेळी ह्याचे अपडेट वाचत जावे. निदान वर्षातून २/३ वेळा तरी.

शेवटी प्रत्येकाने आपल्या राशी बद्दल जे जे मिळेल ते ते घेत राहावे जीवन सुखकर होण्यासाठी.

आणि महत्वाचे — काहीही चुकीचे असेल तर ते पॉईंट इग्नोर करावेत सोडून द्यावेत.

धन्यवाद…..!

This Post Has 2 Comments

 1. Jayashri Nalawade

  Very good information 👍👌

 2. Mayuri

  “जर तुला राशीच्या व्यक्तीनी सर्व आयते घेऊन शिक्षण केले असेल तर करिअर हे शुक्राच्या अधीन करावे. म्हणजे अशा क्षेत्रात कि तुमचे शालेय, विद्यालयीन सर्टिफिकेट काही कामाचे नसेल.”
  मग तुम्ही अभिनेता, ज्वेलरी , सौन्दर्य प्रसाधन, प्रसिद्ध व्यापारी, नृत्य निर्देशक, गायक, संगीतकार, फिल्म इंडस्ट्री, फैशन डिजाइनर, मॉडलिंग इत्यादि क्षेत्र निवडून प्रगती करा

  उच्च शिक्षण आहे पण करीअर मनासारखं नाही. खरतर सुरूच होत नाही आहे.

Leave a Reply