You are currently viewing शनी वक्री २३ मे ते ११ ऑक्टोबर २०२१ लग्न आणि राशीगत फळे

२३ मे २०२१ ते ११ ऑक्टोबर २०२१ पर्यंत शनी वक्री होत आहे (VAKRI SHANI 2021). शनी सध्या मकर राशीतून भ्रमण करत आहे. आणि मकर मध्ये तो २४ जानेवारी २०२० पासून आला आहे आणि २३ जानेवारी २०२३ पर्यंत राहील.

प्रत्येक वर्षी शनी हा ४/५ महिने वक्री होतच असतो. वक्री ह्याचा अर्थ त्या ग्रहाचा नॉर्मल स्पीड कमी होणे आणि मागे मागे सरकत जाणे. जेव्हा एखादा ग्रह असे करत असतो तेव्हा त्याच्या कारकत्वामध्ये बदल होतात. तो एकतर अति स्ट्रॉंग होतो किंवा अति दुबळा होतो.
शनी सारखा ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा त्याची फळे हि अति स्ट्रॉंग मिळतात ज्यांना शनी ची महादशा साडेसाती किंवा ज्यांची शनी ची राशी असेल त्यांनी ह्यावर अति दक्षता घ्यावी. शनी कर्माचा, नियमाचा, कमिटमेंट चा कारक आहे.

शनी सध्या २४/१/२०२१ पासून ते १८/२/२०२२ पर्यंत श्रवण नक्षत्रात असेल आणि ह्याच नक्षत्रात शनी २३ मे ते ११ ऑक्टोबर मध्ये वक्री राहील.

जेव्हा शनी श्रवण नक्षत्रात वक्री होत आहे तेव्हा शनी गुरुजन, शिक्षक, ब्राह्मण, स्त्रिया, देशाची अर्थव्यवस्था, कलाकार, मंत्री, राजकारण ह्या गोष्टींवर आपला प्रभाव टाकेल.

 • मेष राशी आणि मेष लग्नाला शनी सध्या कर्म स्थानात वक्री होत आहे. त्यामुळे वक्री अवस्थेच्या वेळी शनी कर्माची हानी करू शकतो. सध्या कोणत्याही कामात आळशीपणा येऊ शकतो. लक्ष ठेवण्याची गरज आहे. घरातील वातावरण थोडे डिस्टर्ब करू शकतो. आपण जर विद्यार्थी असाल तर शैक्षणिक प्रगती होत आहे.
 • वृषभ लग्न आणि वृषभ राशी ला शनी भाग्यात वक्री होत आहे. धर्म स्थानात शनी वक्री होत आहे त्यामुळे आपल्या अध्यात्मिक क्षेत्रात व्यत्यय येऊ शकतील. वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. कर्म क्षेत्री आणि वैवाहिक जीवन चांगले चालेल. घराचे स्वप्न साकार होईल.
 • मिथुन लग्न आणि मिथुन राशी ला शनी अष्टम स्थानी वक्री होत आहे. आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याचा हा पिरियड असेल. फिट राहण्यासाठी योग्य काळजी हाच उपाय असेल. कार्यक्षेत्री उत्तम, धर्मक्षेत्री रुची वाढेल, पैसा खर्च होऊ शकतो.
 • कर्क लग्न आणि कर्क राशी ला शनी सातव्या स्थानी वक्री होत आहे. हे वैवाहिक जीवनाचे स्थान असल्यामुळे ताण तणाव जाणवेल. रिलेशन कडे लक्ष द्यावे लागेल. पैसे मिळतील भाग्य स्थानाच्या राहुमुळे चांगले लाभ होतील.
 • सिंह लग्नात आणि सिंह राशी शनी सहाव्या स्थानी वक्री होत आहे. हे सर्व्हिस लोन आणि कॉम्पिटिशन, कोर्ट केस चे स्थान आहे. हे विषय आधी पासून असतील तर थोडे त्रास होण्याचा संभव असेल. आरोग्य ठीक राहील. जीवनसाथी थोडा तापट किंवा जिद्दी होऊ शकेल. शांत राहणे. दुरावा दिसेल. किंवा त्याच्या/तीच्या आरोग्याच्या काळजी लागतील.
 • कन्या राशी आणि कन्या लग्न कुंडलीत शनी पाचव्या स्थानी वक्री होत असेल तर हा काळ विद्यार्थ्यांना जास्त मेहनतीचा होऊ शकेल. त्यातून यश मिळेल ज्या व्यक्ती प्रेमप्रकणात असतील त्यांना अति सावध राहण्याचा सल्ला दिला जातो ब्रेकअप होण्याचा प्रकार ह्याच समयी होऊ शकेल. अपचनाचे त्रास जाणवतील. पैसे चुकीच्या ठिकाणी खर्च होतील. जॉब मध्ये घरी जास्त बसण्याचा योग दिसतो. जॉब मधील काळजी निर्माण होऊ शकेल.
 • तुला राशी आणि तुला लग्न कुंडलीत शनी चौथ्या स्थानी वक्री होत आहे. प्रॉपर्टीज साठी उत्तम काळ आहे मात्र त्यातील कामे रखडून शेवटी पूर्ण होतील. घरातील वातावरणाची काळजी लागेल. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी राहील.
 • वृश्चिक लग्नात शनी तिसऱ्या स्थानी वक्री होत आहे. सध्या १४१ दिवस मोठे प्लॅन करू नका. मित्र, भाऊ बहिणी ह्याच्या संबंधात कटुता येऊ शकेल किंवा त्याच्या जीवनातील एखादी धावपळ दिसण्याचा संभव आहे. शनी पराक्रम स्थानात आपणाकडून मेहनत करून घेईल आणि पैसे देईल. मुलांच्या शैक्षणिक बाबतीत एखादी काळजी दिसेल. पण ती थोड्या वेळासाठी असेल.
 • धनु राशी आणि धनु लग्न कुंडलीत शनी दुसऱ्या स्थानी येत आहे कुटुंब स्थानी वक्री शनी आपल्याला कुटुंबाची जबाबदारी देऊ शकेल. कुटुंबासाठी पैसे खर्च करावे लागत आहेत. पैसा मिळेल. अध्यात्मिक राहून हा काळ घालावावा. कौटुंबिक मोठे निर्णय घेऊ नका.
 • मकर राशी आणि मकर लग्न कुंडलीत शनी प्रथम स्थानी वक्री होत आहे. आरोग्याकडे अति लक्ष द्यावे, आळशी पणा येईल. योग्य खाणे पिणे योग्य व्यायाम आपल्याला चांगले आरोग्य देऊ शकेल, नियमांत राहावे लागेल आरोग्याच्या बाबतीत केलेले दुर्लक्ष आपल्यलाला ऑक्टोबर नंतर त्रास देऊ शकेल. सध्या सर्व कामांमध्ये अडचणी दिसतील त्यात ती उशिरा होण्याचा संभव असेल पण कोणत्याही टार्गेट वर मेहनत सुरु ठेवा. फळ मिळेल शेवटी शेवटी. मानसिक ताण वाढू शकेल.
 • कुंभ राशी कुंभ लग्न कुंडलीत शनी द्वादश भावात वक्री होत आहे. धर्म कर्माची कामे वाढतील. आरोग्य चांगले असेल. कार्यक्षेत्री बदल दिसेल ते नवीन संधी मिळाल्यामुळे होण्याचा संभव जास्त असेल. नवीन नवीन काही करावेसे नक्की वाटेल आणि त्यावर मेहनत कराल.
 • मीन राशी आणि मीन लग्न कुंडलीत शनी लाभत वक्री होत आहे. लाभाची स्थिती वाढेल पण ते लाभ कुठेतरी जाण्याचे संभव नाकारता येत नाहीत. आपले नाव होईल. मेहनत खूप करून प्रत्येक प्रकारचे लाभ मिळविण्याचा प्रयत्न कराल. काही जीवनातले बदल आत्ता करू शकता. मुलाबाळांच्या विषयी काळज्या दिसतील.

वरील सर्व विवेचन एका शनी वक्रीमुळे त्या स्थानातील फळे काय मिळतील हे टाकले आहे त्यात कमी जास्त परिणाम होऊ शकतील कारण इतर ग्रह आपल्या पत्रिकेत पाहून पुढील विवेचन त्यावर जास्त अवलंबून असते.

सर्व राशीसाठी उपाय

ह्या काळात जास्तीत जास्त जमापुंजी करू नका. जास्तीत जास्त खास शनिवारी दान करा. शनी च्या वस्तू दान करणे हितावह ठरेल. शनीच्या दानाबद्दल अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/shanichya-vastu-aani-tyachi-mahiti/

शनी चा प्रभाव देशांवर कसा?

आखाती देशांमध्ये काही प्रमाणांत त्रासदायक घटना घडू शकतील. तेल खाणी ह्याबद्दल च्या विषयाची जगाला काळजी लागू शकेल.
देशात आणि परदेशातून मोठे राजकारण बदल दिसतील. देशातील राजस्थान, महाराष्ट्र, गोवा, दिल्ली ह्या प्रमुख राज्याच्या राजकारणात बदल दिसतील. शेअर मार्केट मधील चढउतार हा एकदम नीचांक आणि एकदम उच्चांक गाठू शकेल. १४१ दिवसातील पहिले ५० दिवस जर शेअर मार्केट वधारले तर त्यावर विश्वास ठेऊ नका किंवा खाली आले तरी त्यावर विश्वास ठेऊ नका.

धन्यवाद…..!

Leave a Reply