
Shani Transit 2025 Dhanu rashi Dhanu langa- शनी मीन राशीत दिनांक २९/३/२०२५ पासून ते २३/२/२०२८ पर्यंत असताना धनु राशीला शनीची अडीचकी सुरु असेल. येथे हि अडीच वर्षे कशी जातील आणि त्यात आपणास कोणत्या विषयासाठी धावपळ असेल हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
हे शनीचे भ्रमण सुरु असताना गुरु च्या अवस्था सुद्धा महत्वाच्या असतील
१४/५/२०२५ पर्यंत गुरु वृषभेत असेल
१४/५/२०२५ पासून ते २/६/२०२६ पर्यंत गुरु मिथुन राशीत असेल
२/६/२०२६ पासून २६/६/२०२७ पर्यंत गुरु कर्क राशीत असेल
२६/६/२०२७ पासून २४/४/२०२८ पर्यंत गुरु सिंह राशीत असेल
तसेच राहू १८/५/२०२५ पर्यंत मीन राशीत शनी बरोबरच असणार आहे
नंतर राहू १८/५/२०२५ पासून ५/१२/२०२६ पर्यंत कुंभ राशीत मागे जाईल
५/१२/२०२६ पासून २३/६/२०२८ पर्यंत राहू मकर राशीत असेल
आता ह्याला अनुसरून शनी चे मीन राशीतील धनु राशीला मिळणारे विषय मांडू
शनी २९/३/२०२५ पासून आपल्या धनु राशीला किंवा धनु लग्नाच्या पत्रिकेत चतुर्थ स्थानातून भ्रमण करणार आहे. हा काळ २३/२/२०२८ पर्यंत असेल. कुंडलीचे ही स्थान मातृ स्थान म्हणून ओळखले जाते. हेच स्थान जन्मस्थानाचे असते. आईचे सुख आणि त्यातील विषयाचे हे स्थान आहे.
ह्याच स्थानातून आपल्या सर्व प्रॉपर्टीज चे विषय पहिले जातात. सर्व आपल्या पर्सनल सुखाचे विषय सुद्धा हेच स्थान आहे. त्यामुळे शनी इथे आल्यावर ह्या विषयांची काही धावपळ होते का ते पहा. आणि त्यातील निर्णय हे १८/५/२०२५ नंतर घ्या.
ज्योतिष नियमा प्रमाणे शनी एखाद्या स्थानातून भ्रमण करीत असताना तो आपल्या त्या स्थानापासून ३ ऱ्या स्थानावर ७ व्या स्थानावर आणि १० व्या स्थानावर दृष्टी टाकीत असतो. शनीच्या ह्याच दृष्ट्या आपणास त्रासदायक होऊ शकतील पण ते ते स्थानातील विषय जर आपण व्यवस्थित हाताळले तर २३/२/२०२८ पर्यंत त्यात आपणास शनी काहीतरी उत्तम सोलुशन देऊन जाईल हे कायम स्वरूपात असेल कारण माझ्या मते शनीच्या ज्या ज्या स्थानावर दृट्या येतात त्या स्थानातील विषयाला शनी आपणास आपल्या मागील कर्माची फळे चांगली किंवा वाईट देत असतो आणि त्याची फळे तो आपल्याला भोगवुन पुढे क्लिअर करीत असतो.
आपल्या पत्रिकेत शनी ची ३ री दृटी हि जिथे २ नंबर ची वृषभ राशी लिहिली आहे तिथे आहे. हे स्थान आपल्या जॉब चे आहे तसेच हे स्थान स्पर्धा परीक्षेचे सुद्धा आहे. ह्याच स्थानावरून सर्व प्रकाचे शारीरिक रोग पाहण्यात येतात. शत्रू, कोर्टकेस असे विषय इथून चेक करता येतात. त्यामुळे हे विषय एक दोन ऍक्टिव्ह होणारच असे समजा. जॉब संबधीतले विषय असतील तर व्यवस्थित निर्णय घ्या. विद्यार्थी दशेत असाल तर आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी हा मेहनतीचा कालावधी आहे असे समजा. काही कोर्टकेस असतील तर त्याचे निर्णय ह्या कालावधीत लांबू शकतील किंवा त्यात जर निर्णय आले तर आपणास काही अडजस्टमेन्ट करावी लागेल.
आपल्या पत्रिकेत शनीची ७ वी दृष्टी हि कुंडलीच्या दशम स्थानावर येत आहे. हे स्थान आपल्या प्रोफेशन चे करिअर चे आणि आपल्या स्टेटस चे आहे ह्या विषयाला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या करिअर मध्ये जास्त मेहनत करावी लागेल हे नक्की. जर कार्यरत असाल तर निर्णय सावकाश घ्या. ऑफिस मधील अधिकाऱ्यांचा काही त्रास होणार नाही ह्याकडे लक्ष द्या. ट्रान्सफर सारखे विषय किंवा करिअर मधील बदल हे नक्की होणार आहेत. जर आपण मातृस्थानापासून / जन्मस्थानापासून लांब आपले करिअर करत असाल तर काही गोष्टी सुलभ होतील काळजी नको.
शनी ची १० वी दृष्टी आपल्या पत्रिकेच्या प्रथम स्थानावर येत आहे. जिथे शनी ची धनु राशी ९ नंबर पहा. हे स्थान आपल्या प्रेझेंटेशन चे आपल्या ऍक्टिव्हिटीचे आपल्या देह बोलीचे आहे. इथूनच आपल्या प्रत्येक युक्त्या ऍक्टिवेट होतात कारण इथेच तुमच्या डोक्याचा सुद्धा भाग तपासाला जातो.
शनी इथून भ्रमण करत असताना काही गोष्टी ज्या ज्या तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणाऱ्या आहेत त्यावर तो खूप मेहनत करायला लावेल. काही ऍक्टिव्हिटी करताना फार त्रास होईल किंवा कामे जलद होणार नाहीत संघर्ष वाढेल. म्हणून सावकाश ह्या विषयांना हाताळा. खास करून तब्येतीकडे लक्ष जरूर द्या. कोणताही आळशीपणा ह्या कालावधीत आता चालणार नाही रोज शारीरिक मेहनत ज्या व्यक्तींच्या होत आहेत त्यांना काही इशू नाही पण जर आपण फार कंफर्ट झोन मध्ये आरामदायक स्थिती मध्ये असाल तर शनी इथे आपल्या तब्येतीवर परिणाम करेल म्हणून व्यायाम करायलाच लागेल. विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलांना सुद्धा इथे त्याच्या आळशीपणाचा त्रास होईल. मेहनत करावीच लागेल.
आपणास आणि आपल्या परिवारास शनीच्या मीन राशीतील हि अडीचकी व्यवस्थित जावो हीच शनी महाराजांकडे प्रार्थना.
शनी ची हि वरील फळे फक्त जनरल आहेत तंतोतंत समजण्यासाठी आपल्या जन्म पत्रिकेचा शनी पहावा लागतो तो जन्माचा शनी कोणत्या स्थानात आहे. आपणास महादशा कोणती आहे. अष्टक वर्गात शनी किती गुण देत आहे. ह्यावरूनच एखादा ज्योतिषी आपणास आपल्याच कुंडलीचे निदान सांगू शकेल.
आता काही उपाय देतो.
आपली राशी धनु आहे त्यामुळे गुरुचे सर्व उपाय गुरु ला स्ट्रॉंग करण्यासाठी केलेत तर आपली राशी मजबूत होईल आणि आपणास ह्या अडिचकीचा खूप कमी त्रास जाणवेल. कपाळावर आणि नाभीवर केसर चा टिळा रोज अंघोळीनंतर लावा. एखाद्या गुरुची मनोभावे सेवा किंवा दर्शन किंवा वाचन करा . खास गुरुवारी गायीला चणा डाळ भिजवून गूळ घालून खाण्यास द्या. शनिवारी पिंपळाला जल अर्पण करा.
धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७८
७५०६७३७१९