You are currently viewing राहू केतू राशी परिवर्तन २०२० : सिंह राशी आणि सिंह लग्न

राहू केतू राशी परिवर्तन २०२० खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आधी हे वाचून नंतर खालील आपल्या राशीचे आणि लग्न स्थानाचे फळ वाचावे हि विनंती.

राहुचा वृषभ राशीत आणि केतूचा वृश्चिक राशीत प्रवेश

https://shreedattagurujyotish.com/rahu-aani-ketu-bhraman-23-september-2020/

२३ सप्टेंबर २०२० ते पुढील १८ महिने सिंह राशी आणि सिंह लग्नाला राहूचे भ्रमण हे पत्रिकेच्या कर्म स्थानी (पत्रिकेचे १० वे स्थान) आहे आणि केतू चे भ्रमण चौथ्या स्थानी आहे.

ज्यांची राशी सिंह राशी आहे त्यांची हि चंद्र कुंडली आहे आणि खालील राहू केतू चे भ्रमण ह्यावर केलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.
आणि ज्यांची कोणतीही राशी असली तरी आपली जर लग्न कुंडली वरील कुंडली प्रमाणे असेल जिथे ५ ने सुरुवात होते तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे. तुमच्या मूळ लग्न कुंडलीत येथे राहू नसला तरी आणि असला तरी लग्न कुंडली अशीच असेल तरी हे लिखाण वाचून घ्यावे.

पत्रिकेचे १० वे स्थान हे कर्म स्थान आहे आणि राहू चे इथले १८ महिन्यासाठीचे भ्रमण आपल्याला करिअर च्या बाबतीत जास्त ऍक्टिव्हेट ठेवेल मोठे निर्णय घ्याल ह्या विषयात पुढील १८ महिने. पण ते निर्णय उत्तम परिणाम देतील का ह्याचा विचार करून घ्या. काही घटना ह्या आपल्या विरुद्ध होत आहेत का ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. कारण सिंह लग्नाला राहू १८/१८ महिन्यांनी ज्या स्थानात येतो त्या स्थाना बद्दल चांगले रिझल्ट देत नाही.

राहू ची ७ वी दृष्टी

राहू ची ७ वी दृष्टी हि ४ थ्या स्थानावर येत आहे जिथे ८ नंबर आहे. ह्या स्थानातून घरातील सुख, मातृ सुख, प्रॉपर्टीज आणि पर्सनल सुखे पाहतात. आणि इथे केतू सुद्धा वृश्चिक राशीत आल्यामुळे ह्या बाबतीत पुढील काही घटना ऍक्टिव्हेट होऊ शकतील. अचानक ह्या सुखांना सांभाळताना धावपळीच्या गोष्टी दिसू शकतील. प्रॉपर्टीज साठी काही घटना इथे भटकंतीच्या होऊ शकतील लक्ष द्यावे.

राहू ची ५ वी दृष्टी

राहू ची ५ वी दृष्टी धन स्थानावर कुटुंब स्थानावर येत आहे. जिथे ६ लिहिले आहे. पुढील १८ महिन्यात काही अशा घटना घडू शकतील जिथे कर्मासाठी कुटुंबा पासून दूर राहावे लागेल. असे घडले नाही तर कुटुंबासाठी मोठे धन खर्च होण्याची चिन्हे दिसतील. पण ह्यात तुमच्या हाती चांगले रिझल्ट लागतील पैशाचे चीज होईल असे दिसते.

राहू ची ९ वी दृष्टी

राहू ची ९ वी दृष्टी हि जिथे १० लिहिले आहे तिथे शनी च्या मकर राशीवर येत आहे हे स्थान पत्रिकेत तुमच्या कॉम्पिटिशन चे आणि तुम्ही इतरांना ज्या सर्व्हिस देता त्याचे (जॉब वगैरे) , आजारांचे, कर्जाचे आहे. त्यामुळे पुढील १८ महिन्यात ह्यात सुद्धा आपल्याला काही गोष्टी अनुभवास येउ शकतील. कर्ज असेल तर ते वाढेल किंवा नवीन काढलं जाईल, आजार असतील तर त्यात त्रास होण्याची संभावना, किंवा जॉब मधील काही चेंजेस दिसतील.

सिंह राशी ची लहान मुले घरात असतील तर ह्या राहू भ्रमणाचे पुढील १८ महिने आरोग्यास उत्तम नाहीत तर पालकांनी लक्ष द्यावे. कारण ह्या राहू मुळे खास लहान मुलांच्या बाबतीत त्रास होण्याची संभावना जास्त असेल ह्याचे दुसरे कारण असे कि लहान मुलांना कोणी शत्रू नसतो, ते स्वतः सर्व्हिस देत नाहीत, त्याच्याकडे स्पर्धा नसतात. त्यामुळे फक्त राहू ची ९ वी दृष्टी फक्त आजारपणावर येईल आणि निदान होणार नाही. जर का असे झाले तर थोडी कळ सोसू शकता. वैद्यकीय उपाय सुरु ठेवा आणि काही रवी ची दाने करा.

केतू च्या दृष्ट्या

केतू ४थ्या स्थानापासून १० व्या कर्म स्थानाला पाहत आहे जिथे राहू आहे म्हणून राहू बद्दल ची फळे इथे अचानक समोर दिसतील जी वर लिहिली आहेत कर्म स्थानाची.

केतू ची ५ वी दृष्टी अष्टम स्थानी येत आहे. जिथे १२ नंबर ची मीन राशीवर आहे. त्यामुळे काही अपघाताची सुद्धा चिन्हे दिसतात सांभाळावे. असे होत नसेल तर काही ऑपेरेशन वगैरे. असे हि नाही झाले तर अचानक काही पैसा जो मिळालेला असेल त्यावर काही खर्च निघतील.

केतू ९ व्या दृष्टीने तुमच्या १२ व्या स्थानाला पाहत आहे जिथे ४ नंबर लिहिले आहे हे मोक्ष स्थान आहे. हे गुंतवणुकीचे आहे त्यामुळे तुमच्या गुंतवणुकी काही तुटू शकतील. बँक बॅलन्स मोठ्या प्रमाणात ४/५ वेळा काढावा लागेल. हे स्थान जन्म स्थानापासून दूर जाण्याचे सुद्धा स्थान आहे. म्हणून बाहेर जाण्याचे योग उत्तम आहेत सिंह राशी आणि सिंह लग्नाच्या व्यक्तीना.

उपाय

सिंह राशी साठी राहू च्या भ्रमणासाठी काही उपाय देत आहे.

  • तूप तांबे गहू गूळ ह्यांचे रविवारी दान करा जमेल तेव्हढे
  • गायीला गूळ रविवारी खाण्यास द्या
  • कोणतीही रोज किंवा रविवारी केलेली सूर्य उपासना ह्यात तुम्हाला मदत करेल नक्की
  • गायत्री मंत्र साधना सुद्धा खूप सेफ ठेवेल ह्यापासून आपल्याला.

नोट : वरील सर्व आपली जन्मपत्रिका न पाहता आणि इतर सर्व ग्रहांची स्थिती न पाहता एक विवेचन आहे अधिक शुक्ष्मता हि आपली स्वतःची पत्रिका सांगू शकेल एखाद्या तद्न्य ज्योतिषाकडून. तेव्हा हे सर्व सिंह राशीच्या आणि सिंह लग्नाच्या पत्रिकेवरील कॉमन भाकीत समजावे हि विनंती.

धन्यवाद…..!

Leave a Reply