आज वृषभ राशीचे ( Vrushabh Rashi–Taurus ) पूर्ण विश्लेषण करू. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला कळेल असेच लिहिणार आहे.
Table of Contents
वृषभ राशीचे लोक कसे असतात?
वृषभ ह्याचा अर्थ बैल– ह्याचे सर्व गुणधर्म ह्या राशींत सामवलेले दिसतात. कामाला सुरुवात करताना ह्यांना आळशीपणा येतो पण एकदा ह्यांनी स्वतःला जुंपले कि मागे पुढे पाहत नाहीत त्या कामात समाधान होईपर्यंत किंवा संपेपर्यंत तरी. ताकद सुद्धा बैलाची ह्याच राशींत येते. (Taurus in marathi)
खाणे हे सुद्धा इथूनच समजेल ह्यांचे. थोडे किंवा जास्त जरी खाल्ले तरी त्याचा स्पीड हा जास्त असतो नंतर बसतील एका बाजूला पाहिजे असल्यात रवंथ करत पण आपल्याला जे पाहिजे ते भर भर खाऊन मोकळे होतील.इमानदारी सुद्धा तशीच करतील बैलासारखी. एकूण सर्व चांगले वाईट गुणधर्म ह्या राशीत आपोआप ह्या राशीत बैल सारखे येतात म्हणून ह्याला वृषभ म्हणतात.
वृषभ राशी चा मालक
ह्या राशीचा मालकी हक्क शुक्राकडे (Venus) आहे. म्हणजे शुक्राच्या सर्व छटा ह्या राशीवर उमटलेल्या असतात. कलेच्या बाजू भक्कम असतात कलात्मक विचार अनुभव दांडगा असतो ह्यांना. नटणे, मुरडणे , सुंदर दिसण्याचा प्रयत्न करणे निटनेटके राहणे ह्यात ह्या राशीचे लोक थोडे बिझी असतील तर हे शुक्रावरूनच कळते. तसे प्रत्येकाला अनुभव येतीलच असे नाही हे शुक्राच्या स्थितीवर अवलंबून असते.
चंद्र जर २ नंबर मध्ये लिहिला असेल पत्रिकेत तर आपली राशी वृषभ आहे.
जसे प्रत्येक राशीत ३/३ नक्षत्रे असतात तसे ३० डिग्री साठी तुमचा चंद्र खालील डिग्री वर २ नंबर मध्ये लिहिला असेल तर …
- पत्रिकेत २ नंबर वृषभ राशीत चंद्र ० डिग्री ते १० डिग्री पर्यंत असेल तर नक्षत्र — कृतिका = स्वामी सूर्य, गण — राक्षस , नाडी — अंत्य असेल.
- पत्रिकेत २ नंबर वृषभ राशीत चंद्र १० ते २३:२० डिग्री पर्यंत असेल तर नक्षत्र — रोहिणी = स्वामी चंद्र, गण –मनुष्य — नाडी अंत्य असेल.
- पत्रिकेत २ नंबर वृषभ राशीत चंद्र २३:२० ते ३० डिग्री पर्यंत असेल तर नक्षत्र –मृगशीर्ष = स्वामी मंगळ, गण — देव, नाडी– मध्य असेल.
ज्या डिग्री वर तुमचा जन्म चंद्र असेल त्याप्रमाणे नक्षत्र, गण, नाडी ह्याच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला मिळतील.
सध्या नक्षत्र, गण, नाडी ह्या एकाच राशीत वेगवेगळ्या असतात म्हणून इथे देणार नाही जेव्हा ह्यावर अधिक प्रकाश पडेल तेव्हा तुमची डिग्री पाहून नक्षत्र गण नाडी बद्दल वाचू शकता आणि तुमच्या राशीचे कॉमन इफेक्ट त्यात मिक्स करू शकता.
सध्या कॉमन वृषभ राशी कशी आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
माझे मत वृषभ राशी चे
कृष्णाचा जन्म वृषभ राशीत (Vrushabh Rashi)चंद्र असतानाच रोहिणी नक्षत्री झालेला म्हणून कृष्णाची हि राशी भौतिक सुखांसाठी १२ राशींपैकी सर्वात लकी राशी असे मी मानतो.खूप कमी रिझल्ट मला ह्या राशीच्या लोकांकडून मिळाले आहेत ज्यांचे कधीच लग्न झाले नाही , मुलेच झाले नाहीत, एखादी प्रॉपर्टीच घेता आली नाही अशा सर्व बाबतील ह्या राशी खूपच लकी असतात.
जीवनातील ह्याच भौतिक सुखांना उपभोगताना त्रास आणि बदल ह्यांना नेहमी जाणवतात स्वतःच्याच माणसांकडून हे १००%. जसे कृष्णाकडे खूप भौतिक सुखे होती पण ती उपभोगताना वेगवेगळ्या संघर्षातून जावे लागले कृष्णाला आणि स्वतःच्याच रिलेशन मधून त्रास सहन करावा लागला ज्याने जीवनात जास्त भटकंती झाली.
वृषभ राशी आणि प्रेम – Taurus Love Life
समोरच्यावर इमाने इतबारे प्रेम करणारी हि राशी आहे. मात्र ह्याचा मिसयुज स्वतःच्या फायद्यासाठी समोरचा करणार नाही ह्याची ग्यारंटी देता येत नाही तेव्हा प्रेमात सावधान राहावे . चारित्र्य सांभाळून प्रेम करणे नेहमी हितावह असेल.
प्रत्रिकेत वृषभ राशीचा लीडर जरा जरी बिघडला तर वृषभ राशी च्या मुलींसाठी तो रेड सिग्नल असेल.
वृषभ राशीची (Vrushabh Rashi) मुले जर प्रेमात असतील तर ह्यांना एक सल्ला आपला बैल होत नाही ना ह्यावर जास्त लक्ष ठेवणे. पण हे समोरच्या राशीवर अवलंबून असेल. खास जर मुलीची राशी मीन किंवा धनु असेल तर. (हे फक्त प्रेमात आहे वैवाहिक जीवनात कोणताही संबंध नाही)
प्रेमात असताना थोडे समाजात आपल्याबद्दल काही चुकीचे पसरणार नाही ह्यावर ह्यांनी लक्ष द्यावे.
विशेष नोट – सर्वांसाठी माझे मत
जे जे इतर राशींचे लोक वृषभ राशींच्या लोकांचा कोणत्याही पद्धतीने फायदा घेतात स्वार्थापोटी त्यांना दरिद्रता सहन करावी लागते पुढे. ह्यात सर्व रिलेशन आले आई वडील मित्र मैत्रिणी वगैरे जे जे वृषभ राशींचे असतील त्यांचा स्वार्थापोटी फायदा घेऊ नये.
तुम्हाला जर सुदामा – कृष्णा ह्याची स्टोरी माहिती असेल तर त्याचा हा इफेक्ट असेल असे मला वाटते. पण ह्याची प्रचिती बऱ्याच लोकांना अनुभवताना पहिली आहे.
उदाहरणार्थ — जर वृषभ राशीच्या मुलाचा मुलीचा समोरच्याने स्वतःच्या स्वार्थापोटी जर चुकीचा उपयोग केला तर वरीलप्रमाणे होऊ शकते त्या व्यक्तीबद्दल. त्याचा सुदामा होण्याची दाट शक्यता असते. पण त्यातून बाहेर काढणारी व्यक्ती सुद्धा तीच वृषभ राशीची असू शकते का सध्याच्या युगात हा अभ्यासाचा विषय आहे. तुम्हाला जे अनुभव येतील तेव्हा सांगा.
स्वभाव – Taurus Personality
ह्या राशीच्या स्वभावात आणि व्यक्तित्वात एक कलात्मकता असतेच. स्वभाव खूप चांगला असतो. पण थोडा हट्टी पणा सुद्धा येतो. एकदा वृषभ राशीच्या लोकांनी निर्णय घेतला तर मग स्वतःचे नुकसान दिसले तरी ते मागे हटत नाहीत.
चिकाटी वृत्तीची सुद्धा व्यक्ती वृषभ राशीची (Vrushabh Rashi) असू शकते. शत्रुत्व कुणाशी न मानण्याचा स्वभाव असतो मात्र ह्याच्याशी कोणी शत्रुत्व केले तर बैलाचे शिंग खुपसल्याशिवाय मागे हटणार नाहीत.
वृषभ राशी आणि करिअर – Career of Taurus
असे कोणतेही करिअर वृषभ राशींच्या लोकांना करता येईल ज्यात ग्ल्यामर असेल , कलागुणांचा वाव दाखवायला मिळेल , सौंदर्य असेल, जिथे लोकांना आनंद मिळत असेल अशा ठिकाणी वृषभ राशीच्या व्यक्ती चांगल्या सर्व्हिस देतात असे माझे मत आहे.
ह्या राशीचे चिन्ह हे बैलाचे म्हणून जमिनीशी खास नाते आहे म्हणून करिअर मध्ये कोणत्याही शेतीबद्दल किंवा जिथे जमिनीवरून काही विषय असा अभ्यास करून करिअर करू शकतात. ह्या राशीचा स्वामी शुक्र असल्याने बैंकिंग, प्रदर्शन कला ह्या क्षेत्राचा अभ्यास करून प्रगती करता येईल.
ललित कला, रेस्टोरेंट, होटल, संगीत, तेल व्यवसाय, गायन, नृत्य, कलाकार, अभिनेता, श्रृंगार व सजावट वस्तु, आभूषण, कलात्मक व शिल्पकारी संबंधित वस्तु, चित्रकारी, रेडिमेड वस्त्र व्यवसाय, बागवानी, मॉडलिंग, टेलरिंग, फिल्म व्यवसाय, फैशन डिजाइनर, विज्ञापन एजेंसी, इत्र ह्या सम्बंधित जॉब किवा व्यवसाय ह्या राशींना सूट होऊ शकतो.
वैवाहिक जीवन – Taurus Married Life
वैवाहिक जीवनांत आनंद असतो कारण तुम्ही स्वतः भरपूर कलागुणांनी भरलेले असता. पार्टनर ला तुमच्या जे पाहिजे ते तुम्ही देण्यास पात्र असता. खास कोणताही इशू तसा दिसणार नाही फक्त शारीरिक सुख हा विषय कोणत्याही मार्गाने मध्ये येता कामा नये. जर हा विषय सुरु झाला तर मात्र ह्या दाम्पत्यांना खास पुढे संसार रेटण्यास त्रास होतो. जर ह्यात स्त्री वृषभ ची असेल तर एक वेळ सहन करेल हा विषय पण पुरुषांनी सुद्धा खास सांभाळून घेण्यास हरकत नाही भावी सुंदर जीवनासाठी.
वृषभ राशी च्या विद्यार्थ्यांसाठी – Vrushabh Rashi For Student
वृषभ राशी च्या विद्यार्थ्यांसाठी एक सल्ला तुम्ही हुशार आहात पण विद्यार्थी वयात किती गोष्टींचा शो शाईन करावा ह्याचा जर बॅलन्स केलात तर कोणतीही विद्या घेण्यास अडचणी येणार नाहीत. खास तुमच्या कडील असलेल्या कलागुणांना महत्व द्या पण रेगुलर अभ्यासाची ऍक्टिव्हिटीज सांभाळून हे ऋषभ राशीच्या विद्यार्थ्यांना जमले तर विद्यार्थी दशेत प्रगती दिसते.
एक खास — वृषभ राशीच्या सर्व विद्यार्थ्यांना जर त्यांचा जन्म चंद्र हा कृतिका नक्षत्री असेल तर विद्याधन मिळविताना स्वतःला खूप त्रास सहन होऊन किंवा आईवडिलांपासून दूर जाऊन जर शिक्षणाच्या पायऱ्या चढल्या तर ते शिक्षण पूर्ण होते. जन्म ठिकाणी मातृ ठिकाणी शिक्षण पूर्ण होण्यास अडचणी येतात.
वृषभ राशी आणि रोहिणी नक्षत्र ह्यात सुद्धा केव्हा केव्हा असे पाहावयास दिसले आहे.
वृषभ राशी च्या ५ ते १२ वयातील लहान मुलांसाठी – Vrushabh Rashi For Small Childrens
ह्या वयात खास गळ्याच्या आजारांना जपावे लागेल टॉन्सिल्स / गाठी वगैरे ह्यांचा सामना करावा लागत असेल तर थंड पेय पदार्थ अशा वयातील मुलांना देऊ नये हा सल्ला. ह्याच वयातील मुलांना गॅजेट्स पासून थोडे दूर ठेवणे हे आई वडिलांसाठी पुढे खूप चांगले कारण पुढे जास्त त्याच्या आहारी जाण्याची शक्यता फार असते.
वृषभ राशींच्या वृद्धांसाठी – Vrushabh Rashi For Senior Citizen
६० + वृद्धांना खास डायबिटीज कडे आणि किडनी ह्यांच्या आजारांना जपून पुढे योग्य जीवन जगावे. खास एकत्र कटुंबात राहत असाल तर उत्तम.
सल्ला — पैसा कुठे किती कुणासाठी खर्च करावा ह्या वयात बॅलन्स आणावा लागेल
वृषभ राशी शुभाशुभ
अंक
- भाग्यशाली अंक ६ आहे.
- ४,५,६ हे अंक शुभ आहेत आणि १ आणि २ हे अशुभ फळे देऊ शकतात. ३ अंक सम समजावा.
रंग
- निळा जांभळा रंग हा भाग्यशाली असू शकतो.
- स्वतःजवळ सफेद रुमाल ठेवणे शुभ असेल.
- कपड्यांत खास सफेद रंग हा शुभ फळे देऊ शकतो.
दिन
- शुक्रवार हा वृषभ राशीला शुभ आहे त्याबरोबर बुधवार आणि शनिवार हे सुद्धा शुभ असतील.
- जेव्हा चंद्र वृश्चिकेत असेल सव्वादोन दिवस तेव्हा नवीन कोणत्याही कामाची सुरुवात करू नये. असे महिन्यातून एकदा असेल.
देवता
हि राशी पृथ्वी तत्वाची आहे म्हणून वृषभ राशींच्या लोकांनी नेहमी शिव आणि कृष्ण ह्याची उपासना करत राहावी ज्याने आयुष्यात खूप कमी अडचणींना सामना करावा लागेल.
वृषभ राशी च्या महिलांसाठी – Vrushabh Rashi For Womens
सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. संसारासाठी मेहनत करण्याची नेहमी तयारी असते. आपला पती/मुले ह्या सर्कल मध्ये जास्त असतात. ज्या घरात वृषभ राशींच्या महिला असतील तेथे काहीच कमी नसते कोणत्याही सर्विस साठी ह्या महिला तत्पर असतात.
माहेरी सुद्धा ह्यांना जास्त लक्ष द्यावे लागते लग्न झाल्यावर. हे खास विवाह करताना लक्ष ठेवा कारण नंतर ह्याचा त्रास होता कामा नये सासर च्या लोकांकडून. संसारातील कोणत्याही कष्ठापासून हनुमान उपासना सुरु ठेवा हळू हळू बाहेर निघाल.
शेवटी वृषभ राशींच्या सर्वाना एक सल्ला असा आहे कि सर्व्हिस जास्त देताना स्वतःकडे लक्ष ठेवा. स्वतःचे सुख डिस्टर्ब होणार नाही ना ह्याकडे लक्ष असू द्या.
सध्या एव्हढे पुरे…
विशेष नोट :- सर्व राशींबद्दल लिहिताना तुमच्या कंमेंट वाचून किंवा अजून काही अभ्यास करता करता ह्यात बदल केले जातील किंवा अजून काही पॉईंट्स टाकले जातील. तेव्हा सर्व वृषभ राशींच्या माझ्या मित्र मैन्त्रिणींसाठी एक विनंती आहे कि हा लेख पूर्ण समजू नये. वेळोवेळी ह्याचे अपडेट वाचत जावे. निदान वर्षातून २/३ वेळा तरी.
शेवटी प्रत्येकाने आपल्या राशी बद्दल जे जे मिळेल ते ते घेत राहावे जीवन सुखकर होण्यासाठी.
आणि महत्वाचे :-काहीही चुकीचे असेल तर ते पॉईंट इग्नोर करावेत सोडून द्यावेत.
राशीवरून भविष्य नाही स्वतःचे गुणधर्म चेक करावेत.
खूप सुंदर सर!…कमी आणि मोजक्या शब्दात तुम्ही मांडले आहे.
धन्यवाद सर!
खूपच सुंदर शब्दात मांडले आहे. मी वृषभ राशीची असल्याने बऱ्या पैकी बाबींमधे साधर्म्य आहे
Thank you
माझं रोहिणी नक्षत्र आहे….. सांगितलेत ते सर्व माझावर लागू होतंय..
पण एक विचारतो.. एखाद इच्छित कामात अडचण येऊ नये, त्यासाठी उपाय सांगावा…
3.6.1997 11.55 janm ahe maze kundali kashi ahe lagn yog kadhi ahe