You are currently viewing सिंह राशी (Leo)- पितृप्रधान राशी, जंगलाचा राजा

सिंह राशी अक्षर- मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे

सिंह राशी – Simha Rashi Characteristics

ह्या राशीत ३ नक्षत्र -मघा – पूर्व फाल्गुनी – उत्तरा फाल्गुनी  

  • जर तुमचा जन्म चंद्र ० ते १३:२० पर्यंत पत्रिकेत लिहिला आहे तर  मघा नक्षत्र आहे. गण- राक्षस आणि नाडी- अंत्य असेल.
  • जर तुमचा जन्म चंद्र १३:२० ते २६:४० पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल तर पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे तुमचे गण – मनुष्य आणि नाडी – आद्य असेल 
  • जर तुमचा जन्म चंद्र २६:४० ते २९:५९  पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल तर उत्तरा फाल्गुनी   नक्षत्र आहे तुमचे गण – मनुष्य आणि नाडी – आद्य असेल.

ज्या डिग्री वर तुमचा जन्म चंद्र असेल त्याप्रमाणे नक्षत्र गण नाडी ह्याच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला मिळतील. 

नक्षत्र गण नाडी ह्या एकाच राशीत वेगवेगळ्या असतात म्हणून इथे देणार नाही जेव्हा ह्यावर अधिक प्रकाश पडेल तेव्हा तुमची डिग्री पाहून नक्षत्र गण नाडी बद्धल वाचू शकता आणि तुमच्या राशीचे कॉमन इफेक्ट त्यात मिक्स करू शकता.

सध्या कॉमन सिंह राशी कशी आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

आज सिंह राशीचे ( Leo ) पूर्ण विश्लेषण करू. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला कळेल असेच लिहिणार आहे.

सिंह राशीचे चिन्ह हेच मुळात सिंहच आहे. ह्या सिंहाचा जेव्हढा तुम्ही अभ्यास कराल तेव्हढे जास्तीत जास्त गुणधर्म ह्या राशीचे आहेत. मला महित असलेले गुणधर्म पुढील प्रमाणे असतील.

सिंह जंगलाचा राजा मानला आहे त्याचा राजेशाही थाट, त्याची डरकाळी , त्याचा चालण्याचा रुबाब त्याची ऐट हे सर्व ह्या राशीत पाहायला मिळते.

सिंह शिकार करताना खूप कमी वेळा शिकार सोडून देतो आणि आपल्या शिकारीच्या टार्गेट वर असताना त्याला कितीही वाट पाहायला लागली तरी तो त्याची वाट पाहतो आणि प्रयत्न सुद्धा करतो आणि एकदा ती शिकार तोंडाला लागली तर त्याची लचके तोडतो. म्हणून ह्या व्यक्ती आपल्या टार्गेट वर खूप मेहनत करतील आणि एकदा ते टार्गेट ठरले तर त्यावर सक्सेस होण्याचा प्रयत्न करून ते सक्सेस झाल्यावर समाधानी होतील.

पण ह्यात एक गुणधर्म सिंहा कडे आहे तो म्हणजे त्याचा आळशीपणा. 

भूक लागल्याशिवाय तो आपल्या टार्गेट वर राहणार नाही – ह्यावरून सिंह राशीचे लोक प्रगती करण्यासाठी प्रथम जास्त हाव हाव करीत नाहीत आणि आधी ते थोडे डिऍक्टिव्हेट दिसतील. पण जेव्हा त्या टार्गेट वर येतील नंतर मागे वळून पाहणार नाहीत.

सिंह कधीच घास खाणार नाही कितीही भूक लागली असताना. ह्यावरून ऍडजेस्टमेंट प्रकार ह्या राशीकडे दिसत नाही. कितीही गरज असली तरी न आवडणारे क्षेत्र घेणार नाहीत. घरच्यांनी अगदीच जबरजस्ती केली तरच ते न आवडणारे क्षेत्र काही काळापुरते करतील पण ते कंटिन्यू पुढे नेणार नाहीत. म्हणून ह्यांनी आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रातच प्रगती करावी.

आकाश मंडळातल्या राजाची राशी आहे हि. कारण सूर्य हा ग्रह मंडळात राज्याच्या भूमिकेत आहे.

ह्याने हि राशी जरा हुकमी बाण्याची आहे. ऑर्डर देणे ह्या राशीचा मूळ स्वभाव. ह्या सूर्य हा जसा नियमित उगवतो मावळतो आणि आपल्या सिस्टम ला संभाळतो तशी ह्या राशीच्या व्यक्ती अगदी सिस्टेमॅटिक असतात.

ह्या राशी चा मालकच सूर्य असल्यामुळे तापट स्वभाव सुद्धा पाहायला मिळतो, आणि स्वतः तपणे सुद्धा जास्त असते ह्यांच्या आयुष्यात.जसा सूर्य स्वतः वितळून जगाला प्रकाश देतो तसे हे इतरांसाठी स्वतःच्या आयुष्यात सतत तपत असतात म्हणजे संघर्ष आणि हे ह्यांची जोड पूर्ण आयुष्यभर असतेच.

त्यात सूर्य जसा दुपारी १२ ते ३ मध्ये जास्त तापत असतो त्या अनुषंगानेच जर एखादा सिंह राशीचा व्यक्ती ८० वर्षे राहणार असेल तर २२ ते ४०/४५ पर्यंत (साधारण २० पर्यन्त सुख, २० ते ४० संघर्ष, ६० नंतर सुख). सिंह राशीचा व्यक्ती जास्त संघर्ष करताना दिसतो कारण ह्याच वेळात सूर्याला आपण जास्त इग्नोर करतो तसे समाजाकडून ह्यांना अशा प्रकारची जास्त पीडा- त्रास सहन करावा लागतो. – ह्यावर टिपणी द्या. हे सर्व सिंह राशी साठी फिक्स आहे ?

सिंह राशीचा मूळ स्वभाव- Leo Personality

ह्या राशीचा स्वभाव जरी वर वर तापट असला तरी तो आतून हळवा असतो बऱ्याच वेळा स्वतःची दुःख इतरांना शेअर करत न बसणे हाच मूळ स्वभाव ह्यांचा इथे मान्य केला पाहिजे. तरी सुद्धा समोरच्या व्यक्तीला समजेल असा भाव चेहऱ्यावर ह्यांच्या असतोच ज्याने ह्यांनी न बोलता समोरील व्यक्तीला ह्यांना काय आवडले नाही ते कळते.

सिंह राशींच्या स्वभावात सहनशीलता आहे. आदर आहे. ह्या राशी च्या व्यक्ती नेहमी जबाबदारी झटकून कधीच मोकळे होणार नाही हेच ह्यांच्या स्वभावात असते. ह्या राशीच्या स्वभावात कधीच बालपण नसते. खट्याळपणा नसतो.

सिंह राशी आणि पिता ह्याचा संबंध-

सिंह राशी च्या व्यक्तींना कधीच वडिलांबरोबर सहमती नसेल किंवा त्याच्याबरोबर सर्व गोष्टी शेअर करणार नाहीत किंवा त्याच्याबरोबर पटणार सुद्धा नाही.

ह्यात सिंह राशीच्या कुणाला जर मकर अणि कुंभ पिता किंवा मोठा भाऊ म्हणून लाभले तर हे असे घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. कारण मकर कुंभ ह्या राशी शनी च्या आहेत आणि शनी ह्या राशीला आपला शत्रू मानतो.

सिंह राशी चे शिक्षण करिअर – Leo Education & Career

सिंह राशी हि अग्नी तत्वाची राशी आहे तशी मेष राशी सुद्धा अग्नी तत्वाची राशी आहे पण हा अग्नी सिंह राशीचा आहे आणि तो अग्नी मंगळाचा आहे. ह्याने हा सिंह राशीचा अग्नी अति सात्विक आहे त्या अग्नीपेक्षा 

ह्या व्यक्ती शिक्षण करिअर मध्ये इमाने इतबारे व्यवहार करतील. अति कष्ट घेतील हे नक्की.

म्हणून ह्या राशीला शिक्षण करताना जबाबदाऱ्या येतातच बऱ्याच सिंह राशी च्या व्यक्तींना शिक्षण करताना स्वतःच्या पायावर आधी उभे राहून नंतर शिक्षण करताना पहिले जाते तसे कष्टच ह्याच्या वाट्याला पाहण्यात येते. पुढे करिअर ला सुद्धा फाईट करावी लागते ह्यांना. 

पण ह्यात सिंह जसा आपली शिकार सोडत नाही म्हणून करिअर च्या मागे लागणाऱ्या सिंह राशीचे सुद्धा करिअर ९०% सक्सेस होताना पहिले जाते. काळजी अजिबात नको.

ह्या राशीला सरकारी नोकरीत प्रयत्न केल्याने यश मिळते असे निदर्शनात आले आहे. ह्यात ह्या राशींच्या व्यक्तींनी पत्रिकेत मंगळ हा जरूर चेक करावा. मंगळ मेष राशीत असेल किंवा सिंह राशीतच (स्वराशीचा) रवी असेल तर नक्की समजावे. (५ नंबर मध्ये रवी लिहिला असेल किंवा १ नंबर मध्ये मंगळ लिहिला असेल) अशा व्यक्तींनी आपले करिअर कोणत्याही सरकारी क्षेत्रात केलेले उत्तम.

राजनीतीत ह्या व्यक्ती लगेच प्रसिद्ध होताना दिसतात. ह्याच्या स्वभावात एक प्रकारचे आदेश देण्याचेच ठरलेले असते त्यामुळे कोणतेही टीम वर्क हे करू शकतात.

सिंह राशीच्या व्यक्तींच्या सर्कल मधील इतर व्यक्ती हे स्वतःला नेहमी सेफ समजतील.

ह्यासाठी पितृप्रधान राशी ह्याला नाव दिले आहे. जसे आपण वडिलांकडे सुरक्षितता अनुभवतो तसे.

अभिनय , जज, वकील, कोर्ट, जेलर, दिशा निर्देशक मीडिया , ऍनिमेशन चित्रकला , बँक, क्रीडा क्षेत्र , शेअर कंपनी , सोनार , सरकारी कॉन्ट्रॅक्टर , स्वतःची कंपनी , मेडिकल क्षेत्र कोणतेही. अशा करिअर अनुषंगाने शिक्षण करून पुढे प्रगती करण्यास हरकत नाही.

सिंह राशी च्या ५ ते २० वयातील मुलाच्या पालकांसाठी- Simha Rashi For Small Childrens

आपल्याकडे जी राशी घरात जन्माला आली आहे ती एक प्रौढ राशी आहे असे समजा. तीच्या वरील स्वभावाकडे थोडे सांभाळून घ्या. ह्यांना जास्त ऑर्डर करू नका. कारण किती ऐकतील ह्याची ग्यारंटी देता येत नाही.

त्याच्या शिक्षणात आपल्याकडून काही अडचणी होणार नाहीत उदाहरणार्थ घरातील वातावरण किंवा त्यांना लागणाऱ्या डेली नीड्स ह्याकडे लक्ष द्या. बऱ्याच सिंह राशी चा पहिला मुलगा हा त्या घराण्यातील वरील दोन विषयांवर त्रस्त झालेले पहिले आहेत . (घरातील वातारण किंवा घरात येणारी कोणतीही सुविधा) खास पैसे.

शिक्षणात अडथळे आलेत तर हे दोन विषय मुख्य कारणीभूत होतील बऱ्याच वेळा.

हाच विषय करिअर होताना सुद्धा कधी कधी अनुभवाला येतो. म्हणजे जर सिंह राशीच्या लोकांना करिअर शिक्षण करताना स्वतःला आपली आर्थिक सोय करावी लागते असे बऱ्याच वेळा निदर्शनात आले आहे.

घरात खूप श्रीमंती असली तरी मग रिलेशन चा आणि हट्टी स्वभावांमुळे वरील घटना घडतील हे नक्की. ह्यावर टिपणी द्या.

ह्याच्या करिअर मध्ये तुमचा निर्णय हा खूप कमी ग्राह्य धरला जाईल. ५ ते १२ वर्ष्याच्या सिंह राशीच्या मुलांमध्ये पोट छाती ह्यांच्या आजारांना सांभाळावे लागते.

सिंह राशी-वैवाहिक जीवन -Simha rashi marriage life 

जर तुम्ही स्त्री असाल तर जरा ऑर्डरफुल किती राहावे ह्यावर विचार करणे हितावह ठरेल. जर तुम्ही पुरुष असाल तर फक्त आपले कर्त्यवच म्हणजे संसार नाही दुसऱ्या अशा कितीतरी गोष्टी सुखाच्या असतात. संसारामध्ये ह्यावर लक्ष ठेवा.

दोघांनाही आपल्या वैवाहिक सुखांमध्ये खूप व्याप दिसतो. पण त्यात सिंह राशीचे घटस्फोट खूप कमी होताना दिसतील कारण हि राशी जास्त करून आपल्या जबाबदारीला झटकत नाही. कारण पितृप्रधानता ह्यांत असतेच थोडी तरी.

सिंह राशीच्या व्यक्तीं साठी धनु राशी हि रोमँटिक असेल. पण पैशाचे कोणतेही व्यवहार लग्ना अगोदर क्लिअर करून घ्यावेत. नंतर व्याप असतो.

सिंह राशी साठी वृश्चिक राशी बरोबर थोडे कमी पटेल. 

सिंह राशी ने मेष राशीबरोबर वैवाहिक जीवन अनुभवायला हरकत नाही जर दोघे आपल्या आपल्या टार्गेट वर करिअर करणारे असतील तर संसार सुखाचा होतो. मात्र ह्यात करिअर हा विषयच त्रासदायक ठरतो जर कुणाला संसार करताना आपले करिअर कुठेतरी सुटते आहे किंवा करिअरला त्रास होत आहे मग मात्र हे  निभावता येत नाही.

सिंह राशीला मकर कुंभ ह्या शनीच्या दोन्ही राशीबरोबर  पत्रिका चेक करूनच लग्न करावे असा सल्ला दिला जातो. तसा हा सल्ला सर्व राशीबरोबर लागू होईल कारण ह्यांच्या हाताखाली जे राहतील तेच सुखी बाकीच्यांना थोडा त्रास होईल.

सिंह राशीला संतान कमी होण्याचे जास्त चान्स असतात तेव्हा प्रॉपर प्लॅन मध्ये असावे.

सिंह राशींच्या वृद्धांसाठी -Simha rashi for senior citizen

सूर्य जसा संध्याकाळी ६ नंतर अस्ताला जातो तसा त्यातील ताप कमी असतो आणि थंड सुद्धा तेव्हढाच होत जातो. आपल्या राशीचा लीडर हा सूर्य आहे सध्या त्या पोजिशन मध्ये आहात तुम्ही तेव्हा जेव्हढे कष्ट ताप व्याप झेलतात तेव्हढे आता शांत होण्याचा काळ आहे. तेव्हा शांतपणे आपली दिनचर्या करायची वेळ हीच.

तरीसुद्धा ह्या वयातील राशीच्या लोकांना आता समाधान असते कि आपल्या आयुष्यात ज्या ज्या लोकांकरता आपण केले ते पूर्ण करून आपण समाधानी आहोत. फक्त ह्या राशींच्या या वयातील लोकांनी शारीरिक त्रासांना सामोरे जाताना डोकेदुखी , मूत्र , छाती , पोट , ब्लडप्रेशर ह्यावर लक्ष द्यावे.योग्य व्यायाम करावा.

एक विशेष –ह्या वयात सिंह राशीच्या घरात चोरीचे प्रकरण होण्याचा संभव असतो. लक्ष ठेवणे आपल्या अमूल्य गोष्टींवर.

ह्या वयात जलाशय आणि तीर्थक्षेत्री जाताना सावधानता आणि स्वतःला सांभाळून जावे काळजी घ्यावी. कारण तिथून आलेले आजार किंवा एखादा छोटा मोठा अपघात पुढे त्रास दिसेल.

सिंह राशी आणि प्रेम – Simha rashi love life

ह्या राशीचे लोक ह्या विषयात एकदम क्लिअर असतात. कॉन्फिडन्स मॅनेजमेंट खूप चांगले असते ह्यात. कधी कधी रोमॅंटिक खूप असतील. निष्ठावान खूप असतील , समोरच्याची काळजी घेणारे असतील , फिरणे ट्रॅव्हल करणे खुश असणे ह्यांना प्रेमात आवडते. 

ह्यांना उपयोगी वस्तू प्रेमात गिफ्ट म्हणून मिळलेली आवडते फुले वगैरे ह्याना दिलेत नाही तरी चालेल.

समोरच्याच्या चुकांना सांभाळून घेणारे असतील. प्रेमात अपटुडेट असणे ह्यांना आवडते. ह्यांना प्रेमात धोका अजिबात चालत नाही. त्यांच्या लेव्हल च्या व्यक्तींच्या वाट्यालाच हे जातील.

आपल्या अति खालच्या दर्जातील श्रेणीतील व्यक्तींबरोबर प्रेम खूप क्वचित होईल. अथवा होणारच नाही.

ह्यांच्या प्रेम आणि लग्न ह्यात जास्त अंतर दिसत नाही.

असे खूप कमी वेळा होते कि ८/१० वर्षांपासून प्रेम चालले आहे आणि अजून लग्न केले नाही. ह्यात पत्रिकेवरील ५ व्या स्थानावर अवलंबून असेल बाकीचे.

सिंह राशीचे शुभाशुभ

  • शुभ अंक – १ 
  • शुभ रंग – लाल 
  • शुभ राशी —मिथुन, तुला पासून फायदा. वृश्चिक पासून सम , मकर कुंभ पासून जास्त त्रास.
  • भाग्यशाली वर्ष  – १०, १४, १९, २३, ३६, ४१, ४६, ५०, ५५, ५९, ६४ 
  • शुभ दिशा – पूर्व
  • अशुभ दिशा – पश्चिम 

सध्या एव्हढे पुरे…

विशेष नोट — सर्व राशींबद्दल लिहिताना तुमच्या कंमेंट वाचून किंवा अजून काही अभ्यास करता करता ह्यात बदल केले जातील किंवा अजून काही पॉईंट्स टाकले जातील. तेव्हा सर्व सिंह राशींच्या माझ्या मित्र मैन्त्रिणींसाठी एक विनंती आहे कि हा लेख पूर्ण समजू नये. वेळोवेळी ह्याचे अपडेट वाचत जावे. निदान वर्षातून २/३ वेळा तरी.

शेवटी प्रत्येकाने आपल्या राशी बद्दल जे जे मिळेल ते ते घेत राहावे जीवन सुखकर होण्यासाठी.

आणि महत्वाचे — काहीही चुकीचे असेल तर ते पॉईंट इग्नोर करावेत सोडून द्यावेत.

This Post Has 2 Comments

  1. प्रज्ञा तुळसकर

    माझ्या मुलीची राश आहे ही…सांगितल्याप्रमाणे ती तशीच आहे थोडी…पण माझी रास ही कुंभ आहे. आणि माझे आणि तीच थोड कमी पटत…ती अजून १२ वर्षाची आहे….

    1. Devendra Kunkerkar

      धन्यवाद ,
      आपण कॉमेंट दिलीत , सिंह राशीच्या मुलांना जास्त वडिलांचे प्रेम मिळत नाही असे पत्रिका पाहताना खूप पहिले जात.
      तुम्ही तुमच्या मुलीला जास्तीत जास्त सांभाळून दोन्ही प्रेम देण्याचा प्रयत्न करा.

Leave a Reply