कुंडली गुण मिलन करताना नाडी दोष आणि माझे विचार ह्यावर खालील लिंक वर क्लिक करून वाचून घ्या.
https://shreedattagurujyotish.com/vivah-vishay-nadi-dosh-aani-maze-vichar/
आपण जर कुंडली मिलन विवाह करायच्या अगोदर करत असाल तर वरील इमेज मध्ये जिथे सर्कल केले आहे तो पार्ट भकूट चा आहे.अष्टकूट मधील हा सुद्धा भाग अति महत्वाचा ठरतो कारण ह्याला ३६ पैकी ७ गुण दिलेले असतात.
Table of Contents
काय आहे भकूट दोष
मुलाची किंवा मुलीची राशी हि त्यांच्या एकमेकांच्या राशी पासून २,५,६,८,९,१२ राशी असेल तर भकूट दोष दाखविला जातो. म्हणजे त्यात गुण मिलन मध्ये ७ पैकी ० गुण दाखवितात.
- मुली किंवा मुलाच्या एकमेकांच्या राशी पासून २री किंवा १२ वी राशी द्विद्वाश भकूट दोष निर्माण करतात.
- मुली किंवा मुलाच्या एकमेकांच्या राशी पासून ६ वी किंवा ८ वी राशी षडाष्टक भकूट दोष निर्माण करतात.
- मुली किंवा मुलाच्या एकमेकांच्या राशी पासून ५ किंवा ९ वी राशी नवपंचम भकूट दोष निर्माण करतात.
लग्न झाल्यावर काय होते भकूट दोष असेल तर?
अशा भकूट दोषात लग्न झाले तर कुणाला एकाला त्रास होण्याचा संभव नाकारता येत नाही. त्यातला एक पार्टनर लग्नानंतर स्वतःला आपण अनलकी आहोत असे मानण्यास सुरुवात करू शकतो. ह्याचे कारण लग्न झाल्यावर त्याच्या करिअर मध्ये किंवा हेल्थ मध्ये किंवा पैशासंबधित व्यवहारामध्ये कुठे तरी असे फील होत राहते कि लग्ना अगोदर हा विषय मला आनंद देणारा होता पण लग्न झाल्यापासून आता मी सध्या त्या विषयासाठी हैराण आहे.
२/१२ द्विद्वाश भकूट दोषात काय होते?
जर द्विद्वाश म्हणजे मुलामुलींच्या राशी पासून पार्टनर ची राशी १२ वी किंवा २ री राशी असेल आणि लग्न झाले तर ह्या जोडप्यांना आर्थिक गोष्टी पासून त्रास होण्याचा संभव असतो. किंवा दोघांमध्ये काही आर्थिक मतभेद असू शकतात.
मुलाच्या पगारावरून किंवा मुलीच्या पगारावरून इथे वाद होण्याचा संभव नाकारता येत नाही. मुलगी जर कमावती असेल तर आणि आपल्या राशी पासून २ ऱ्या किंवा १२ व्या राशीशी लग्न करत असाल तर लग्ना अगोदर मुलीच्या पगाराबद्दल विषय क्लिअर करून घ्यावेत. नाहीतर पुढे वाद होण्याचा संभव असू शकतो. कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी ह्या आपल्या राशी पासून २ री किंवा १२ वी राशी चांगली नव्हे.
६ किंवा ८ षडाष्टक भकूट दोषात काय होते
जर ६ किंवा ८ असेल तर अशा जोडप्यांना वैचारिक मतभेद होऊ शकतात. संबंध बिघडू शकतात. पत्रिकेत वैधव्य योग असेल तर किंवा डिवोर्स चे नियम लागत असतील तर हि स्थिती योग्य नाही. काही जणांना ह्यात आरोग्याचे त्रास सुद्धा जाणवू शकतात. पत्रिकेत ७ व्या स्थानाचा मालक हा कुठे बसला आहे तो कसा आहे त्यावर दृष्टी कुणाची आहे हे पाहून निर्णय घ्यावा.
५ किंवा ९ नवपंचम भकूट दोषात काय होते?
जर ५ किंवा ९ नवपंचम भकूट दोष असेल तर संतान प्राप्ती हा विषय त्रासाचा असू शकतो. जर आपण आपल्या राशी पासून ५ व्या किंवा ९ व्या राशीशी लग्न करत असाल तर कुंडलीचे ५ वे स्थान जरूर चेक करून घ्यावे. कारण ह्यात कॉन्सिव्ह होताना त्रास जाणवतो. झाला तरी पुढे त्या प्रोसेस ला चांगले फळ मिळताना दिसत नाही.
भकूट दोष होत नाही केव्हा ?
जरी एकमेकांच्या राशी पासून २,१२,५,९,६,८ वी राशी आली तरी भकूट दोष काही सॉफ्टवेअर मध्ये दाखवीत नाहीत कारण त्या राशींच्या मालकांमध्ये एकमेकांची मित्रता किंवा दोन्ही राशींचे स्वामी एकच असतात.
भकूट दोषात न येणाऱ्या राशी
खालील पहिल्या आणि दुसऱ्या कॉलम मधील ज्या राशी लिहिल्या आहेत जरी भकूट दोष असेल तरी तो लागत नाही. मात्र पहिल्या किंवा दुसऱ्या कॉलम च्या राशीच्या व्यक्तींनी त्याच कॉलम मधील राशीची विवाह करताना भकूट दोष लागणार नाही. जरी ती राशी तुमच्या राशी पासून २ री ५वी,६वी ८वी ९वी १२वी आली तरी.
राशी नंबर | राशी नंबर |
२- ऋषभ | १- मेष |
३- मिथुन | २- कर्क |
६- कन्या | ५- सिंह |
७- तुला | ८- वृश्चिक |
१०- मकर | ९- धनु |
११- कुंभ | १२- मीन |
- मेष ला वृश्चिक राशी (मेष पासून ८ वी आणि वृश्चिक पासून ६ वी) पण इथे दोन्ही राशीचा स्वामी मंगळ हा एकच आहे.
- ऋषभ ला तुला राशी ६ वी आणि तुला राशीला ऋषभ राशी ८ वी येते पण इथे दोन्ही राशींचा स्वामी शुक्र हा एकच आहे.
- मिथुन ला मकर राशी ८ वी आणि मकर ला मिथुन ६ वी येते.
- कर्क ला धनु राशी ६ वी आणि धनु ला कर्क राशी ८ वी येते.
- सिंह राशी ला मीन राशी ८ वी आणि मीन ला सिंह राशी ६ येते.
- कन्या ला कुंभ राशी ६ वी आणि कुंभ ला कन्या राशी ८ वी येते.
कारण वर दोन्ही गटातील राशीचे मालक हे त्याच गटातील राशींचे मित्र असतात. किंवा त्यांचे मालक एकच असतात . जसे सिंह राशी चा मालक रवी त्याच गटात असणाऱ्या मीन राशीचा मालक गुरु ह्यांच्याबरोबर मित्रता ठेवतो. आणि तुला राशीचा मालक शुक्र तो त्याच गटात असणाऱ्या कन्या राशीचा मालक बुध ह्यांच्याबरोबर मित्रता ठेवतो.
अशा वेळी हा भकूट दोषाची काट होते. पण काही सॉफ्टवेअर मध्ये असे असून सुद्धा त्याला ७ पैकी ० दाखविले जातात आणि एखादे चांगले स्थळ नाकारण्याची शक्यता होऊन बसते.
ह्यावर माझे मत
जर आपल्या राशी पासून २,५,९,६,८,१२ व्या राशीशी लग्न करत असाल आणि समोर ७ गुण दाखवीत असतील तरी आणि ० गुण मिळत असतील तरी द्वादश षडाष्टक आणि नवपंचम ह्यात मिळणारे लग्नानंतर चे परिणाम जाणून घेण्यासाठी योग्य ज्योतिषांचा सल्ला घ्यावा.
कारण काही ठिकाणी हि काट असून सुद्धा वाईट परिणाम मिळालेले आहेत. तेव्हा दोघांचे लग्न स्थान आणि महादशा पुढे कशा आहेत त्या चेक करून निर्णय घ्यावा असे माझे मत आहे.
धन्यवाद…..!
भकूट आणि वर्ण ह्यामध्ये दोन्ही ठिकाणी ० गुण असतील तर, ते लग्न यशस्वी होऊ शकणार नाही का? आणि जर नसेल, तर ते यशस्वी होण्यासाठी काय उपाय करावेत? कृपया मार्गदर्शन करावे.