You are currently viewing वृश्चिक राशी- Scorpio- एक विंचू

वृश्चिक राशी अक्षर:- तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू

राशी चक्रातील ८ वि राशी, गुप्तांगाची राशी, कालपुरुषाच्या मृत्यू स्थानातील राशी, मंगळाची राशी, विंचू चिन्हाची राशी, जल तत्वाची राशी, स्थिर राशी, चंद्राची नीच राशी.

आधी वृश्चिकेच्या नक्षत्रांची ची माहिती देतो.

ह्या राशीत ३ नक्षत्र — विशाखा, अनुराधा , जेष्ठा.  

 • जर तुमचा जन्म चंद्र ० ते ३:२० पर्यंत पत्रिकेत लिहिला आहे तर विशाखा नक्षत्र आहे तुमचे. गण – राक्षस आणि नाडी – अंत्य असेल.
 • जर पत्रिकेत आपला जन्म चंद्र ३:२० ते १६:४० डिग्री पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल तर अनुराधा नक्षत्र आहे. गण – देव आणि नाडी – मध्य असेल. 
 • जर जन्म चंद्र १६:४० ते २९:५९  पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल तर जेष्ठा नक्षत्र आहे आपले. गण – राक्षस आणि नाडी – आद्य असेल.

ज्या डिग्री वर तुमचा जन्म चंद्र असेल त्याप्रमाणे नक्षत्र गण नाडी ह्यांच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला मिळतील.  

नक्षत्र गण नाडी ह्या एकाच राशीत वेगवेगळ्या असतात म्हणून इथे देणार नाही जेव्हा ह्यावर अधिक प्रकाश पडेल तेव्हा तुमची डिग्री पाहून नक्षत्र गण नाडी बद्धल वाचू शकता आणि तुमच्या राशीचे कॉमन इफेक्ट त्यात मिक्स करू शकता.

सध्या कॉमन वृश्चिक राशी कशी आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

वरील सर्व बाजूंनी वृश्चिक राशीचा येणारा स्वभाव

१२ राशींमध्ये चर, स्थिर, द्विस्वभाव, ह्या क्रमवार स्वभाव गुणधर्माच्या राशी पैकी वृश्चिक राशी हि स्थिर स्वभाव राशी मध्ये मोडते.

पण १२ राशींमध्ये  अग्नी, पृथ्वी, वायू, जल ह्या क्रमवार तत्वामध्ये हि राशी जल तत्वामध्ये सुद्धा येते. 

त्यामुळे असे जल जे स्थिर असेल तर त्याचा एक ना दिवस चिखल होतो कारण स्थिर जल हे एकदा ना एकदा अस्वच्छ होतेच  म्हणून ह्या राशीचा स्वभाव सुद्धा कुणाला वर वर चंचल दिसतो पण हे आतून आपल्या टार्गेट वर फिक्स असतात. पण त्यांच्या मनाचा झालेला चिखल हा त्यांना फार नेहमी टेन्स मध्ये ठेवतो.

१२ राशी फिरत असताना जेव्हा चंद्र हा वृश्चिक राशीत येतो तेव्हा चंद्राला न आवडणारी हि राशी (नीच राशी चंद्रासाठी) म्हणून ह्या राशीत चंद्राची शुभ फळे मिळत नसल्याने स्वभावात चिडचिड , अति चंचल पण , मानसिक त्रास , आईला कष्ट ,अति भावुक, अस्थिरता ह्यांचे दुष्परिणाम दिसतात.

ह्या राशीत जेव्हा चंद्र येतो तेव्हा हि राशी मंगळाची असल्यामुळे ह्या व्यक्ती साहसी सुद्धा असतात. मंगळाच्या दोन्ही राशींना (मेष वृश्चिक) ऊर्जा जास्त असल्याने कोणत्याही टार्गेट वर आपली लढाई पूर्ण करण्याचा स्वभाव ह्यांना नेहमी लीडरशिप मध्ये अग्रेसर ठेवतो. आज झालेले नुकसान उद्या फायदा मिळविण्याचा स्वभाव.

कालपुरषाच्या पत्रिकेत १ ली राशी हि मेष लग्न स्थानात येते आणि ८ वि राशी वृश्चिक हि गुप्तांगाच्या ठिकाणी येते आणि गुप्तांगे हि आपण कधीही शो करत नाही म्हणून ह्या राशीत गूढ पण स्वभावात आपोआप येते. ह्यांच्या स्वभावाचा ठावठिकाणा कोणालाही उमगत नसतो. 

ह्या राशीचे चिन्ह हे विंचवाचे आहे. विंचवाला डंख मारायला कुणीही शिकविलेले नसते. पण त्याच्या नांगीवर कुणी पाय ठेवला तर तो डंख मारल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे काही वेळा क्रूरपणा , बदला घेण्याचा स्वभाव सुद्धा ह्या राशीत दिसतो.

वृश्चिक राशीचे शिक्षण आणि करिअर

जल तत्व आहे म्हणून आयात निर्यात व्यवसाय किंवा नोकरीत ह्या राशीवाले उत्तम काम करू शकतात.

गूढ राशी आहे म्हणून ज्योतिषी , डिटेक्टिव्ह संस्था ह्यात अग्रेसर दिसतील, कोणत्याही अशा विषयाचा अभ्यास जो समाजासाठी गूढ असेल त्यात प्रगती होते. 

मंगळाची राशी आहे म्हणून डिफेन्स मध्ये सुद्धा ह्या राशी अग्रेसर दिसतात जसे पोलीस , नेव्ही, मिलिटरी, एरफोर्स (जल थल वायू सेना)

किंवा एखादी सेक्युरिटी एजेन्सी सुद्धा.

मंगळाची राशी म्हणून राजनीती सुद्धा ह्यांना सूट होते. 

मृत्यू स्थानातील राशी आहे म्हणून असे करिअर जिथे मृत्यूची झुंज असते उद. हॉस्पिटल , (डॉक्टर , नर्स ,वार्डबॉय, लॅब टेक्निशियन) येथेही ह्या राशी अग्रेसर दिसतील.

हि राशी चंद्राची नीच तत्वाची राशी आहे म्हणून विषारी पदार्थाची रसायने एकत्र करून शिक्षण घेणे, त्यात काही सर्च करून नवीन समाजासमोर आणणे असे शिक्षण घेतल्याने सुद्धा प्रगती दिसेल. (शोध करणे असे क्षेत्र) 

खनिज पदार्थांचे व्यवसाय किंवा नोकरीत सफलता सुद्धा ह्या राशींना मिळते 

व्यवसायात कधीही वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी पार्टनरशिप करू नये असे माझे मत आहे पुढे पत्रिका पाहून सल्ला घ्यावा. 

वरील सर्व मुद्यांची शिक्षणे घेतली तर वृश्चिक राशी हि आपल्या करिअर मध्ये अग्रेसर दिसेल.

वृश्चिक राशीचे रोग

रक्ताचे कोणतेही दोष, छोटे मोठे अपघातातून झालेले त्रास, शरीरातील उष्णता, वीर्य दोष, स्वप्न दोष, मानसिक त्रास, फोड , त्वचा रोग, महिलांना मासिक धर्म चे त्रास , अति उष्णतेमुळे ताप डोळ्यांचे विकार.

ह्या राशींना जीवनात काही वर्षे तरी गुप्तेंद्रियांचा किंवा त्यापासून होणार त्रास होतोच. 

सल्ला — ह्या राशीच्या लोकांनी आपल्या सर्व इंद्रियांची जास्त स्वच्छता बाळगावी. बऱ्याच वेळा दुर्लक्षतेमुळे येथील त्रास उद्भवतात. 

वृश्चिक राशीचे वैवहिक जीवन

वैवाहिक जीवन जगताना शरीर सुखाबद्दल ह्या राशी अग्रेसर असतील. आणि तसे आपल्या वैवाहिक जोडीदाराबद्दल चांगले मत झाले तर ह्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद असेल.

वृश्चिक राशीचे वैवाहिक जीवन हे आपल्या पार्टनर बरोबर अधिकारी तत्वाचे सुद्धा असू शकेल. पण अति झाले तर वैवाहिक जीवनात अडथळे सुद्धा ह्यानेच उद्भवतील.

ह्या राशीच्या व्यक्ती वैवाहिक सुख वाढविण्याच्या कल्पनेत खूप मेहनती दिसतात. मात्र त्यांना किती यश मिळेल ह्यात शंका येते त्यामुळे अति सुखाच्या मागे लागणे आपल्या जोडीदाराबद्दल जास्त आशा बाळगणे ह्यांना कधी कधी त्रासदायक ठरू शकेल.

ह्या राशीत कोणताही ग्रह उच्च होत नाही म्हणून ह्या राशीत समोरचा पार्टनर कधीही उच्चत्व प्राप्त करीत नाही ह्याने ह्या राशी आपलेच खरे करून दाखविण्याकडे कल असल्यामुळे , जिद्दी स्वभावामुळे सांसारिक जीवनातील काही प्रसंगांना सामोरे जावे लागते.

वृश्चिक राशी हि गूढ तत्वाची राशी असल्यामुळे आपल्या सांसारिक पार्टनर ला आपल्या काही गोष्टी जास्त शेअर न केल्याने सुद्धा समस्या जाणवतील.  

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी  कधीही विवाह करताना घाई करू नये कारण हि मंगळाची राशी आहे. करिअर झाल्या शिवाय विवाह करूच नये ज्यांनी ज्यांनी करिअर च्या आशा पूर्ण न होता वैवाहिक जीवनात एन्ट्री केली असेल त्यांना त्यांना वैवाहिक सुख घेताना नंतर करिअर सेट होताना त्रास होतो.  कारण मंगळ तुमच्या राशीचा मालक आहे आणि तो ज्या वयात तुम्हाला लढाई करायला सांगतो तेव्हाच तुम्ही विवाह बंधनात अडकता. आणि नंतर तुमचा मंगळ हा त्या विषयात त्रास देतो उदा — शारीरिक सुख मिळत नाही किंवा तुम्हाला ते मिळविताना त्रास देतो कोणत्याही अडचणी समोर टाकून. हे माझे मत आहे ह्यावर टिपणी द्या. (कमेंट द्या)

वैवाहिक जीवनात जर पत्रिकेत गुरु स्ट्रॉंग असेल तर काही काळजी करू नये वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी.

वृश्चिक राशीच्या ५ ते २० वर्षाच्या मुला मुलींच्या पालकांसाठी

आपल्या घरात जर ह्या वयातील मुले असतील तर ते किती स्वच्छ राहतात आपल्या गुप्तांगाबद्दल ह्यावर विशेष लक्ष द्यावे.

ह्या वयातील विद्यार्थ्यांना विशेष लक्ष देऊन ह्यांचे शिक्षणामध्ये पालकांनी  सपोर्ट करावाच असे माझे मत आहे कारण ह्या राशीच्या मुलांना अति हट्टीपणा मुळे शिक्षणात त्रास होण्याची चिन्हे असतात. 

विशाखा अनुराधा आणि जेष्ठा ह्या तीन नक्षत्रातील मुले ह्या राशीत जन्म घेतात आणि ह्यातील जेष्ठा नक्षत्रातील मुलांवर जास्त मेहनत घ्यावी लागेल. त्याच्या आचार विचार वागणुकीत. ह्यात जर हेच नक्षत्र असेल तर बऱ्याच वृश्चिकेच्या  आई वडिलांना एकत्र कुटुंबात त्रास होताना दिसतो आणि विभक्त पणा येतो कुटुंबापासून वेगळे व्हावे लागते मुलांच्या ५ व्या वयापर्यंत असा अनुभव ९०% दिसतो जर वृश्चिक राशी आणि जेष्ठा नक्षत्र असेल मुलांचे 

बाकी सुद्धा दोन्ही नक्षत्रातही  वृश्चिक राशी घरात असेल तर काही ना काही कौटुंबिक वाद विवाद दिसण्यात आलेली आहेत.

तेव्हा अशा विषयी सावधानता बाळगावी. येथे मुलांपासून काहीही दोष समजू नये कारण ह्या राशीचा  प्रोसेस सुरु होत असताना आईला ९ महिन्याच्या प्रोसेस मध्ये घरातील असा त्रास जाणवायला सुरुवात होतेच. मानसिक चिडचिड होतेच.

चांगले असे कि ह्यात माता ह्या अति त्रास घेऊन सुद्धा त्या मॅनेज करतात सर्व कष्टाना.

वृश्चिक राशीच्या आईने ह्या मुलांना जास्त सर्व्हिस देण्यास जाऊ नये असा हि सल्ला मी नेहमी देतो कारण भाग्योदयात ह्यांना जास्त अडचणी येतात नंतर. उदा — करिअर चा सल्ला देताना।  विवाह ठरविताना आईने जास्त निर्णय घेऊ नये. बाकी घरातील इतर जणांनी सल्ला द्यावा ह्यांना.

वृश्चिक राशी आणि आई ह्यांची एव्हढी अट्याचमेंट असते कि ते एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न आयुष्यभर करत असतात पण त्यात किती सक्सेस होतील शंका आहे. म्हणून हीच अट्याचमेंट पुढे मानसिक कष्ट देते. 

ह्यात एक उदाहरण देतो– जर वृश्चिक राशीच्या मुलाने लग्न केले तर सून येऊन सेवा करेल अशी आशा आईने बाळगली तर एकतर मुलाचे लग्न होताना किंवा झाल्यावर असे त्रास होतात कि जेणे करून आईला सुनेकडून सेवा करून घेणे हा योगच येत नाही. आणि करिअर मध्ये सुद्धा असेच जाणविते.

हे माझे मत मी मांडले आहे ह्याचा अभ्यास करताना असे अनुभवास आले कि वृश्चिक राशी हि कोणत्याही ब्लड रिलेशन ला मॅनेज करण्यासाठी नव्हे ह्यांनी नेहमी समाजासाठी , एनजीओ साठी , राजकारणासाठी आपल्या जीवनातील काही अंश द्यावा असे आईवडिलांचे मत असले पाहिजे — ताजे उदाहरण – नरेंद्र मोदी , अटलबिहारी बाजपेयी.

तेव्हा वरील विवेचन वाचून आपण त्याचे करिअर विवाह ची दिशा ठरवावी असा सल्ला देण्यात येतो.

आपल्या कॉमेंट्स ह्या विषयी आल्या तर त्यावर जास्त अभ्यास करण्यासाठी मला वाव मिळेल.

वृश्चिक राशीचे प्रेम संबंध

ह्या राशीच्या स्वभावात चंचलपणा , गूढ तत्व , रागीटपणा , चिडचिड पण जर जास्त होत असेल तर प्रेमप्रकणात बऱ्याच अडचणी येतात.

ह्या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव प्रेमात सरळ असतो म्हणून सावधान. कामुक पण म्हणजे प्रेम नव्हे असा सल्ला नेहमी ह्या राशीच्या लोकांनी लक्षात ठेवावे लागेल असे माझे मत. ह्या राशीच्या प्रेमाचे लग्नात रूपांतर होताना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागेल एव्हढे सुलभ नाही म्हणून विचार करूनच ह्यात पदार्पण करावे. वृश्चिकेचा प्रेम विवाह झाला तर अशा जोडप्याना संतान सुखात व्यत्यय येताना दिसते. तेव्हा कधीही प्रेमात शारीरिक सुखाची अपॆक्षा करून प्रेम करू नये.

वृश्चिक राशीच्या मुलींना प्रेमप्रकरणात एक विशेष सल्ला देण्यात येतो कि आपण आपले शिक्षण आपली फिल्ड आपले कुटूंब ह्याच्या मर्यादेत राहून प्रेमात जोडीदार पाहावा. बऱ्याच वेळा ह्या राशीच्या मुलींचे प्रेम त्याच्या पेक्षा कमी लायकी असणाऱ्या मुलांबरोबर पाहायला मिळाले आहे. किंवा होण्याची शक्यता फार असते. सावध राहावे. त्रास होईल.

तसे ह्यांचे प्रेम हे सक्सेस होताना दिसते कारण कुणाचे नुकसान न करण्याचा आणि सॅक्रिफाईस होण्याचा ह्यांचा स्वभाव इथे कामाला येतो.

पण ह्यांना प्रेमात कुणी चिट केले तर त्याला ते माफ करत नाहीत आणि त्याचा राग कधी ना कधी काढतात.

वृश्चिक राशींच्या वृद्धांसाठी –६० +

ह्या वयातील ह्या राशीच्या व्यक्तींना एकटेपणा सतावतो त्यामुळे त्यावर आपण नेहमी सर्वाना सांभाळून ह्यापुढे राहावे असा सल्ला देण्यात येतो. ह्या वयात वरील प्रमाणे जे जे रोग दिले आहेत त्यात काळजी घ्यावी.

आपण केलेले करिअर आणि त्यातून जमा झालेला पैसा व्यवस्थित वापरावा कारण ह्या वयात आपल्याला किती सपोर्ट मिळेल ह्यावर शंका आहे ह्याचे कारण ह्या वयानंतर व्यक्ती वर शनी चा प्रभाव असतो आणि मावळत्या सूर्याचा सुद्धा. म्हणून सूर्य जरी ह्या राशीचा मित्र ग्रह असला तरी शनी हा ह्या राशीचा शत्रू आहे. (खास हे त्रास ज्यांनी ज्यांनी आयुष्यात आपल्या आईचे मन दुखावले असेल अशाना झालेला आहे असे माझे मत आहे) बाकीच्यांना काहीच त्रास नसतो एंज्योमेन्ट असते ह्या वयात.

शेवटचा सल्ला — जर आपले स्वतःचे ६० वरील आयुष्य मजेत घालवायचे असेल त्यांनी त्यांनी आत्तापासून आईची जबाबदारी घ्यावी आणि तिची काळजी सुद्धा. जरी तिच्यापासून दूर असलात तरी.

असा वृश्चिकेचा एकही व्यक्ती सक्सेस झाला नाही ज्याने आपल्या आईला त्रास दिला असेल. पण हे वयाच्या ३०/३५ नंतर ग्राह्य धरावे कारण त्या आधी आईला सुख देणे ह्या राशीच्या व्यक्तीना जमत नाही असा अनुभव आहे. नीच चंद्राचा प्रभाव दुसरे काही नाही.

वृश्चिक राशी आणि शुभाशुभ

 • शुभ अंक:- ९ ह्या वातिरिक्त १,२,३ अंक सुद्धा शुभ असतील 
 • अशुभ अंक:-  ४,५,६ 
 • सम अंक:- ७,८ (नफा नुकसान काहीच नाही)
 • भाग्यशाली वर्ष:- १६,२२,२४ ते २८,३६ 

२५,२८,३३ इच्छाविरुद्ध परिवर्तन वर्षे सावधानी बाळगावी.

 • खालील ४ महिने शुभ:- शत्रूला शमविण्यासाठी, आरोग्या साठी करिअर साठी.

१४ जान ते १३ फेब 

१३ एप्रिल ते १२ मे

१७ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर 

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर 

 • शुभ रंग:- लाल (स्वतःजवळ लाल रंगाचा रुमाल अव्यश्य ठेवावा किंवा कपडे परिधान करावेत)
 • शुभ दिवस:- मंगळवार 
 • इष्ट देव:- हनुमंत आणि गणेश 
 • उपासना:- पूर्णिमेचे व्रत 
 • शुभ मंत्र:- ॐ गं गणपतये नमः आणि ॐ हं हनुमतये नमः (रोज करावा) 

वृश्चिक राशीचा एकाक्षरी  मंत्र आहे ” हं ”

 • दान:- प्रत्येक मंगळवारी मिष्ठान्न गरीबाला दान करावे .

मसूर डाळ + गूळ गायीला मंगळवारी खाऊ घालावा. 

लाल बुंदीचे लाडू हनुमंताला एका द्रोण मध्ये ठेऊन प्रार्थना करावी. जमत नसेल तर गरिबांना वाटप करावेत.

जीवन सुखकर होण्यासाठी वरील शुभाशुभतेचे  पालन जरूर  6 महिने वर्षभर करून अनुभव घ्यावा.

सध्या एव्हढे पुरे…

विशेष नोट — सर्व राशींबद्दल लिहिताना तुमच्या कॉमेंट वाचून किंवा अजून काही अभ्यास करता करता ह्यात बदल केले जातील किंवा अजून काही पॉईंट्स टाकले जातील. तेव्हा सर्व वृश्चिक राशींच्या माझ्या मित्र मैन्त्रिणींसाठी एक विनंती आहे कि हा लेख पूर्ण समजू नये. वेळोवेळी ह्याचे अपडेट वाचत जावे. निदान वर्षातून २/३ वेळा तरी.

शेवटी प्रत्येकाने आपल्या राशी बद्दल जे जे मिळेल ते ते घेत राहावे जीवन सुखकर होण्यासाठी.

आणि महत्वाचे — काहीही चुकीचे असेल तर ते पॉईंट इग्नोर करावेत सोडून द्यावेत.

धन्यवाद…….!

This Post Has 3 Comments

 1. Yadnesh Ramesh Dalvi

  Nice information 👌😃

  1. Smita chavan

   100 percent correct information about vrichik Rashi just like you are showing the mirror to the person of vrichik Rashi that u r like this good predictions. I really impressed

 2. Abhijit Thigle

  नमस्कार ताई, मी अभिजित ठिगळे सांगली वरून आहे.
  माझ्या मुलीची जन्म तारीख १६/०६/२०२२ वेळ ०९/३८ सकाळी अशी आहे.
  तरी कृपया आपण तिझ्या साठी योग्य नाव सांगू शकाल का …🙏🏻

Leave a Reply