You are currently viewing विवाह विषय नाडी दोष आणि माझे विचार

विवाह विषय नाडी दोष आणि माझे विचार

Nadi Dosh

वर दाखविलेला एक इमेज हा सर्वानाच परिचयाचा असेल जे जे आपल्या लग्नाच्या आधी आपल्या जोडीदाराबरोबर किती गुण जुळतात हे पाहण्यासाठी पत्रिका मिलन साठी पाहिले जाते त्यातलाच हा प्रकार नाडी दोष ह्याला अष्टकूट मधील ८ गुणांचा पेपर असे म्हणतात. (Nadi dosh in Marathi)

वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रह मैत्री, गण, भकूट, नाडी ह्या अष्टकुटात नाडी हा विषय येथे मांडण्याचा प्रयत्न करतो जो ह्यात फार महत्वाचा पार्ट आहे. ह्याचे कारण आपण पाहिले असेल कि इथे नाडी ला ८ गुण दिले आहेत. सर्वात जास्त गुणांचा चा पेपर म्हणजे नाडी.

वरील उदाहरण इमेज मध्ये.

 • वर्ण ला १ गुण
 • वश्य ला २ गुण
 • तारा ला ३ गुण
 • योनी ला ४ गुण
 • ग्रह मैत्री ला ५ गुण
 • गण ला ६ गुण
 • भकूट ला ७ गुण
 • नाडी ला ८ गुण

नाडी ह्या विषयाला सर्वात जास्त गुण असल्यामुळे इथे हा विषय आधी मांडतो.

नाडी चे प्रकार आणि नियम

नाडी प्रकारात ३ नाड्या — आद्य – मध्य – अंत्य

 • आदी अथवा आद्य: ह्यात जर आपला जन्म खालील नक्षत्रांवर झाला असेल तर आपली आद्य नाडी असेल. अश्विनी, आर्द्रा, पुनर्वसू, उत्तरा फाल्गुनी, हस्त, जेष्ठा, मूळ, शततारका, पूर्वा भाद्रपदा. ह्या नाडीला पिंगला नाडी सुद्धा म्हणतात. ह्या नाडीवर जन्म घेतलेले जातक वात प्रवृत्ती चे मानले जातात. ह्या नाडीवर ब्रह्मा चे शाशन असते.
 • मध्य: ह्यात जर आपला जन्म खालील नक्षत्रांवर झाला असेल तर आपली मध्य नाडी असेल. भरणी, मृगशीर्ष, पुष्य, पूर्वा फाल्गुनी, चित्रा, अनुराधा, पूर्वाषाढा, धनिष्ठा, उत्तरा भाद्रपदा. ह्या नाडीवर जन्म घेतलेले जातक पित्त प्रवृत्ती चे मानले जातात. ह्या नाडीवर विष्णू चे शाशन असते.
 • अंत्य: ह्यात जर आपला जन्म खालील नक्षत्रांवर झाला असेल तर आपली अंत्य नाडी असेल. कृतिका, रोहिणी, आश्लेषा, मघा, स्वाति, विशाखा, उत्तराषाढा, श्रवण आणि रेवती. ह्या नाडीवर जन्म घेतलेले जातक कफ प्रवृत्ती चे मानले जातात. ह्या नाडीवर शिवाचे शाशन असते.

काय होते जर पती पत्नी ची नाडी सारखी असेल तर

 • जर दोघांची आद्य आद्य नाडी असेल तर तिथे पुरुष स्त्रीला भारी पडतो.
 • जर दोघांची अंत्य अंत्य नाडी असेल तर इथे स्त्री पुरुषाला भारी पडते.
 • जर दोघांची मध्य मध्य नाडी असेल तर हे दोघेही स्वतःला पूर्ण मानतात. त्यांना एकमेकांची आवश्यकता नसते अशातला भाग होतो.
 • अष्टकूट मधे आपल्या दोघांची नाडी एकच असेल तर शून्य गुण दाखविले जातात.

जर दोघांची एकच नाडी असेल आणि विवाह झाला तर इथे शारीरिक पीडा किंवा शारीरिक संबंध करताना एखादा त्रास होण्याची शक्यता फार असते. असे कोणतेच कारण नसेल तर शरीर सुख घेताना काही कारणे समोर असू शकतात. जसे एखादे नेहमीचे टेन्शन, (मानसिक त्रास), किंवा वेळ न मिळणे किंवा एकमेकांपासून चा काही कारणाने दुरावा.

जर वरील प्रकार दिसला नाही आणि समजा मूल झालेच कोणताही त्रास न होता तर अशा सर्व मुलांना आईवडिलांना सांभाळण्यासाठी खालील त्रास १००% होताना पाहिले गेले आहेत. त्यांच्यातली न्यूनगंडता, एखादा आजार, एखाद्या विषयावरील त्रास हा नेहमी त्याच्यासमोर असतोच. काही ज्योतिषांच्या मते इथे दोघांपैकी एकाचा मृत्यू हे कारण सुद्धा सांगण्यात येते ह्यावर मी अजून ठाम नाही.

>>हेही वाचा : ज्योतिष शास्त्रात राशीचे महत्त्व

मोबाईल नूमरॉलॉजि: काय सांगतात आपल्या मोबाईल नंबर मधील अंक?

एकच नाडी पण नाडी दोष नाही असे केव्हा होईल ?

मुलगा आणि मुलीची एकच नाडी असेल पण नक्षत्र वेगवेगळे असेल.

मुलगा आणि मुलीची एकच नाडी असेल एकच नक्षत्र सुद्धा असेल पण राशी वेगवेगळी असेल. ह्याचा निर्णय घेताना फक्त योग्य ज्योतिषांचा सल्ला घ्यावा हि विनंती. स्वतःहून काही निर्णय घेऊ नये.

नाडी दोष आणि ज्योतिषीय उपाय

जर वधू (मुलगी) आणि वर (मुलगा) ह्यांची नाडी एकच असेल तर विवाह न करावा असे आपल्याला सांगण्यात येते. पण विवाह झालाच असेल तर ह्यावर खालील उपाय करून आपले त्रास काही प्रमाणात दूर करू शकता. (नाडी दोषावर उपाय मराठी )

 • अशा जोडप्यांची सर्वात प्रथम शिवाला शरण जावे. कोणतीही शिव उपासना आपल्याला खूप प्रमाणात त्रास कमी होण्यास मदत करेल. जसे शिव पिंडीवर जलाभिषेक दुग्धाभिषेक करणे प्रत्येक सोमवारी किंवा रोज, रुद्राभिषेक (लघु रुद्र महारुद्र) वर्षातुन एकदा करणे वगैरे. लग्न झाल्यावर प्रथम निदान ५ वर्षे तरी करत राहावे. महामृत्युंजय मंत्र सुद्धा आपल्याला ह्यात अवश्य मदत करेल.
 • आपल्या जन्म दिवशी गरिबांना सात्विक भोजन अन्न दान करत रहावे.
 • घरात जर शक्य असेल आणि रोज शिव उपासना घरात करायची असेल तर फक्त स्फटिक शिवलिंगाची स्थापना करावी आणि रोज अभिषेक करावा. त्यात जलाभिषेक करून चंदन लेप लावून रोज एक तीन बेलपत्र अर्पित करावे.
 • शक्य असल्यास ब्राह्मणांना सोन्याचा नाग किंवा सोने दान करावे असे सुद्धा सांगितले गेले आहे (शक्य असल्यास करून घ्यावे)
 • लग्न करण्या अगोदर किंवा नंतर सुद्धा आपली पत्रिका योग्य ज्योतिषांना दाखवूनच लग्न करावे त्यात दोघांचे कुंडलीचे ५ वे स्थान किती मजबूत आहे ते जरूर चेक करावे. एक संतान झाली असेल आणि दुसऱ्याचा विचार करताना सुद्धा ह्या बाबी चेक करूनच निर्णय घ्यावा.
 • पती पत्नी पैकी एखाद्याला शारीरिक त्रास सहन करावा लागत असेल तर अशा वेळी आजारी व्यक्तींना जास्तीत जास्त कोणतीही मदत करत रहावी.

धन्यवाद…..!

नवनवीन माहिती साठी श्री दत्तगुरु ज्योतिष या Telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Telegram बटणावर क्लिक करा.

Leave a Reply