You are currently viewing गुण मिलन आणि कुंडली मिलन ह्यातला फरक-  माझे विचार

हल्ली कितीतरी सॉफ्टवेअर आपल्याला विवाह करताना गुण मिलन ची सुविधा देतात. ह्यात ३६ पैकी १८ गुण किंवा अधिक दाखवीत असतील तर विवाह करण्यास हरकत नाही असे सर्वांचे मत असते. आणि त्यात लिहून हि येते कि विवाह करण्यास हरकत नाही.

हा प्रयोग करण्यास हरकत नाही पण माझ्या मते ह्यात थोडे नुकसान सुद्धा होण्याचा संभव नाकारता येत नाही जेव्हा पत्रिका जुळत असून सुद्धा गुण कमी पडल्यामुळे काही मुलामुलींचे फार नुकसान होते एखादे स्थळ हे ह्या विषयासाठी नाकारले जाते.

ह्यात जर उदाहरण द्यायचे असेल तर सर्व सॉफ्टवेअर मध्ये एकाच नाडीत आणि भकूट दोष मध्ये फार गोंधळ होतो. त्यात ० गुण दाखविले जातात त्याचा काट दाखविला जात नाही त्यामुळे ८ किंवा ७ मार्क आपले डायरेक्ट कमी होऊ शकतात. कारण अशा काही तरुण पिढी ह्या प्रोसेस मध्ये पडून अजून लग्नाचे राहिले आहेत.

माझ्या मते आपण अशा कोणत्याही गुण मिलन सॉफ्टवेअर चा वापर करत असाल तर जरूर एकदा योग्य ज्योतिषाकडे जाऊन ह्याची पडताळणी करून घ्यावी.

गुण मिलन बरोबर पत्रिका मिलन का?

कारण फक्त गुण मिलन मध्ये आपल्याला अशा गुणांचा चार्ट मिळतो ज्याने पती पत्नी एक दुसऱ्यासाठी योग्य आहेत का पण त्यात त्यांच्या आरोग्य संतान कॅरेक्टर स्वभाव आर्थिक व्यवहार प्रॉपर्टीज, गुंतवणूक जे आत्ताच्या घडीला संसार करताना महत्वाचे विषय बनले आहेत हे पाहण्यास कठीण होते.

जेव्हा ५०० वर्षांपूर्वी गुण मिलन मध्ये अष्टकूट चेक करत होते तेव्हाचा काळ हा वेगळा होता. तेच जर आपण आत्ता वापरत असू तर काही वेळी नुकसान होण्याचा संभव नाकारता येत नाही.

आजच्या तरुण मुलामुलींनी ह्याचा विचार करून निर्णय घ्यावा कि एकतर ह्यात पडूच नये बिनधास्त लग्न करून घ्यावे. किंवा जर गुण मिलन करत असाल तर कुंडली मिलन दोघांचे करूनच लग्न करावे. फक्त जर गुणमिलन ३६ गुणांचा पेपर कसा आहे हे पाहूच नये.

आधीच निर्णय घेतला असेल आणि गुणमिलन करत असाल तर

हल्लीच्या तरुण मुलामुलींना एक नम्र विनंती जर आपण आधीच एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा आपल्या आयुष्यासाठी निर्णय घेतला आहे तर नंतर ज्योतिषांकडे जाऊ नयेच. जर गेलात तर सरळ सांगावे कि आम्ही आमचा निर्णय घेतला आहे तुम्ही फक्त आम्हाला आमचा संसार करताना कोणत्या अडचणी येतील ह्याचे विश्लेषण करून सांगावे. जेणेकरून त्या बद्दल आधीच कल्पना येऊन तुम्ही त्यात सावधान राहाल.

अशा कितीतरी पत्रिकेत जर विवाहानंतर बाहेरील संबंध होतील किंवा आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा संतान विषय असेल तर मार्गदर्शन करता येते.

कोणत्या वयापर्यंत गुणमिलन किंवा पत्रिका मिलन करावे

आत्ताच्या मुलामुलींना नम्र विनंती जर आपले लग्न वयाच्या ३६ नंतर सुद्धा होत नसेल तर अशा प्रोसेस मध्ये पडू नये हा धोका आहे. ह्याने तुमचे नुकसान होऊ शकते कारण समोरील आलेली पत्रिका आता नाकारण्याची हिम्मत ह्या वयात करू नये. पत्रिकेत इतर गोष्टी पाहून निर्णय घ्यावा.

धन्यवाद…..!

Leave a Reply