You are currently viewing राहूचा ऋषभ राशीत आणि केतूचा वृश्चिक राशीत प्रवेश

दिनांक २३ सप्टेंबर २०२० ला दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी राहू मिथुन राशीतून ऋषभ राशीत प्रवेश करत आहे. तो वृषभ राशीत १२ एप्रिल २०२२ पर्यंत दुपारी ३ पर्यंत राहील. नंतर तो मेष राशीत जाईल.

प्रत्येक ग्रह हा अवकाशात एकाच जागी स्थिर नसतो. तो आपले भ्रमण हे नेहमी १२ राशीतून करत असतो.

  • जसे सूर्याला एका राशितून दुसऱ्या राशीत जाण्यास ३० दिवस लागतात
  • चंद्राला ३५४ दिवस लागतात
  • शनीला २.५ वर्षे लागतात
  • गुरूला साधारण १३ महिने लागतात
  • तसे राहू ला देखील एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यास १८ महिने लागतात.

ह्यात राहू आणि केतू चे भ्रमण सारखेच असते कारण राहू च्या अगदी समोरच्या स्थानातील राशीत केतू असतोच. सर्व ग्रह आपले भ्रमण एका राशीतून नेहमी पुढील राशीत करतात पण राहू आणि केतू हे नेहमी उलटे फिरतात.

सर्व ग्रह एका राशीत असताना ० डिग्री पासून सुरुवात करून ३० डिग्री पर्यंत त्या राशीत असतात आणि पुढील राशीत प्रवेश करतात. पण राहू केतू हे ३० डिग्री पासून सुरु होऊन ० डिग्री कडे उलटे भ्रमण करत करत मागील राशीत प्रवेश करतात.

उदारणार्थ — दिनांक ७ मार्च २०१९ पासून राहू मिथुन राशीत आल्यानंतर तो त्याची ० डिग्री दिनांक २३ सप्टेंबर ला केल्यानंतर तो मिथुन राशीतून वृषभ राशीत जात आहे आणि ऋषभ राशी पासून ७ वि राशी (वृषभ च्या समोरील राशी) वृश्चिक राशीत केतू जात आहे.

कोणी असे समजू नये कि ह्या दोन राशी सोडून राहू केतू चे परिणाम हे आमच्या राशीला नाहीत तर तसे होत नाही.

चंद्र कुंडलीत राहू आणि त्याच्या समोरील स्थान केतू असेल आणि हि स्थाने प्रत्येक कुंडलीत कोठे आहे त्या स्थानाची सर्व फळे त्या राशीला मिळणार आहेत. लग्न कुंडलीत सुद्धा हेच असेल कि राहू आणि केतू तुमच्या पत्रिकेत हे कोणत्या स्थानातून गोचर (भ्रमण) करत आहेत त्या स्थानातील फळे हि राहू केतू कसे देईल हे पाहावे लागेल.

आता दोन दोन कुंडल्या का पाहाव्यात जेव्हा एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतो.

चंद्र कुंडली हि तुमच्या मनाची कुंडली असते त्यात ग्रह हे कोणत्या स्थानातून भ्रमण करीत आहेत ह्यावरून तुमचे भविष्य ठरत असते आणि लग्न कुंडली हि तुमच्या ऍक्टिव्हिटी दाखवीत असल्यामुळे तुमच्या लग्न चार्ट मध्ये एखादा ग्रह कोणत्या स्थानातून सध्या फिरत आहे हे पाहून तुमची ऍक्टिव्हिटी तुम्हाला त्या स्थानाची काय काय फळे देतो हे पाहावे लागते.

म्हणून ज्यांचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे अशा सर्वाना एक माझा आग्रह असतो कि प्रत्येक ग्रह हा तुमच्या साठी काय घेऊन येत आहे हे पाहण्यासाठी निदान राहू केतू शनी रवी गुरु ह्यांचे भ्रमण पाहून घ्यावे कारण ते एका स्थानातून जाण्यासाठी बराच कालावधी असतो.

सर्वात चंद्र फक्त एका राशीत सव्वादोन दिवस असतो म्हणून तुम्ही रोज चे राशी भविष्य हे चंद्र कुंडलीतून ऐकता किंवा पेपर मध्ये पाहता.

सध्या इथे २३ तारखेपासून राहू चे आणि केतुचे भ्रमण चा विचार करणार आहोत.

राहू केतू च्या साधारण भ्रमणाची व्याख्या

राहू जिथे असेल त्या स्थानात तो स्वतः येऊन त्याची फळे तुम्हाला देण्यासाठी तो उत्सुक असतो म्हणून ते स्थान कसले आहे हे पत्रिकेत पाहिले कि कळते कि तुम्ही कशासाठी प्रोत्साहित होणार आहात. किंवा तो तुम्हाला कशासाठी उत्तेजित करेल.

केतू जिथे असेल तो मंगळासारखे फळ देत असल्यामुळे त्या स्थानातील ऍक्टिव्हिटीसाठी तुमचा पराक्रम दिसेल. लढाई कराल पण जास्त कॉन्फयुज्ड सुद्धा असाल. त्या स्थानातील फळे मिळविण्यासाठी तुमची धावपळ होईल.

हे आपल्याला प्रत्येक राशी साठी हळू हळू प्राप्त होईल. पुढील दिवसातून ह्याचे विवेचन हे वेळो वेळी केले जाईल

सर्वाना हे राहू केतू चे भ्रमण पुढील १८ महिने काय काय देईल , समाजासाठी कसे फळ असेल , राजकारणात कसे फळ असेल आणि आपल्या भारत देशाबरोबर इतर सर्व देशांना सुद्धा काय काय फळ देईल ह्यावर लिहिण्याचा प्रयत्न करेन वेळोवेळी.

ह्या राहू केतूच्या गोचरीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

एक विशेष नोट —
मागे राहू मिथुन राशीत होता ७ मार्च २०१९ पासून ते २३ सप्टेंबर २०२० पर्यंत. त्याची फळे सर्व जगाने पहिली आहेतच .

पण इतकेच सांगेन राहू च्या कोणत्याही ऍक्टिव्हिटीज ला कोणताही मनुष्य अजून ओळखू शकला नाही. फक्त एक ज्योतिषी म्हणून तो आकलन करून आपले विचार मांडत असतो. त्यात माझे विचार मी आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करेन.

सर्वाना विनंती आहे कि आधी त्यांनी मी राहू वर लिहिलेही पोस्ट मी ‘राहू बोलतोय राहू’ हि वाचून घ्यावी.

मी राहू बोलतोय राहू- भाग १:- https://shreedattagurujyotish.com/mi-rahu-bolatoi-rahu-part-1/

मी राहू बोलतोय राहू- भाग २:- https://shreedattagurujyotish.com/mi-rahu-bolatoi-rahu-part-2/

ह्यात मी असे नमूद केले आहे कि दिनांक २४ पासून महामारी साठी चांगले रिझल्ट मिळतील कारण राहू हा शुक्राच्या वृषभ राशीत जात आहे आणि शुक्र त्याचा गुरु (टीचर) आहे. थोडे तरी नमेल अशी आशा धरू.

पण दिनांक २१/५/२०२० पासून राहू मृगशीर्ष नक्षत्री आहे आणि तो २७/१/२०२१ पर्यंत असेल. हे नक्षत्र मंगळाचे आहे आणि मंगळ त्याचा शत्रू आहे म्हणून जरा भीती आहे दुसरे काही नाही. ह्या काळात जे उलट सुलट पावसाचे प्रमाण हे मृगशीर्ष राहूचेच फळ जाणावे. ज्या प्रांतात कधीच पडत नव्हता तिथे तिथे त्याने पूर परिस्थिती निर्मण केली आहे.
असो.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. Jayesh Balsara

    Chagli mahiti denya sathi Dhanyavad saheb.

Leave a Reply