मी राहू बोलतोय राहू – भाग २

मागील काही वर्षांत महामारीमुळे सर्वात वाईट परिस्थिती करणाऱ्या महामारीत माझा रोल

मी राहू बोलतोय राहू- १९१८ साली स्पेनिश फ्लू ने ५ करोड च्या वर जगात माणसे मारली गेली तेव्हा मी जुलै १९१८ पासून वृश्च्छिक राशीत येत होतो. जी मंगळाची राशी आहे. मंगळाच्या कोणत्याही नक्षत्रात किंवा राशीत असताना मी धुमाकूळ घालतोच.

१८५५ ला प्लेग ची महामारी भारत, चीन, हँकोन्ग मिळून १.५ करोड माणसे मारली गेली. तेव्हा सुद्धा मी मेष राशीत होतो.

HIV-AIDS ने 3.5 करोड़ च्या वर माणसे मारली गेली १९८१ चे वर्ष होते हे. तेव्हा सुद्धा मी कर्केतून मिथुनेत जात होतो वर्ष अखेर.

नंतर पुन्हा २००५ पासून ते २०१२ पर्यंत मीन, कुंभ, मकर, धनु, वृश्चिक राशीतून १८/१८ महिने जात असताना पूर्ण ७ वर्षे मी धुमाकूळ घातला होता तेव्हा. कारण ह्या राशीचे स्वामी गुरु शनी मंगळ आहेत.

आणि तुला राशीत आल्यावर मी कंट्रोल केला.

>हेही वाचा :- मी राहू बोलतोय राहू भाग -१

मुख्य म्हणजे नंतर सर्वाना कळले कि एड्स हा विषय फार मोठा नव्हताच जेव्हढा तो केला गेला तेव्हा जसे लोकांना कॉन्फयुज्ड केले होते ते आत्ताही आहे आणि मी जेव्हा तुला राशीत जाइन २४ सप्टेंबर २०२० ला तेव्हा कदाचित शांत होईन.

आणि आत्तापर्यंत समाजात जे जे विषय कोरोनामुळे रंगले त्यावर एकदा हसाल नक्की.

कारण ह्या वर्षात मी पाहिले –

कोणत्याही देशाचा पंतप्रधान एका खास विशिष्ट निर्णयावर पोहोचत नव्हता. ह्यात WHO सुद्धा फार गुंतला होता. आणि आत्ताही तीच परिस्थिती आहे.

कधी लॉकडाऊन तर कधी अनलॉक, कधी शाळा सुरु करण्याचा निर्णय तर कधी परीक्षा घेण्याचा निर्णय.

शाळेत आत्तापर्यन्त मोबाइलला एन्ट्री नव्हती आणि आत्ता मोबाईल मधेच शाळा आली.(बरे मोबाईल वर सुद्धा माझेच वर्चस्व आहे बरं का जसे सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मी कार्यरत असतो)

तुमच्या घरातील इलेकट्रीक वस्तू जरी अचानक बिघडल्या तर समजा मी तिथे आहे.

  • कधी हवेतून कोरोना 
  • कधी स्पर्शाने कोरोना 
  • कधी तोंडावाटे 
  • कधी वास नाहि येण्याने कोरोना 
  • कधी थुंकीतून 
  • कधी प्राण्या मुळे

अशा अनेक बाबी ज्या कधीही प्रूव्ह करताना कोणताही एक सबळ पुरावा देता आला नाही कुणाला. कधी हि औषधे कधी ती औषधे कोणतेही फिक्स नाही.

२६ डिसेंबर २०१९ ला सूर्य ग्रहणात  ६/६ ग्रह एकाच ठिकाणी आले आणि मी त्यांची सर्व पॉवर काढू शकलो आणि मी माझ्या आवडत्या मिथुन राशीत सुद्धा होतो म्हणून जास्त धुमाकूळ घालू शकलो.

पण मी आता आवरते घेणार आहे ह्याला कारण मी आता ऋषभ राशीत जात आहे २४ सप्टेंबर २०२० ला. 

आणि तिथे शुक्र देवाच्या राशीत मला काही जास्त करता येत नाही असे वाटते कारण शुक्र देव हे दानवांचे गुरु आहेत म्हणजे माझे आणि गुरु समोर असताना विद्यार्थी हाताची घडी घालतो तसा मी आपली निदान मान लज्जेने त्यांच्या समोर ठेवेन. आणि नंतर चा रोल शुक्र देव जसे म्हणतील तसे मी करेन पुढे.

लक्षात असू द्यात —

अमृत प्यायल्याने मी सुद्धा देव रुपी आहे  म्हणून माझा मान नक्की ठेवा तुम्ही. ह्यात आमचे मुख्य दैवत शिव आहे. आणि शिवाची भक्ती करणाऱ्याला मी राहू कमी पीडतो हे ध्यानात असू द्यात.

शेवटी — जगाचा बॅलन्स करण्याचा सुद्धा माझा हा रोल तुम्हाला सहन केलाच पाहिजे.

कारण जेथे उत्पत्ती आहे तेथे नाश आहेच. जसे जिथे जन्म आहे तिथे मृत्यू. हेच काम शिव सुद्धा करतो संहाराचे.

आता एव्हढे पुरे आम्ही जातो आमच्या गावा अमुचा राम राम घ्यावा…..

धन्यवाद….!

This Post Has One Comment

  1. Jayashri Nalawade

    This information is very important and best 👌

Leave a Reply