You are currently viewing मी राहू बोलतोय राहू – भाग १

मी राहू बोलतोय राहू- आपल्याला ठाऊक असेलच कि देव आणि दानव यांनी मिळून समुद्र मंथन केले होते. त्यात  त्यातून मिळालेल्या विषाला शिवाने प्राशन केले आणि शिव नीलकंठ झाले.

नंतर अमृत जे मिळाले त्याला आधी देवांना पाजण्यासाठी विष्णू ने मोहिनी रूप धारण केले आणि तो आधी देवांना अमृत पाजू लागला.

हे पाहून माझ्यातला दानव जागा झाला आणि मी देवांच्या रांगेत उडी घेऊन चंद्र आणि सूर्य च्या मध्ये बसलो.

मोहिनी रूपातल्या विष्णू ने माझ्या मुखात ते अमृत ओतले सुद्धा आणि मी गिळता गिळता चंद्र आणि सूर्याने बोंब ठोकली. आणि माझा चिरच्छेद झाला. मी  चंद्र आणि सूर्याच्या मागे मागे धावलो आणि ते शिवाकडे जाऊन उभे राहिले.

शिव आम्हा दानवांचा सुद्धा देव होता म्हणून चंद्र आणि सूर्याच्या ह्या चुकीला (चुगली करण्याच्या) त्याने मला प्रत्येक वर्षी ग्रहण लावण्याचे समाधान दिले.

तेव्हापासन आज पर्यंत सूर्य आणि चंद्र हे माझे कट्टर वैरी झाले. ते जे जे करतात त्याच्या अगदी उलट मी वागत असतो.

उदाहरण सूर्य आणि चंद्र हे जगाला प्रकाश देण्याचे काम करतात तर मी जगाला अंधारात ठेवण्याचे काम करतो.

जसे आत्ता ह्या हि २०२० ला करतो आहे.

सूर्य तुम्हाला ऊर्जा देतो चंद्र तुमचे मन उल्हसित करतो तर मी ऊर्जा काढण्याचे आणि तुमचे मन कलुषित करण्याचे काम करतो.

असो हा माझा आवडणारा कार्यक्रम बनला आहे.

मी अमृत प्राशन केले आहे म्हणून मी देवांसारखा झालो आणि तुमच्या पत्रिकेत मला आणि केतूला स्थान मिळाले.

तेव्हापासून माझी भीती सदैव तुम्हाला आहे. आणि ती असेलही अशी मी आशा बाळगतो. आत्ताच्या कलियुगात जर तुम्हाला पुढे जायचे असेल तर माझ्याशिवाय पर्याय नाही. कारण ह्या युगात सुद्धा माझेच राज्य सुरु आहे. जिथे जिथे तुम्ही तूमाच्या चवीच्या मागे मागे फिराल तेथे तेथे मी तुमच्या जिभेवर बसेन, तुम्ही जेथे जेथे खोटे , लबाडी , राजकारण , जुगार , नशा , अपप्रवृत्ती , ह्या गोष्टी कराल ते मला आवडेल आणि मी त्यात तुमची मदत सुद्धा करेन. आणि समाजात धुमाकूळ घालण्यासाठी तुमचा उपयोग सुद्धा करून घेईन मी.

देवांचा सहवास , विधी विधान , पूजा अर्चा, तुमची संस्कृती , तुमची परंपरा , तुमचे नियम मला अजिबात आवडत नाहीत.

ह्यासाठी मी एकदम मोकळे पणाने आपले कार्य कुणालाही न दिसता करत असतो. न दिसता ह्या साठी म्हणतो कि आकाशमंडळात ग्रहांसारखा मी कुणालाच अजून दिसलो नाही. मी सूर्य आणि चंद्र ह्याच्या कक्षेतून फिरतो आणि हे जिथे जिथे एकत्र येतात तेथे तेथे साऊथ पोल आणि नॉर्थ पोल ला मी आणि केतू तयारी करत असतो.

मला पत्रिकेत चंद्र सूर्य बरोबर राहायला आवडत नाही ह्याला तुमचे ज्योतिषी ग्रहण दोष म्हणतात. ह्यात मी तुमच्या पितरांकडून तुम्हाला ताकद मिळवायला अजिबात मदत करत नाही आणि तो पितृदोष सुद्धा होतो तुमच्या घराण्याचा. 

पत्रिकेत एकत्र चंद्र बरोबर असताना तुम्ही चंद्र ग्रहण असे म्हणता जिथे तुम्हाला आईचे प्रेम मिळवायला आणि आईला तुमचे प्रेम मिळवायला कठीण होऊन बसते. तिच्या संसारात ती सुद्धा फार कष्ठीत असते. आणि ह्यात माझा रोल फार आहे.

पत्रिकेत एकत्र मंगळ बरोबर असताना तुम्ही ह्याला अंगारक दोष म्हणता ह्यात कोणतेही इंडीव्हिजिवल रिलेशन तुम्ही मेंटेन करू शकत नाही.

पत्रिकेत मी राहू + शुक्र आलो कि मी तुमच्या हॉर्मोन्स चा फज्जा उडवितो.जरा जपूनच आयुष्य जगा कारण तुमच्या कॅरेक्टर ला मी तडा देतो इथे. असे करता नाही आले तर नक्की औषधे खायला लावेन.

ह्या सर्व दोषात मी माझे कार्य बरोबर करतो मला जे जे पाहिजे ते ते तुमच्याकडून करून घेत असतो.

माझे स्थान हे तुमच्या डोक्यात आहे म्हणून मी तुमचे डोके आधी खराब करतो. आणि राजकारणी बनवितो.

मी तुमच्या घरात साऊथवेस्ट ला वास्तव्य  करतो  आणि म्हणून तुमच्या घरातील कोणताही जिना एखादा खड्डा , टॉयलेट बाथ मला इथे आवडत नाही.   

तुम्हाला एखादा रोग मी लावला कि त्याचे निदान तुम्हाला कोणताही डॉक्टर करून देत नाही अथवा तो आजार कधी बारा होणार नाही हे नक्की. कारण तुम्ही समजता तसा तो आजार नसतोच. कधी पूर्वजांकडून आलेला आजार मी तुम्हाला देतो कधी आमच्या दानवांकडून मिळालेला आशीर्वाद असतो तो.

ह्यात मी साफ वेडा करतो व्यक्तीला.

४ आकड्यावर सुद्धा माझे प्रभुत्व आहे.

जेव्हा जेव्हा कोणत्याही वर्षीची बेरीज ही ४ येईल (जसे २०२०) २००२ वगैरे त्या त्या वर्षी मी पॉवर मध्ये असतो 

कोणाच्याही जन्म दिनांक ४ शी संबंधित असेल जसा ४ / १३ / २२ / ३१ अशा वेळी त्यांच्या जास्त जवळ असतो . 

म्हणून अशा व्यक्तींना तुम्ही सतत स्पर्धा करताना पाहाल. पर्सनल सुखाकडे खूप कमी लक्ष देताना पाहाल.

माझी महादशा हि १८ वर्षाची असते.

माझ्या तीनही नक्षत्रात (आर्द्रा, स्वाती, शततारका) म्हणजे मिथुन राशीत आर्द्रा नक्षत्र / तुला राशीत स्वाती नक्षत्र आणि कुंभ राशीत शततारका नक्षत्र — ह्यात तुमचा जन्म झाला कि पहिली महादशा हि माझीच असते. साधारण १८ वर्षापर्यंत. जर चंद्र ० डिग्री पासून असेल तर.

मात्र चंद्र जेव्हढा जास्त डिग्री चा तेव्हढा माझी महादशा हि कमी कमी होत जाते जसे चंद्र जर १५ डिग्री चा असेल तर ९ वर्षे महादशा असते हि.

विद्यार्थी दशेत हि महादशा कोणत्याही व्यक्तीला आली तर अभ्यास होतो का पहा तुमचा? जर तुमचे वय ७ ते २२ असेल 

जर २२ ते ४० वयात हि महादशा असेल तर करिअर करण्यासाठी मी तुम्हाला डेरिंग देतो. पण ह्याच वयात मी तुमच्या पर्सनल गोष्टीना धक्का सुद्धा लावतो. जसे वैवाहिक जीवन जसे प्रॉपर्टीज वगैरे. जर वैवाहिक जीवन चांगले असेल तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे तर मी करिअर पैसे देतच नाही. 

मला तुमचे वैवाहिक जीवन मुळीच आवडत नाही. तुम्ही संतान सुख घेतलेले मला सहन होत नाही.

म्हणून मी ५ व्या स्थानी पत्रिकेत असलो कि गर्भाला इजा पोहोचवितो. 

अवकाशात फिरत असताना चंद्र पृथी आणि सूर्य एका रांगेत जेव्हा येतात तेव्हा तुम्ही म्हणता कि पृथ्वीवरून चंद्र दिसत नसेल तर चंद्र ग्रहण आणि सूर्य दिसत नसेल तर सूर्य ग्रहण.

कारण सूर्य किंवा चंद्र ह्यापैकी एक जण मधे येतो पण खरी गोष्ट मी दिसत नसताना सुद्धा मी ह्यांना गिळत असतो. म्हणून त्यांची ताकद त्यांचा प्रकाश हा तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. 

सूर्य एका राशीत ३० दिवस (एक वर्षे लागते सर्व राशीतून जात असताना) – सूर्याभोवती सर्व ग्रह फिरतात सूर्य केंद्रबिंदू आहे.

चंद्र एका राशीत २.२५ दिवस २७ दिवस लागतात सर्व राशीतुन जाण्यासाठी 

तसे मी एका राशीत १८ महिने असतो.

ज्या राशीत मी असतो त्या राशीचे सर्व गुणधर्म त्याचा स्वभाव हा माझ्यासारखा होतो. मग ती राशी आणि ती व्यक्ती माझ्यासारखी वागायला लागते .

माझ्याकडे फक्त मानेपर्यंतचा भाग आहे आणि केतुकडे मानेच्या खालचा भाग आहे म्हणून मी सतत प्लॅनिंग करवतो.

मी लीडर शिप करून घेतो. ऑर्डर सोडतो म्हणून ती राशी आणि तो व्यक्ती माझ्या मुळे भटकंतीला येतात. आणि हे मला आवडते सुद्धा.

ग्रहण असताना जे जे माझ्या सावलीत ग्रह येतात त्यांची पूर्ण ताकदच मी संपवलेली असते.

मी काय करेन, कधी करेन आणि कसे करेन ह्याचे कोणी निदान करू शकत नाही म्हणून सध्याच्या २०२० परिस्तिथीला मी सर्वाना भुलवून सोडले आहे. कारण माझा सर्वात पहिला गुणधर्म हा भ्रमित करण्याचा आहे. 

प्रत्येक ग्रह त्या राशीतून पुढे पुढे जात असतात ० डिग्री पासून ३० डिग्री च्या दिशेने आणि नंतर  ते पुढील राशीत जातात 

पण इथे सुद्धा मी सर्वांच्या उलट असतो मी राशीतच उलट एन्ट्री करतो म्हणजे ३० डिग्री पासून सुरवात आणि ० डिग्री झाली कि मागच्या राशीत जातो. उदाहरण म्हणजे मी आत्ता मिथुन राशीत आहे आणि २४/९/२०२० ला मी मागच्या ऋषभ राशीत एंटर कारेन.

दिनांक ७ मार्च २०१९ ला मी मिथुन राशीत आलो आणि तेथूनच मी माझ्या कार्याला सुरवात केली कारण एका राशीत १८ महिने असे करत करत १८ वर्षाने मी पुन्हा मिथुन राशीत येत असतो.

हि राशी माझी आवडीची राशी आहे कारण हि बुद्धीची राशी आहे तशीच कन्या राशी सुद्धा माझी आवडीची राशी आहे पण त्यापेक्षा मिथुन कारण हि खेळकर सुद्धा आहे. ह्या राशीत मी २४/९/२०२० पर्यंत असणार आहे 

मिथुन राशीत ३ नक्षत्र असतात एक पुनर्वसू दुसरे आर्द्रा आणि मृगशीर्ष. पाहिले गुरुचे दुसरे माझे आणि तिसरे नक्षत्र मंगळाचे आहे.

जेव्हा मी आर्द्र नक्षत्री असतो तेव्हा खूप स्ट्रॉंग असतो. आणि बाकीच्या नक्षत्रात मी माझा राग काढतो.

अजून एक महत्वाचे सांगावेसे वाटते- कोणताही ज्योतिषी मला पूर्ण ओळखू शकत नाही कारण मी एक उलटी फिरणारी सावली आहे.

व्यक्तीला भ्रमिष्ट करण्याचा गुणधर्म मी सोडत नाही मग मोठ्यात मोठा ज्योतिषी सुद्धा माझ्या फेऱ्यातून सुटलेला नाही. म्हणून आत्तापर्यंत त्याने केलेले कोरोना बद्दलचे सर्व विधाने मी खोडत गेलो. सर्वाना फार बुचकळ्यात टाकून ठेवले आहे .

आत्तापुरते एव्हढे पुरे.. पुढील लेखात कोरोनाबद्दल मी स्पष्ट करेनच माझा पुढील रोल.

धन्यवाद करण्याचा माझा स्वभाव नाही. तरी सुद्धा मला पूर्ण ओळखायचे असेल तर हि पोस्ट एका वेळी समजली नाही तर ४ वेळा नक्की वाचा ४थ्या वेळी आपोआप कळेल. इथे सुद्धा माझ्या  ४ आकड्याचा संबंध आहे चमत्कार पहा.

This Post Has 12 Comments

 1. Shilpa

  अगदी बरोबर आहे गुरुजी

 2. Yogita

  Namaskar

  Details given in the post are very informative and useful for us to follow.
  Please send more and more of such posts.

 3. Deepak Maruti patil

  Sir Rahu chi khup Chan mahiti dilat tyabaddal dhanywad🙏

 4. Janhavi

  Very nice information about Rahu it all true thnx sir

 5. Bhagesh

  Namaskar
  Very informative.
  While reading the post I was feeling RAHU grah itself telling me about his Nature.
  Devendraji has given this rare and tough details in such a simple way that even a small ‘school going kid’ can understand,your are amazing.

 6. संतोष संखे

  खूप मस्त लिहिले आहे

 7. Jayashri Nalawade

  Sir this information is perfect 👍

  1. अर्चना लांडगावकर

   आवडली पण याचा मंत्र मिळाला तर खुप चांगलं झालं असतं

  2. पांडुरंग विठ्ठल लाड

   गुरुजी, राहू बद्दल खूप छान माहिती दिलीत, मिथुन राशीत असलेला राहू 24 सप्टेंबर 2020 ला संपेल, असे म्हटले आहे, त्यानंतर ठीक असेल का

 8. इतेंद्र चांदेकर ,चामोर्शी

  खूप छान माहिती, माहिती वाचतांना आपली पत्रिका जवळ असली की ,आपल्याला आपणा सोबत राहू काय करतोय जरा लवकर लक्षात येईल,
  माहिती वाचल्यानंतर राहू चे आपल्या जीवनातील महत्व काय ते कळले

 9. Tejas

  Nice and Detail information 👍🏽

 10. Devendra Kunkerkar

  धन्यवाद . आपल्या रिप्लाय बद्दल .

Leave a Reply