You are currently viewing राहू केतू राशी परिवर्तन २०२०- मेष राशी आणि मेष लग्न

राहू केतू राशी परिवर्तन २०२०- खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आधी हे वाचून नंतर खालील आपल्या राशीचे आणि लग्न स्थानाचे फळ वाचावे हि विनंती.

राहुचा वृषभ राशीत आणि केतूचा वृश्चिक राशीत प्रवेश

https://shreedattagurujyotish.com/rahu-aani-ketu-bhraman-23-september-2020/

२३ सप्टेंबर २०२० ते पुढील १८ महिने मेष राशी ला राहूचे भ्रमण हे पत्रिकेच्या दुसऱ्या स्थानी आहे आणि केतू चे भ्रमण अष्टम स्थानी आहे.

मेष राशी आणि लग्न कुंडली
ज्यांची राशी मेष आहे त्यांची हि चंद्र कुंडली असेल खालील राहू केतू चे भ्रमण ह्यावर केलेले विवेचन आपल्यासाठी आहे.

आणि ज्यांची कोणतीही राशी असली तरी आपली जर लग्न कुंडली अशी असेल तरी सुद्धा हा लेख आपल्यासाठी समजावा.

पत्रिकेचे हे दुसरे स्थान कुटुंब स्थान आहे ते धन स्थान सुद्धा आहे त्यामुळे आपली राशी मेष असेल किंवा आपली कोणतीही राशी असेल आणि मेष लग्न असेल तर हा राहू ह्या स्थानातील मानसिक विचारात सतत पैशाचे विचार मनातून कधीच निघणार नाहीत पुढे १८ महिने.

सतत कुटुंब आणि पैसे ह्यांच्या विचारांच्या मागे तुम्ही असू शकता. कुटुंबात एकता आणण्याचा प्रयत्न सतत करावा हा सल्ला. येथे राहू आपल्या जन्म पत्रिकेत जर व्यवस्थित नसेल तर काही मेष राशींच्या व्यक्तींना कुटुंबाचे विभाजन सुद्धा दिसण्याची शक्यता आहे.

येथे शुक्राची वृषभ राशी असल्याने त्यातील राहू हा आपल्या धनाच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये ग्ल्यामरता आणेल. वेगवेगळे खाणे पिण्यावर पैसे जास्त खर्च होतील.

हे स्थान वाणी चे सुद्धा आहे म्हणून आपल्याला आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवावा लागेल नाहीतर काही ठिकाणी वाणी दोष होऊन इतरांशी वाद विवाद होण्याचा संभव असू शकतो हे खास कुटुंबात घडण्याची जास्त शक्यता आहे.

दुसरे स्थान हे आपल्या मुखातील असल्याने ज्यांना दाताचे इशू आधीचे असतील त्यांना ह्या १८ महिन्यात दाताच्या डॉक्टर कडे त्यात काही रूट कॅनल वगैरेची गरज भासू शकेल.

राहू ची ५ वी दृष्टी

हि दृष्टी पुढे १८ महिन्यासाठी कन्या राशीवर ६ नंबर जिथे आहे तिथे येत आहे. ह्या स्थानावरून रोग, जॉब, कर्ज, शत्रू, कॉम्पिटिशन , तुम्ही इतरांना देणारी सर्व्हिस पाहतात.

राहू ज्या स्थानावर नजर टाकतो त्या स्थानावरील विषयांत तो व्यक्तीला धावपळीत ठेवेल. ह्यासाठी मेष लग्न आणि मेष राशीच्या व्यक्तींना त्यांच्या वयोमानानुसार ती ती फळे पुढील १८ महिन्यासाठी मिळतील विषय हे वरील असू शकतील.

उदाहरण जर जॉब असेल तर आधीच्या जॉब मध्ये काही तरी चेंजेस दिसतील. किंवा एखादा जॉब सोडून दुसरा करावा लागेल. ह्या १८ महिन्यात आपण दिलेल्या सर्व सर्व्हिसेस मध्ये आपल्याला फार मेहनत करावी लागेल.

कॉम्पिटिशन मध्ये आपण अग्रेसर असाल. कर्जातून बाहेर पडता येणार नाही किंवा नवीन कर्ज घ्यावे लागेल. रोग संबंधित काही शारीरिक पीडा ह्या अपचन किंवा पोटाच्या असू शकतील. किंवा त्वचा बाबतीत सुद्धा हे दिसेल.

वृषभ राशीतून राहू कन्या राशीला पाहत असल्याने त्याची ती आवडती राशी असल्याने ज्या ज्या वरील ऍक्टिव्हिटी पुढील १८ महिन्यात होतील त्यातून नुकसान जास्त होणार नाही हेल्थ बद्दल सोडून बाकीच्या सर्व ऍक्टिव्हिटीत फायदा दिसेल हे नक्की.

राहू ची ७ वी दृष्टी

मेष राशी आणि मेष लग्न ज्यांचे आहे त्यांच्या पत्रिकेत राहू कुटुंब स्थानी असल्यामुळे त्याची ७ वी दृष्टी हि अष्टम स्थानी येत आहे जिथे ८ नंबर ची वृश्चिक राशी आहे.

इथे केतू हा मंगळाच्या राशीत आहे म्हणून खास काही मोठ्या अपघाता विषयी काळजी वाटू शकते. पण मूळ जन्म पत्रिकेत मंगळ आणि गुरु ची स्थिती त्याची तीव्रता कशी असेल त्यावरून ठरते. तरीसुद्धा खास सांभाळून राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

ह्या केतुमुळे काही जणांच्या पायाला काही इजा किंवा दुखण्याचे संभव नाकारता येत नाही. खास डावा पाय.

इथे असलेल्या केतू ची ५ वी दृष्टी हि १२ व्या स्थानी दिसते जिथे गुरु ची मीन राशी आहे ह्यामुळे आपण आधीपासून जर अध्यात्मिक असाल तर त्यात जास्त ऍक्टिव्हेट व्हाल. दुसरे म्हणजे आपल्या आधीच्या गुंतवणूक जर असतील त्यात एखादी मोठी विड्रॉव दिसेल. गुंतवणुकीचे पैसे अचानक काढण्याची शक्यता असेल.

राहू ची ९ वी दृष्टी

राहू ची ९ वी दृष्टी हि कर्म स्थानावर येत आहे जिथे शनी ची मकर राशी आहे. आणि शनी सुद्धा ह्या राशीत सध्या २०२३ च्या जानेवारी पर्यंत असेल.

शनिवर आणि शनीच्या राशीवर येणारी हि धन स्थानातून आणि कुटुंब स्थानातून येणारी राहू ची दृष्टी हे करिअर कर्म च्या दृष्टीने काही मोठे बदल घडवेल. जे कुटुंब आणि पैसे ह्यासाठी काही तरी करिअर चे निर्णय घ्यावे लागतील.

केतू ची धन स्थानावर दृटी हे राहू सारखेच धन आणि कुटूंब बाबत फळ देऊ शकतो अचानक कुटुंब स्थानातील काही निर्णय घ्यावे लागतील.

केतू ची ४ थ्या स्थानावरील दृष्टी जिथे ४ आहे कर्क राशी त्यावरून केतू आपल्या घरातील काही आधीचे विषय हे जास्त ऍक्टिव्ह होऊ शकतात. त्यातील निर्णय ह्या १८ महिन्यात दिसतील.

काही प्रॉपर्टीज सर्च वगैरे सुद्धा मेष राशी आणि मेष लग्न ह्यांना दिसू शकतील कारण ह्या स्थानावर शनी ची सुद्धा ७ वी दृष्टी असल्याने प्रॉपर्टीज बद्दल आपल्याला खूप सर्चिंग वगैरे होऊन खरेदीचे योग दिसतील.

उपाय

ह्या सर्वं बाबतीत राहू आणि केतू च्या ह्या राशी परिवर्तनावर काही उपाय सुचवितो ते मेष आणि मेष लग्न वाल्यानी जरूर करावेत.

  • हनुमान चालीसा चे वाचन करत राहावे खास मंगळवारी.
  • प्रत्येक बुधवारी गायीला चारा द्यावा
  • गुरुवारी केसर आणि गंगाजल मिक्स करून तिलक करावा नाभी वर आणि कपाळावर.

नोट — वरील सर्व आपली जन्मपत्रिका न पाहता आणि इतर सर्व ग्रहांची स्थिती न पाहता एक विवेचन आहे अधिक शुक्ष्मता हि आपली स्वतःची पत्रिका सांगू शकेल एखाद्या तद्न्य ज्योतिषाकडून. तेव्हा हे सर्व मेष राशीच्या आणि मेष लग्नाच्या पत्रिकेवरील कॉमन भाकीत समजावे हि विनंती.

धन्यवाद…..!

Leave a Reply