You are currently viewing ग्रहांचे शत्रू/मित्र/सम/उच्च/नीच/दिशा/दृष्टी तक्ता

ग्रहांचे शत्रू/मित्र/सम/उच्च/नीच/दिशा/दृष्टी तक्ता

ग्रहांचे शत्रू/मित्र/सम/उच्च/नीच/दिशा/दृष्टी तक्ता

वरील तक्त्यात आपण पहिल्या कॉलम मधे जी ग्रहांची नवे दिली आहेत त्या नुसार त्यांची पुढील माहिती खालील प्रमाणे वाचणे.

उदा:- मला जर रवी ग्रहाचे वाचायचे असेल तर मी खालील प्रमाणे वाचेन

१) रवी ग्रहाची एकच राशी सिंह
२) त्या राशीचा पत्रिकेत अंक ५ — जो कोणत्याही एका स्थानी लिहिला असेल
३) रवी ग्रहाचे मित्र ग्रह चंद्र मंगळ आणि गुरु
४) रवी ग्रहाचे शत्रू ग्रह शुक्र शनी राहू
५) रवी चा सम बुध
६) रवी जर पत्रिकेत मेष राशीत लिहिला असेल तर तो उच्च असतो (जन्म १५ एप्रिल ते १५ मे असेल)
७) रवी जर पत्रिकेत तूळ राशीत असेल तर रवी नीच समजावा (जन्म १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर)
८) अंकशात्राप्रमाणे रवी चा अंक हा १ मानला जातो. आणि शनी चा पहा तिथे ८ दिला आहे
९) रवी ची दिशा आहे पूर्व
१०) रवी जिथे पत्रिकेत असेल त्यावर बोट ठेवून घडाळ्याच्या उलट्या दिशेने पत्रिकेत मोजावे ७ व्या स्थानावर त्याची दृष्टी पडते. जसे शनी
आपल्या स्थानापासून ३,५,7 व्या स्थानावर दृष्टी टाकतो.

असे आपणास प्रत्येक ग्रहाची वाचायचे असेल. त्यामुळे आपणास हे समजेल कि आपल्या राशी नुसार आपणास कोणत्या राशी ह्या मित्र आहेत त्याची शत्रू राशी कोणती ज्याने आपणास सावधानता बाळगावी लागेल आणि त्रास जास्त होणार नाहीत त्या राशी पासून. आपल्या राशीची दिशा समजेल ज्याने आपण त्या दिशेला आपले कोणतेही टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकू.

ग्रहांची नीच राशी समजून घ्या जर आपल्या पत्रिकेत तो एखादा ग्रह जर नीच राशीत असेल तर कोणत्या पद्धतीने त्या स्थानात सुख घ्यावे हे निष्णात ज्योतिषांना विचारलेत तर एकदम सोपे होईल. नाहीतर उगाच जीवनाचा त्या विषयीचा वेळ वाया जाऊ शकेल.
तसेच जर एखादा ग्रह उच्च राशीत असेल तर त्याचा फायदा कसा आणि केव्हा घ्यावा हे कळू शकेल.

ह्यात आपणास आपल्या राशीचा चा अंक जो नुमरॉलॉजि मधे वापरात येतो तो समजेल. जसे जर आपली राशी मीन असेल तर वरील तक्त्यात त्या राशीचा अंक १२ लिहिला आहे पण नुमरॉलॉजि मधे गुरु चा अंक हा ३ आहे.

हे एव्हढे जरी आपणास समजले तरी जेव्हा जेव्हा ह्या शास्त्राची मदत आपण घ्याल तेव्हा बरीच माहिती हि आपणास झटपट समजू शकेल.

धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
9821817768
7506737519

Leave a Reply