You are currently viewing गुरु राशी परिवर्तन २०२१ : मकर राशी / मकर लग्न

गुरु राशी परिवर्तन २०२१ मकर राशी / मकर लग्न- गुरु २० नोव्हेंबर २०२१ ला कुंभ राशीत जात आहे १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु कुंभ राशीत असेल. त्यावरील त्याचे नक्षत्रीय भ्रमण आणि इतर विवेचन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/guru-rashi-parivartan-2021-jupiter-transit-in-kumbh-rashi-in-marathi/

गुरु राशी परिवर्तन २०२१ मकर राशी मकर लग्न

वरील कुंडली हि मकर राशीची चंद्र कुंडली आहे आणि मकर राशीची लग्न कुंडली आहे.

आपली चंद्र कुंडली मकर राशी किंवा लग्न कुंडली मकर असेल (मग राशी किंवा लग्न वेगवेगळे असले तरी) खाली दिलेले सर्व काही आपल्यासाठी आहे.

मकर राशी/लग्नाच्या कुंडलीत गुरु हा द्वितीय / दुसऱ्या स्थानी येत आहे. हे स्थान आपल्या कुटुंब आणि धनाचे आहे. गुरु १४४ दिवस ह्या स्थानातून भ्रमण करेल तेव्हा तो वक्री होणार नाही ह्याच राशीत संपूर्ण मार्गी असेल. तेव्हा जर आपल्या पत्रिकेत जन्मतः गुरु ची स्थिती उत्तम फळ देईल. आपल्या जन्म कुंडलीत गुरु जर वक्री नसेल तो ० ते ५ किंवा २७ ते २९.५९ डिग्री पर्यंत नसेल. गुरुवर कोणत्याही पापग्रहांची दृष्टी नसेल. आणि दशा महादशा उत्तम असेल तर ह्या कुंभ राशीतील गुरु आपल्या ह्या द्वितीय स्थानी चांगले फळ देईल.

वरील कुंडलीत जिथे ९ नंबरच्या धनु राशीला आणि १२ नंबर च्या मीन राशीला सर्कल केला आहे त्या गुरु च्या दोन राशी आहेत.
मकर राशी हि आपल्या द्वितीय स्थानी आहे. जेव्हा बाराव्या स्थानाचा मालक गुरु हा धनस्थानातून भ्रमण करेल तेव्हा घराबद्दल काही खर्च कराल. ते मोठे असतील. काही कौटुंबिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न असेल त्यात सफल व्हाल.

गुरु ची १२ वी राशी मीन आपल्या तिसऱ्या स्थानी येत आहे आणि त्याचा मालक स्वतः गुरु हा मागील दुसऱ्या म्हणजे धन आणि कुटुंब स्थानात भ्रमण करणार आहे म्हणून १४४ दिवसात आपल्याला ह्या दिवसात स्वतःच्या परिवाराविषयी आणि काही त्याबद्दलच्या आर्थिक व्यवहाराविषयी ची धावपळ दिसेल. कुटुंबात मंगल कार्ये होतील त्यासाठी तुम्ही तत्पर असाल. तुमचा पैसा इथे खर्च होणार हे नक्की.

हेही वाचा : गुरु राशी परिवर्तन २०२१ : धनु राशी / धनु लग्न

गुरु ची ७ वी दृष्टी

गुरु ची ७ वी दृष्टी हि ५ नंबर च्या सिंह राशीवर येत आहे (जिथे बाण आहे) ते स्थान आपले हे स्थान पत्रिकेतील काष्ठाचे स्थान आहे. त्यामुळे इथे आपले काही संघर्ष जर निर्माण झाले कष्ट झाले तर गुरु आपले रक्षण करेल. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणासाठी वेगळ्या प्रकारचा म्हणजे ज्यात आधी अपयश आले होते त्यासाठी पुन्हा खर्च करावा लागेल.

गुरु ची ५ वी दृष्टी

गुरु ची ५ वी दृष्टी हि जिथे ३ नंबर मिथुन राशी आहे त्यावर येत आहे. जिथे बाण आहे हे स्थान हे स्थान षष्ठ स्थान म्हणजे कॉम्पिटिशन चे जॉब आणि कर्ज आणि हेल्थ चे आहे. त्यामुळे कुटुंबातील हे विषय आपल्यासाठी बऱ्याच प्रमाणात काळजी देऊ शकतील पण त्यात मार्ग काढून गुरु आपल्याला सहकार्य करेल. काही जणांच्या नोकरीत स्वतःच्या स्किल ला वाव मिळेल.

गुरु ची ९ वी दृष्टी

गुरु ची ९ वी दृष्टी जिथे ७ नंबर ची तुला राशी आहे जिथे बाण आहे तेथे येत आहे. हे स्थान आपल्या पत्रिकेतील करिअरचे आहे. करिअर च्या काही नवीन संधी निर्माण होतील. आपल्या कलागुणांना वाव मिळेल. नवीन करिअरच्या दिशेने वाटचाल असेल. हा उत्तम परिणाम देणारा योग आहे

काळजीचे काही मुद्दे

मकर लग्न आणि मकर राशीच्या कुंडली चार्ट मध्ये जिथे क्रॉस केला आहे त्या स्थानातील काळजी किंवा सावधानता आपल्याला बाळगावी लागेल.

गुरु पासून चे ८ वे घर हे ६ नंबर चे असेल हे स्थान आपल्या भाग्य स्थानाचे आहे . म्हणून भाग्याबद्दल आपल्याला थोडी विशेष काळजी वाटेल त्यासाठी भटकंती दिसेल. लक साथ देत आहे कि नाही ह्याची भीती निर्माण करेल.

जिथे १० नंबर मकर राशी आहे ते गुरु पासून चे मागील स्थान आपल्या प्रथम स्थानी येत आहे म्हणून ह्या काळात कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा स्वतःची धावपळ झालेली दिसेल.

जिथे ४ नंबर लिहिले आहे ते स्थान वैवाहिक सुखाचे स्थान आहे . जेव्हा हे स्थान गुरु पासून ८ वे असते तेव्हा ह्या विषयी च्या म्यानेजमेंट मध्ये गुरु चे सहकार्य मिळताना कठीण होईल काही वैवाहिक विषय हे आपल्याला कष्टदायक होऊ शकतील. पण नंतर त्यावर मात कराल..

गुरु चे नक्षत्रीय भ्रमण

गुरु चे धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण

२१ नोव्हेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ पर्यंत गुरु मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण करेल. हे भ्रमण मकर राशी/लग्न साठी मंगळाची दोन स्थान ऍक्टिव्ह होत आहेत एक चतुर्थ स्थान आणि दुसरे लाभ / इच्छापूर्ती स्थान. त्यामुळे ह्या कालावधीत प्रॉपर्टीज च्या बाबतीतला विचार थोडा फायदा देत आहे. काही जणांना करिअर साठी दूर जाऊन तेथे स्थायिक होण्याची इच्छा पूर्ण होईल.

५ डिसेंबर २०२१ पासून २०२१ पासून मंगळ १७ जानेवारी पर्यंत हाच मंगळ वृश्चिक राशीत येत आहे लाभ स्थानातील जिथे ८ लिहिले आहे तेथे मंगळ भ्रमण करताना गुरु ह्या नक्षत्राचे फळ हे लाभ आणि इच्छापूर्ती करणारे असेल.

गुरु चे शततारका नक्षत्रातून भ्रमण

गुरु २ जानेवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत शततारका नक्षत्रातून भ्रमण करेल तेव्हा तो राहू च्या नक्षत्रातून भ्रमण करीत असल्यामुळे राहूचे फळ देण्यास सुरुवात करेल. मकर लग्न आणि राशीच्या पत्रिकेत राहू हा पंचम स्थानातून जिथे २ लिहिले आहे तेथून जात आहे. म्हणून व्या स्थानाचे फळ राहू देण्यास सुरुवात करेल. विद्यार्थ्यांना हा कालावधी अति मेहनत करण्याचा असेल. नोकरदार व्यक्तींना काही त्रास होण्याचा संभव नाकारता येत नाही. जॉब बद्दल मोठे निर्णय नको.

गुरु चे पूर्वाभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण

२ मार्च २०२२ ते १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु चे पूर्वभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण असेल. पूर्वभाद्रपदा हे गुरुचेच नक्षत्र असल्यामुळे हा काळ आपणासाठी दुसऱ्या स्थानाचे फळ देत आहे. पैशाबद्दल चे असे व्यववहार दिसतील जे तुम्ही कुटुंबासाठी खर्च कराल. त्यात एखादा कौटुंबिक कलह दिसू शकेल. पण एकंदर हे शेवटी चांगले परिणाम देईल.

धन्यवाद…..!

Leave a Reply