You are currently viewing सर्वार्थ सिद्ध योग- सर्व कार्य सिद्ध करणारा योग

सर्वार्थ सिद्ध योग- सर्व कार्य सिद्ध करणारा योग

काय आहे हा योग?

कोणते कार्य करावेत किंवा करू नये?

केव्हा कसा हा योग तयार होतो?

काय आहे हा योग?

आपले शुभ कार्य सिद्ध करण्यासाठी आपण वेगवेगळा मुहूर्त पाहत असतो आणि आपण ज्योतिषाकडे किंवा भटजींकडे जात असतो. पण एका सामान्य व्यक्तीला सुद्धा कळेल असा हा मुहूर्त आपण आपल्या शुभ कार्यास सुरुवात करून आपल्या कार्याला शुभत्व आणू शकतो.

ज्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग असतो त्या दिवशी असणारे इतर अशुभ योग ह्या योगासमोर पाळले जात नाहीत म्हणून कोणतेही अशुभ मुहूर्त त्या दिवशी असले तरी त्याचे नियम  लागत नाहीत.

छोट्या छोट्या शुभ कार्याचा प्रारंभ करण्यासाठी हा योग शुभ समजावा.

कोणते कार्य करावेत किंवा करू नये

ह्या योगात घर, जागा, दुकान खरेदी करू शकतो, दुकानाचे उदघाटन करू शकतो, वाहन , दुकान घेणे, आपल्याकडे काही विकण्याचे सामान असेल तर विकू शकतो , दुकान घर भाड्याने देऊ शकतो , दुकान घर ह्याची चावी घेऊ शकतो , साखरपुडा वगैरे करू शकतो.

पण — विवाह , गृहप्रवेश करू नयेत मात्र ह्यात विवाह गृहप्रवेश मुहूर्त असला आणि सर्वार्थ सिद्ध योग असेल तर चालेल. सोन्याहून पिवळे

सर्वार्थ सिद्ध केव्हा कसा हा योग तयार होतो

सर्वार्थ सिद्ध योग हा वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने पाहिले जाते. ७ वारांमध्ये काही ठराविक नक्षत्रे आली तर हा योग निर्माण होतो.

आपल्या माहिती साठी येथे नमूद करतो कि वार ७ आहेत आणि नक्षत्र २७ आहेत. त्यातले कोणत्या वारी कोणते नक्षत्र आले कि सर्वार्थ सिद्ध योग होतो त्याची माहिती खाली देत आहे. 

  • सोमवार:- रोहिणी, मृगशीर्ष, श्रवण आणि अनुराधा नक्षत्र असेल तर हा योग निर्माण होतो.
  • मंगळवार:- उत्तराभाद्रपदा, अश्विनी , कृतिका नक्षत्र असेल तर हा योग निर्माण होतो. 
  • बुधवार:- रोहिणी, हस्त, कृतिका, अनुराधा आणि मृगशीर्ष नक्षत्र असेल तर हा योग निर्माण होतो. 
  • गुरुवार:- अनुराधा, रेवती, पुनर्वसू, अश्विनी नक्षत्र असेल तर सर्वार्थ सिद्ध योग निर्माण होतो. 
  • शुक्रवार:- अनुराधा, अश्विनी, रेवती नक्षत्र असेल तर सर्वार्थ सिद्ध योग निर्माण होतो. 
  • शनिवार:- रोहिणी, श्रवण, स्वाती, नक्षत्र असेल तर सर्वार्थ सिद्ध योग निर्माण होतो. 
  • रविवार:- मूळ, अश्विनी, हस्त, उत्तरा फाल्गुनी,  पुष्य, उत्तराभाद्रपदा, उत्तराषाढा, नक्षत्र असेल तर सर्वार्थ सिद्ध योग निर्माण होतो. 

कोणतेही नक्षत्र साधारण २४ तासाचे असेल आणि ते दिवसाच्या कोणत्याही वेळी सुरु होऊ शकेल तेव्हा तो वार घेऊन त्या नक्षत्रात आपण शुभ कार्य करू शकता. ते नक्षत्र सूर्योदयाला असावे असा वार शक्यतो घ्यावा. 

ऑगस्ट महिन्यातील सर्वार्थ सिद्ध योग येथे देत आहे.

  • २६ ऑगस्ट २०२० बुधवार सकाळी ६:२२ ते दुपारी १:०४ पर्यंत.
  • ३० ऑगस्ट २०२० रविवार सकाळी ६:२३ ते दुपारी १:२२ पर्यंत. 
  • ३१ ऑगस्ट सोमवार सकाळी ६:२३ ते दुपारी ३:०४ पर्यंत.

वरील सर्व वेळा मुंबईला धरून आहेत आपल्या शहरातील वेळा ह्या मागे पुढे होऊ शकतात त्यासाठी आपल्या वेळा आपल्या शहरातील जाणून घेण्यासाठी गूगल सर्च करून सर्वार्थसिद्ध योग आणि शहराचे नाव पुढे टाईप करून मिळवू शकता कोणत्याही ज्योतिष साईड वर.

किंवा काही ज्योतिष ऍप्स चा सुद्धा तुम्ही वापर करू शकता.

>हेही वाचा:- हरतालिका व्रत- २१ ऑगस्ट २०२०

एक विशेष माहिती मुहूर्ताबद्दल आणि माझे मत

आपण जे जे मुहूर्त पाहतो आपल्या शुभ कार्यासाठी ते सर्व समाजासाठी असतात. उदाहरणार्थ – जर विवाह करायचा असेल तर कॅलेंडर च्या मागे विवाहास उपयुक्त दिवस दिलेले असतात ते सर्वांसाठी खुले असतात. 

ह्याचा जरूर वापर करावा आणि आपल्या भटजींकडून सुद्धा ते कन्फर्म करून घ्यावेत कोणत्याही महत्वाच्या कार्यसिद्धी साठी.

पण ह्यावर माझे मत असे कि जे आपणास मुहूर्त मिळतात ते सर्वांसाठी असतात पण आपल्या पत्रिकेला आपल्या जन्माच्या वेळेनुसार आपणास कोणता दिवस वेळ नक्षत्र शुभ आहे हे एक निष्णांत ज्योतिषीच सांगू शकतो. 

सध्या तसे ऍप्स ज्योतिषांकडे असतात जे अति महागडे असू शकतात. त्याचा वापर नक्की करून आपण आपल्या पत्रिकेनुसार मुहूर्त घ्यावा असा माझा अट्टाहास आहे.

जसे आपण एखाद्या लॅबोरेटरी मध्ये आपला मेडिकल रिपोर्ट काढतो आणि तेथील सुविधा पाहतो तसेच  ज्योतिषांकडे ह्या सुविधा आहेत का ह्याचा नक्की विचार व्हावा.

जी आता काळाची गरज आहे कारण पहिल्या ज्योतिषांसारखे हाताने पत्रिका लिहून देऊन तुमच्यासाठी वेळ कोणी फुकट घालवीत नाहीत. 

आत्तापर्यंत आपण कॉमन मुहूर्तावरच सर्व करत आलेलो आहोत पण माझे मतानुसार स्वतःच्या पत्रिकेवरचा अशा प्रकारचा मुहूर्त घेऊन आपले कार्य सिद्ध करावे कारण असे किती तरी मुहूर्त जे सर्वाना चालतात ते आपल्या पत्रिकेवर सूट होत नाहीत.

ह्यावर जरूर विचार व्हावा..

धन्यवाद……!

This Post Has 4 Comments

  1. Yogita

    Nice information.

  2. प्रज्ञा तुळसकर

    खूपच छान आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे

  3. संतोष संखे

    खूप माहिती पूर्ण

  4. Ranjana Mardhekar

    खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती आहे

Leave a Reply