You are currently viewing शनी कुंभ राशी भ्रमण – जान २०२३ ते मार्च २०२५ | कुंभ राशी साडेसाती चे दुसरे चरण

कुंभ राशी साडेसाती चे दुसरे चरण | Shani Transit for Aquarius

जेव्हा शनी कुंभ राशीत असेल जान २०२३ ते मार्च २०२५ पर्यन्त तेव्हा गुरु राहू आणि केतू हे कोणत्या राशीत आहेत त्याप्रमाणे शनी चे फळ प्रत्येक राशीला मिळण्याचा संभव असेल.

कुंभ राशीला किंवा लग्नाला गुरु राहू केतू यांची गोचरी दिली आहे. त्यावरून शनी आपल्याला कसे फळ देईल हे सुद्धा समजण्यास मदत होईल.

  • गुरु २२/४/२०२३ पर्यंत मीन राशीत.– कुंभ लग्न किंवा राशी कुंडलीत दुसऱ्या स्थानी.
  • गुरु मेष राशीत १/५/२०२४ पर्यंत असेल.– कुंभ लग्न किंवा राशी कुंडलीत त्रितीय स्थानी.
  • गुरु वृषभ राशी १/५/२०२४ ते १४/५/२०२५ पर्यंत असेल. — कुंभ लग्न किंवा राशी कुंडलीत चतुर्थ स्थानी.
  • राहू ३०/१०/२०२३ पर्यंत मेष राशीत असेल — कुंभ लग्न किंवा राशी कुंडलीत त्रितीय स्थानी.
  • केतू ३०/१०/२०२३ पर्यंत तुला राशीत — कुंभ लग्न किंवा राशी कुंडलीत नवम स्थानी.
  • राहू ३०/१०/२०२३ ते १८/५/२०२५ पर्यंत मीन राशीत — कुंभ लग्न किंवा राशी कुंडलीत दुसऱ्या स्थानी.
  • केतू ३०/१०/२०२३ ते १८/८/२०२५ पर्यंत कन्या राशीत –कुंभ लग्न किंवा राशी कुंडलीत अष्टम स्थानी.

आपली राशी किंवा आपले लग्न कुंभ असेल तर हि ११ नंबर ची राशी वायू तत्वाची आहे. शनीच्या साडेसाती मध्ये शनी वायू तत्वाच्या राशींना खूप चांगली फळे देत असतो. शनी ची कुंभ राशी हि मुलत्रिकोण राशी आहे त्यामुळे कुंभ राशी / लग्नाला शनी चांगले परिणाम नेहमी देतो. जसे करिअर आणि नाव. ती सर्व फळे आपल्या पत्रिकेतील शनी च्या स्थितीवर सुद्धा अवलंबून असतात.

येथे आपणास दिनांक १७/१/२०२३ ते २९/३/२०२५ पर्यंत शनी कुंभ राशीत असताना काय फळ देऊ शकतो ते देण्याचा प्रयन्त असेल.
येथे फक्त विषय मांडले जातील जे आपल्यासमोर ह्या साडेसातीच्या दुसऱ्या चरणात येतील. तिसरे चरण साडेसातीचे इथे देण्यात आलेले नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी .

  • कुंभ राशीला साडेसाती चे दुसरे चरण १७/१/२०२३ ते २९/३/२०२५ .
  • कुंभ राशीला साडेसाती चे तिसरे चरण २९/३/२०२५ ते २३/२/२०२८ पर्यंत असेल. — साडेसाती संपेल.

वर दिलेल्या कुंडलीत जी आपली लग्न कुंडली किंवा राशी कुंडली असेल तर शनी चे भ्रमण कुंभ राशीतून ११ नंबर च्या राशीतून होत आहे ते स्थान आपल्या पत्रिकेचे पहिले स्थान आहे. ह्या स्थानावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याची प्रकृती त्याचा मानसन्मान विचार करण्याची क्षमता हे विषय पाहिले जातात.

जेव्हा शनी सारखा ग्रह येथून भ्रमण करत असतो तेव्हा वरील पैकी जास्तीत जास्त विषयी कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या ऍक्टिवेट होतील आणि स्वतःच्या प्रेसेंटेशन साठी मेहनत जरूर करतील. शनी हा एक शिस्तबद्ध आणि कायद्याचा न्यायाचा ग्रह आहे तो ह्या विषयी आपणास काही ना काही शिस्त लावेल एव्हढे नक्की. प्रत्येकाच्या कुंभ राशीच्या जन्माच्या शनी वरून हे नक्की होते कि विषय काय आहेत.

तरी सुद्धा आपण १७/१/२०२३ च्या ८४ दिवस अगोदर च्या सर्व घटना डोळ्यासमोर आणल्या तर ह्यातील एखाद्या विषयी आपण व्यस्त झाला असाल तर ते विषय इथे ऍक्टिव्हेट होतील ह्यात शंका नाही.

शनी आता आपल्या स्वतःच्या राशीतच आहे आणि तो तुमच्या डोक्यावर आहे म्हणून आता कोणत्याही चुका चालणार नाहीत. कुंभ राशीच्या व्यक्तींना आधी स्वतःचा मानसन्मान मिळवायचा असेल तर आधी दुसऱ्याचा मान राखण्याची सवय करून घेतली पाहिजे.

इथे शनी आपणास आपल्या प्रत्येक कामात मेहनत करून त्या कामासाठी आपण लायक झालात कि फळ देईल. त्यामुळे इथे आपल्याला बरेच श्रम करावे लागतील पण त्या श्रमाचे चांगले फळ हे नक्की मिळेल कारण शनी इथे त्याच्या मुलत्रिकोण राशीत आहे. पण जर आपल्या जन्म पत्रिकेत शनी ची स्थिती चांगली नसेल तर मात्र तो इथे आपल्या प्रेसेंटेशन ला चांगला नाही.

तेव्हा शनी पासून चांगली फळे मिळविण्यासाठी मागे केलेल्या चुका आता चालणार नाहीत जेणे करून तो तुमच्या राशीत तुमची परीक्षा घेण्यासाठी आला आहे असे घडता कामा नये हे १००% असेच होणार.

कुंभ राशीच्या किंवा लग्नाच्या व्यक्तींच्या पत्रिकेत जर जन्माचा शनी चांगला नसेल तर तो आधी आपणाकडून चुका करवून घेतो जसे आपले कॅरॅक्टर लूज करवून नंतर तो तुम्हाला शिक्षा घडवेल तेव्हा प्रथम त्यास सांभाळा.

कुंभ राशीच्या किंवा लग्नाच्या व्यक्तींना एक गोष्ट खूप चांगली होणार आहे ती म्हणजे करिअर मध्ये त्याची प्रगती होईल. असे झाले तर आपला मान सन्मान वाढेल नवीन जबाबदाऱ्या मिळतील. मागील ३ वर्षे जे जे आपणाबरोबर झाले त्याची भर आता होईल.

मागील काही वर्षांपासून जे जे तुम्ही स्वतःसाठी करण्याची इच्छा बाळगून होतात त्यात आता अग्रेसर व्हाल आणि पुढे चालायला सुरुवात कराल ह्याचे कारण शश नामक पंचमहापुरुष योग आपल्या पत्रिकेत तयार होत आहे.

शनी च्या दृष्टी

जन्म स्थानाच्या वेळी आपल्या पत्रिकेत शनी जेथे बसला असेल तेथे तो चांगली फळे देतो आणि त्या संबंधित घटना आपल्याकडून करवून घेतो.

जन्म स्थानाच्या वेळी शनी ज्या राशीत असतो त्या राशीपासून ३ ऱ्या, ७ व्या आणि १० व्या स्थानावर आपली दृष्टी टाकतो. ह्या शनी च्या तिन्ही दृष्ट्या चांगल्या मानल्या गेलेल्या नाहीत. त्या त्या स्थानापासूनच्या विषयी व्यक्ती थोडा हैराण असतो आपल्या जीवनात. किंवा त्या स्थानातील चांगल्या परिणामांसाठी व्यक्ती सतत मेहनत करीत असतो. हे कोणत्या कोणत्या स्थानावर त्याची दृष्टी पडली आहे ह्यावर अवलंबून असते.

मात्र शनी जेव्हा एखाद्या स्थानावर मर्यादित कालावधीत गोचरीने भ्रमण करतो तेव्हा त्याची दृष्टी ज्या ज्या स्थानावर येत असते तेथून तो त्या व्यक्तीला उजेडात आणतो त्या स्थानाच्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्या २.५ वर्षाच्या कालावधीत तो त्या त्या गोष्टी त्याच्याकडून करवून घेतो. आणि तो जेथे बसलेला असतो त्या विषयी चे विषय सुद्धा व्यक्तीला त्याच्या प्रगतीसाठी मदत करतात.

कुंभ राशी आणि कुंभ लग्न कुंडली साठी शनी प्रथम स्थानातून आपल्या पराक्रम (तिसऱ्या) स्थानाला पाहत आहे. जिथे १ नंबर लिहिले आहे. तेथे मंगळाची मेष राशी येते आणि सध्या तेथे ३०/१०/२०२३ पर्यंत राहू सुद्धा तिथेच आहे. हा प्रकार आपल्या पराक्रमात आधी व्यत्यय आणण्याचा होऊ शकेल मात्र त्यात तुम्ही प्रयत्न करून पुढे जाल. लहान भावंडांचे हे स्थान असल्यामुळे त्याचा एखादा विषय आपल्यासमोर असेल. हा विषय आपणास थोडा त्रासाचा दिसू शकेल.

शनी ची सातवी दृष्टी

शनी ची सातवी दृष्टी हि जिथे ५ सिंह राशी आहे तिथे येत आहे. आपल्या विवाह स्थानावर त्याची दृष्टी आल्याने हा विषय सुद्धा तुम्हाला दिसेल ह्या स्थानापासून एप्रिल पर्यंत गुरु मीन राशीत असेल म्हणून तो ह्या स्थानापासून ८ वा येत असल्यामुळे आणि राहू मेष राशीतून विवाह स्थानावर ५ वी दृष्टी टाकत असल्यामुळे निदान एप्रिल पर्यंत तरी वैवाहिक अडचणींना सामना करावा लागेल. ज्यांचे विवाह अडकले असतील त्यांना एप्रिल नंतर विवाह होताना दिसतील. ऑक्टोबर ला राहू बदल झाल्यावर वैवाहिक संबंधातील काही ताण कमी होईल. किंवा त्याचे प्रश्न सुटतीलही.

ह्या शनीच्या भ्रमणात २०२३ आणि २०२४ मधील १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर हा कालावधी वैवाहिक विषयी फार चांगला नाही किंवा आपण सरकारी नोकरीत असाल किंवा राजकारणात असाल तरी चांगला सांगता येत नाही कारण इथे कन्या राशीत सूर्य हा शनीला ८ व्या स्थानी येईल.

शनी ची १० वी दृष्टी

आपल्या पत्रिकेत कर्म (दशम) स्थानी जिथे ८ मंगळाची वृश्चिक राशी आहे त्यावर आहे. त्यामुळे करिअर च्या बाबतीत घटना घडतील.
बऱ्याच कुंभ राशी काही करिअर मधील बदल करावेसे वाटतील. आपल्या पत्रिकेतील दशम स्थान जर चांगले असेल तर निर्णय घेण्यास हरकत नाही. आतापर्यंतच्या मागील ३ वर्षाच्या मेहनतीचे फळ आपणास मिळेल. बदली साठीचे प्रयत्न सफल होतील.

गुरु वृषभ राशी १/५/२०२४ ते १४/५/२०२५ पर्यंत असेल. — कुंभ लग्न किंवा राशी कुंडलीत चतुर्थ स्थानी असताना वरील १० व्या दृष्टीचे विवेचन हे सुखकारक होईल कारण गुरु ची ७ वी दृष्टी आपल्या कर्म स्थानावर येत आहे ह्याच कालावधीत घटना नक्की चांगल्या घडतील अशी अशा आहे. ह्यात कुणाला आत्तापर्यंत जर जॉब मिळत नव्हता त्यांची कामे पूर्ण होतील. आपला स्किल डेव्हलोप करण्यासाठी जे जे प्रयत्न कराल ते संपूर्ण समाधानी राहील.

गुरु २२/४/२०२३ पर्यंत मीन राशीत.– कुंभ लग्न किंवा राशी कुंडलीत द्वितीय स्थानी. ह्या कालावधीत कुटुंबासाठी आपली चांगली जबाबदारी पार पाडाल. पैसे कुटुंबासाठी खर्च कराल. कुटुंबात एखादे मंगल कार्य ह्याच दरम्यान घडेल.
कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एप्रिल पर्यंत चांगला आहे मात्र नंतर गुरु मेष राशीत जाईल तेव्हा विद्यार्थी दशेतील पायपीट दिसेल.

१/७/२०२३ ते १८/८/२०२३ मंगळ सिंह राशीत जात आहे तेव्हा तो आपल्या पत्रिकेत विवाह स्थानी असेल. सिंह राशीच्या समोरील कुंभ राशीत शनी असल्यामुळे इथे आपल्या तब्येतीच्या बाबतीत किंवा वैवाहिक सुखाच्या बाबतीतील विषय हे हैराण करणारे असतील.

असेच १५/३/२०२४ ते २३/४/२०२४ ला मंगळ कुंभ राशीतून जात असेल तेव्हा शनी + मंगळाची युती आपल्या प्रथम स्थानी येत असल्यामुळे ज्याना आधीपासून काही आजार असतील त्यांनी किंवा ज्यांच्याकडे आधीपासून वैवाहिक विषय असतील त्यांनी सुद्धा काळजी घ्यावी.

जे प्रेमसंबंधात असणारे तरुण तरुणी असतील त्याच्यासाठी वरील दोन्ही कालावधी हे कुंभ राशी आणि लग्नवाल्यांसाठी निर्णय घेण्याचा कालावधी दिसेल.

उपाय कुंभ राशी किंवा कुंभ लग्नाचा

ह्या पूर्ण साडेसाती मध्ये कधीही शनिवारी जर नॉनव्हेज खात असाल तर लगेच बंद करा. दशरथ कृत शनी स्तोत्र प्रत्येक शनिवारी वाचणे, प्रत्येक शनीवारी पिंपळाकडे मोहरी च्या तेलाचा दिवा लावणे, प्रत्येक शनीवारी गरजू व्यक्तींना तेल, उदंड, लोखंडी वस्तू, घोंगडी चे दान करत राहणे ह्याबरोबर प्रत्येक शनीवारी शनी मंत्र जरी जपला तरी राशीस्वामी स्ट्रॉंग होण्यास मदत होईल. हे उपाय करून साडेसाती चा हा कालावधी सुद्धा आपणास शुभ जाईल.

शनी कुंभ राशी प्रवेश नक्षत्र कालगणना

वरील लिंक वर जर आपण शनी च्या प्रत्येक नक्षत्राचा कालावधी पाहिलात तर त्यात ज्या ज्या वेळी शनी वक्री असेल त्या त्या वेळी आपल्याला वर दिलेली फळे हि अचानक आपल्या समोर असतील. ती चांगली किंवा वाईट हे आपल्या जन्माच्या शनीच्या अवस्थेवर अवलंबून आहे. साधारण गणित करायचे झाल्यास एव्हढेच आपण पाहू शकता जर आपल्या पत्रिकेत शनी वक्री असेल आणि इथे भ्रमण काळातील शनी वक्री असताना तो आपल्याला चांगली फळे नक्कीच देतील.

वरील लिंक मध्ये दिलेल्या नक्षत्र भ्रमणाचे परिणाम आपल्या जीवनावर काय होतील ह्यासाठी आपण नक्कीच एखाद्या तज्ज्ञ ज्योतिषाकडून सल्ला घ्या हि विनंती. कारण इथे प्रत्येक नक्षत्राबद्दलचे विवेचन सर्वांसाठी सारखे नसेल.

धन्यवाद…..!
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८

Leave a Reply