ज्योतिष शास्त्रात राशीचे महत्त्व
नमस्कार मित्रानो ,
ज्योतिष विषयक पहिल्या पानावर काय लिहायचे ह्याचा विचार आधीच केला होता ह्या पहिल्या पानाचे नाव राशी-
माझी रास काय आहे- (What is my Rashi in Marathi).
आपण एकमेकांना सहज विचारतो काय रे बाबा तुझी राशी कोणती (Whats your Rashi). किंवा गपचूप एखाद्याला हिणवितो सुद्धा हा ह्या राशीचा असावा. राशी हि ज्योतिष शास्त्राची खरी ओळख आहे असे मला सुद्धा वाटते. कारण पत्रिकेत जे १२ भाव असतात त्यात जे आकडे असतात ते राशिचेच असतात ना.
१२ राशी १३० करोड लोकसंख्या जर ह्या संख्येला १२ ने भागले तर कितीतरी करोड लोकांची एकच राशी येते मग सारख्या राशीवाल्याना एकसारखे रिझल्ट का मिळत नाहीत? ह्याला उत्तर म्हणजे देश, वेष, परिस्तिथी, बोली, संस्कार ह्यावर सर्व अवलंबून असते.
What is my Rashi – माझी रास काय आहे
- मेष (Aries)
- वृषभ (Taurus)
- मिथुन (Gemini)
- कर्क (Cancer)
- सिंह (Leo)
- कन्या (Virgo)
- तूळ (Libra)
- वृश्चिक (Scorpio)
- धनु (Sagittarius)
- मकर (Capricorn)
- कुंभ (Aquarius)
- मीन (Pisces)
तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती राशी तुमची असते. पत्रिकेत चंद्र ज्या आकड्याबरोबरोबर लिहिला असेल त्या नंबर ची राशी तुमची समजावी.
उदाहरण — जर पत्रिकेत चंद्र ४ नंबर बरोबर लिहिला आहे तर कर्क राशी आहे तुमची.
राशीच्या प्रत्येक चिन्हां वरून
तिच्या तत्व वरून
राशीच्या रंगावरून
तिच्याकडे असलेल्या ग्रहांच्या लीडरशिप वरून
त्या व्यक्तीचा स्वभाव आणि ऍक्टिव्हिटीज कळतात.
ह्यात प्रत्येक राशीत सर्वाना सारखा अनुभव ह्यासाठी सुद्धा येत नाही कारण चंद्र त्या राशीत वेगवेगळ्या डिग्री वर असतो.
पुढे मी राशीबद्दल लिहिणार आहे. त्यासाठी खालील काही पॉईंट्स वर नजर ठेवा.
- तुमची राशी कोणती आहे हे ठरल्यावर तुम्ही प्रथम चंद्र किती डिग्री चा आहे ते पहा.
- चंद्र हा ० डिग्री ते २९.५९ डिग्री पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल.
- चंद्र हा ० डिग्री ते २९.५९ डिग्री पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल.त्यावरून तुमची राशी किती मजबूत आहे ते पहा.
- जर तुमचा चंद्र हा जन्माच्या वेळी ० ते ५ डिग्री च्या आत किंवा २६ ते २९.५९ डिग्री असेल तर त्या राशीचे चांगले गुणधर्म मिळण्यास त्रास होतो त्या व्यक्तीला.
- राशी चा मालक जर पाप ग्रहांबरोबर बसला असेल किंवा त्याच्या दृष्टीत असेल किंवा मागे पुढे पापग्रह असतील तरी ती राशी कमकुवत होते.
राशी हा एक बेसिक विषय असला तरी त्या राशीवरून आपली एक ओळख असते ती विसरता कामा नये.
आपल्या राशी वर फॉलोव कसा ठेवावा.
- आधी पाहावे राशीला साडेसाती किंवा शनीची लहान पनौती आहे का ?
- नसेल तर आपल्या राशीवरून कोणता पापग्रह सध्या अवकाशातून जात आहे का ?
- आपली राशी हि ज्या तत्वाची ज्या गुणधर्माची आहे तशी ऍक्टिव्हिटी आपण करत आहोत का ?
- आपल्या राशी ची शत्रू राशी मित्र राशी कोणती आहे आणि त्या व्यक्ती आपल्या सानिध्यात आहेत का ?
- आपली जन्म राशी पत्रिकेत ज्या स्थानी बसली आहे तिथून आपण काही ऍक्टिव्हिटी करत आहोत का?
- आपल्या राशी प्रमाणे आपला स्वभाव आहे का ?
- आपल्या राशी चे दान धर्म योग साधना आपण सध्या करत आहोत का ?
ह्या सर्व गोष्टींचे विवेचन प्रत्येक राशीवर लिहिणार आहे तेव्हा वेट अँड वॉच फॉर श्री दत्तगुरु ज्योतिष नेक्स्ट ब्लॉग .
नोट :- नुसत्या राशीने ज्योतिष शास्त्रात भविष्य कळत नाही.नक्षत्र तिथी योग भाव युत्या महादशा आणि हजारो नियम पत्रिकेवर असतात. पण जर राशी बॅलन्स केली तर ५०% लढाई जिंकलात तुम्ही असा माझा स्वतःचा अभ्यास सांगतो.
जबाबदारी स्वीकारून प्रत्येकाने राशी स्वतःची कोणती आहे हे जाणून घ्यावे कारण निदान हे तर कळेल कि जन्म देताना ज्या आईने यातना सहन केल्या तेव्हा मनाचा आणि आईचा कारक चंद्र हा कोणत्या राशीत होता. आणि तेथून माझ्या जीवनाला त्याची साइन मिळाली.
ह्याचे कारण असे आहे कि चंद्र जेथे तुमचा पडलेला असेल पत्रिकेत त्या स्थानाच्या विषयातून तुम्ही आयुष्यभर कधीच बाहेर पडणार नाही…
असो आजच्या पुरता एव्हढे पुरे …
पुढच्या लेखात राशी बद्दल असे लिहिणार आहे कि तुम्ही नक्की विचार करायला लागाल क्या बात है ?