You are currently viewing रक्षाबंधन मुहूर्त २०२२

रक्षाबंधन मुहूर्त

रक्षाबंधन हा सण नेहमी श्रावणातल्या पूर्णिमा तिथीला मानवाला जातो. ज्यात बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि त्याच्या प्रगतीची, त्याच्या सुरक्षेची, त्याच्या सुखाची मनोकामना करते.

दिनांक ११ ऑगस्ट २०२२ ला पूर्णिमा १०:३८ पासून सुरु होत आहे आणि हि तिथी १२ ऑगस्ट २०२२ च्या सकाळी ७:०५ ला संपत आहे
म्हणून रक्षाबंधन हे ११ तारखेलाच होईल.

भद्राभद्राभद्रा

दुसरे असे कि रक्षाबंधनाच्या वेळी भद्रा हा विचार केला जातो कारण कोणतेही शुभ कार्य हे भद्रा सुरु असताना केले जात नाही असे पंचांग शास्त्र सांगते.
एका महिन्यात ३० तिथी असतात. प्रत्येक तिथीत २ करणे असतात. आणि हि कारणांची संख्या फक्त ११ असते. ती खालील प्रमाणे

 1. बव
 2. बालव
 3. कौलव
 4. तैतिल
 5. गर
 6. वणिज
 7. विष्टि (भद्रा)
 8. शकुनि
 9. चतुष्पद
 10. नाग
 11. किस्तुघन

अशी ११ करणे लागोपाठ ३० दिवस दोन दोन क्रमाने येत असतात. ज्या दिवशी विष्टी करण असेल त्या दिवशी भद्राचा विचार केला जातो.

काय आहे भद्रा

शनी ची भद्रा हि बहीण आहे. शनी देवाप्रमाणेच तिचा हि स्वभाव कठोर आहे. म्हणून जेव्हा भद्रा असेल त्या दिवशी शुभ कार्य वर्जित आहे.
पण तांत्रिक क्रिया, कोर्टकचेरी, राजनीती अशा कामांसाठी भद्रा चा विचार केला जातो

काय आहे भद्रा वास (स्थान)

भद्रा चे स्थान हे चंद्राच्या राशीवर अवलंबून आहे. चंद्र ज्या दिवशी कर्क सिंह कुंभ मिन राशीत असेल तेव्हा भद्रा हि पृथीवर असते.
चंद्र ज्या दिवशी मेष वृषभ मिथुन वृश्चिक राशीत असतो तेव्हा भद्रा हि स्वर्गलोकात असते.
चंद्र ज्या दिवशी कन्या तुला धनु मकर राशीत असतो तेव्हा भद्रा हि पाताळ लोकी असते. हे सर्व ब्रह्मदेवाने आखून दिले आहे.

पृथ्वीवर भद्रा हि अशुभ मानली गेली आहे. आणि स्वर्गलोकी आणि पातळ लोकी हि शुभ मानली गेली आहे.

दिनांक ११ ऑगस्ट २०२२ ला भद्रा हि पाताळ लोकी असल्याने रक्षाबंध करण्यास हरकत नाही.

भद्रा ची शेपटी आणि मुख

जर भद्रा पृथीवर असेल तर तिचे मुख सुरु असताना कोणतेही शुभ काम करू नये
जर शेपटी उदित होत असताना कामे करण्यास हरकत नाही.

११ तारखेला भद्रा हि पाताळ लोकी आहे तरी तिचे मुख उदित असताना रक्षाबंधन करू नये. संध्या ६:१८ पर्यंत रात्री ८ पर्यंत करू नये.

काही ठिकाणी असेही म्हटले आहे कि दुपारच्या वेळी दोष नसतो म्हणून २:१४ ते ३:०७ पर्यंत रक्षाबंधन करू शकता. पण ११ तारखेला राहू काळ २:१९ ते ३:५६ आहे.(मुंबई) करू नये. इथे आपापल्या शहराचे राहू काळ गूगल ला सर्च करावा.

भद्रा समाप्ती रात्री ८:५१ ला होत आहे म्हणून ८:५२ ते ९:१४ पर्यंत आणि हा प्रदोष मुहूर्त सुद्धा आहे त्यामुळे रक्षाबंधन करण्यास हरकत नाही.

नोट — वरील जे जे दिले आहे ते माझे मत नाही भद्रा हि पातळ लोकी शुभ – शेपटीकडे शुभ
पण श्री दत्तगुरु ज्योतिष हे कोणत्याही स्थितीत भद्रा सुरु असताना रक्षाबंधनाला मान्यता देत नाही. काही ठिकाणी ५:१७ ते ६:१८ ला भद्राचे शेपूट सुरु असताना मान्यता दिली गेली आहे. पण हे सुद्धा माझ्या मते वर्जित समजावे. सरळ ८:५२ ते ९:१४ पर्यंत रक्षाबंधन करावे.

धन्यवाद…..!

Leave a Reply