You are currently viewing श्रावण महिना- नक्की आत्तापर्यंत न वाचलेले मिळेल

चातुर्मासात म्हणजे ४ महिन्यांचा कालावधी, त्यात श्रावण / भाद्रपद / अश्विन आणि कार्तिक असे हे ४ महिने पूर्णपणे उत्सवाचे असतात.

दिनांक २१ जुलै पासून श्रावण महिना सुरु होत आहे. काही उत्तरभारतातल्या ठिकाणी हा महिना पौर्णिमेपासून सुरु झाल्यामुळे त्यात श्रावणातले १५ दिवस पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि काही प्रांतात श्रावण महिना २१ जुलै पासूनच सुरु होईल.

ह्या महिन्यात  नागपंचमी , रक्षाबंधन (नारळी पौर्णिमा) , श्री कृष्ण जयंती (कृष्णाष्टमी) , दहीहंडी , पिठोरी अमावस्या (पोळा) असे मुख्य सण असतात.

ह्या श्रुष्टीचा रक्षणकर्ता विष्णू हा पाताळलोकी असताना हे ४ महिने श्रुष्टीचा सांभाळ करण्यासाठी वेगवेगळ्या शक्तींनी कसे वाटून घेतले आहे हे पहा.

खरे म्हणजे शिव हि देवता संहारक आहे पण पूर्ण चतुर्मासात श्रुष्टीला सांभाळण्याचे कार्य हे शिवपरिवाराकडे आहे अर्थात शिव गणेश पार्वती आणि कार्तिकेय. ह्या साठी ह्यांची पुढील प्रमाणे आराधना करण्याची रीती आहे.

कसे

  • श्रावणात शिव उपासना (सोमवारचे व्रत)
  • भाद्रपदात गणेश उपासना (गणेशोत्सव)
  • अश्विन मध्ये देवी उपासना (नवरात्री)
  • कार्तिक महिन्यात – कार्तिकेय उपासना.

म्हणून पूर्ण श्रावणात केलेली जी जी शिव उपासना असते ती साधकाला त्याच्या जीवनातील समस्या दूर करण्यास शिव नक्की मदत करेल ह्यावर विश्वास ठेवा.

ह्यासाठी सोमवार चे व्रत त्यात अति महत्वाचे असते 

शिव हा भोळा आहे असे मानले जाते तसेच शिव हा स्त्रियांच्या उपासनेला लगेच फळ देणारी देवता असल्याने ह्यात स्त्रियांनी शिवाची जास्तीत जास्त उपासना करावी सांगितली आहे.

मग त्याच्या विवाहाचे प्रश्न असू देत किंवा त्यांना संततीचा प्रश्न असू देत किंवा आरोग्याचा सुद्धा असे कितीतरी प्रश्न स्त्रियांना ह्या महिन्यात सोडविता येतात.

> हेही वाचा…. दीप अमावस्या-दिव्याची अमावस्या-आषाढ अमावस्या

माझ्या मते श्रावणात स्त्रियांनी जास्तीत जास्त शिव उपासना करून आपले प्रश्न सोडवून घ्यावेत जे जे तुमच्या आयुष्यातील असतील.

भाद्रपद महिन्यातला गणेश उत्सव सर्व बालकांना युवकांना विद्यार्थ्यांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी असतो. (बुद्धीचा दाता श्री गणेशच असतो)  

अश्विनी महिन्यात देवीची उपासना हे पुरुषांना स्त्रियांशी कसे वागावे कसा मान सन्मान ठेवायचा ह्यासाठी त्यांना देवी उपासनाचे व्रत दिले असावे 

आणि कार्तिक महिना ह्यात कार्तिकेय चे सेनापती नियम म्हणजे करिअर साठी त्यात उपासना करून पैसा / हिम्मत / पराक्रम गाजविण्यासही ह्या महिन्यातील उपासना फळ देते. म्हणून व्यापारी लोकांसाठी हा महिना जास्तीत जास्त क्रियाशील आहे असे मला वाटते.

तेव्हा मित्रानो ह्या श्रावणात शिवाची उपासना बद्दल वेळोवेळी लिहेन पण त्यासाठी पूर्ण श्रावणात तुम्ही अति सात्विक राहण्याची हि वेळ आहे समजा नियमच आहेत आपल्या संस्कृतीचे असेच समजा.

ह्यासाठी शिव उपासनेत जसे कांदा लसूण किंवा उग्र पदार्थ कामुक पदार्थ चालत नाहीत म्हणून हे पूर्ण महिन्यात वर्ज करावेत.

तेव्हा पुढील लेखात शिव उपासना आणि श्रावण ह्याबद्दल जरूर वाचाल.

धन्यवाद.

This Post Has 3 Comments

  1. अनिल केगडे

    खुप सुंदर, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती

  2. अनिल केगडे

    खुप सुंदर, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    धन्यवाद

  3. Ranjana Mardhekar

    खुप छान माहिती आहे

Leave a Reply