मंगळ आणि त्याचा नक्षत्र विचार
Mangalik Kundali and Married Life- विषय-विवाह विच्छेद
https://shreedattagurujyotish.com/kashi-olakhavi-mangalik-patrika/
वरील लिंक वर आधी क्लिक करून मांगलिक ची पूर्ण माहिती मिळवा.
आपणाकडे जर कॉम्पुटर कुंडली असेल तर लग्न कुंडलीच्या वर प्रत्येक ग्रहाच्या डिग्रीज दिलेल्या असतात. विवाहाच्या सुखात जर आपण मांगलिक असाल तर जरूर ह्याचा विचार करावा. आणि मांगलिक नसाल तरी त्याच्या डिग्रीज एकदा पाहून घ्या.
१२ राशीतल्या २७ नक्षत्रात काही तीक्ष्ण नक्षत्र असतात आणि जर त्याचा संबंध मांगलिक दोष असेल सप्तम भाव आणि त्याचा स्वामी आणि कारक बरोबर असेल तर विवाह सुखाची चिंता करावी लागेल.
तीक्ष्ण नक्षत्र फक्त ४ असतात
- आद्रा – मिथुन राशीत ६:४० ते २० डिग्री
- आश्लेषा – कर्क राशीत १६:४० ते ३० डिग्री
- जेष्ठा वृश्चिक राशीत १६:४० ते ३० डिग्री
- मूळ – धनु राशीत ० ते १३:०० डिग्री
जर वरील राशीत मंगळ दिलेल्या डिग्रीत असेल तर आणि मांगलिक योग असेल किंवा त्याबरोबर सप्तमाचा स्वामी असेल तर अधिक चिंता करावी.
हि नक्षत्र एव्हढी स्ट्रॉंग असतात कि जर कुणाबरोबर संबंध तोडायचे असतील त्यावेळी आपण एकदम स्ट्रॉंग होऊन त्या व्यक्ती बरोबरचे संबंध तोडायला मदत करतात.
ह्या नक्षत्रांप्रमाणे आजून काही उग्र नक्षत्र असतात ती अशी — भरणी, पूर्व भाद्रपदा, पूर्व आषाढ, मघा, पूर्व फाल्गुनी हि नक्षत्र सुद्धा चांगली नसतात पण वरील पेक्षा उग्र नाहीत.
जर पहिल्या ४ नक्षत्रांमध्ये आपला मंगळ असेल किंवा आपण मांगलिक नसाल आणि ७ वा भाव जरी वरील ४ नक्षत्रांमध्ये त्या डिग्रीत असेल तरी तो जोडीदाराचे सुख मुलूं देत नाही.
मांगलिक पत्रिकेत मंगळाच्या पत्रिकेत ह्याचा नक्की विचार करावाच लागतो.
धन्यवाद…..!