You are currently viewing शिव पूजेबद्दल जाणून घ्या : SHIVPUJA NIYAM

शिवाला कोणत्या वस्तू पूजेत अर्पित करत नाहीत

  • हळद — ह्याचा जेवणाबरोबर आणि शुभ कार्यात सुद्धा सहभाग असतो. हे एक सौंदर्य प्रधान असल्यामुळे ह्याचा संबंध शिव पिंडीवर पूजेत करत नाहीत. (पण हळकुंड आपल्या विवाहाच्या प्रार्थनेसाठी चढवू शकता.)
  • वर्जित फुले — कणेर, कमळ, लाल रंगाची फुले आणि सफेद रंगाच्या फुलात केतकी आणि केवडा शिवाला वाहिला जात नाही. याचा निषेध आहे.
  • कुंकू सुद्धा शिव पूजेत वाहण्याची परंपरा नाही. (पण जिथे शिवपिंडीवरून पाणी खाली उतरते तिथे पार्वतीचे स्वरूपात तिथे वाहू शकता हळदी कुंकू – पण पिंडीवर नाही)
  • शिवाच्या कोणत्याही अभिषेकात पूजेत शंख वापरू नये. शंख हे भगवान विष्णूंना अतिप्रिय जरी असले तरी शंखासुराचा वध शिवाने केल्यामुळे शंखाला शिव पूजेत मान्यता नाही.
  • शिव पूजनात कधीही नारळ फोडू नये. प्रसाद म्हणून पूर्ण अक्खा नारळ शिवाला अर्पण करण्याची परंपरा आहे. पण त्यात सुद्धा नंतर ते फोडून त्यातले पाणी पिऊ नये.
  • तुळस सुद्धा शिवाच्या पूजनात वर्जित आहे. ह्याचा संबंध जालंधर च्या कथेशी आहे. जालंधर चा वध शिवाने केला होता आणि त्याच्या पत्नी वृंदा हिने विष्णूला शाप देऊन स्वतः तुळस झाली होती.आणि विष्णू शाळीग्राम झाले होते. (एक काळा दगड)

शिवपुजनात कोणत्या वस्तू अर्पण करतात

सर्वात शिवाला प्रथम जल (पाणी) ह्याने अभिषेक करण्याची रीती आहे. त्याबरोबर दूध, दही , गायीचे तूप , मध , साखर, अत्तर, चंदन , केसर , भांग ह्या सर्व वस्तूंचा अभिषेक शिव पिंडीवर करण्याची पद्धती आहे.

प्रत्येक अभिषेक ची वेगवेगळी फळे

१) पाण्याने अभिषेक करता करता शिव मंत्र म्हटल्याने स्वभाव शांत होतो. व्यक्तीचे आचरण शुद्ध होते. मन शांत राहते.

२) मधाने अभिषेक केल्याने वाणीत गोडवा येतो. असा व्यक्ती बोलताना प्रभावात येतो. त्याच्या बोलण्याने इतरांची कामे होतात. करून पहा.

३) दुधाने अभिषेक केल्याने उत्तम स्वास्थ्य प्राप्त होते.

४) दह्याने अभिषेक केल्याने स्वभावात गंभीर पणा येतो.

५) तुपाने अभिषेक केल्याने शक्ती वाढते.

६) अत्तराच्या अभिषेकाने विचार पवित्र होतात.

७) शिवपिंडीवर चंदनाचा लेप केल्याने मानसन्मान वाढतो, व्यक्ती आकर्षित होतो.

८) केसर अर्पित केल्याने सौम्यता येते. व्यक्ती एकदम सरळ मार्गाने आपले जीवन जगतो.

९) भांग चढविल्याने व्यक्तीचे विकार दूर होतात. वाईट गोष्टींपासून सावधानता प्राप्त होते.

१०) साखर चढविल्याने सुख समृद्धी वाढते.

११) गंगाजलाने रोज शिवाभिषेक केल्याने व्यक्तीला पुनर्जन्म नाही. मुक्ती मिळते. आणि सध्याच्या जीवनात व्यक्ती समाधानी होऊन जातो.

काय आहे रुद्राभिषेक?

एका सामान्य कोणत्याही अभिषेकाने पूजनाने भोलेनाथ प्रसन्न होतात पण व्यक्ती जर खूप त्रासात असेल किंवा शिवाच्या अगदी जवळीक साधना करण्याची त्याची उपासना असेल तर रुद्राभिषेक उत्तम मानला गेला आहे.
रुद्र हा शिवाचा एक अवतार मानला जातो. आणि त्यामुळे शुक्ल यजुर्वेदाच्या रुद्राष्टाध्यायी मंत्राने काही विशेष अभिषेक शिवपिंडीवर करण्याची पद्धती त्याला रुद्राभिषेक म्हटले गेले आहे.

ह्याने व्यक्तीच्या जीवनात आलेले कष्ट, ग्रहपीडा, दूर करण्यासाठी किंवा कोणत्याही मनोकामना लवकर पूर्ण होण्यासाठी उपयोगात आणले जाते.

कुठे करावा रुद्राभिषेक आणि त्याचे फळ

घरातील स्थापित पिंडीवर , मंदिरात, नदीकिनारी समुद्र किनारी, पर्वतावर रुद्राभिषेक करावा.

सर्वात प्रथम क्रमांकावर पर्वतावर रुद्राभिषेक विशेष फळ देते नंतर नदी वर नंतर मंदिरात आणि सर्वात शेवटी घरातील पिंडीवर.

रुद्राभिषेक करताना तुपाने अभिषेक केले तर वंश वाढतो , साखर आणि दुधाने अभिषेक केला तर व्यक्ती विद्वान होतो, मधाने अभिषेक केला तर जुने आजार दूर होतात, गायीच्या दुधाने अभिषेक केल्यास आरोग्य उत्तम राहते. भस्माने अभिषेक केल्यास मुक्ती मिळते. काही विशेष प्रयोगात तेलाने सुद्धा अभिषेक करण्याची पद्धती आहे जेव्हा रुद्राभिषेक विधी होत असेल. त्याचे फळ वेगवेगळे आहे.

केव्हा करावा रुद्राभिषेक

पूर्ण ब्रह्माण्डात शिवाचे वास्तव्य सांगितले गेले आहे.

जेव्हा शिव पार्वती एकत्र असतात तेव्हा त्यांचे वास्त्यव्य हे कैलास पर्वतावर असते.

प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षी द्वितीय तिथीवर आणि नवमीला शिव कैलासावर पार्वती एकत्र असतात.
प्रत्येक महिन्याची कृष्ण पक्षाची प्रतिपदा अष्टमी आणि अमावस्या ला सुद्धा शिव पार्वती एकत्र असतात.
कृष्ण पक्ष ची चतुर्थी आणि एकादशी ला आणि शुक्ल पक्षाच्या पंचमी, द्वादशी तिथीला शिव कैलासावर असतात.
कृष्ण पक्षाच्या पंचमी आणि द्वादशी ला शिव नंदीवर आरूढ असतात. आणि विश्व भ्रमण करतात.
शुक्ल पक्ष षष्टी आणि त्रयोदशी इथेसुद्धा शिव विश्व भ्रमण करतात.

ह्या वरील तिथींना शिवरुद्राभिषेक उत्तम मानला गेला आहे.

रुद्राभिषेक केव्हा करू नये

कृष्ण पक्षाच्या सप्तमी आणि चतुर्दशी ला आणि शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा, अष्टमी, पूर्णिमा शिव स्मशान भूमीत ध्यानस्त अवस्थेत असतात.
कृष्ण पक्ष द्वितीयेला आणि नवमी ला तसेच शुक्ल पक्ष तृतीयेला, दशमी ला शिव देवांची समस्या जाणून घेत असतात.
कृष्ण पक्ष तृतीय आणि दशमी शिव नटराज क्रीडेत व्यस्त असतात.
कृष्ण पक्षात षष्ठी आणि त्रयोदशी ला रुद्र भोजन करतात.

वरील सर्व तिथी रुद्राभिषेक करताना जर आपल्या कोणत्याही मनोकामनेसाठी करत असाल तर करू नये. बाकी असेच केले तर काही हरकत नसेल.

नोट — महाशिवरात्री हि एकदा वर्षातून येते पण जर काही खूप विशेष अडचणी दूर करायच्या असतील तर त्यासाठी शिव उपासना प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला करावी त्याचे फळ एका वर्षात मिळते असा कित्येक जणांचा अनुभव आहे.

राशी प्रमाणे शिव मंत्र

तसे शिवाच्या सान्निध्यात लिन होण्यासाठी पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय हाच असेल
तरी सुद्धा काही मंत्र इथे राशीप्रमाणे सुद्धा काही ठिकाणी सांगितले आहेत त्याचा उपयोग करून पहावा.

मेष : ॐ सोमेश्वराय नमः
वृषभ: ॐ मल्लिकार्जुनाय नमः
मिथुनः ॐ महाकालेश्वराय नमः
कर्कः ॐ ॐकारेश्वराय नमः
सिंहः ॐ वैजनाथाय नमः
कन्याः ॐ भिमाशंकराय नमः
तुलाः ॐ रामेश्वराय नमः
वृश्चिक: ॐ नागेश्वराय नमः
धनुंः ॐ विस्वेश्वराय नमः
मकरः ॐ त्रंबकेश्वराय नमः
कुंभः ॐ केदारेश्वराय नमः
मीनः ॐ धृष्मेश्वराय नमः

शिव आपले कल्याण करो

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. Jayashree Nalawade chiplun

    Very nice 👍👍

Leave a Reply