You are currently viewing मोबाईल नूमरॉलॉजि: काय सांगतात आपल्या मोबाईल नंबर मधील अंक?

मोबाईल नूमरॉलॉजि | Mobile Numerology

मोबाईल नूमरॉलॉजि: 12 किंवा 21

जर आपल्या मोबाईल नंबर मध्ये १२ किंवा २१ असे नंबर असतील कुठेही लागोपाठ तर त्यातील १ नंबर सूर्याचा (राजा) आहे आणि २ नंबर चंद्राचा (राणी) आहे.
२१ मध्ये पहिला चंद्र (राणी) आणि नंतर(राजा)

असे अंक वापरणाऱ्या व्यक्ती फोटोजेनिक असतात. चेहऱ्यावर एक आभा असते. ह्यांच्या जीवनात ७ वेळा अप्स डाऊन पाहायला मिळते
पैसा भरपूर मिळतो. ह्यांचे शत्रू खूप असतात पण काही वाकडे करू शकत नाहीत. १२/२१ साठी सर्व सारखे असेल पण २१ अंक असलेल्याना पैसा टिकविता येत नाही. आणि १२ अंक वापरात असलेल्या व्यक्तींना पैसा टिकविता येतो हा फरक आहे.
तेव्हा १२ किंवा २१ जर वापरात असलात मोबाईल नंबर मध्ये तर वरील सर्व चेक करा आणि हे नंबर नसतील तर मोबाईल मध्ये घेण्याचा प्रयत्न करा.

मोबाईल नूमरॉलॉजि: 13 किंवा 31

जर आपल्या मोबाईल नंबर मध्ये १३ किंवा ३१ असे नंबर असतील कुठेही लागोपाठ तर त्यातील १ नंबर सूर्याचा (राजा) आहे आणि ३ नंबर गुरु चा आहे

जीवनात अशा व्यक्ती सक्सेस च्या मार्गाने असतात. ह्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली दिसेल. हे फार हुशार असतील. शिक्षण चांगले झालेले असते. नशीब ह्यांना नेहमी साथ देते. म्हणून मोबाईल मधील १३ किंवा ३१ हा नंबर चांगला मनाला जातो. ह्यात फक्त अहंकार जवळ बाळगू नये त्याने नुकसान झालेले पाहण्यात आले.

मोबाईल नूमरॉलॉजि: 14 किंवा 41

जर आपल्या मोबाईल नंबर मध्ये १४ किंवा ४१ असे नंबर असतील कुठेही लागोपाठ तर त्यातील १ नंबर सूर्याचा (राजा) आहे आणि ४ नंबर राहू चा आहे.

इथे सूर्याला राहू ने वेढले आहे. सूर्य बरोबर राहू आला कि हा एक ग्रहण दोष मानला जातो. जर आपल्या मोबाईल मध्ये हा नंबर असेल तर काळजी करण्याचे कारण आहे कारण इथे सूर्याची ताकद कमी झाल्याने मानसन्मान, रुतबा कमी होण्याचे प्रकार असतात. हेल्थ साठी सुद्धा हे चांगले नाही. घरात कुणी ना कुणी आजारी असण्याची शक्यता असते. सरकारी कामे होत नाहीत किंवा ह्यांना एखाद्या सरकारी नोटीस साठी धावपळ झालेली पाहावयास मिळते.

>> हेही वाचा : आपले नाव आणि नूमरॉलॉजी

मोबाईल नूमरॉलॉजि: 16 किंवा 61

जर आपल्या मोबाईल नंबर मध्ये १६ किंवा ६१ असे नंबर असतील कुठेही लागोपाठ तर त्यातील १ नंबर सूर्याचा (राजा) आहे आणि ६ नंबर शुक्राचा आहे.

इथे सूर्य आणि शुक्र युती होते. हे मोबाईल मध्ये दिसले कि त्याच्या पार्टनर ला काही आजार आहे आणि त्यासाठी त्याची धावपळ आणि पैसा खर्च होत आहे असे पहावयास मिळते. घरात एखाद्या स्त्रीला गर्भाशय संबंधित आजार सुद्धा दिसतात. काही वेळा अशा व्यक्तींना मूत्राशयाचे आजार होण्याचे प्रकार होतात. वाढत्या वयाच्या मुला मुलींनी हे दोन्ही नंबर वापरण्याचे टाळावे.

मोबाईल नूमरॉलॉजि: 18 किंवा 81

जर आपल्या मोबाईल नंबर मध्ये १८ किंवा ८१ असे नंबर असतील कुठेही लागोपाठ तर त्यातील १ नंबर सूर्याचा (राजा) आहे आणि ८ नंबर शनी चा आहे.

इथे सूर्य आणि शनी युती होते. जे पिता पुत्र असून सुद्धा एकमेकांचे शत्रू मानले गेले आहेत. त्यामुळेच एखाद्याने जर आपल्या मोबाईल मध्ये हे नंबर वापरले तर त्याचे पित्या बरोबर संबंध चांगले दिसत नाहीत किंवा पित्याला त्रास किंवा आजार पाहण्यात येतात. सरकारी कामकाजात ह्यांना अडथळे येऊ शकतात. इथे शुक्र सुद्धा कमजोर होतो म्हणून जीवनसाथी ला आजार होण्याची शक्यता असते. ह्याच्या करिअर मध्ये सुद्धा वर खाली पाहण्यात येते.

मोबाईल नूमरॉलॉजि: 23 किंवा 32

जर आपल्या मोबाईल नंबर मध्ये २३ किंवा ३२ असे नंबर असतील कुठेही लागोपाठ तर त्यातील २ नंबर चंद्राचा (माता) आणि ३ नंबर गुरुचा आहे.

इथे चंद्र आणि गुरु युती होते म्हणून ज्योतिष शास्त्राप्रमाणे हि युती गजकेसरी योग मानला जातो. त्यामुळे ज्ञान पैसा उत्तम मिळतो. दुसऱ्याचा आदर करण्याचा भाव असतो. सात्विकपणा येतो. पण जर हे दोन्ही पैकी एक नंबर जर मोबाईल मध्ये वापरात असाल आणि आपल्याला मुलं असतील तर त्यांच्यापासून काहीतरी दुःख प्राप्त होते. त्यांच्या एकतर प्रगती साठी खूप धावपळ होते किंवा हेल्थ साठी. मुलांकडून सतत काळजी देणारे हे अंक असल्याने व्यक्ती मुलाबाळांकडून हैराण असतो. किंवा त्याचा पैसा त्याच्यासाठी फुकट सुद्धा जाताना पहिला आहे.

मोबाईल नूमरॉलॉजि: 24 किंवा 42

जर आपल्या मोबाईल नंबर मध्ये २४ किंवा ४२ असे नंबर असतील कुठेही लागोपाठ तर त्यातील २ नंबर चंद्राचा (माता/राणी/मन/स्त्री) आणि ४ नंबर राहूचा आहे.

इथे चंद्र आणि राहू युती होते म्हणून ज्योतिष शास्त्राप्रमाणे हि युती ग्रहण दोष मनाली जाते. इथे चंद्राला दोष लागतो म्हणून व्यक्ती सतत मानसिक त्रासातून जात असतो. निगेटिव्ह विचार सतत सुरु असतात. अशा व्यक्ती खूप प्रयत्नाने सक्सेस मिळवितात. एखाद्या अपघाताची भीती सतत मनात असते. आग आणि पाणी ह्यांच्यापासून सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो.

मोबाईल नूमरॉलॉजि: 26 किंवा 62

जर आपल्या मोबाईल नंबर मध्ये २६ किंवा ६२ असे नंबर असतील कुठेही लागोपाठ तर त्यातील २ नंबर चंद्राचा (माता/राणी/मन/स्त्री) आणि 6 नंबर शुक्राचा आहे.

इथे चंद्र आणि शुक्र युती होते म्हणून अशा व्यक्तींना शिक्षणात व्यत्यय येऊ शकतील. शिक्षण पूर्ण होताना खूप मेहनत करावी लागेल. विवाहित महिला हा अंक वापरत असतील सासू चा एखादा त्रास जाणवतो. किंवा पटत नाही. अशा व्यक्तींना मधुमेह आजार होण्याचे चान्सेस असतील. शरीरातील साखर वाढलेली असते. शारीरिक थकवा सुद्धा पाहण्यात आला.

मोबाईल नूमरॉलॉजि: 27 किंवा 72

जर आपल्या मोबाईल नंबर मध्ये २७ किंवा ७२ असे नंबर असतील कुठेही लागोपाठ तर त्यातील २ नंबर चंद्राचा (माता/राणी/मन/स्त्री) आणि ७ नंबर केतूचा आहे.

इथे चंद्र आणि केतू युती होते म्हणून इथे चंद्राला बळ मिळत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींच्या मातेला काही ना काही त्रास सहन करावा लागतो. काही वेळा आजारी पाहण्यात आल्या किंवा काही वेळा मातेचे सुख कमी पाहण्यात येते. मानसिक क्लेश असतो. पैसे येतो पण बऱ्याच प्रमाणात वाया सुद्धा जातो. जर 74 च्या आधी ३ अंक असेल ३७४ असे नंबर येत असतील तर जास्त मेहनत करून कमी पैसा मिळेल आणि जर २७ च्या पुढे 9 अंक असेल 279 तर कमी श्रमात जास्त पैसा मिळतो.

मोबाईल नूमरॉलॉजि: 28 किंवा 82

जर आपल्या मोबाईल नंबर मध्ये २८ किंवा ८२ असे नंबर असतील कुठेही लागोपाठ तर त्यातील २ नंबर चंद्राचा (माता/राणी/मन/स्त्री) आणि ८ नंबर शनी आहे.

इथे चंद्र आणि शनी युती होते म्हणून शनी चंद्र विषयोंग होत आहे. अशा व्यक्तींना आईला सुख देताना किंवा आईचे सुख घेताना त्रास पाहण्यात आला. ह्यांनी जरी पत्नीला सून म्हणून घरात आणली तरी ती आई ची सेवा करताना दिसत नाही मग कारणे हि वेगवेगळी असू शकतील. ती एकतर करिअर ने उत्तम असेल किंवा दुसरे काही. पैसा भरपूर मिळतो. पण अशा व्यक्तींना मानसिक त्रास असतोच. मात्र ह्यांच्या घरात भिंतींना तडे किंवा प्लास्टर पडलेले दिसते.

मोबाईल नूमरॉलॉजि: 34 किंवा 43

जर आपल्या मोबाईल नंबर मध्ये ३४ किंवा ४३ असे नंबर असतील कुठेही लागोपाठ तर त्यातील ३ नंबर गुरु आणि ४ राहु आहे.

इथे गुरु आणि राहु युती होते म्हणून आशा व्यक्ति आपल्या जीवनात नेहमी दुसऱ्याकडून फसविल्या जातात. मुले मोठी झाल्यावर विचारत नाहीत. किंवा मुलांकडून त्रास होतो. अशा व्यक्ती आपल्या मुलांबाळांकडून काहीही घेत सुद्धा नाहीत. स्वाभिमानी असतात. सेल्फ रिस्पेक्ट ह्यांच्यात असतोच.

मोबाईल नूमरॉलॉजि: 35 किंवा 53

जर आपल्या मोबाईल नंबर मध्ये ३५ किंवा ५३ असे नंबर असतील कुठेही लागोपाठ तर त्यातील ३ नंबर गुरुचा आणि ५ बुध आहे.

इथे गुरु आणि बुध युती होते म्हणून आशा व्यक्तीना पैसा मिळविताना त्रास दिसतो. किंवा मिळविलेला पैसा कमी पडत असतो नेहमी. अशा व्यक्तीची प्रगती वडिलांपासून लांब राहून दिसते. वडिलांबरोबर असताना ह्यांना करिअरमध्ये उतार पाहण्यात आले. ह्या व्यक्ती उच्च शिक्षण घेणाऱ्या दिसतात. किंवा नेहमी काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असतात.

मोबाईल नूमरॉलॉजि: 45 किंवा 54

जर आपल्या मोबाईल नंबर मध्ये ४५ किंवा ५४ असे नंबर असतील कुठेही लागोपाठ तर त्यातील ४ नंबर राहुचा आणि 5 बुध आहे.

इथे राहू आणि बुध युती होते म्हणून आशा व्यक्ती नेहमी आपल्या आयडिया लावत असतात. पण ह्या व्यक्ती नेहमी बंधनात असतात. म्हणजे अशी कामे ज्यात वेळ नेहमी पाळावीच लागते. अशा व्यक्तींच्या जीवनात कोर्ट केस येतात. किंवा अशा व्यक्ती हॉस्पिटल मध्ये काम करण्याऱ्या असतील. बहीण आणि पुत्री असेल तर त्याच्याशी संबंध बिघडलेले पाहण्यात आले. किंवा बहीण आणि पुत्री ह्या नेहमी शकतात असलेल्या दिसल्या. जा हेच ४ किंवा ५ अंक अशांच्या जन्मतारखेत असतील तर ह्याचे परिणाम जास्त पाहण्यात आले.

मोबाईल नूमरॉलॉजि: 46 किंवा 64

जर आपल्या मोबाईल नंबर मध्ये ४६ किंवा ६४ असे नंबर असतील कुठेही लागोपाठ तर त्यातील ४ नंबर राहुचा आणि शुक्राचा आहे.

इथे राहू आणि शुक्र युती होते अशा व्यक्तींना मोठ्या शारीरिक समस्या होण्याचे योग असतात. हेल्थ चे इशू नेहमी दिसतील. स्त्रियांना गर्भाशयाचे आजार पाहण्यात येतात. पैसा जास्त फुकट जातो. काही वेळा ह्यांना पाइल्स चा आजार सुद्धा होण्याचा संभव नाकारता येत नाही. हे काहीच नसेल तर अशा व्यक्तींचे बाहेरील संबंध असू शकतील.

मोबाईल नूमरॉलॉजि: 48 किंवा 84

जर आपल्या मोबाईल नंबर मध्ये ४८ किंवा ८४ असे नंबर असतील कुठेही लागोपाठ तर त्यातील ४ नंबर राहुचा आणि ८ शनी आहे.

इथे राहू आणि शनी युती होते अशा व्यक्तीच्या जीवनात मोठ्या मोठ्या आपत्ती अचानक येतात. किंवा अशा व्यक्तींकडे मोठी आजारपणे आलेली असतात. राहू शनी हा एक शापित योग असल्यामुळे शक्त्यतो मागे पुढे ४८ किंवा ८४ घेऊ नये. जास्त त्रास पाहण्यात आला.

जर आपल्या जन्मदिनांक मध्ये कुठेही हे अंक असतील किंवा मूलांक भाग्यांकाने ते अंक बनत असतील आणि आपल्या मोबाईल नंबर मध्ये हे नंबर येत असतील किंवा नसतील तर तो अंक घ्यायचा किंवा नाही हा निर्णय नूमरॉलॉजिस्टकडे जरूर चर्चा करून सोडावा.

आपल्या मोबाइल संबंधित अधिक माहिती साठी जरूर अपॉइंटमेंट घ्या आणि आपल्या तारखेप्रमाणे कोणते नंबर आपल्या मोबाईल मध्ये असले पाहिजेत ह्यावर चर्चा करा. किंवा निगेटिव्ह नंबर जर काढू शकत नाहीत आपण तर त्यावर उपाय करा. किंवा त्याची निगेटिव्ह बाजू जी असेल त्या गोष्टीची काळजी करून त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा.

श्री अंकवेद
श्री दत्तगुरु ज्योतिष
देवेंद्र कुणकेरकर
9821817768

Leave a Reply