You are currently viewing शिव – मला समजलेला तुमच्या घरातील अणि मनातील शिव

तुम्ही शिव उपासक आहात का ?

आपल्या घरात शिवपिंड आहे का ?

नसेल तरी आणायची इच्छा आहे का ?

मागच्या लेखात शिव हा संहारक शब्द जरी मी वापरलेला असला तरी ह्या भूलोकाची जबाबदारी काही अंशी शिवाकडे आहेच आणि ती खास चातुर्मासातील श्रावणात.

शिवपिंडीतून आलेली ऊर्जा हि आपण सहन करू शकत नाही. प्रकृतीत सुद्धा असे पाहायला मिळते कि जिथे जिथे शिवालये आहेत तेथे खूप ग्ल्यामरता नाही. सजावटी नाहीत , (एखादा अपवाद वगळता) त्याचे कारण हेच कि शिव हा त्याग आहे शिव हा मोक्ष आहे. वैराग्याची देवता आहे, स्वतः शिव कोणत्याही सुखासाठी रममाण नाही. म्हणून माझ्या मते कोणतीही शिव उपासना हि एका सांसारिक माणसाला वैराग्य दिल्याशिवाय राहत नाही. वैराग्य म्हणजे सर्व सुखाच्या गोष्टतून बाहेर येणे.

म्हणून जेव्हा जेव्हा एखाद्या सांसारिक माणसाला शिवउपासना करताना पहिले असेल तर त्यात एखादा अपवाद वगळता शिवउपासना करणारी व्यक्ती हि त्याला लागणाऱ्या सुखसोयी पासून दूर पळण्याचा प्रयत्न करेल.

म्हणूनच कदाचित जेव्हढे शिव साधक जंगलात रानात नागासाधु (शिव उपासक) हे ह्या नियमात मोडतात.

ह्याचा अर्थ असा नाही कि कोणीही आपल्या गरजा सुखसोयी घेताना अथवा संसार करताना शिवउपासना करू नये. पण केव्हा कशी करावी ह्याबद्दल काही नियम सांगितले आहेत ते पुढील प्रमाणे.

शिवउपासनेत आपापल्या सुखसोयींचा त्याग करून लिन होण्याचा प्रकार आहे . ह्यात सर्व स्त्रिया अपवाद आहेत कारण पार्वतीने सुद्धा शिवप्राप्तीसाठी स्वतःच्या सुखासाठी शिव उपासना केली होती.

श्रावणात खूप शिव उपासना करून त्याचा आशीर्वाद घ्यावा. पण जर नियमित शिव उपासना करताना कोणत्याही एका शक्तीची उपासना जरूर करावी (अर्थात देवी उपासना) नंतर शिवउपासना चालेल.

हा देव स्मशान देवता म्हणून प्रतीक मानला जातो म्हणून कोणत्याही सांसारिक व्यक्तीने स्वतःच्या घरात शिवपिंड बसवू नये असे मला वाटते कारण तिथे जर वेगळे घरातील देवालय असेल जसे पूर्वी च्या घरातून होते तर काही हरकत नाही पण जर एकाच घरात जिथे तुम्ही झोपता सांसारिक गरजा पूर्ण करता तेथे ह्या पिंडीमधून सतत निघणारी ऊर्जा त्या वातावरणाला राख बनवून सोडण्यास कारण ठरेल आणि घराचे स्मशान म्हणजे तेथे सांसारिक उत्साह कमी दिसेल. असे माझे स्वतःचे मत आहे.

काही शिव उपासकांना ह्याबद्दल माझा खूप तिरस्कार वाटेल पण हे सत्य तुम्ही चेक करूनच टिपणी द्या.

शिव उपासनेत आपल्या चुका

काही सांसारिक व्यक्तींना कुठेही तीर्थस्थळी गेले तर एखादी पिंडी उचलून आणण्याची सवय असते आणि ते आपल्या देवालयात त्याची स्थापना सुद्धा करतात. नंतर त्याची सेवा हि मनाला वाटेल तशी करतात. (ह्यात सर्वच येत नाहीत).

लक्षात घ्या तुम्ही आणलेली शिवपिंडी जर सुखी / कोरडी राहिली तर त्यातून निघणारी ऊर्जा हि तुम्ही सहन करू शकत नाही म्हणून शिवालयात ह्या देवतेवर सतत पाणी पडेल असे कमंडलू ची व्यवस्था असते.

घरातील शिव पिंडी ची शिव उपासना

मी असे इथे तुम्हाला काहीही चुकीचे देणारच नाही कि ज्याने तुम्ही शिव उपासना घरात करणार नाही. त्याची पद्धती हि समजून घ्या—

शिव पिंड असलेल्या घरात रोज त्यावर पाणी अर्थात गंगाजल , दूध , मध , पंचामृत ह्या कोणत्याही साधनेने रोज अभिषेक करणे महत्वाचे आहे. जर हे रोज जमले नाही तर निदान पिंडीवर चंदनाचा लेप करून ठेवणे आणि त्यावर शक्य असल्यास बेलपत्र अर्पण करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. कारण बेल आणि चंदन ह्या दोन्ही गोष्टी शीतलतेचे प्रतीक आहेत. एखाद्याची ऊर्जा शीतल करण्यासाठी ह्याचा खास उपयोग होतो.

शिव उपासक असाल तर

मुख्य म्हणजे सांसारिक व्यक्तीला घरात पारद शिवलिंग , स्फटिक शिवलिंग , किंवा चांदीचे शिवलिंग ठेवण्यास हरकत नाही. कारण ह्या तिन्ही धातू मध्ये एक प्रकारचा थंडावा असतो.

पण त्यातही सेवा हि वरीलप्रमाणेच असावी.

आणखी काही सेवेचे नियम –

  • शिव उपासना घरात करताना आपण नेहमी ॐ नमः शिवाय हा जाप करत असतो. हा आपण शिव पंचाक्षरी मंत्र मानतो. 
  • पण हा मंत्र शिवाचा आहे हे लक्षात घ्या. त्यात जो ॐ आहे त्यात साधकाला पूर्ण लिन राहून संपूर्ण प्राणिमात्राला संरक्षण देणारा आहे आणि पुढे शिव पंचाक्षरी मंत्र आहे. नमः शिवाय.

ह्याबद्दल माझे मत –

तसे सर्व देवदेवतांच्या मंत्रात आधी ॐ असतोच. पण शिव मंत्राला ॐ लावताना काळजी घ्यावी लागेल कारण आपण स्वतःसाठी हा ॐ लावून केलेला मंत्र थोडा वैराग्य देईल.

ॐ केव्हा —तुम्ही समाजाच्या रक्षणासाठी , तुम्ही साधू बनून वैराग्यात असताना , तुम्ही NGO (सामाजिक) कार्य करताना, 

तुम्ही एका  विशिष्ट वयातून बाहेर आल्यावर (म्हणजे ओल्ड एज) मध्ये ॐ लावण्यास हरकत नाही. पण तुम्ही सुखसोयींच्या मागे धावताना ॐ लावून मंत्र म्हणत असाल तर मात्र त्यात वैराग्यता येईलच.

हे वरील नियम फक्त घरातील शिव उपासनेसाठी आहेत. 

सांसारिक व्यक्तीला शिवालयात शिव उपासना करताना वरील कोणतेही नियम नाहीत. (जास्त भीती नको)

घरातील देवांसाठी पूजेचे खास नियम

घरातील देव हे फोटो  रूपातच  ठेवण्याची  रीती  हि  आली कारण तेव्हढी षोडोपचार पूजा करण्यासाठी वेळ नाही सध्या.

सांसारिक व्यक्तींच्या देव्हाऱ्यात जर मुर्त्या वगैरे असतील तर त्यांना स्नान वस्त्र धूप दीप नैवेद्य हे नित्याने झालेच पाहिजे. 

त्यात तुम्ही जर शिव पिंड बसवलीय तर रोज किंवा निदान शिवरात्रि आणि सोमवारी तरी त्याला भाताच्या खिरीचा नैवेद्य हा दाखविलाच पाहिजे असे माझे मत आहे.

शिव रुद्राक्षाबद्दल सुद्धा माझे मत हेच आहे.

रुद्राक्ष जे जे घालतात एका विशिष्ट तरुण वयात , संसार करताना , त्याचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते कि ते जास्त संसाररूपी जबाबदारीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. 

ह्यावर मी लिहेन पण थोड्या वेळाने कारण रुद्राक्ष मार्केट मध्ये उगाच हाहाकार नको सध्या. चालतेय तसे चालू देत. पण खरोखर रुद्राक्षाचा खूप उपयोग आहे सध्या त्यावरील माझा अभ्यास हा कमी पडेल. पाहू पुढे.

ज्यांनी घरातील शिव पिंड आधीपासून ठेवली आहे त्यांना एकच विनंती आहे कि हा लेख वाचून जास्त टेंशन घेऊ नका. त्या देवतेची रोज उपासना करा आणि खास श्रावणात. म्हणजे आत्तापर्यंत केलेल्या चुकांवर पांघरून पडेल अशी अशा बाळगू.

विशेष नोट –

तुम्ही फार मोठी चूक केली नाही असे मला वाटते याचे कारण कोणत्याही औषधाचा चुकीचा उपायोग हा जसा एलर्जी कडे घेऊन जातो तसाच तो नियम इथेही आहे.

 म्हणून ह्या श्रावणात कुणाला जर शिव पिंड घरात आणून साधना करावी असे वाटत असेल तर वरचा लेख पूर्ण वाचा आणि निदान पहिल्या श्रावणी सोमवारी त्याची सुरुवात करा.

ज्यांना जुन्या शिवलिंग बदलायचे असेल त्यांनी पारद शिवलिंग जरूर घ्या आणि जुने शिवलिंग पिंपळाच्या खाली त्याची पूजा करून ठेऊन द्या. (पाण्यात विसर्जन करू नका. ह्या देवतेला पाण्यात विसर्जन करता येत नाही.)

इथे लगेच पारद शिवलिंगाबद्दल माहिती देत नाही कारण पारद शिवलिंग जे जे काही तुम्हाला देईल हे पुढच्या लेखात वाचाल तर ते आणून घरी बसविण्याचा मोह आवरता येणार नाही तुम्हाला.

पण पारद शिवलिंग – स्फटिक शिवलिंग – चांदीचे शिवलींग घरात बसविण्यास हरकत नाही वरील नियम मात्र पाळावे लागतील.

अजून ह्यावर माझ्या माहितीत ला प्रकाश टाकेन. सध्या एव्हढेच.

पुढील लेखात पारद शिवलिंग माहिती देण्यात येईल.

धन्यवाद.

This Post Has One Comment

  1. Jayashree Nalawade chiplun

    Suberb very useful information 👍👌👌👌👌👍

Leave a Reply