You are currently viewing तुमचा विवाह कुणाबरोबर होण्याचा संभव असतो

जर आपल्याला असा प्रश्न असेल कि माझा विवाह हा कोणत्या राशीशी होऊ शकतो तर खाली दिलेली माहिती हि आपल्याला काही मदत करू शकेल. (WHO WILL BE YOUR SPOUSE?)

सूत्र क्रमांक १

सप्तम भावात कोणती राशी लिहिली आहे ती पहा त्या राशीचा मालक लिहून घ्या. आता त्या राशीचा मालक कोणत्या राशीत उच्च होतो किंवा नीच होतो त्या दोन्ही राशी लिहा.
उदाहरण —

 • जर सप्तमात १ किंवा ८ असेल तर त्या राशीचा मालक मंगळ होईल आणि मंगळ हा मकर राशीत उच्च होतो आणि कर्क राशीत नीच होतो –मकर आणि कर्क राशीशी विवाह होऊ शकेल.
 • जर सप्तमात २ किंवा ७ असेल तर त्या राशीचा मालक शुक्र होईल आणि शुक्र हा मीन राशीत उच्च होतो आणि कन्या राशीत नीच होतो –मीन किंवा कन्या राशीशी विवाह होऊ शकेल.
 • जर सप्तमात ३ किंवा ६ असेल तर त्या राशीचा मालक हा बुध होईल आणि बुध हा कन्या राशीत उच्च होतो आणि मीन राशीत नीच होतो म्हणून कन्या किंवा मीन राशीशी विवाह होऊ शकेल.
 • जर सप्तमात ४ आकडा असेल तर ती कर्क राशी आहे आणि कर्क राशी चा मालक हा चंद्र वृषभ राशीत उच्च होतो आणि वृश्चिक राशीत नीच होतो म्हणून ह्या दोन्ही राशींशी विवाह होऊ शकतो.
 • जर सप्तमात ५ आकडा असेल तर ती सिंह राशी आहे आणि सिंह राशीचा मालक हा रवी मेष राशीत उच्च होतो आणि तुला राशीत नीच होतो म्हणून ह्या दोन्ही राशीशी विवाह होऊ शकेल.
 • जर सप्तमात ९ किंवा १२ असेल तर ती गुरुची धनु आणि मीन राशी असेल — गुरु हा कर्क राशीत उच्च होतो आणि मकर राशीत नीच होतो म्हणून कर्क राशी आणि मकर राशीशी विवाह होऊ शकतो.
 • जर सप्तमात १० किंवा ११ असेल तर ती शनीची मकर आणि कुंभ राशी असेल — शनी हा तुला राशीत उच्च आणि मेष राशीत नीच होतो.

सूत्र क्रमांक २

सप्तमात जी राशी लिहिली असेल तीच राशी जोडीदाराची होऊ शकते.

 • १ किंवा ८ असेल तर मेष किंवा वृश्चिक
 • २ किंवा ७ असेल तर वृषभ आणि तुला
 • ३ किंवा ६ असेल तर मिथुन किंवा कन्या
 • ४ असेल तर कर्क
 • ५ असेल तर सिंह
 • ९ किंवा १२ असेल तर धनु आणि मीन
 • १० किंवा ११ असेल तर मकर आणि कुंभ

सूत्र क्रमांक ३

सप्तमात जो राशी अंक असेल त्या राशीचा मालक ज्या राशी अंकात बसला असेल ती राशी जोडीदाराची होऊ शकते.

उदाहरण — पत्रिकेत १ किंवा ८ असेल तर सप्तमाचा मालक मंगळ झाला आता मंगळ कुठे बसला असेल ते पहा तो ज्या आकड्याबरोबर लिहिला असेल त्या राशी च्या व्यक्तीशी तुमचा विवाह होऊ शकेल

सूत्र क्रमांक ४

मुलाच्या कुंडलीत शुक्र ज्या राशीत बसला असेल त्या राशी ची मुलगी मिळेल
आणि मुलीच्या कुंडलीत गुरु ज्या राशीत बसला असेल त्या राशीचा मुलगा मुलीला मिळू शकेल.

सूत्र क्रमांक ५

लग्न स्थानाचा मालक (प्रथम स्थान) ज्या राशीत बसला असेल त्या राशीशी विवाह होऊ शकेल
उदाहरण — जर प्रथम स्थानी ३ किंवा ६ लिहिले असेल तर मिथुन आणि कन्या राशीचा मालक हा बुध होतो तर बुध कुठे बसला असेल त्या क्रमांकाच्या राशीशी आपला विवाह होऊ शकेल.

सूत्र क्रमांक ६

आपल्या स्वतःच्या राशीपासून ७ वि राशी शी विवाह होऊ शकतो

वरील सर्व सूत्रांमध्ये गुणमिलन नक्षत्र मिलन करूनच निर्णय घ्यावा.

खाली एक कोष्टक देत आहे वरील माहिती वाचताना त्यात आपल्याला राशीचे कोण मालक आहेत त्या राशी चे मालक कोणत्या राशीत उच्च किंवा नीच होतात हे पाहू शकाल.

राशीचा क्रमांकराशीचे नावराशीचा मालकउच्च राशीनीच राशी
मेषमंगळमकरकर्क
वृषभशुक्रमीनकन्या
मिथुनबुधकन्यामीन
कर्कचंद्रवृषभवृश्चिक
सिंहरवीमेषतुला
कन्याबुधकन्यामीन
तुलाशुक्रमीनकन्या
वृश्चिकमंगळमकरकर्क
धनुगुरुकर्कमकर
१० मकरशनीतुलामेष
११ कुंभशनीतुलामेष
१२ मीनगुरुकर्कमकर

धन्यवाद…..!

Leave a Reply