You are currently viewing राहू राशी परिवर्तन २०२२ सिंह राशी / सिंह लग्न

राहू राशी परिवर्तन २०२२ सिंह राशी / सिंह लग्न- RAHU/KETU TRANSIT FOR SINHA RASHI / SINHA LAGNA

राहू/केतू परिवर्तन २०२२

वरील लिंक मध्ये ज्या प्रमाणे महत्वाचे पॉईंट राहू केतूच्या बदलाचे दिले आहेत त्याच प्रमाणे फक्त आता इथे सिंह राशी आणि सिंह लग्न ह्यावर राहू केतू च्या भ्रमणाचा (भासमानाचा) विचार करू.

राहू राशी परिवर्तन २०२२ सिंह राशी / सिंह लग्न
राहू राशी परिवर्तन २०२२ सिंह राशी / सिंह लग्न

सिंह राशी आणि सिंह लग्न म्हणजे आपली राशी जरी सिंह नसली पण लग्न सिंह असेल तर किंवा आपले लग्न सिंह नसले पण राशी सिंह असली तर खाली दिलेले विवेचन हे आपल्या साठी असेल.

सिंह राशि अणि सिंह लग्नाच्या पत्रिकेत राहु भाग्य स्थानी १८ महिने मेष राशीत असेल. आणि केतू तृतीय स्थानी तुला राशीत असेल भाग्य आणि पराक्रम स्थानातील जी जी फळे आहेत ती ती फळे ह्या जातकांना मिळतील त्यांच्या प्रत्येक सुरु असलेल्या क्षेत्राशी निगडित व्यवहार आणि आचारविचार असतील.

विद्यार्थ्यांना — राहू भाग्यात आणि पंचमेश गुरु अष्टमात बऱ्याच अडचणींना सामना करावा लागेल. काहींच्या शिक्षणात व्यत्यय दिसू शकतो मेहनत करावी हा सल्ला. बाहेर जाऊन शिक्षण घेण्यास योग्य आणि चांगले परिणाम सुद्धा दिसतील.

करिअर क्षेत्रातील वयातील जातकांना भाग्यात येणार राहू काही अंशी नशिबाची साथ देताना कठीण. जे जे आपल्या जन्मस्थानी आहेत त्यांना बराच सामना करावा लागेल. जन्म स्थनापासून लांब असतील त्यांना मोठ्या संधी मिळतील आणि काही बदल कराल स्वतःच्या भाग्योदयासाठी.

पराक्रमात केतू बऱ्याच संधींच्या मागे लागाल आणि त्यासाठी खूप प्रयत्न कराल. इथून तिथून कोठूनही स्वतःच्या पराक्रमासाठी प्रयत्नशील असाल. एखादे घर जागा जमीन विकण्याचा योग किंवा घरापासून लांब जाण्याचा योग आहे.

राहू केतू नक्षत्रीय फळ

 • १२/४/२०२२ ते १५/६/२०२२ पर्यंत राहू मेष राशीतल्या कृतिका नक्षत्राचे फळ देणार आहे. तेव्हा सिंह राशी किंवा लग्न च्या व्यक्तींना ह्या काळात स्वतःला प्रेझेंट करण्यासाठीची धावपळ असेल. आत्तापर्यंत ज्या विषयासाठी आपण गप्प होतात त्यासाठी आत्ता ऍक्टिव्ह व्हाल आणि कामाला लागाल. काही जणांच्या आरोग्यासाठी इथे त्रास होण्याची चिन्हे आहेत ज्यांना आधीपासून काही आरोग्यविषयक अडचणी होत्या.
 • १५/६/२०२२ ते २१/२/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या भरणी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे सिंह राशी किंवा सिंह लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे मिळेल. हा काळ पराक्रम दाखविण्याचा काळ असेल. आपल्याला जे जे येते ते ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रेझेंट करावेसे वाटेल. पैसा मिळेल. जर व्यवसायिक असाल तर हाच काळ मोठा बदल करवून देईल.
 • २१/२/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या अश्विनी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे सिंह राशी किंवा सिंह लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे असेल. ह्या कालावधीत आपण जर घरापासून दूर असाल तर नवीन संधी मिळतील. पण हाच काळ स्वतःच्या नशिबाशी लढा देणारा सुद्धा असेल. मोठ्या मोठ्या व्यक्तींशी संपर्कात याल. आणि मोठे निर्णय घेऊन नवीन काहीतरी सुरु करण्याच्या मार्गावर असाल
 • केतू तुला राशीत १२/४/२०२२ पासून ते १८/१०/२०२२ पर्यंत विशाखा नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे सिंह राशी/लग्न च्या व्यक्तींना इथे भावंडांसाठी काहीतरी धावपळ करताना दिसाल. पत्नीच्या तब्येतीसाठीची आधीची घटना असेल तर कॉन्फयुज्ड होण्याचा हा कालावधी असेल. संतती साठी कोणतेही प्रयत्न नको. पारिवारिक क्लेश आधीपासून असतील तर जपावे.
 • केतू तुला राशीत १८/१०/२०२२ पासून ते २६/६/२०२३ पर्यंत स्वाती नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे हाच काळ बराच पैसे मिळवून देणारा कालावधी असेल जर व्यवसाय करत असाल तर हाच काळ धावपळीसह योग्य असेल. नोकरी करणार्यांना प्रमोशन होऊन ट्रान्सफर मिळेल. जवळ बदली झाली तर मात्र प्रमोशन नाही.
 • केतू तुला राशी २६/६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत चित्रा नक्षत्राचे फळ देणार आहे. इथे बऱ्याच सिंह राशी किंवा लग्न वाल्याना भाग्याशी झगडण्याचा काळ असेल. आधीच्या कोर्ट केस असतील तर त्यात आपल्या बाजूने इथे निर्णय मिळताना कठीण होईल. सिन राशी किंवा लग्नाच्या लोकांना आरोग्याचे त्रास इथे जाणवू शकतील ज्यांना उच्च रक्तदाब असेल त्यांनी विशेष काळजी घ्यावी.

उपाय —सिंह लग्न आणि राशीच्या व्यक्तींनी राहू बदलासाठी उपाय म्हणून रोज एक माळा रोज गायत्री मंत्र जाप करावा. आणि सूर्य आदित्य स्तोत्राचे वाचन करावे.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

 1. Mayur Pise

  what if Rashi is simha and lagna is kark
  what predictions will come?

Leave a Reply